भानुदास म्हणे

अनादि परब्रह्मा जें कां निजधाम । तें ही मूर्तिं मेघः श्याम विटेवरी ॥१॥

जें दुर्लभ तिहिं लोकां न कळे ब्रह्मादिकां । तपें पुंडलिका जोड़लेंसे ॥२॥

जयातें पहातं श्रुती परतल्या नेति नेति । ती हे परब्रह्मा मूर्तिं विटेवरी ॥३॥

वेदं मौन्य पड़े श्रुतीसी सांकड़े । वर्णितां कुवाड़ें पुरणांसी ॥४॥

ज्ञानियांचें ज्ञान मुनीजनांचे ध्यान । ते परब्रह्मा निधान विटेवरी ॥५॥

पुंडलिकाचे तपें जोडलासे ठेवा । भानुदास देवा सेवा मागे ॥६॥

अद्वय आनंद तो हा परमानंद । शोबहे सच्चिदानंद विटेवरी ॥१॥

सांवळें रूपडें गुणा आगोचर । उभा कटीं ठेऊनी विटे ॥२॥

पीतांबर परिधान चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥३॥

भानुदास म्हणे ब्रह्मा अगोचर । नेणवे विचार ब्रह्मादिकां ॥४॥

१०

वेदीं संगितलें श्रुतिं अनुवादिलें । तें ब्रह्मा कोंदलें पढंरीये ॥१॥

वाळंवंटीं बुंथीं श्रीविठठ्लनामें । सनकादिक प्रेमें गाती जया ॥२॥

भानुदास म्हणे तो हरि देखिला । हृदयीं सांठविला आनंदभरित ॥३॥

११

चंद्रभागेतीरीं उभा विटेवरी । विठ्ठल राज्य करी पंढरीये ॥१॥

ऋद्धिसिद्धि धृति वोळंगती परिवार । न साहती अवसर बह्मादिकां ॥२॥

सांडोनि तितुलें यथाबीजें केलें । कवणें चाळविलें कानडीयासी ॥३॥

उष्णोदक मार्जन सुगंधचर्चन । भीवरा चंदन पाट वाहे ॥४॥

रंभा तिलोत्तमा ऊर्वशी मेनिका । कामारी आणिका येती सर्वे ॥५॥

कनकाचे परयेंळीं रत्नाचे दीपक । सुंदर श्रीमुख ओवाळिती ॥६॥

संत भागवत सकळ पारुषले । निःशब्द होऊनि ठेले तुजविण ॥७॥

रुक्माबाई ती जाहलीसे उदार । पुंडलीअका कैसे पंडिले मौन ॥८॥

येसी तरी येई पंढरीच्या राया । अगा कृपावर्या पांडुरंगा ॥९॥

धन्य पंढरपूर विश्रांती माहेर । धन्य भीमातीर वाळुवंट ॥१०॥

भानुदास म्हणे चला आम्हांसवें । वाचा ऋन देव आठवावें ॥११॥

१२

जैसा उपनिषदंचा गाभा । तैसा विटेवरी उभा । अंगीचिया दिव्य प्रभा । धवळिलें विश्व ॥१॥

उगवती या सुरज्या । नवरत्नेंव बांधू पूजा । मुगुटीं भाव पैं दुजा । उपमा नाहीं ॥२॥

दोन्हीं कर कटीं । पीतांबर माळ गांठी । माळ वैजयंती कंठीं । कौस्तुंभ झळके ॥३॥

कल्पदुम छत्राकार । तळीं त्रिभंगीं बिढार । मुरली वाजवी मधुर । श्रुति अनुरागें ॥४॥

वेणुचेनि गोडपणें । पवन पांगुळला तेणें । तोही निवे एक गुणें । अमृतधारीं ॥५॥

अहो लेणियाचे लेणें । नादसुखासी पैं उणें । विश्व बोधिले येणें । गोपाळवेषें ॥६॥

पुंडलिकाचेनि भावें । श्रीविठ्ठला येणें नावें । भानुदास म्हणे दैवें । जोडले आम्हां ॥७॥

१३

शंख चक्र गदाधरु । कासे सुरंग पीतांबरु । चरणीं ब्रीदाचा तोडरु । असुरावरी काढितसे ॥१॥

बरवा बरवा केशिराजु । गरुडवहन चतुर्भूजु । कंठी कौस्तुभ झळके बिजु । मेघःशाम देखोनी ॥२॥

करी सृष्टिची रचना । नाभी जन्म चतुरानाना । जग हें वाखाणी मदना । तें लेंकरुं तयाचें ॥३॥

कमळा विलासली पायीं । आर्तं तुळशीचे ठायीं । ब्रह्मादिकां अवसरु नाहीं । तो यशोदे वोसंगा ॥४॥

उपमा द्यावी कवणे अंगा । चरणीं जन्मली पै गंगा । सोळा सहस्त्र संभोगा । नित्य न पुरती कामिनी ॥५॥

आधिष्ठान गोदातीरीं । श्रुद्धिसिद्धि तिष्ठती द्वारीं । भानुदास पूजा करी । वाक् पुष्पें अनुपम्य ॥६॥

१४

लावण्य रुपड़े पहा डोळेभरी । मूर्ति हे गोजिरी विटेवरी ॥१॥

राही रखुमाई सत्यभामा आई । गरुड हनुमंत ठायीं उभे असती ॥२॥

चंद्रभागा तीर्थ पुंडलीक मुनी । दक्षिणवाहिनी शोभतसे ॥३॥

वेणुनादीं काला गोपाळ करिती । भानुदासा तृप्ति पाहूनिया ॥४॥

१५

देखितांचि रूप विटेवरी गोजिरें । पाहतां साजिरें चरणकमळ ॥१॥

पाहतां पाहतां दृष्टीं धाये जेणें । वैकुंठीचें पेणें सहज हातीं ॥२॥

भानुदास म्हणे लावण्य पुतळा । देखियेल डोळा पांडुरंग ॥३॥

१६

चतुर्भुज मूर्ति लावण्य रुपड़े । पाहतां आवडे जीवा बहू ॥१॥

वैंजयंती माळा कीरीट कुंडलें । भुषण मिरवलें मकराकार ॥२॥

कासे सोनसळा पितांबर पिवळा । कस्तुरीचा टिळा शोभे माथे ॥३॥

शंख चक्र हातीं पद्म तें शोभलें । भानुदासें वंदिलें चरणकमळ ॥४॥

१७

गोंड साजिरें रूपस । उभा आहे हृषिकेश । योगी ध्याती जयास । तो हा सर्वेश साजिरा ॥१॥

रूप मंडीत सगुण । शंख चक्र पद्म जाण । गळा वैजयंती भूषण । पीतांबर मेखळा ॥२॥

कस्तुरी चंदनाचा टिळा । मस्तकीं मुकुट रेखिला । घवघवीत वनसावळा । नंदरायाचा नंदनु ॥३॥

हरूषे भानुदास नाचे । नाम गातसे सदा वाचे । प्रेम विठोबाचें । अंगीं वसे सर्वदा ॥४॥

१८

उन्मनीं समाधीं नाठवे मनासी । पहातां विठोबासी सुख बहु ॥१॥

आनंदाआनंद अवघा परमानंद । आनंदाचा कंद विठोबा दिसे ॥२॥

जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे । पाहतां साठवे रूप मनीं ॥३॥

नित्यता दिवाळी नित्यता दसरा । पाहतां साजिरा विठ्ठलदेव ॥४॥

भानुदास म्हणे विश्रांतींचें स्थान । विठ्ठल निधान सांपडलें ॥५॥

१९

जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥१॥

जन्मोनी संसारीं जाहलों त्यांचा दास । माझा तो विश्वाचा पांडुरंगीं ॥२॥

आणिका दैवता नेघे माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥३॥

भ्रमर मकरंदा मधासी ती माशी । तैसें या देवासी मन माझें ॥४॥

भानुदास म्हणे मज पंढरीची न्या रे । सुखें मिरवा रे विठोबासी ॥५॥

२०

आलों दृढ धरुनी जीवीं । तो गोसावी भेटला ॥१॥

जन्ममरण हरला पांग । तुटला लाग प्रपंच ॥२॥

इच्छा केली ती पावलों । धन्य जाहलों कृतकृत्य ॥३॥

भानुदास म्हणे देवा । घ्यावी सेवा जन्मोजन्मीं ॥४॥

२१

वेदशास्त्राचें सार । तो हा विठ्ठल विटेवर ॥१॥

पुढें शोभे चंद्रभागा । स्नाने उद्धार या जगा ॥२॥

पद्मतळें गोपाळपुर । भक्त आणि हरिहर ॥३॥

भानुदास जोडोनी हात । उभा समोर तिष्ठत ॥४॥

Savata mali abhang

संत सावता माळी यांचे अभंग
१.
ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥
करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥
कष्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥ ३ ॥
माळी सावता मागे संतान । देवा करी गा निःसंतान ॥ ४ ॥
२.
कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥
दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥ २ ॥
आशा मोह माया लागलीसे पाठीं । काळ क्रोध दृष्टी पाहतसे ॥ ३ ॥
सावता म्हणे देवा नका ठेऊं येथें । उचलोनी अनंते नेई वेगीं ॥ ४ ॥
३.
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥
लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥ ३ ॥
सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥ ४ ॥
४.
आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥ १ ॥
आह्मा हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलवाडा ॥ २ ॥
शांति शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥ ३ ॥
सावतानें केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥ ४ ॥
५.
नको तुझें ज्ञान नको तुझा मान । माझें आहे मन वेगळेची ॥ १ ॥
नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति । मज आहे विश्रांती वेगळीच ॥ २ ॥
चरणीं ठेउनि माथा विनवितसे सावता । ऐका पंढरीनाथा विज्ञापणा ॥ ३ ॥

पैल पहाहो परब्रह्म भुललें । जगदीश कांहो परतंत्र झालें ॥ १ ॥
काया सुख केलें येणें नेणिजे कोण भाग्य गौळीयाचें वर्णिजे ॥ २ ॥
आदि अंतू नाहीं जया व्यापका । माया उखळी बांधिला देखा ॥ ३ ॥
सर्व सुखाचें सुख निर्मळ । कैसें दिसताहे श्रीमुखकमळ ॥ ४ ॥
योगियां ह्रदयमकळींचें हें निधान । दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण ॥ ५ ॥
सावत्या स्वामी परब्रह्म पुतळा । तनुमनाची कुरवंडी ओंवाळा ॥ ६ ॥
७.
मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी । आठवावें संतासी हेंचि खरें ॥ १ ॥
पूर्ण भक्त आह्मां ते भक्ती दाविती । घडावी संगती तयाशींच ॥ २ ॥
सावता म्हणे कृपा करी नारायणा । देव तोचि जाणा असे मग ॥ ३ ॥
८.
भली केली हीन याति । नाही वाढली महंती ॥ १ ॥
जरी असतां ब्राह्मण जन्म । तरी हें अंगीं लागतें कर्म ॥ २ ॥
स्नान नाहीं संध्या नाहीं । याति कुळ संबंध नाहीं ॥ ३ ॥
सावता म्हणे हीन याती । कृपा करावी श्रीपती ॥ ४ ॥
९.
विकासिला नयन स्फुरण आलें बाहीं । दाटले ह्रदयीं करुणाभरितें ॥ १ ॥
जातां मार्गी भक्त सावता तो माळी । आला तया जवळी पांडुरंग ॥ २ ॥
नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळिया भीतरीं गेला देव ॥ ३ ॥
माथा ठेऊनि हात केला सावधान । दिलें आलिंगन चहूं भुजीं ॥ ४ ॥
चरणीं ठेऊनि माथा विनवितो सावता । बैसा पंढरीनाथा करीन पूजा ॥ ५ ॥
१०.
समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥ १ ॥
कोणे दिवशीं बसून याचीं मन । कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।
कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण । कोठें साठवावें ॥ २ ॥
कोणे दिवशीं यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन । एकटें रहावें ॥ ३ ॥
कोणे दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥
११.
नामाचिया बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥ १ ॥
वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाऊनी नाचो रंगीं ॥ २ ॥
सुखाचा सोहळा करुनी दिवाळी । प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं ॥ ३ ॥
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा । तेणें भक्तिद्वार वोळंगती ॥ ४ ॥
१२.
उठोनी प्रातःकाळीं करूनियां स्नान । घालुनि आसन यथाविधी ॥ १ ॥
नवज्वरें देह जाहालासे संतप्त । परि मनीं आर्त विठोबाचें ॥ २ ॥
प्राणायाम करूनी कुंभक साधिला । वायु निरोधिला मूळ तत्त्वीं ॥ ३ ॥
शके बाराशें सत्रा शालिवाहन शक । मन्मथ नामक संवत्सर ॥ ४ ॥
ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी । आला उदयासी सहस्त्र कर ॥ ५ ॥
सावता पांडुरंगीं स्वरूपीं मीनला । देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥ ६ ॥

काही निवडक अभंग

  • · ॐ नमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥ तुमचा अनुग्रह लाधलों । पावन जालों चराचरीं ॥२॥ मी कळाकुसरी काहींच नेणें । बोलतों वचनें भाविका ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥
  • · अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति । मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥१॥ पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोवा ॥२॥ तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दाराशी ॥३॥ तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेर ॥४॥
  • · अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥१॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥२॥ विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥३॥ तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥४॥
  • · अबीर गुलाल उधळीत रंग | नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन । रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन । पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥ वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू । चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ । विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती । पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥
  • · अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥ सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥ कीर्तनीं बैसतां निद्रें नागविलें । मन हें भुललें विषयसुखा ॥३॥ हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥
  • · अर्थ इतकाचि साधिला । वेद अनंत बोलिला॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावे ॥२॥ सकळ शास्त्रांचा विचार । अंती इतुकाची निर्धार ॥३॥ अठरा पुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥४॥
  • · अलंकपुरासी पांडुरंग गेले | समाधिस्त केले ज्ञानदेवा ॥ उरकोनी सोहाळा सखे संत मेंळा | विठोबा राहिला आळंदीस ॥ पाहे चक्रपाणी नामा डोळा पाणी | कंठ हा दाटोनी उभा राहे ॥ पुसे लक्ष्मीकान्त का रे तू निवांत | नामा शोकाक्रांत कोण दुखी .
  • · आजि संसार सुफ़ळ झाला गे माये । देखियेले पाय विठोबाचे ॥१॥ तो मज व्हावा तो मज व्हावा । वेळोवेळां व्हावा पांडुरंग ॥२॥ बापरखुमादेविवरु न विसंबे सर्वथा । निवृत्तीने तत्त्वतां सांगितलें ॥३॥
  • · आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥ भाग गेला शीण गेला । अवघा जाला आनंदु ॥ध्रु.॥ प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥ तुका म्हणे आम्हां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥३॥
  • · आतां तरी पुढे हाचि उपदेश । नका करुं नाश आयुष्याचा ॥१॥ सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥२॥ हित तें करावें देवाचे चिंत्तन । करुनियां मन शुद्ध भावें ॥३॥ तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फ़ार शिकवावें ॥४॥
  • · आम्हा घरीं धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ॥१॥ शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दे वाटुं धन जनलोका ॥२॥ तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देचि गौरव पूजा करुं ॥३॥
  • · आरंभी वंदीन अयोध्येचा राजा | भक्ताचिया काजा पावतसे ॥१॥ पावतसे महासंकटी निर्वाणी | रामनाम वाणी उच्चारीता ॥२॥ उच्चारिता नाम होय पापक्षय | पुण्याचा निश्चय, पुण्यभूमी ॥३॥ पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे| पापिया नाठवे काही केल्या ॥४॥ काही केल्या तुझे मन पालटेना| दास म्हणे जना,सावधान ॥५॥
  • · आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहतां लोचन सुखावले ॥१॥ आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥२॥ लांचावलें मन लागलीसे गोडी । ते जीवें न सोडी ऐसें झालें ॥३॥ तुका म्हणे आम्हीं मागावें लडिवाळी ।पुरवावी आळी मायबापें ॥४॥
  • · इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची । ज्ञानियाचा राजा भोगतो जाणीव नाचती वैष्णव मागे पुढे मागे पुढे ॥१॥ मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे ॥२॥ विठ्ठलाऽऽऽ मायबापऽऽऽ उजेडी राहिले उजेड होऊनी निवृत्ति सोपान मुक्ताबाई ॥३॥
  • · उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त बाळाजवळी ठेवूनियां ॥१॥ तैसें माझें मन राहो कां ईश्वरीम । मग सुखें संसारीं असेना का ॥२॥ धेनु चरे वनीं वच्छ असे घरीं । चित्त वच्छावरी ठेवूनियां ॥४॥ विष्णुदास नामा विनवी परोपरी । हें प्रेम श्रीहरी द्यावें मज ॥५॥
  • · उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥१॥ ऐसी चंद्रभागा ऐसा भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ॥२॥ ऐसे संतजन ऐसे हरिदास | ऐसा नामघोष सांगा कोठे ॥३॥ तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे | पंढरी निर्माण केली देवे ॥४॥
  • · ऎसा ज्याचा अनुभव । विश्‍वदेव सत्यत्वें ॥१॥ देव तयाजवळी असे । पाप नासे दर्शनें ॥२॥ काम क्रोधा नाहीं चाली । भूतीं झाली समाता ॥३॥ तुका म्हणॆ भेदा-भेद । गेला वाद खंडोनी ॥४॥
  • · एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम । आणिकाचे काम नाही तेथे । मोडूनीया वाटा सूक्ष्म दस्तर केली राज्यभार चाले ऎसा ॥१॥ लावोनी मृदंग श्रुति टाळ घोष । सर्व ब्रह्मरस आवडीने ॥२॥ तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळामात्रे ॥
  • · ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥१॥ कर जोडितों कथाकाळीं । आपण असावें जवळी ॥ध्रु.॥ घेई ऐसी भाक । मागेन जरि कांहीं आणिक ॥२॥ तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुका राखावा ॥३॥
  • · कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥१॥ लसुण मिरची कोथिंबरी । अवघा झाला माझा हरि ॥२॥ मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥३॥ सांवतां म्हणे केला मळा । विठ्ठलपायीं गोविला गळा॥४॥
  • · कानडीनें केला मर्हांटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥ तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥ तिनें पाचारिलें इल बा म्हणोन । येरु पळे आण जाली आतां ॥२॥ तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥
  • · काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याति । वेद महिषामुखी बोलविले ॥धृ॥ कोठवरी वाणू त्याची स्वरुपकीर्ति । चालविली भींति मृतिकेचे ॥१॥ अविद्या मायाचा लावोनी निवारा । ऎसे जगजोद्धारे बोलाविले ॥२॥ नामा म्हणे नित्य तारिले पतित । भक्तीचे हे सारे ज्ञानदेव ॥३॥
  • · किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला l कंठ हा सोकला आळविता lमाझे हे निर्वाण किती बा पाहसी l पाव ह्रीशिकेशी मायबापा lगजेंद्राकारणे सत्वर धावसी l तैसा अनाथासि पावे मज lजीवना वेगळा तळमळी मासा l तैसे झाले देवा तुका म्हणे l
  • · किती वेळा जन्मा यावों । किती व्हावें फ़जीत ॥१॥ म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥२॥ प्रारब्ध पाठी गाढें । न सरे पुढें चालतां ॥३॥ तुका म्हणे रोकडी हे । होती पाहें फ़जीती ॥४॥
  • · कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥ न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥ भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥ ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥४॥
  • · कृष्णा माझी माता कृष्णा माझा पिता । बहिणीबंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरु कृष्ण माझें तारुं । उतरी पैल पारुं भवनदी ॥२॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥
  • · खेळे खेळे हरी कुंजनी, राधिकेच्या मना मोहुनी ॥धृ॥ भोळि राधा हरी पाहता, वेडि झाली बंसी ऎकता । रंगवी आत्म-रंगातुनी, राधिकेच्या मना मोहुनी ॥१॥ जात होती यमुनेतिरी, गोरसाते धरोनी शिरी । माठ फोडी हरी धावुनी, राधिकेच्या मना मोहुनी ॥२॥ दास तुकड्या म्हणे ही लीला, देव गोकुळासी खेळला । उध्दरील्या सख्या गौळणी, राधिकेच्या मना मोहुनी ॥३॥
  • · गुणा आला ईटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ॥१॥ डोळे कान त्याच्या ठायीं । मन पायीं राहो हें ॥ध्रु.॥ निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयासी ॥२॥ तुका म्हणे समध्यान । हे चरण सकुमार ॥३॥
  • · गुरु माता गुरु पिता । गुरु आमुची कुळदेवता ॥१॥थोर पडतां सांकडें । गुरु रक्षी मागें पुढें ॥२॥काया वाचा आणि मन । गुरुचरणींच अर्पण ॥३॥एका जनार्दनीं शरण । गुरु एक जनार्दनीं ॥४॥
  • · गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥ मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.॥ आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥२॥ तुका म्हणे आळी । जेवी नुरे चि वेगळी॥३॥
  • · घेईं घेईं माझें वाचे । गाडे नाम विठोबाचें ॥१॥ तुम्ही घ्यारे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥२॥ तुम्ही ऎका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥३॥ मना तेथें धांव घेईं । राहें विठोबाचे पायीं ॥४॥ तुका म्हणॆ जीवा । नको सोडूं या केशवा ॥५॥
  • · ‎चार युगा पावन | कली माजी सोपे भजन ||१||मना दृढ धरी साचा | विठ्ठल विठ्ठल म्हणे वाचा ||२||संकल्प नको भिन्न | तेणे पावशी हरी चरण ||३||नामे जीवीचा जिव्हाळा | भानुदास जीवनकळा ||४||
  • · चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण ॥१॥ देखवी ऎकवी एक नारायण । तयाचें भजन चुको नको ॥२॥ मानसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्तां म्हणोनियां ॥३॥ वृक्षाचेंही पान हाले ज्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥४॥ तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें काहीं चराचरीं ॥५॥
  • · जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥ पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥ वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥ आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥३॥
  • · जन्मासी येवोनी पहा रे पंढरी नाचा महाद्वारी देवापुढे ॥धृ॥ चंद्रभागेतीरी करा तुम्ही स्नान घ्या रे दर्शन विठोबाचे ॥१॥ सेना म्हणे पुरलासे हेत डोळे भरूनी पहात विठ्ठलासी ॥२॥
  • · जयाचिये दारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐसे बळ रेडा बोले ॥धृ॥ करील ते काय नोहे महाराज । परी पाये बीज शुद्ध अंगी ॥१॥ जयाने घातली मुक्तीची गवाळी । मिळवीली मादी वैष्णवाची ॥२॥ तुका म्हणे तेथे सुखा उणे काय सुखा काय उणे । राही समाधाने चीत्तीचीया ॥३॥
  • · जाऊं देवाचिया गांवां । देव देईंल विसांवा ॥१॥ देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ध्रु.॥ घालूं देवासी च भार । देव सुखाचा सागर ॥२॥ राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसी ॥३॥ तुका म्हणे आम्ही बाळें । या देवाचीं लडिवाळें ॥४॥
  • · जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥१॥ आणिक नये माझ्या मना । हो कां पंडित शहाणा ॥२॥ नाम रुपीं जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥३॥ तुका म्हणे नवविध । भक्ति जाणे तोचि शुद्ध ॥४॥
  • · जे कां रंजले गांजलें । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥३॥ ज्यासी आपंगिता नाही । त्यासी धरी जो ह्रुदयी ॥४॥ दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥५॥ तुका म्हणे सांगु किती । तोचि भगविंताची मूर्ती ॥६॥
  • · ज्ञानदेव माझी योग्यांची माऊली । जेणें निगमवल्ली प्रकट केली ॥१॥ गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रकट केली ॥२॥ अध्यात्मविद्येचे दाविलेसें रूप । चैंतन्याचा दीप उजळिला ॥३॥ छप्पन भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारीली ।।४॥ श्रवणाचे मिषें बैसावें येऊनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव । एकतरी ओवी अनुभवावी ॥६॥
  • · ज्या सुखाकारणें देव वेडावला । वैकुंठ सांडुनीं संतसदनीं राहिला ॥१॥ धन्य धन्य संतांचें सदन । जेथें लक्ष्मीसहित शोभे नारायण ॥२॥ सर्व सुखांची सुखराशी । संतचरणीं भुक्तिमुक्ति दासी ॥३॥ एका जनार्दनीं पार नाहीं सुखा । म्हणोनि देव भुलले देखा ॥४॥
  • · टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीची ॥धृ॥ पंढरीची हाट कौलाची पेठ | मिळाले चतुष्ठ वारकरी ॥१॥ पताकांचे भार मिळाले अपार | होतो जयजयकार भिमातीरी ॥२॥ हरीनाम गर्जता नाही भय चिंता | ऐसे बोले गिता भागवत ||३|| खट नट यावे शुद्ध होऊनी जावे | दवंडी पिटे भावे चोखामेळा ||४||
  • · तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत ।। काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।। माथा शोभे जटाभार । अंगी विभूती सुंदरा ।। तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ।।
  • · तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम | ऐसा तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ | जळी दगडासहित वहया | जैश्या तरियेल्या लाहया | म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा | तुका विष्णू नोहे दुजा |
  • · तुज पाहतां सामोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥ माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडली पंढरीराया ॥२॥ नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥३॥ तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळीं ॥४॥
  • · तुझिये निढळीं कोटि चंद्र प्रकाशे ॥ कमल नयन हास्य वदन हांसे ॥१॥ हालकारे कृष्णा डोलकारे ॥ घडिये घडिये गुज बोलकारे ॥ध्रु०॥ उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो ॥ बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥२॥
  • · तुझी आण वाहीन गा देवराया । बहु आवडसि जिवांपासुनियां ॥१॥ कानडिया विठोबा कानडिया । बहु आवडसि जीवापासूनियां ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु राया । बहु आवडसि जीवांपासूनियां ॥३॥
  • · तुझी सेवा करीन मनोभावें वो । माझें मन गोविंदी रंगलें वो ॥१॥ नवसिये नवसिये नवसिये वो । पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२॥ बापरखुमादेविवरे विठ्ठले वो । चित्त चैतन्य चोरुनि नेलें वो ॥३॥
  • · तुमचिये दासीचा दास करुनि ठेवा । आशिर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥ नवविधा काय बोलिली जे भक्ति । द्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥ तुका म्हणॆ तुमच्या पायांच्या आधारें । उतरेन खरे भवनदी ॥३॥
  • · दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥ आतां मज ऎसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥२॥ उपजला भावो । तुमचे कृपे सिद्धी जावो ॥३॥ तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥४॥
  • · ‎देवा माझे मन लागो तुझे चरणी , संसार व्यसनी न पडो देही ॥धृ॥ नाम संकीर्तन संत समागम , चीऊगावा भ्रम नको देवा ॥१॥ पायी तिर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई ॥२॥ आणिक मागणे नाही नाही देवा , एका जनार्दनी सेवा नित्य घेई ॥३॥
  • · देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥ चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥२॥वदनीं तुझें मंगळनाम । अखंड सदोदित प्रेम ॥३॥जैसा तैसा असेल भाग । तैसा तैसा घडेल योग ॥४॥नामा म्हणे केशवराजा । केला पण चालवी माझा ॥५॥
  • · धन्य धन्य धन्य धन्य निवृत्तीराया | धन्य ज्ञानदेव सोपान सकया ॥ शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही | सोपान तो ब्रह्मा मूळमाय मुक्ताई ॥ प्रय्तक्ष पैठणी भटा दाविली प्रचीती | रेडीयाच्या मुखी वदविली वेदश्रुती ॥ चौदाशे वर्षाचे तापितीरी रहिवाशी | गर्व हरविला चालविले जड भिंतीशी ॥ धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्यासी | भेटी झाली ज्ञानदेवाची ॥
  • · धन्य धन्य धन्य धन्य निवृत्तीराया l धन्य ज्ञानदेव सोपान सकया l शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही l सोपान तो ब्रह्मा मूळमाय मुक्ताई l प्रय्तक्ष पैठणी भटा दाविली प्रचीती l रेडीयाच्या मुखी वदविली वेदश्रुती l चौदाशे वर्षाचे तापितीरी रहिवाशी l गर्व हरविला चालविले जड भिंतीशी l धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्यासी l भेटी झाली ज्ञानदेवाची l
  • · धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर ॥१॥ ह्रुदय बंदिखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥ शब्दें केली जुडाजुडी । विठ्ठलपायीं घातली बेडी ॥३॥ सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥ जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडी मी तुला ॥५॥
  • · धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर ॥ ह्रुदय बंदी खाना केला | आत विठ्ठल कोंडीला ॥ शब्दे केली जडा जुडी | विठ्ठल पायी घातली बेडी ॥ सोहं शब्दे मारा केला | विठ्ठल काकुळ्ती आला ॥ जनी म्हणे बा विठ्ठला |जीव्हे न सोडी मी तुला ॥
  • · धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥ मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥ करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥ जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥
  • · धांवोनियां आलों पहावया मुख । गेलें माझें दुःख जन्मांतरिंचें ॥१॥ ऐकिलें ही होतें तैसें चि पाहिलें । मन स्थिरावलें तुझ्या पायीं ॥२॥ तुका म्हणे माझी इच्छा पूर्ण जाली । कांहीं न राहिली वासना हे ॥३॥
  • · नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ॥१॥ गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला । आल्या स्तुतीला द्यावी मती ॥२॥ गुरुराया तुजऐसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ॥३॥ तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ॥४॥
  • · नाम गाऊं नाम ध्याऊं । नामें विठोबासी पाहूं ॥१॥ आम्ही दैवाचे दैवाचे । दास पंढरिरायाचे ॥२॥ टाळ दिंडी घेऊनि हातीं । केशवराज गाऊं गीतीं ॥३॥ नामा म्हणे लाखोली सदा । अनंत नामें वाहूं गोविंदा ॥४॥
  • · नेसले ग बाई मी साडी जरी बुट्याची तिरकी नजर माझ्या वरती सांवळ्या नेत्री घातले अंजन । भांगी भरला रे , माळली ग केसावरी फुलवेणी चमेलीची । पैंजण पायी माझ्या । चाल माझी ही तालात कुंडलेच कानी डुलती । चाल माझी हो ठेक्यांत । किती सांगू विठ्ठला रे । रीत माझी गरतीची । मुरलीच्या नादाने । बावरले मी ग भारी । यमुनेच्या पाण्या जाता । कडे घेतली घागरी । ओढ लागे अंतरीया हरीच्या ग संगतीची । तिरकी नजर माझ्या वरती सावळ्या हरीची ।
  • · पंढरीसी जारे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तांतडी उतावीळ ॥२॥ मागील परिहार पुढें नाही सीण । जालिया दर्शन एकवेळा ॥३॥ तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्ती निवडेना ॥४॥
  • · पतित तू पावना । म्हणविसी नारायणा ॥१॥ तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण ॥२॥ याति शुद्ध नाही भाव । दुष्ट आचरण स्वभाव ॥३॥ मुखी नाम नाही । कान्होपात्रा शरण पायी ॥४॥
  • · परिमळाची धांव भ्रमर ओढी । तैसी तुझी गोडी लागो मज ॥१॥ अविट गे माय विटेना। जवळींच आहे परि भेटेना ॥२॥ तृषा लागलिया जीवनातें ओढी । तैसी तुझी गोडी लागे या जीवा ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलीं आवडी । गोडियेसी गोडी मिळोनि गेली ॥४॥
  • · पायो जी मैने राम रतन धन पायो ॥ वस्तु अमोलिक दी मेरे सत्गुरु | किरपा कर अपनायो ॥ जनम जनम की पुंजी पायी ॥ जग मे साखोवायो॥ खर्चे ने खूटे चोर न लूटे | दिन दिन बढत सवायो ॥ सत कि नाव केवाटिया सदगुरु |भवसागर तर्वायो ॥ मीरा के प्रभु गिरधर नागर | हर्ष हर्ष जस गायो॥
  • · पुढें ज्ञानेश्वर जोडोनियां कर । बोलतो उत्तर स्वामिसंगें ॥१॥ पाळिलें पोसिलें चालविला लळा । बा माझ्या कृपाळा निवृत्तिराजा ॥२॥ स्वामीचिया योगें जालों स्वरुपाकार । उतरलों पार मायानदी ॥३॥निवृत्तीचें हात उतरिला वदना । त्यागिलें निधाना आम्हालागीं ॥४॥ नामा म्हणे देवा देखवेवा मज । ब्रह्मीं ज्ञानराज मेळविला ॥५॥
  • · पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥१॥ घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू ॥२॥ सांभाळिले सांभाळिले । सांभाळीले अनाथा ॥३॥ केला निळा केला निळा । केला निळा पावन ॥४॥
  • · फिरवीले देऊळ जगा मधी ख्याती | नामदेवा हाती दुध प्याला ॥ भरीयली हुंडी नरसीह मेहत्याची | धनाजी जाटाची शेते पेरी ॥ मीराबाईसाठी घेतो विष प्याला | दामाजीचा झाला पडेवार ॥ कबीराचे मागी विणुलागे शेले | ऊठविले मुल कुंभाराचे ॥ आता तुम्ही दया करा पंढरी राया | तुका विनवी पाया वेळोवेळा ॥
  • · भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥ गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥ भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥ सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥
  • · भाव धरुनियां वाची ज्ञानेश्‍वरी । कृपा करी हरि तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्‍नु अर्जुनेसी ॥२॥ तेचि ज्ञानेश्‍वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाही तया ॥३॥ एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरी मनीं ज्ञानेश्‍वरी ॥४॥
  • · भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी ॥२॥ तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥ एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥
  • · भूमी भार वाया | का रे जन्म लिही काया ॥ना घडे वाचे नामस्मरण | जिव्हा नोहे चर्म जाण ॥ना घडे करे दान धर्म | कर नोहे ती सर्प जाण ॥पायी तीर्थयात्रा ना घडे | पाय नोहे ती लाकडे ॥ एका जनार्दनीचे वेडे | नरदेही प्रत्यक्ष रेडे ॥
  • · मथुरा मे प्रगट भयो भगवान | नंदाजी के घर नौबत बाजे | टाल मृदुंग और तान | सब हि राजे मिलन आये | छोड दिया अभिमान | मीरा के प्रभू गिरीधर नागर | निशिदिन धरीयो ध्यान |
  • · मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा ।पुनरपी संसारा येणे नाही ॥१॥ मन हे शेवंती देऊ भगवंती । पुनरपी संसृती येणे नाही ॥२॥ मन हे तुळशी देऊ हृषिकेशि । पुनरपी जन्मा येणे नाही ॥३॥ तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तुझा वास व्हावा वैकुंठासी ॥४॥
  • · मनमोहन मुरलीवाला । नंदाचा अलबेला ॥१॥ भक्तासाठीं तो जगजेठी । कुब्जेसी रत जाला ॥२॥ विदुरा घरच्या भक्षुनि कण्या । परमानंदें धाला ॥३॥ भक्तिसुखें सुखावला । एका जनार्दनीं निमाला ॥४॥
  • · माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली ।। जैसे वत्सालागी गाय, जैसे अनाथांची माय, ॥हाकेसरशी घाई घाई, वेगे धांवतची पायी । आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात,॥ खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम । विष्णुदास आदराने, वाका घाली पदराने, ॥
  • · माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा ॥१॥नाहीं नाहीं मज आणिक सोयरा । न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥अनाथाचा नाथ होसी तूं दयाळा । किती वेळोवेळां प्रार्थू आतां ॥३॥ नामा म्हणे जीव होतो कासावीस । केली तुझी आस आतां बरी ॥४॥
  • · माझ्या बोवडिया बोला । चित्त द्यावें वा विठ्ठला ॥१॥ वारा जाय भलत्या ठायां । तैसी माझी रागछाया ॥२॥ गातां येईल तेणेंचि गावें । येरीं हरि हरि म्हणावें ॥३॥ तान मान नेणें देवा । नामा विनवितो केशवा ॥४॥
  • · या रे नाचुं प्रेमानंदे । रामनामचेनि छंदें ॥१॥ म्हणा जयरामा श्रीराम । भवसिंधु तारक नाम ॥२॥ ऐसी नामाची आवडी । काळ गेला देशोधडी ॥३॥ आवडीने नाम घोका । म्हणे जनार्दन एका ॥४॥
  • · येई गा तु मायबापा पंढरीच्या राया । तुजविण क्षिण वाटे क्षिण झाली काया । यातीहीन मती हीन यातीहीन मतीहीन कर्महीन माझे । सर्व लज्जा सोडून बापा शरण आलो तुज । दिनानाथ दिन बंधू नाव तुम्हा साजे । पतीत पावन नाम ऐसी ब्रिदावली गाजे । विटेवरी नीट उभा कटेवरी कर । तुका म्हणे हेची आम्हा ध्यान निरंतर ।
  • · येई हो विठ्ठले भक्तजनवत्सले । करुणा कल्लोळे पांडुरंगे ॥१॥सजलजलदघन पीतांबर परिधान । येई उद्धरणें केशिराजे ॥२॥नामा म्हणे तूं विश्वाची जननी । क्षिराब्धिनिवासनी जगदंबे ॥३॥
  • · येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥ काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥ काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥ काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥ काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥ रामीरामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥
  • · राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥ कस्तुरी मळकट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥२॥ मुकुट कुंडलें श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतिलें सकळही ॥३॥ कांसे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाइयांनो ॥४॥ सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५॥
  • · राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥१॥ काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी देव जाणे ॥ध्रु.॥ चिंता मोह आशा ठेवुनि निराळीं । देईन हा बळी जीव पायीं ॥२॥ तुका म्हणे कांहीं उरों नेदीं उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनी ॥३॥
  • · राम गावा राम घ्यावा राम जिवीचा बिसावा ॥धृ॥ कल्याणाचे कल्याण रघुपतीचे गूणगान ॥१॥ मंगलाचे मंगल, कौसल्येचा रामबाळ ॥२॥ राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी ॥३॥
  • · रुपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥१॥ देह भाव हरपला । तुज पाहतां विठ्ठला ॥२॥ कळों नेदी सुखद:ख । तहान हरपली भूक ॥३॥ तुका म्हणॆ नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥४॥
  • · लक्ष्मीवल्लभा । दीनानाथा पद्मनाभा ॥१॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं तेचि ठायीं ॥२॥ माझी अल्प ही वासना । तूं तो उदाराचा राणा ॥३॥ तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥४॥
  • · लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥ ऎरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥ ज्याचें अंगी मोठेपण । तया यातना कठिण ॥३॥ तुका म्हणॆ जाण । व्हावें लहानाहूनि लहान ॥४॥
  • · लागोनियां पाया विनवितो तुम्हांला । कर टाळीं बोला मुखें नाम ॥१॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा । हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ॥२॥ कृष्ण विष्णु हरि गोविंद । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥३॥ सकळांसी येथें आहे अधिकार । कलियुगीं उद्धार हरिनामें ॥४॥ तुका म्हणे नामापासीं चारी मुक्ति । ऎसें बहु ग्रंथीं बोलियेलें ॥५॥
  • · विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो । तुटेल हा संदेहो । भवमूळव्याधीचा ॥१॥ म्हणा नरहरि उच्चार । कृष्ण हरी श्रीधर । हें नाम आम्हां सारा । संसार तरावया ॥२॥ एकतत्त्व त्रिभुवनीं । हेंचि आम्हां हरिपर्वणी । गाइली जे पुराणीं । वेदशास्त्रांसहित ॥३॥ नेघों नामेंविण कांहीं । विठ्ठल कृष्ण लवलाही । नामा म्हणे तरलों पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणतांचि ॥४॥
  • · विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ॥धृ॥ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ॥१॥ कोणाचा जिवाचा न घडे मत्सर वर्ग सर्वेश्‍वर पूजवावे ॥२॥ तुका म्हणॆ एक देहाचे अवयव । सुख दु:ख सर्व भोग पावे ॥३॥
  • · वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातिरीं ॥१॥ चलाचला संत जन । करा देवासी भांडण ॥ध्रु.॥ लुटालुटा पंढरपूर । धरा रखुमाईचा वर ॥२॥ तुका म्हणे चला । घाव निशानी घातला ॥३॥
  • · वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनष्टि नाम गावें ॥ध्रु.॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतका चि निर्धार ॥२॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ॥३॥
  • · शंख चक्र गदा रुळे वैजयंती ।कुंडलें तळपती दोन्हीं कानीं ॥१॥ मस्तकीं मुकुट नवरत्नहार । वरी पीतांबर पांघुरला ॥२॥ रत्नहिरेजडित कटीं कडदोरा । रम्य शोभे हिरा बेंबीपाशी ॥३॥ जडित कंकण कर्णी शोभे मुद्रिका । लाचावला तुका भेटीसाठीं ॥४॥
  • · ‎शरण शरण जी हनुमंता । तुम्हा आलो रामदूता ।। काय भक्तिच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ।। शुर आणिक धीर । स्वामी काजी तू सादर ।। तुका म्हणे रुद्रा । अंजनिचिया कुमरा ।।
  • · संत कृपा झाली इमारत फळा आली । ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया । नामा तयाच्या किंकर, त्याने केला हा विस्तार । जनार्दन, एकनाथ, खांब दिधला भागवत । तुका झालासे कळस, भजन करा सावकाश ॥
  • · संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥१॥ मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥२॥ कंठी प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । ह्रुदयी प्रगटे नामरुप ॥३॥ तुका म्हणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥४॥
  • · संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥ तेथें असे देव उभा । जैसी समचरणांची शोभा ॥२॥ रंग भरें कीर्तनांत । प्रेमे हरिदास नाचत ॥३॥ सखा विरळा ज्ञानेश्र्वर । नामयाचें जो जिव्हार ॥४॥ ऎशा संतां शरण जावें । जनी म्हणे त्याला घ्यावें ॥५॥
  • · सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥ तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
  • · हनुमंत महाबळी। रावणाची दाढी जाळी॥१॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर॥ध्रु॥ करोनि उड्डाण। केलें लंकेचे शोधन ॥२॥ जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका॥३॥
  • · हरि बोलो भाई हरि बोलो भाई । हरि ना बोले वांकु राम दुर्‍हाई ॥१॥ काहेकु पढता खिन खिन गीता । हरिनाम लिया सो सब कुछ होता ॥२॥ मेरा मेरा कर कर क्या फ़ल पाया । हरिके भजन बिना झुठ गमाया ॥३॥ कहत कबीर हरिगुन गाना । गावत गाचत वैकुंठ जाना ॥४॥""
  • · हीन दीन जात मोरी पंढरी के राया । ऐसा तुमने नामा दरजी कायक बनाया ॥१॥ टाल बिना लेकर नामा राऊल में गाया । पूजा करते ब्रह्मन उनैन बाहेर ढकाया ॥२॥ देवल के पिछे नामा अल्लक पुकारे । जिदर जिदर नामा उदर देऊलहिं फिरे ॥३॥ नाना बर्ण गवा उनका एक बर्ण दूध । तुम कहां के ब्रह्मन हम कहां के सूद ॥४॥ मन मेरी सुई तनो मेरा धागा । खेचरजी कें चरण पर नामा शिंपी लागा॥
  • · हेंचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें तैसेचि राहावें । चित्तीं असा द्यावें समाधान ॥२॥ वाहिल्या उद्वेग दु :खचि केवळ । भोगणॆं तें फ़ळ संचिताचें ॥३॥ तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवापायीं ॥४॥
  • · हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मीं तुझा दास ॥१॥ पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ॥२॥ संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ॥३॥ चंद्रभागे स्नान । तुका मागे हेंचि दान ॥४॥

29 April, 2015 06:24


ॐ नमो सदगुरुनिर्गुणा । पार नाहीं तंव गुणा । बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवीं ॥१॥
हरिगुण विशाळ पावन । वदवीं तूं कृपा करुन । मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥
तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसें चरण । सदगुरुचें आदरें ॥३॥

नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचें ॥१॥
करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्त्वतां चालतसे ॥२॥
एका जनार्दनीं तुमचा मी दास । येवढी ही आस पुरवावी ॥३॥

परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥
वसोनिया जिव्हे वदावेम कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२॥
आणिक संकल्प नाहीं माझे मनीं । एका जर्नादनीं वंदितसें ॥३॥

श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी । म्हणोनि विनवयी करितसों ॥१॥
मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादरा वदवावें ॥२॥
न कळेचि महिमा ऊंच नीचपणे । कृपेंचे पोसणें तुमचे जाहलों ॥३॥
एका जनार्दनी करुनी स्तवन । घातिलें दुकान मोलेंविण ॥४॥

असतां बंदिशाळें । देवकी डोहळे । गर्भ घननिळे । आथियला ॥१॥
गुज पुसे भ्रतारा । आनु नेणें दुसरा । आवडी अवधारा । जिवा होय ॥२॥
मेळवुनि लेंकुरी । खेळ खेळावा साकार । गोकुळीं अवतार । गौळीया घरीं ॥३॥
वर्षतां शिळाधारीं । उचलवा माहागिरी । वेणु पावे करीं । वाजवीत ॥४॥
जळीं रिघ करावा । भवसर्प नाथावा । वरि बैसो बरवा । भाव माझा ॥५॥
कंसादिक वीर । त्यांचा कारावा संहार । ईजे राज्यधर । उग्रसेना ॥६॥
एक यश द्यावें त्रैलोक्य जिंकावें । कनकपूर बसवावें । सिंधुमाजीं ॥७॥
एका जनार्दनीं । डोहाळे संपूर्ण । पुरवी नारायणा । वासनेचे ॥८॥

देवकी निज उदरीं । गर्भाजी पाहे थोरी । तंव सबाह्म अभ्यंतरीं । व्यापक श्रीकृष्ण ॥१॥
अगे हा स्वतः सिद्ध हरी । स्वयंप्रकाश करीं । मीपणा माझारी । गर्भु वाढे ॥२॥
आतां नवल कैसे परी । आठवा गर्भु धरी । त्याहि गर्भा माझारीं मज मी देखे ॥३॥
दाहीं इंद्रियां माझारीं । गर्भांची वाढे थोरी । कर्म तदाकारीं । इंद्रिय वृत्ति ॥४॥
चितप्रकाशासी डोहळे । सद्रूप सोहळे । आनंद कल्लोळे गर्भू वाढे ॥५॥
तेथें स्वस्वरुपस्थिती सुखरुप प्रसुती । आनंद त्रिजगतीं परिपूर्ण ॥६॥
एका जनार्दनी । ज्ञानगर्भु सार । चिद्रुप चराचर । निखळ नांदे ॥७॥

देवकी करी चिंता । केवीं आठवा वांचे आतां । ऐसी भावाना भावितां । जिवीं तळमळ ॥१॥
तंव न दुखतांचि पोट । वेण न लगतां उद्धट । कृष्ण झाला प्रगट । स्वयें अयोनिया ॥२॥
हरि सुनीळ सांवळें । बाळ निजतेजे तेजाळें । देखोनि वेल्हाळे । स्वयं विस्मीत ॥३॥
ऐसें देखोनि श्रीकृष्णासी । मोहे आच्छादुं जाय त्यासी । तंव प्रकाशु तियेंसीं । कैसा आंवरेना ॥४॥
वेगीं वसुदेवातें म्हणे । तुम्हीं गोकुळांसी न्या तान्हें । एका जनार्दनें कृपा केलीं ॥५॥

देवकी म्हणे वसुदेवासी । वेगीं बाळके न्यावें गोकुळासी । घवघवीत तेजोराशी । देखे श्रीकृष्ण ॥१॥
पूर्ण प्रकाश निजतेजें । पाहतां न दिसें दुजें । तेथें कैंचे माझें तुझें । लपणें छपणें ॥२॥
सरसर अरजे दुरी । परब्रह्मा आम्हां छरीं । अहं कंसाचे भय भारी । बाधी कवणा ॥३॥
सवेचि पाहे लीळा ।मुगुट कुंडले वनमाळा । कंठीं कौस्तुभ तेजाळा । कळी तटी सुत्र ॥४॥
क्षुद्र घंटिका किंकणी । बाहु भूषणें भुषणीं । चिद्रेत्नें महामणी । वीर कंकणें ॥५॥
कमलवदन हरी । कमले नेत्रधारी । लीला कमळे करी । झेलीतसे ॥६॥
करकमळीं कमळा । सेवी चरणकमळा । ऐशी वसुदेव देखे डोळां । दिव्य मूर्ति ॥७॥
लक्ष्मी डवल उनियां जाण । हृदयीं श्रीवत्सलांछन । द्विजापदांचे महिमान । देखे दक्षिणाभागीं ॥८॥
शंख चक्रादि आयुधें चारी । पीतांबर धारी । सगुण निर्गुण हरि । समसाम्य ॥९॥
ऐसे सगुण निर्गुण भाका । पहात पहात देखा । भिन्न भेदाचि न रिघे रेखा । कृष्णापणीं ॥१०॥
एका जनार्दनीं खरें । निजरुप निर्धारें । अहं कंसाचे वावरे । मिथ्या भय ॥११॥

देवकी वसूदेवाकडे पाहे । तंव तो स्वानंदे गर्जताहे । येरी धावोनि धरी पाये । उगे रहा ॥१॥
जळो जळो हे तुमची बुद्धी । सरली संसारशुद्धी । कृष्ण लपवा त्रिशुद्धी । जग प्रगट न करावा ॥२॥
आतां मी करुं कैसें । भ्रतारा लागलें पिंसे । मज मायेच्या ऐसें । पुरुष ममता न धरी ॥३॥
मज मायेची बुद्धी ऐसी । म्यां आच्छादिलें श्रीकृष्णांसी । वेगें होईन तुमची दासी । अति वेगेंशीं बाळ न्यावें ॥४॥
येरु म्हणे नवल जालें । तुज कृष्णें प्रकाशिलें । त्वां केवीं अच्छादिलें । कृषरुप ॥५॥
सरसर अरजे मूढें । बोलसी तितुकें कुडें । कृष्णरुप वाडें कोडें । माया कैंची ॥६॥
येरी म्हणे सांडा चावटी । कोरड्या काय सांगू गोष्टी । गोकुळासी उठाउठी । बाळ न्यावें माझें ॥७॥
अवो कृष्णीं चिंतीसी जन्ममरण । हेंचि तुझें मूर्खपणा । कृष्णानामें जन्ममरण । समूळ निर्दळिलें ॥८॥
सरो बहु बोलाचा बडीवारु । परि निर्धारु न धरवे धीरु । या लगीं लेकरुं । गोकुळा न्यावें ॥९॥
तुम्हीं न माना माझिया बोला । वेणेंवीण उपजला । नाहीं योनिद्वारां आला । कृषाणानाथु ॥१०॥
आतां मी काय करुं वो । वसुदेव म्हणे नवलाओ । तुझ्या बोलाचा अभिप्रावो । तुझा तुमची न कळे ॥११॥
चोज कैसेवीण । ज्या नाहीं जन्ममरण । त्यासी मारील कवण । समुळ वावो ॥१२॥
जेणें मीपण आभासे । तेणें माझें मूर्खपणें तुम्हां दिसें । हें अंगींचे निजरुप पिसें । न कळें तुम्हां ॥१३॥
कृष्ण निजबोधु सुंदरा । यासी जीवें जतन करा । जाणिवेच्या अहंकारा । गुंता झणीं ॥१४॥
आतां काय मीं बोलुं शब्दू । ऐसा करितां अनुवादू । बोले खुंटला शब्दू । प्रगटला कृष्ण ॥१५॥
प्रकृति पुरुष दोन्हीं । मीनली एकपणीं । एका जनार्दनीं । बंदी मोक्ष ॥१६॥
१०
श्रीकृष्ण न्यावा गोकुळा । पायीं स्नेहाच्या शृंखळा । कायाकपटीं अर्गळा । मोहममतेच्या ॥१॥
कृष्णीं धरितां आवडी । स्वयें विराली स्नेहाची बेडी । मुक्तद्वारा परवडी । नाहीं अर्गळा शृखंळा ॥२॥
कृष्ण जंव नये होतां । तंवचि बंधनकथा । पावलीया कृष्णानाथा । बंदी मोक्ष ॥३॥
ते संधि रक्षणाईते । विसरली रक्षणातें । टकमकीत पहाते । स्वयें कृष्ण नेतां ॥४॥
श्रीकृष्ण अंगशोभा । नभत्व लोपलें नभा । दिशेची मोडली प्रभा । राखते कवण ॥५॥
अंधारामाजी सूर्य जातु । श्रीकृष्णासी असे नेतु । सत्व स्वभावें असे सांगतु । कृष्णाकडिये पडियेला ॥६॥
अंध ते बंधन नेलें । राखतो राखणे ठेलें । एका जनार्दनी केलें । नित्य मुक्त ॥७॥
११
तीरा आणिला श्रीकृष्ण । हरिखे यमुना झाली पुर्ण । चढ़े स्वानंदजीवन । चरण वंदनार्थ ॥१॥
वसुदेव म्हणे कटकटा । यमुना रोधिली वाटा । कृष्ण असतां निकटा । मोहं मार्ग न दिसे ॥२॥
कृष्ण असतां हातीं । मोहें पडली भ्रांति । मोहाचिये जाती । देव नाठवे बा ॥३॥
मैळ मुकी वेताळ । मारको मेसको वेताळ । आजी कृष्ण राखा सकळ । तुम्हीं कुळदेवतांनी ॥४॥
अगा वनींच्या वाघोबा । पावटेकीच्या नागोबा । तुम्ही माझिया कान्होंबा । जीवें जतन करा ॥५॥
हातींचा कृष्ण विसरुन । देव देवता होतों दीन । मोहममतेचें महिमान । देवा ऐसें आहें ॥६॥
मोहें कृष्णांची आवडी । तेथें न पडे शोक सांकडीं । एका जनार्दनीं पावलें परथडी । यमुनेच्या ॥७॥
१२
गोकुळीं ठेवितां श्रीकृष्णनाथ । वसुदेवास माया प्राप्त । तेणें पावला त्वरित । देह बंदिशाळे ॥१॥
तंव तुटली जडली बेडी । कपाटा पडली कडी । भव भयाच्या कडाडी । अहं कंस पावे ॥२॥
श्रीकृष्ण सांडिला मागें । पंचमहाभूत पाठी लागे । मिथ्या बंधन वाउगें । उठी मरण भये ॥३॥
कंस पुसे लवलाह्या । काय प्रसाली तुझी जाया । म्हणोनी आणिली योगमाया । वसुदेवें ॥४॥
वेगें देवकी म्हणे । कंस पुसेल जेव्हां तान्हें । तेव्हा तुवां देणें । हे तया हातीं ॥५॥
ते तें देतां देवकी जवळी । गर्जे ब्रह्मांड किंकाळी । टाहो फुटली आरोळी । दैत्या निधीची ॥६॥
तेणें दचकलें दुर्धर । कामक्रोधादि असुर । कंस पावला सत्वर । धरावयासी ॥७॥
वेंगीं आठवा आणवी । तंव हातां आली आठवीं । कंस दचकला दुर्धर जीवीं । नोहें जालेंचि विपरित ॥८॥
आठवा न दिसे डोळां । आठवी पडली गळां । कर्म न सोडी कपाळा । आलें मरण मज ॥९॥
परासि मारितां जाण । मारिल्या मारी मरण । कंस भीतसे आपण । कृष्ण भय करी ॥१०॥
आठवीं उपडितां तांतडीं । तंव तें ब्रह्मांड कडाडी । हातांतुन निष्टली हडबडी । कंस भयाभीतु ॥११॥
तंव ते गर्जलीं अंबरीं । पैले गोकुळीं वाढे हरी । तुज सगट बोहरी । करील दैत्याकुळाची ॥१२॥
वधिता देवकीचीं बाळें । माझें पाप मज फळलें । माझें निजकर्म बळें । आलें मरण मज ॥१३॥
भय संचलें गाढें । तेणें पाऊल न चले पुढें । पाहतां गोकुळाकडे । मूर्च्छित कंस बा ॥१४॥
आसनीं भोजनीं शयनीं । भये क्रृष्ण देखे नयनीं । थोर भेदरा मनीं । जनीं वनीं हरी देखे ॥१५॥
कृष्ण भयाचें मथित । कंसपणा विसरे चित्त । एकाजनार्दनी भक्त । भयें जीवन्मुक्त ॥१६॥
१३
गोकुळीं आनंद जाहला । रामकृष्ण घरा आला । नंदाच्या दैवाला । दैव आलें अकस्मात ॥१॥
श्रावण वद्य अष्टमीसीं । रोहिणी नक्षत्र ते दिवशी । बुधवार परियेसी । कृष्णमूर्ति प्रगटलीं ॥२॥
आनंद ब समाये त्रिभुवनी । धांवताती त्या गौळणी । वाण भरुनी नंदराणी । सदनाप्रती ॥३॥
एका जनार्दनी अकळ । न कळे ज्याचें लाघव सकळ तया म्हणती बाळ जो म्हणती बाळ । हालविती ॥४॥
१४
एक धांवुनी सांगिती । अहो नंदराया म्हणती । पुत्रसुख प्राप्ति । मुख पहा चला ॥१॥
सर्वें घेऊनि ब्राह्माण । पहावया पुत्रवदन । धावूंनियां सर्वजण । पहावया येती ॥२॥
बाळ सुंदर राजीवनयन । सुहास्यवदन घनः श्यामवर्ण । पाहूनियां धालें मन । सकळिकांचे तटस्थ ॥३॥
पाहूनि परब्रह्मा सांवळा । वेधलें मान तमालनीळा । एका जनार्दनी पाहतां डोळा । वेधें वेधिलें सकळ ॥४॥
१५
वेधल्या गोपिका सकळ । गोवळ आणि गोपाळ । गायी म्हशी सकळ । तया कृष्णाचें ध्यान ॥१॥
नाठवें दुजें मनीं कांही । कृष्णावांचुनीं आन नाहीं । पदार्थमात्र सर्वही । कृष्णाते देखती ॥२॥
करितां संसाराचा धंदा । आठविती त्या गोविंदा । वेधें वेधल्या कृष्णाछंदा । रात्रंदिवस समजेना ॥३॥
एका जनार्दनी छंद । ह्रुदयीं तया गोविंद । नाहीं विधि आणि निषेध । कृष्णावांचुनी दुसरा ॥४॥
१६
गोकुळीच्या जना ध्यान । वाचे म्हणती कृष्ण कृष्ण । जेवितां बैसतां ध्यान । कृष्णमय सर्व ॥१॥
ध्यानी ध्यती कृष्णा । आणिक नाहीं दुजी तृष्णा । विसरल्या विषयध्याना । सर्व देखती कृष्ण ॥२॥
घेतां देतां वदनीं कृष्ण । आनं नाहीं कांही मन । वाचा वाच्य वाचक कृष्ण । जीवेंभावें सर्वदा ॥३॥
कृष्णारुपीं वेधली वृत्तीं । नाहीं देहाची पालट स्थितीं । एका जनार्दनी देखती । जागृती स्वप्नी कृष्णांतें ॥४॥
१७
व्रजात कोणे एक वेळेशी । आले गर्गाचार्य ऋषी । त्यासी दाखवितां कृष्नासी । चिन्हें बोलतां झाला ॥१॥
यशोदेबाई ऐक पुत्राची । लक्षणे ॥धृ ॥
मध्ये मुख्य यशोदा बाळा । सन्मुख रोहिणी वेल्हाळा । भोवंता गोपिकांचा पाळा । त्या गोपाळा दाखविती ॥२॥
करील दह्मा दुधाची चोरी । भोगिल गौळियांच्या पोरी । सकळ सिंदळांत चौधरी । निवडेल निलाजरा ॥३॥
चोरुनी नेईल त्यांची लुगडीं । त्यांचे संगे घेईल फुगडी । मेळवुनी गोवळ गडी । सुगडी फोडी शिंकींची ॥४॥
पांडव राजियाचे वेळीं । काढील उष्टया पात्रावळी । ढोरें तुमच्या घरची वेळीं । निवडेल निलाजरा ॥५॥
यावरी कलवंडतील झाडें । लत्ता खळाळ हाणील घोडे । महा हत्ती धरील सोंडे । परी ती विघ्रे मावळतीं ॥६॥
यावरी गाडा एक पडावा । अथवा डोहामाजीं बुडावा । वावटुळीनें उडुनी जावा । सांपडावा वैरियाला ॥७॥
कारण सच्चिदानंदाचें । बीज नोहे हें नंदाचें । जन्मांतर गोविंदाचें । नव्हें कथिल्य मथिल्यांचे ॥८॥
हृदयीं श्रीवत्सलांछन । ब्राह्मणलत्तेचें भूषण । हा होईल ब्राह्मणा जन । एका जनार्दनीं घरींचा ॥९॥
१८
निळी कांच भूमीं खेळे वनमाळी । पाहिलें प्रतिबिंब कृष्णं तया न्याहाळीं ॥१॥
रडूं घेतलें रडूं घेतलें । समजावी यशोदा परी रडूं घेतलें ॥२॥
दे मज खेळावया भानु । आन नको कांही दुजा छंद मनु ॥३॥
एका जनार्दनीं देव छंद धरी गा । समजावी यशोदा परी न राहे उगा ॥४॥
१९
शुद्ध स्फटिके आपुलें रुप देखे । कृष्ण तेणें हारिखें डोलतसे ॥१॥
देहाविदेहा आलिंगन स्वानंदें चुंबन । तये संधीं मन हारपत ॥२॥
स्वस्वरुपीं भेटीं थोर उल्हास पोटीं । उन्मळींत दाष्टी निजरुप पाहें ॥३॥
हें जाणोनि माया धावे लावलाह्मा । उचलोनि कान्हाया दृश्य दावी ॥४॥
माझें रुप मज देई घालितो लोळणी । जननी नानागुणी बुझावीत ॥५॥
माया मोहं गुणाचे खेळणें । येथें कृष्ण म्हणे जीवेभावें ॥६॥
देह घटाबाहेरी न वचें मी मुरारी । श्रद्धा उष्ण भरी तावितसे ॥७॥
विषय पंचधारा देइन बा साकर । नाथिली करकर कां करिसी ॥८॥
घेई स्तनपान वोरसु इंद्रियां गोरसु । मायेसी उदासू रुसूं नको ॥९॥
इच्छा माउलीची साय सावकाश खाय । गोगोरसाची माय मज चाड नाहीं ॥१०॥
तो तंव ठाईच्या ठाई म्यां तव काहीं नेले नाहीं । निजरुप पाही जैंसे तैसें ॥११॥
तुझी पडलीया पडसाई असतांचि जालें नाहीं । नास्तिक तेचि डोई सबळ जाले ॥१२॥
तुझिया सांगातें करणें आणि भुतें । अहंकारें थिते चोरुनि नेलीं ॥१३॥
दुजेपणें पाहतां धरितां नये हातां । निजरुपा तत्त्वतां काढोनि देई ॥१४॥
होसी चक्रचाळ घाइसी आळ । बाळलीळा खेळ निर्वाणीचा ॥१५॥
मज मायावेगळा नवचे बा गोपाळा । आपरुपीं खेळा खेळू नको ॥१६॥
नेणों कैशी आवडी माया म्हणसी कुडी । भूली नव्हें खोडी तान्हुलिया ॥१७॥
हें नायके उत्तर म्हणे परती सर । निजरुपी साचार दावीं मज ॥१८॥
यापरी कान्हया स्वरुपीं थाया । बुझावितां माया वेढोनि गेली ॥१९॥
आपुलैया स्वप्रभा आपण पावे शोभा । सबाह्म कृष्ण उभा एकपणें ॥२०॥
माया मोहकता गुणाची वार्ता । कृष्णापणीं एकत्वेंची ॥२१॥
एक जनार्दनी निजीं निज मिळणी । सगुणी निर्गुणीं कृष्ण एक ॥२२॥
२०
एके दिनी नवल जालें । ऐकवें भावें वहिलें ॥१॥
घरीं असतां श्रीकृष्ण । योगीयाचें निजध्यान ॥२॥
नंद पूजेसी बैसला । देव जवळी बोलाविला ॥३॥
शाळीग्राम देखोनि । मुखांत घाली चक्रापाणी ॥४॥
नंद पाहे भोवतालें । एका जनार्दनी बोले ॥५॥
२१
म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई । येरू लवलाही वदन पसरी ॥१॥
चवदा भुवनें सप्त तीं पाताळें । देखियलीं तात्काळें मुखमाजीं ॥२॥
स्वर्गीचे देव मुखामाजी दिसती । भुलली चित्तवृत्ति नंदराव ॥३॥
एका जनार्दनी नाठवें भावना । नंद आपणा विसरला ॥४॥
२२
घालुनी माया म्हणे नंदराया । भजे यादव राया कायावाचा ॥१॥
संसारसुख भोगाल चिरकाळ । परब्रह्मा निर्मळ तया भजे ॥२॥
नंद म्हणे देव दूर आहे बापा । आम्हांसी तो सोपा कैसा होये ॥३॥
ऐकातांचि वचन काय करी नारायण । प्रगटरुप जाण दाखविलें ॥४॥
शंख चक्र गदा पद्म तें हस्तकीं । मुगुट मस्तकीं शोभायमान ॥५॥
ऐसा पाहतां हरी आनंद पैं झाला । एका जनार्दनी भेटला जीवेंभावें ॥६॥
२३
सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें । खेळें तें वहिलें वृंदावनीं ॥१॥
नागर गोमटें शोभे गोपवेषें । नाचत सौरसे गोपाळासीं ॥२॥
एका जनार्दनीं रुपासी वेगळें । अहं सोहमा न कळें रुप गुण ॥३॥
२४
वेदादिक श्रमले न कळे जया पार । शस्त्रांसी निर्धार न कळेची ॥१॥
तो हा श्रीहरी नंदाचिया घरीं । क्रीडे नानापरी गोपिकांसी ॥२॥
चोरावया निघे गोपिकांचें लोणी । सौगडें मिळोनी एकसरें ॥३॥
एका जनार्दनी खेळतसे खेळा । न कळे अकळ आगमनिगमां ॥४॥
२५
मेळेवानि मुलें करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्न ॥१॥
पाळती पाहती एका जाणविती । सर्वे जाऊनी खाती दहींदूधा ॥२॥
सांडिती फोडिती भाजन ताकाचें । कवळ नवनीताचे झेलिताती ॥३॥
एका जनार्दनीं नाटकी तो खेळ । न कळे अकळ वेदशास्त्रां ॥४॥
२६
पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा ॥१॥
गोपाळ संवगडे मेळावोनि मेळा । मध्ये तो सावळा लोणी खाये ॥२॥
निजलियाच्या मुखा माखिती नवनीत । नवल विपरित खेळताती ॥३॥
न कळे लाघव करी ऐशीं चोरी । एका जनार्दनी हरीं गोकुळांत ॥४॥
२७
मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची ॥१॥
धाकुल सवंगडी घेऊनि आपण । चालती रामकृष्ण चोरावया ॥२॥
ठेवियलें लोणी काढितो बाहेरी । खाती निरंतरी संवगडी ॥३॥
एका जनार्दनीं तयाचें कौतुक । न पडे ठाऊके ब्रह्मादिकां ॥४॥
२८
मिळती गौळणी दारवटीं बैसती । धरुं आतां निश्चिती घरामध्यें ॥१॥
येतो जातो हें न कळे त्यांची माव । वाउगीच हांव धरिताती ॥२॥
पांच सात बारा होऊनियां गोळा । बैसती सकळां टकमक ॥३॥
एका जनार्दनी न सांपडेचि तयां । योगी ध्याती जया अहर्निशीं ॥४॥
२९
आहर्निशी योगी साधिती साधन । तयासी महिमान न कळेची ॥१॥
तो हा श्रीहरी बाळवेषें गोकुळीं । खेळे वनमाळी गोवाळीयांसीं ॥२॥
एका जनर्दनीं न कळे महिमान । तटस्थ तें ध्यान मुनीजनीं ॥३॥
३०
न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती ॥१॥
बैसती समस्ता धरु म्हणोनि धावे । तंव तो नेणवें हातालागीं ॥२॥
समस्ता मिळोनी बैसती त्या द्वारें । नेणेवेचि खरे येतो जातो ॥३॥
एका जनार्दनी न सांपडेचि तयां । बोभाट तो वायां वाउगाची ॥४॥
३१
वाउगे ते बोल बोलती अबळा । कवण ते गोपाळा धरुं शके ॥१॥
प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी वेरझारी घरामध्यें ॥२॥
एका जनार्दनीं गोपीकांसीं शीण । म्हणोनि विंदान करीतसे ॥३॥
३२
नवल ती कळा दावी गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा ॥१॥
धाकुले संवगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशी भीतरीं आपणची ॥२॥
द्वारा झाकानियां बैसती गोपिका । देखियला सखा गोपाळांचा ॥३॥
एका जनार्दनीं धावुनि धरति । नवल ते रिती करितसे ॥४॥
३३
गोपी धावुनियां धरिती तयातं । उगा पाहे बहतें न बोले कांहीं ॥१॥
करिती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ॥२॥
कां रें चोरा आतां कैसा सांपडलासी । म्हणोनि हातासी धरियलें ॥३॥
वोढोनियां नेती यशोदे जवळी । आहे वनमाळी कडेवरी ॥४॥
एका जनार्दनी यशोदेचे करीं । उभा श्रीहरी लोणी मागें ॥५॥
३४
घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारी ॥१॥
पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ॥२॥
गोपिका धांवती घेऊनियां कृष्ण । न कळे विंदान कांहीं केल्या ॥३॥
घेऊनियां येती तटस्थ पाहती । विस्मित त्या होती आपुले मनीं ॥४॥
एका जनार्दनींदावीत लाघव । न कळेंचि माव ब्रह्मादिकां ॥५॥
३५
मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥
यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें तें वायां बोलताती ॥२॥
एका जनार्दनीं बोलण्याची मात । खुंटली निवांत राहिल्या त्या ॥३॥
३६
आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्तीं कांहीं ॥१॥
परस्परें बोल बोलती अबळा । कैशीं नवल कळा देखियली ॥२॥
धरुनिया करीं जाती तेथवरी । उभा असे हरी जवळींच ॥३॥
एका जनार्दनीं न कळें लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजीं ॥४॥
३७
आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करीं ॥१॥
योगीयांचे ध्यानीं न सांपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणतीं ॥२॥
धारितां न धरवे तळमळ । वाउगा कोल्हाळ करिती वायां ॥३॥
एका जनार्दनीं शुद्ध भक्तिविण । पवे नारायण कवणा हातीं ॥४॥
३८
आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं ॥१॥
म्हणोनि आभावें ठाकतीं गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥
वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासें सायास शिणताती ॥३॥
एका जनार्दनींशीण गोपीकांसी । तेणें हृषीकेशी हांसतांसे ॥४॥
३९
न कळती भावेवीण रामकृष्ण । गोपिकांसी शीण बहुतची ॥१॥
बहुत मिळती बहुतांच्या मतां । तैशां गोपी तत्त्वतां शिणताती ॥२॥
एका जानार्दनीं प्रेमावीण देव । नकळे लाघव श्रीहरींचे ॥३॥
४०
भाविका त्या गोपी येतो काकुळती । तुमचेनि विश्रांती मजलागीं ॥१॥
मज निराकारा आकारासी येणें । तुमचें तें ऋण फेडावया ॥२॥
दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शाहणे तयासी न सांपडे ॥३॥
एका जनार्दनीं भाविकांवांचूनी । प्राप्त नोहे जाण देव तया ॥४॥
४१
भोळे ते साबडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया ॥१॥
यज्ञमुखीं तोंड करी जो वाकुंडें । तो गोपिकांचे रोकडें लोणी खाये ॥२॥
घरां नेऊनियां घालिती भोजन । पंचामृत जाण जेवाविती ॥३॥
एका जनार्दनीं व्यापक तो हरी । गोकुळा माझारीं खेळ खेळे ॥४॥
४२
खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे ॥१॥
जयाचिये चित्तीं जे कांही वासना । तेचि नारायण पुरविणें ॥२॥
जया जैसा हेत पुरवीं तयांचा । विकला काया वाचा भाविकांचा ॥३॥
एका जनार्दनी भाविकांच्या पाठीं । धावें जगजेठी वनोवनीं ॥४॥
३१
वाउगे ते बोल बोलती अबळा । कवण ते गोपाळा धरुं शके ॥१॥
प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी वेरझारी घरामध्यें ॥२॥
एका जनार्दनीं गोपीकांसीं शीण । म्हणोनि विंदान करीतसे ॥३॥
३२
नवल ती कळा दावी गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा ॥१॥
धाकुले संवगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशी भीतरीं आपणची ॥२॥
द्वारा झाकानियां बैसती गोपिका । देखियला सखा गोपाळांचा ॥३॥
एका जनार्दनीं धावुनि धरति । नवल ते रिती करितसे ॥४॥
३३
गोपी धावुनियां धरिती तयातं । उगा पाहे बहतें न बोले कांहीं ॥१॥
करिती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ॥२॥
कां रें चोरा आतां कैसा सांपडलासी । म्हणोनि हातासी धरियलें ॥३॥
वोढोनियां नेती यशोदे जवळी । आहे वनमाळी कडेवरी ॥४॥
एका जनार्दनी यशोदेचे करीं । उभा श्रीहरी लोणी मागें ॥५॥
३४
घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारी ॥१॥
पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ॥२॥
गोपिका धांवती घेऊनियां कृष्ण । न कळे विंदान कांहीं केल्या ॥३॥
घेऊनियां येती तटस्थ पाहती । विस्मित त्या होती आपुले मनीं ॥४॥
एका जनार्दनींदावीत लाघव । न कळेंचि माव ब्रह्मादिकां ॥५॥
३५
मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥
यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें तें वायां बोलताती ॥२॥
एका जनार्दनीं बोलण्याची मात । खुंटली निवांत राहिल्या त्या ॥३॥
३६
आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्तीं कांहीं ॥१॥
परस्परें बोल बोलती अबळा । कैशीं नवल कळा देखियली ॥२॥
धरुनिया करीं जाती तेथवरी । उभा असे हरी जवळींच ॥३॥
एका जनार्दनीं न कळें लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजीं ॥४॥
३७
आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करीं ॥१॥
योगीयांचे ध्यानीं न सांपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणतीं ॥२॥
धारितां न धरवे तळमळ । वाउगा कोल्हाळ करिती वायां ॥३॥
एका जनार्दनीं शुद्ध भक्तिविण । पवे नारायण कवणा हातीं ॥४॥
३८
आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं ॥१॥
म्हणोनि आभावें ठाकतीं गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥
वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासें सायास शिणताती ॥३॥
एका जनार्दनींशीण गोपीकांसी । तेणें हृषीकेशी हांसतांसे ॥४॥
३९
न कळती भावेवीण रामकृष्ण । गोपिकांसी शीण बहुतची ॥१॥
बहुत मिळती बहुतांच्या मतां । तैशां गोपी तत्त्वतां शिणताती ॥२॥
एका जानार्दनीं प्रेमावीण देव । नकळे लाघव श्रीहरींचे ॥३॥
४०
भाविका त्या गोपी येतो काकुळती । तुमचेनि विश्रांती मजलागीं ॥१॥
मज निराकारा आकारासी येणें । तुमचें तें ऋण फेडावया ॥२॥
दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शाहणे तयासी न सांपडे ॥३॥
एका जनार्दनीं भाविकांवांचूनी । प्राप्त नोहे जाण देव तया ॥४॥
४१
भोळे ते साबडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया ॥१॥
यज्ञमुखीं तोंड करी जो वाकुंडें । तो गोपिकांचे रोकडें लोणी खाये ॥२॥
घरां नेऊनियां घालिती भोजन । पंचामृत जाण जेवाविती ॥३॥
एका जनार्दनीं व्यापक तो हरी । गोकुळा माझारीं खेळ खेळे ॥४॥
४२
खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे ॥१॥
जयाचिये चित्तीं जे कांही वासना । तेचि नारायण पुरविणें ॥२॥
जया जैसा हेत पुरवीं तयांचा । विकला काया वाचा भाविकांचा ॥३॥
एका जनार्दनी भाविकांच्या पाठीं । धावें जगजेठी वनोवनीं ॥४॥
४३
गोकुळामाजी कृष्णें नवल केलें । स्त्री आनि भ्रतारा विंदान दाविलें ॥१॥
खेळ मांडिला हो खेळ मांडिला । न कळे ब्रह्मादिकां अगम्य त्याची लीळां वो ॥२॥
एके दिनीं गृहा गेले चक्रपाणी । बैसोनी ओसरी पाहे पाळतोनी लोनी ॥३॥
गौळणी आली घरां म्हणे शारंगपाणी । चोरीचे विंदान पाळती पाहसी मनीं ॥४॥
चोरी करावया जरी येसी सदनीं । कृष्णा धरुनी तुझी शेंडी बांधीन खांबालागुनी ॥५॥
एका जनार्दनीं ऐसे बोले व्रजबाळी । दाविलेंअ लाघव ब्रह्मादिकां न कळे ते काळीं ॥६॥
४४
उठोणि मध्यरात्रीं तेथें आला सांवळा । सुखसेजे पहुडली देखे गोपी बाळा ॥१॥
पती आणि गौळणी एके सेजे पहुडली । बैसोनियां सेजे विपरीत करणी केली ॥२॥
धरुनी गोपी वेणी दाढी पतीची बांधिली । न सुटे ब्रह्मादिकी ऐशी गांठ दिधली ॥३॥
करुनी कारण आले आपुले मंदिरा । यशोदे म्हणे कृष्णा काय केलें सुंदरा ॥४॥
जाहला प्राप्तःकाळ लगबग उठे कामिनी । वोढातसे दाढी जागा झाला तो क्षणीं ॥५॥
कां गे मातलीस दिली दाढी वेणी गांठी । एका जनार्दनीं आण वाहे गोरटी ॥६॥
४५
उभयतां बैसोनि क्रोधें बोलती । कैशीं जाहलीं करणी एकमेक रडतीं ॥१॥
गोदोहन राहिलें दिवस आला दुपारी । धाउनी शेजारी येती पहाती नवलपरी ॥२॥
शस्त्रें घेउनियां ग्रंथीं बळे कपिती । कपितांचि शस्त्रें आन कापें कल्पांतीं ॥३॥
घेऊनियां अग्नि लाविताती दाढी वेणी । न जळेचि वन्ही ऐशी केली कृष्णें करणी ॥४॥
ऐसा समुदाव लक्षावधि मिळाला । बोल बोलती बोला भलतेंचि बरळा ॥५॥
धावूंनिया नंदनारायतें सांगती । एका जनार्दनीं नवल विपरित गती ॥६॥
४६
नंदे आणिविलें उभयंता राजबिंदी । गोवळे आणि गोवळी भोवंतीं जनांची मांदी ॥१॥
येवोनि चावडीये उभयंता रडती । म्हणे नंदराव कैशी कर्मांची गती ॥२॥
अकावरी बैसोनी सांवळा गदगदां हांसें । विंदान दाविले तुज बांधिलें असे ॥३॥
आमुची तूं शेडीं काल बांधीन म्हणसी । न कळे देवाची माव देवें बांधिलें तुजसी ॥४॥
आतां माझी गती कैशीं हरी ते सांगा । करुणाभरीत देखोनि गेलें लागह वेगा ॥५॥
एका जनार्दनी करूणाकर मोक्षदानी । सहज दृष्टी पाहतां सुटली ग्रंथी दोनी ॥६॥
४७
आल्हादयुक्त गोपिका आली आपुलें सदनीं । नंदासहित मोक्षदानी प्रवेशलें भुवनीं ॥१॥
म्हणे यशोदा बा कृष्णा न करी तूं खोडी । बोलती गोपिका वाईट त्या जगझोडी ॥२॥
एका जनार्दनीं माझा अपराध नाहीं । जया जैसा भाव तया तोचि देहीं ॥३॥
४८
उठोनि प्रातःकाळीं गोपी येती घरा । आवरीं आवरीं यशोदे आपुलिया पोरा ॥१॥
थोर पीडीयेलें सांगतां नये आम्हां । दहीं दूध तूप लोनी नासिलें सीमा ॥२॥
लेकी सुना पोरें वेडाविलीं सकळ । चोरी करिताती भुलविलें सबळ ॥३॥
एका जनार्दनीं आवरीं आपुला कान्हा । तुझा तुज गोड वाटे हांसतीस मना ॥४॥
४९
येकीपुढें येक सरसावोनि गोपिका । सांगतो गाह्माणीं तुज नाहीं ठाऊका ॥१॥
रात्री मंचकावारी पहुडतां साजणी । अवचित येऊनी बांधी दाढी आणि वेणी ॥२॥
नाहतां आपुलेअ अंतसदनीं । येऊनियां पुढें बैसें शारंगपाणी ॥३॥
ऐसा कटाळा आणियला येणें । एका जनार्दनीं तुझें आवडतें तान्हें ॥४॥
५०
दुजी येऊनी पुढें बोले ऐकें वो बाई । घुसळण घुसळितां डेरां फोडिला पाहीं ॥१॥
धांवुनि आलीं सासु मारितसें मजला । हांसतसे आपण तेथोनि पळाला ॥२॥
वांसुरें तीं साडीं मुला चिमुरे घेतो । द्या रे नवनीत म्हणोनि तया मारितो ॥३॥
लपविलें ठायीं उरों नेदी कांहीं । एका जनार्दनीं पुरें आतां बाई ॥४॥
५१
धांवुनीं तिजी गोपिका म्हणे वो बाई । येथें रहावया लाग उरला नाहीं ॥१॥
जात होतें पाण्यां यमुने पहाटीं । अविचित येऊनियां पाठी थापटी ॥२॥
एका जनार्दनीं आणियला त्रास । नको हें गोकुळ आम्हीं जाऊ मथुरेस ॥३॥
५२
एकी पुढें एक सांगतीं गार्‍हणीं । लिहितां पृथ्वीं न पुरेचि धूणी ॥१॥
म्हणे यशोदा कृष्णा काय हें कैसें । खोडी नको करुं हरि बोलतसे ॥२॥
मज नेती गृहांत दहा पांच मिळती । नग्न होऊनियां मज पुढें नाचती ॥३॥
म्हणती रे पोरा तु दिससी साना । हृदयी धरुनी करी देती स्तना ॥४॥
ऐसे यांचे तुज सांगु म्हनतां माते । एका जनार्दनी नवल वाटे तुंते ॥५॥
५३
मिळोनि धमकटी दहीं दूध ते खाती । मी खेळतां राजबिंदीं घरांत नेतीं ॥१॥
नग्न होऊनियां नाहती अबळा । डोळें झांक म्हणती मज त्यां सकळां ॥२॥
न झांकितां डोळे लोणी देती । मजसी खादलें म्हणोनि सांगती तुजासी ॥३॥
एका जनार्दनी बोलतां हांसतीं बाळा । रागावुनी मग बोला बोलती सकळां ॥४॥
५४
काय याचें बोलें तुज वाटतसे कोडे बोलते सांवळा अवघे वितंड ॥१॥
पुरें तुझें गाव नको आतां वस्ती । आम्हीं जाऊं सर्व मिळुनि मथुरेप्रती ॥२॥
नाहीं तसे बोल बोलतसे वायां । एका जनार्दनीं हा तुझा कान्हया ॥३॥
५५
नको करुं आतां कृष्णा तु खोडीं । नाहीं म्हणोनियां दोनी हात जोडी ॥१॥
काल इचे गृहीं थोडें खादले नववीत । म्हणोनि राधिकेचे स्तनी ठेवी हात ॥२॥
येवढाचि गोळा कढिला बाहेरी । सत्य म्हणोनिया आण वाहतो हरी ॥३॥
एका जनार्दनीं विश्वव्यापक सांवळा । न कळे ब्रह्मादिकां याची अगम्य कळा ॥४॥
५६
हासोनिया राधा बोले यशोदेशी । यह ओ हा चोर बोल विश्वासी ॥१॥
आण वाहतसे लटकीची मामिसे । याचिया वचनीं सर्वास विश्वासे ॥२॥
खोडी न करी ऐशी वाहे तू आण । गोरसांवांचुनि चोरी न करीं तुझी आण ॥३॥
एका जनार्दनीं बोले विनोद वाणी । यशोदेसह हांसती गौळणीं ॥४॥
५७
घरोघरीं चोरी करितो हृषीकेश । गार्‍हाणे संगिती येऊनी यशोदेसी ॥१॥
भली केली गोविंदा भली केली गोविंदा । निजभक्तालागीं दखाविसी लीला ॥२॥
कवाड उघडोनि शिंके वो तोडिलें । दहीं दुध भक्षूनि ताक उलंडिलें ॥३॥
अंतर बाहेर मज व्यापियलें माया । एका जनार्दनी म्हणे न सोडी पायां ॥४॥
५८
मिळोनि अबळा बैसती परसद्वारी । येरे येरे कृष्णा म्हणोनि बाहाती व्रजनारी ॥१॥
ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ॥२॥
वेदश्रुतीसी न कळे जयांची शुद्धी । तो नवनीत खावया लाहे लाहे घरामाधी ॥३॥
एका जनार्दनी ब्रह्मा परिपूर्ण । पूर्ण वेधे वेधिलें आमुचे मनाचें मन ॥४॥
५९
मार्गी जातां विस्मय करी । कैसें विंदान केले नवल परी । आम्हीं अबला घालितो अचोरी । श्रीहरी परापश्यंती वेगळा ॥१॥
नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करितां धरिला पाहे । घरां घेऊनि जातां उभा आहे । न कळे विंदान सये काय सांगू ॥२॥
एका जनार्दनी परिपूर्ण । व्यापाक सर्वाठायीं संपूर्ण । जनींवनीं जनार्दनी । पाहतां महिमान न कळे ॥३॥
६०
ऐसें नानापरी सांगती गार्‍हाणे । ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ ॥१॥
पुनरपी संसार नवेची मागुती । शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती ॥२॥
एका जनार्दनी ऐकतां चोरीकर्म । कर्म आणि धर्म पावती विश्राम ॥३॥
६१
जो न कळे वेदशास्त्र गे माये । तो गोकुळी चोरुनी लोणी खाये ॥१॥
ऐशी भाविकांची आवडी देखा । टाकुनी आला वैकुंठ सुखा ॥२॥
एका जनार्दनीं ब्रह्मा परिपूर्ण । तया घालिती यशोदा भोजन ॥३॥
६२
बाळ कृष्ण रांगे नंदाघरीं । चोरी करी घरोघरीं गौळणी धरूनिया करीं । घेऊन नंदमंदिरा आली ॥१॥
गार्‍हाणे सांगती अबला नवलविंदान तयाची ती कळा । हांसत उभा यशोदे जवळा पाहूनियां बाळा चाकाटली ॥२॥
राहिलें बोलणें चालणेंनिवांत । कृष्णरुपी वेधलें चित्त । एका जर्नादनीं समाधिस्त । द्वैताद्वैत विसरली ॥३॥
६३
एकमेका गौळणी करिती विचार । चोरी करी कान्हा नंदाचा कुमर ॥१॥
नायके वो बाई करुं गत काई । धरू जातां पळुन जातो न सांपडेचि बाई ॥२॥
दहीं दूध लोणी चोरी करुनियां खाये । पाहूं जातां कवाड जैसे तैसे आहे ॥३॥
एका जनार्दनी न कळें लाघव तयाचें । न कळेची ब्रह्मादिकां वेडावले साचें ॥४॥
६४
काय सांगू यशोदेबाई । आम्ही घरांत बैसलों पाहीं । कृष्ण आला लवलाही । म्हणे मज भूक लागली ॥१॥
ऐसा लाघवी हा हरी । खोडी करी नानापरी । धारितां न धरवे निर्धारीं । जातों पळुनिया दुरी ॥२॥
माझी सुन एकली घरीं । नाहात होती परसद्वारीं । आपण येउनि झडकरी । उभा पुढें राहिला ॥३॥
तवं ती म्हणे का आलासी । कृष्ण म्हणे तूं परियेसी । मी खेळत होतों बिदीसीं । चेंडु उडोनियां आला ॥४॥
तंव ती म्हणे पाहे कृष्णा । क्रियाहीन नष्ट तूं कान्हां । घाली मिठी धरी स्तना । कां गे चेंडू देईना ॥५॥
तव ती म्हणे परतां सर । कृष्ण म्हणे दे चेंडूं सत्वर । एका जनार्दनीं निर्धार । परा भक्ति हे साचार ॥६॥
६५
आम्हीं असतां माजघरीं । रात्र झाली दोन प्रहरीं । मी असतां पतिशेजारीं । अवचित हरी तुझा आला ॥१॥
काय संगु सखये बाई । वेदशास्त्रां अगम्य पाहीं । आगमनिगमां न कळे कांहीं । मन पवन पांगुळलें गे बाई ॥२॥
आम्हीं असतां निदसुरी । मुंगुस घेउनी आपुले करीं । सोडियलें अदोघा माझारीं । तंव तें बोचकरी आम्हांतें ॥३॥
आम्हीं भ्यालों उभयतां । चीर फिटलें बाई तत्त्वतां । नग्नाचि जाहलें मी सर्वथा । भूतभूत म्हणोनि भ्यालें ॥४॥
ऐसें करुनि आपण पळाला । जाउनी माये आड लपला । एका जनार्दनी म्हणे भला । आतां सांपडतां न सोडी त्याला ॥५॥
६६
गौळणी बारा सोळा । हो उनी येके ठायीं मेळा । म्हणती गे कृष्णांला । धरुं आजीं ॥१॥
कवाड लाउनीं । बैसल्या सकळजणी । रात्र होतांचि माध्यांनी । आला कृष्ण ॥२॥
दहीं दुध तुप लोणी । यांची भोजनें आणुनी । रितीं केली तत्क्षणीं परी तयां न कळें ॥३॥
थोर लाघव दाविलें । सकळां निद्रेनें व्यापिलें । द्वार तें नाहीं उघडिलें । जैसें तैसेंची ॥४॥
खाउनी सकळ । मुखा लाविलें कवळ । आपण तात्काळ । पळे बाहेरी ॥५॥
एका जनार्दनी ऐशी करुनि करणी । यशोदे जवळी येउनी । वोसंगा बैसे ॥६॥
६७
उदय सुर्याचा जाला । मिळाला गौळणीचा मेळा । धाउनी सकळां । आलीया अंगणीं ॥१॥
बोलती आणि संक्रोधें । थोर पीडेलें बाळकें ।चोरी करुनियां देखे । आला पळोनि ॥२॥
आमुचीं फोडिलीं भाजनें । दहीं दुध खादलें येणें । एका जनार्दनी तान्हें । यशोदे तुझें ॥३॥
६८
येणें कृष्णें आमुचें खादलं दुध दहीं । फोडोनि टाइलें भाजनें पाहीं ॥१॥
आवरी आवरी बाई आपुला कान्हा । न कळे याची कारणी ब्रह्मादिकां नये ध्याना ॥२॥
घेऊनियां पोरें घरामध्यें येतो पाहे । चोरी करुनियां पळुनी जातो लवलाहें ॥३॥
एका जनार्दनीं किती सांगू गार्‍हाणें । पुन्हां आलिया यासी शोक लावीन सत्य जाणे ॥४॥
६९
गौळणी सांगती गार्‍हाणीं । रात्री आला चक्रपणी ।
खाऊनी दहीं दूध तूप लोणी । फोडिली अवघीं विरजणीं ॥१॥
हा गे बाई कोणासी आवरेना । यशोदा बाळ तुइझा कान्हा ।
कोठवर सांसुद धिंगाणा ॥धृ०॥
दुसरी आली धांवत । याने बाई काय केली मात ।
मुखाशीं मुखचुंबन देत । गळ्यामधी हात घालीत धरुं जातां सांपडेना ॥२॥
तिसरी आली धांउनी । म्हणे गे बाई काय केली करणी ।
पतीची दाढ़ी माझी वेणी । दोहीसी गांठ देउनी । गांठ बाई कोणा सुटेना ॥३॥
मिळोनि अवघ्या गौळणी । येती नंदाच्या अंगणीं ।
जातों आम्हीं गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना घेउनी । हें बाई आम्हांसी पहावेना ॥४॥
ऐशीं ऐकतां गार्‍हाणीं । यशोदानयनीं आलें पाणीं ।
कृष्ण खोड दे टाकुनी एका जनार्दनीं चरणीं । प्रेम तया आवरेना ॥५॥
७०
गौळणी गार्‍हाणे सांगतो यशोदेसी । दहीं दुध खाऊनियां पळुनी जातो हृषीकेशी ॥१॥
लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे । याच्या खोडी किती सांगु महीपत्र सिंधु आटे ॥२॥
मेळवानि गोपाळ घरामध्यें शिरे कान्हा । धरुं जातां पळुनि जातो यादवांचा राणा ॥३॥
ऐसें मज याने पिंसे लावियसे सांगु काई । एका जनार्दनी कायावचामनें पायी ॥४॥
७१
यशोदेसी गौळणी सांगती गार्‍हाणे । नट नाटक कपटी सांभाळ आपुले तान्हें ।
किती खोडी याच्या सांगु तुजकारणें ॥१॥
सहस्त्रमुख लाजला । निवांतचि ठेला । वेद परतला ।गाती अनुछंदे ।
वेध लाविला गोविंदे । परमानंदे आनंदकंदें ॥धृ॥
एके दिवशी मी गेलें यमुनातट जीवना । गाई गोप सांगतें घेऊनि आला कान्हा ।
करीं धरी पदरा न सोडी तो जाणा । एकांत घातली मिठी ।
न सुटे गांठीं तो पाहिला दृष्टी । नित्य आनंदु वेध लाविला ॥२॥
माझ्या घरासी एकदां आले शारंगपाणी । दहीं दुध भक्षुनी रितीं केली दुधाणीं ।
अज्ञान मडकीं टाकिलें निपटुनी । पाहिला हरी पळाला दुरी । घरा भीतरीं बाई यशोदे । वेध लाविला ॥३॥
किती खोडी याच्या सांगू तुज साजणी । गुण यांचे लिहितां न पुरे मेदिनी ।
रुप सुंदर पाहतां न पौरे नयनी । एका जनार्दनीं देखिला ।
ध्यानी धरिला । मनीं बैसला । सच्चिदानंद ॥ वेध लाविला ॥४॥
७२
ऐके ऐके बाई यशोदे । नवल केलें तुझ्या गोविंदे । आमुची मुलें तुडविली पदें । आतां यासी बांधीना ॥१॥
आवरीं आवरीं आपुला कान्हां । नाशियल्या आमुच्या सुना । अझुनि नये तुझ्या मना ॥ तुझा तुला गोड वाटे कान्हा ॥२॥
येतो आमुचे घरासी । धमकावितो लेकीसुनासी । कोठें लोणी सांग आम्हांसी । न सांगतां वासुरें सोडी बिदीसी ॥३॥
आपण खातो दहीं दुध लोणीं । हात पुसतो सुनेच्या मुखालागुनीं । एका जनर्दनी करी करणी । जातो पळोनि तेथोनी ॥४॥
७३
मिळोनि गौळणी । देती यशोदे गार्‍हाणीं । खोडी करी आमुचे घरा । दारीं यशोदे ॥१॥
परां आला आमुचे घरा । दारी निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा ही डेरा । फोडिला सैरा त्यावरीं ॥२॥
दुसरी बोले बाई यशोदे । कांही सांगते तुझिया मुकुंदें । आमचेंघरा येऊनि गोविंदे । नवल केलें साजणी ॥३॥
सुन होती माझी गर्भिणी । तीस पुसे चक्रपाणी । कैसी जाहलीली हो गर्भिणी । तव ती हांसु लागली ॥४॥
जवळा बैसला जाऊनी । पोट आहे चांचुपनी । न कळे इश्वराची करणी । तंव ती झिडकावी ॥५॥
ऐशा खोडी नानापरी । किती म्हणोनि सांगु सुंदरी । ऐका जनार्दनीं आवरी । आपुलीयां कृष्णांतें ॥६॥
७४
गोकुळीं चोरी करितो चक्रपाणी गवळणी येउनी सांगती गार्‍हाणीं ।
येणेंमाझें भक्षिलें दहीं दूध लोणी । पळोनियां येथें आला शारंगपाणी वो ॥१॥
आवरीं आवरीं यशोदे आपुला कान्हा । याच्या खोडी किती सांगु जाणा ।
याचें लाघव न कळे चतुरानना । यासी पाहतां मन नुरे मीपणा वो ॥२॥
एके दिवशीं मी आपुलें मंदिरीं । मंथन करितां देखिला पुतनारी ।
जवळी येवोनि रवीदंड धरी । म्हणे मी घुसळितोम तु राहें क्षणभरी वो ॥३॥
परवां आमुचे घरासी आला । संगे घेउनी गोपाळांचा मेळा ।
नाचले ऐकत धरें पाहें अचला । धरूं जातां तो पळोनियां गेला वो ॥४॥
ऐसें बहु लाघव केलें येणें । किती सांगावें तुज गार्‍हाणें ।
एका जनार्दनीं परब्रह्मा तान्हें । यासी ध्याता खुंटलें येणे जाणे वो ॥५॥
७५
माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥ धृ ॥
हाती घेऊनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल । हातें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥
माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥२॥
संगे घेऊनि गोपाळ । बाळ खळॆ आळुमाळ । पायीं पोल्हारे झळाळ । गळां माळ वैजंयती ॥३॥
एका जनार्दनीं माय । घरोघरांप्रती जाय । कृष्णा जाणावें तें काय । कोणी सांगा गे ॥४॥
७६
नानापरी समजवितें न परी राहे श्रीहरी ।
दहींभात कालवोनि दिला वेगीं झडकरीं । कडेवरी घेऊनियां फिरलें मी द्वारोद्वारीं ।१॥
राधे राधे राधे राधे घेई शामसुंदरा । नेई आतां झडकरीं आपुलिया मंदिरा ॥धृ॥
क्षणभरी घरीं असतां करी खोडी शारंगपाणी । खेळावया बाहेरीं जातां आळ घेती गौळणी ।
थापटोनि निजवितां पळोनि जातो राजद्वारा ॥२॥
राधा घेउनि हरिला त्वरें जात मंदिरीं । हृदयमंचकीं पहुडाविला श्रीहरीं ।
एका जनार्दनीं हरीला भोगी राधा सुंदरीं ॥३॥
७७
करूं देईना मज दुध तुप बाई । मथितां दधि तो धरी रवीं ठायीं ठायीं ।
हट्टे का कदापि नुमजे समजाविल्यास काई । समजाउनी यातें तुझ्या घरांत नेई नेई ॥१॥
राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेइ घेई । रडतानां राहिना करुं यांस गत काई काई ॥धृ॥
हरिसी आनंदे राधा मृदु मृदु बोलवीते । पाळण्यांत तुला कृष्णा निजवोणी हालवितें ।
गुह्मा नेऊनियां दही भात कालवितें । यशोदेसी सोडीं कान्हा माझ्याजवळी येई येई ॥२॥
हट्ट मोठा घेतो मला छळितो गे राधे पाहाणें । असाच हा नित्य राधे हरि घरा नेता जाणें ।
उगाचि हा निश्चळ कैसा राहे त्वां समजावल्यानें । तुझी धरिते हनुवटी यासी गुहां नेई नेई ॥३॥
गोविंदा गोपाळा कृष्ना मुकुंदा शेषशाई । जगज्जीवना गोकुळभुषणा गोपी भुलवणा बाई ।
उगा नको रडुं कृष्णा यशोदेसी सोडीं तूंही । एका जनार्दनीं शरण राधे । घेऊन यासी जाई जाई ॥४॥
७८
एके दिनीं प्रातः काळीं । कृष्णें घेतलीसे आळी । देखोनियां उदय मेळीं । सुर्यबिंब ॥१॥
देई देई मज तें आई । रडत बैसला हो बाई । काय सांगो हो सई । या बाळातें ॥२॥
मांडिलें विंदान । न कळे कोना महिमान । रडतां राहिना पुर्ण । तों देखे राधिका ॥३॥
राधा म्हणे कृष्णांसी । का रे चोरा रडतोसी । येरु म्हणे गोळा दे मजसी । मग मी न रडे ॥४॥
उचलोनी काखेसी घेतला । तंव तो रडतां राहिला । यशोदा म्हणे राधिकेला । नेई घरा कृष्णतें ॥५॥
घेऊनियां झडकरीं । घरी आली सत्वरीं । सुमनांचे सेजेवरी । पहुडविलें कृष्णा ॥६॥
घरी देखोनी एकांत । चुबन देउनि बोले माते । अससी धाकुटी बहुत । नचले कांहीं ॥७॥
तंव बोले वनमाळी । थोर होतो हेचि वेळी । डोळें झांकीं तूं वेल्हांळीं दावी विंदान ॥८॥
नेत्र झाकितां तें क्षणीं । जाहला निमासुर तरुणी । षोडश वर्षी मोक्षदानी । देखे राधिका ॥९॥
धांउनी घातालीसे मिठी । हरुष न समाये पोटीं । शयन सुखें गोष्टीं । करी कृष्णांसी ॥१०॥
असतां सुखें एकांतासी । भ्रतार आला ते समयासी । उभा राहुनि द्वारासी । हांक मारी ॥११॥
ऐकतां भ्रतारांचें वचन । घाबरलें राधिकेचें मन । धरी कृष्नाचे चरण । सान होई ॥१२॥
कृष्ण बोले हास्यमुखे । मंत्र विसरलों या सुखें । आतां होणार तें सुखें । होवो यावरी ॥१३॥
भक्तांचे मानसींचा चोर । पाहूनियां तो विचार । पुर्ववत साचार होऊनि रडे ॥१४॥
दहीं भात कालवुनी । ठेविला पुढें आणुनी । बोले आनयासी प्रती वचनीं । क्षणभरी बैसा ॥१५॥
जेवितसे कृष्णनाथ । क्षणभरी बैसा स्वस्थ । ऐकतांचि ऐशीअ मात । निवांत बैसे ॥१६॥
मग द्वार उघडिविलें । राया कृष्णातें देखिलें । मन तें मोहिलें । अनायांचें ॥१७॥
आनया बोले राधिकेसी । गृहीं नगमें तुजसी । क्षणभरी कृष्णासी । आणीत जाई ॥१८॥
तुमची आज्ञा प्रणाम । म्हणोनि वंदिले चरण । एका जनार्दनी समाधान । पावले दोघे ॥१९॥
७९
एके दिवशी शारंगपाणी । खेळत असतां राजभुवनीं । तेव्हा देखिली नयनीं । गौळणी ते राधिका ॥१॥
मीस करुनी पाणीयाचें । राधा आली तेथें साचें । मुख पहावया कृष्णाचे । आवड मोठी ॥२॥
देव उचलोनि घेतला । चुंबन देउनि आलंगिला । सुख संतोष जाहला । राधेलागीं ॥३॥
यशोदा म्हणे राधिकेसी । क्षणभरी नेई गे कृष्णासी । कडे घेउनी वेगेंशीं आणिला घरा ॥४॥
हृदयमंचकीं बैसविला । एकांत समय देखिला । हळूच म्हणे कृष्णाला । लहान असशी ॥५॥
कृष्णा म्हणे राधिकेसी । मंत्र आहे मजपाशी । थोर होतो निश्चयेंसी । पाहें पा आतां ॥६॥
वैकुंठाचा मन मोहन । सर्व जगांचे जीवन । एका जनार्दनीं विंदान । लाघव दावीं ॥७॥
८०
हर्षा नमाये अंबरीं । येऊनियां झडकरी । द्वारा उघडी निर्भरी । आनंदमय ॥१॥
वृद्धा येऊनियां पाहें । उचलोनि लवलाहे । मुख चुंबिलें तें पाहें । कृष्णाचे देखा ॥२॥
मोहिलें वृद्धेचें मन । नाठवे आपपर जाण । लाघवी तो नारायण । करुनियां आकर्ता ॥३॥
दोहीं करें उचलिला । राधिकेजवळीं तो दिला । म्हणे राधेसी ते वेळां । यांसी नित्य आणी ॥४॥
तुज न गमे एकटी । आणीत जाई जगजेठी । एका जनार्दनाचे भेटी । रे कांहीं विकल्प ॥५॥
८१
निमासुर वदन । शंखचक्राकित भूषण । शोभवते राजीवनयन । राधेजवळी ॥१॥
नवल मांडिलें विंदान । वेदां न कळे महिमान । वेडावली दरुशने । न कळे तयां ॥२॥
रत्‍नजडित पर्यंकीं । पहुडले हर्ष सुखीं । नवल जाहलें तें ऐकीं । सासू आली घरां ॥३॥
वृद्धा म्हणे राधेशीं । दार उघड वेगेंशी । गुह्मा गोष्टी बोलसी । कवणाशीं आंत ॥४॥
राधा म्हणे मामिसे । गृहामध्यें कृष्ण असे । मज गमावया सरिसें । आणिला घरीं ॥५॥
क्षणभरी स्थिर रहा । भरले पायें आत न या । भोजन जाहलीया । उघडितें द्वार ॥६॥
म्हणे कृष्णा आतां कैसें । दारीं वृद्धा बैसलीसे । लज्जा जात अनायासें उभयतांची ॥७॥
कृष्ण म्हणे राधेसी । मंत्र नाठवे मजसी । काय उपाय गोष्टिसी । सांगे तूं मज ॥८॥
नेणो कैशी पडली भुली । मंत्र चळला या वेळीं ऐकोनि राधा घाबरली । दीनवदन ॥९॥
करुणा वचनें बोले राधा । विनोद नोहे हा गोविंदा । माझी होईल आपदा । जगमाजीं ॥१०॥
भक्तवत्सल मनमोहन । शरण एका जनार्दन । ऐकोनि राधेचें वचन । सान जाहला ॥११॥
८२
थुरकात थुरकत चालतु । राधिकेचे गळां मिठी घालितु ।
तयेसी चुंबन आवडी देतु । पाहतां यशोदेसी मग रडतु ॥१॥
देई देई म्हणे चेंडूवातें । म्हणोनि आसडी निरीतें ।
यशोदा म्हाणे राधे परते । कां गे रडविसी कृष्णा ॥२॥
राधिका म्हणे ऐका मामिसें । याचा चेंडु मजपाशी नसे ।
हा क्रियानष्ट बोले भलतैसें । चेंडू मजपाशी नाही आणि तुमची असे ॥३॥
कृष्ण म्हणे झाडुनी चीर दावी । राधा झाडिता चेंडू पडिला लवलाहीं ।
म्हणे पाहे वो माझे आई । चेंडू घेउनी आण वाहेती पाहीं ॥४॥
यशोदेनें उचलोनि घेतिला कडेवरी । चेंडू झेलितसे सव्य अपसव्य करीं ।
एका जनार्दनीं भाव न कळे निर्धारीं । लाजोनी ती राधा आली आपुले घरीं ॥५॥
८३
मथुरेसी गोरस विकूं जातां नितंबिनी । तयामाजीं देखिली राधिका गौळणी । जवळी जाऊनियां धरिली तिची वेणी ॥१॥
सोडी सोडी कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा घातलें पाणी । नांव रुप माझें बुडविलें जनीं ॥२॥
राधा म्हणे येथोनियां बहु चावट होसी । घरीं चोरी करुनियां वाटे आडविसी । ओढोनिया नेते आतां तुज मातेपाशीं ॥३॥
धरिलीं पदरीं राधा न सोडिच निरी । दान दे आमुचे म्हणे मुरारी । भोवंताली हांसती व्रज सुंदरी ॥४॥
भक्तीचियां पोटीं राधा समरस जाली । कृष्णरुप पाहूनियां देहभावा विसरली । एका जनार्दनीं राधा शेजे पहुडली ॥५॥
८४
फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनि नांरगी फाटा ॥१॥
वारियाने कुंडलें हाले । डोळे मोडित राधा चाले ॥२॥
राधा पाहून भुललें हरी । बैल दुभें नंदाघरी ॥३॥
हरी पाहूनि भुलली चित्ता । राहा घुसळी पडेरा रिता ॥४॥
मन मिनलेंसें मना । एका भुलला जनार्दना ॥५॥
८५
आल्या पांच गौळणी पांच रंगाचे शृंगार करुनी ॥धृं॥
पहिली गौळण रंग सफेत । जशी चंद्राची ज्योत । गगनी चांदणी लखलखीत ।
एका चिती मात । मंथन करीत होती दारीत । धरुन कृष्णांचा हात । ऐशा आल्या पांच गौळणी ॥१॥
दुसरी गौळण भाळीभोळी । रंग हळदीहुनि पिवळी । पिवळा पितांबर नेसुन आली ।
अंगीं बुट्टे दार चोळी । एक लहान तनु उमर कवळी । जशी चांफ्यांची कळी । ऐशा आल्या पांच गौलणी ॥२॥
तिसरी गौळण रंग काळा । नेसुन चंद्रकाळा । काळे काजल लेऊन डोळां ।
रंग तिचासांवळा । काळीं गरसोळी लेऊन गळां । आली राजस बाळा । ऐशा आल्या पांच गौळनी ॥३॥
चवथी गौळण रंग लाल । लाल लालही लाल । कपाळी कुंकुम चिरी लाल ।
भांगी भरुन गुलाल । मुखी विडा रंग लाल । जैसे डांळिबीचे फुल । ऐशा आल्या पांच गौळणी ॥४॥
पांचवीं गौळण हिरवा रंग । अवघ्या झाल्या दंग । हिरव्या कांकणांचा पहा रंग ।
जसें आरशींत जडलें भिंग । फुगडी खेळतां कृष्णसंग । एकनाथ अभंग । ऐशा आला पांच गौळणी ॥५॥
८६
देखे देखे ग जशोदा मायछे । तोरे छोरींयानें मुजें गारी देवछे ॥१॥
जमूनाके पानीयां मैं ज्यावछे । बीच मीलके घागरीया फोडछे ॥२॥
मैंने ज्याके हात पकरछे । देखे आपही रोवछे मायना ॥३॥
एका जनार्दन गुन गावछे । फेर जन्म नहीं आवछे मायना ॥४॥
८७
देवरे देवरे मोरी घागरीया लालसे । मैं बोलुंगी जशोदा मायछें ॥१॥
हाम रहीन दसे नामछे । तारी भीद नहीं मारो कामछे ॥२॥
आकर पकरीयो मोरे आंगछे । मैं लाजे न आइगे मा अवछो ॥३॥
एका जनार्दनी तोरे पुत्रनें हामछे । फजितीन मानली आइछे ॥४॥
८८
मैं ज्यावगी छोरकर तोरे गांवाछे । तूं खोरी मतकर मोरे लालछे ॥१॥
मोरे घर तूं आकर लालछे । माखन चुरावत आपणे हातछे ॥२॥
मैं कहँगी तोरे मातछे । किसननें चोरी करी मोरी घरछे ॥ ३॥
कहे एका जनार्दनी लालछे । चरण पकरु मो तुमछे ॥४॥
८९
माई मोरे घर आयो शामछे । गावढी छोरी मारे मनछे ॥१॥
दधीं दूध माखन चुरावें हमछे । छोकारीया खिलावन देवछे ॥२॥
मारी सुसोवन लगीछे । बालन उनके पकड लीनछे ॥३॥
एका जनार्दन थारो छोडछे । वेड लगाये माई हामछे ॥४॥
९०
हामे आपले सोवते घरछे । रात आयो थारोशामछे ॥१॥
मारी वेणी पकड करी हतछे । दाढी बांधी गाठछे ॥२॥
मोरी घागरीया फोर करछे । भागन गया गाप घरछें ॥३॥
एका जनार्दनीं तोरे शामनेछे । मोरो संसारको नासछे ॥४॥
९१
दे दे दे मोरी कन्हया साडीछे । तुम भलो नंदजी नंदन लालसे ॥१॥
मैतो आई मथुरा हाटछे । बिगरी तु क्या धरे घाटछे कन्हया ॥२॥
ज्याकर बोलुंगी जशोदा नंदछे । तरी खोड तांडुगी हातछे कन्हया ॥३॥
एक जनार्दन बिनती करतछे । दोनो हात जोडकरछे कन्हया ॥४॥
९२
मैं दधी बेचन मथुरा । तुम केवं थारे नंदजीको छोरा ॥१॥
भक्ति का आचला पकडा हरी । मत खेचो मोरी फारी चुनरीं ॥२॥
अहंकारको मोरा गरगा फोरा । व्हाको गोरस सबही गिरा ॥३॥
द्वैतनकी मोरी आंगेया फारी । क्या कहुं मैं नंगी नार उधारी ॥४॥
एका जनार्दनी ज्यासो भेटा । लागत पगसे कबु नहीं छुटा ॥५॥
९३
मारी गावढी चुकलीसे भाई । देखन देखन त्रिभुवनसे आई । उन शोधन लागछे भाई । अब कैसी गत करुछे आई ॥१॥
मथुरा लमानीना मारो नामछे । गावढी देखत आई गांवछे । दृष्टी देखन नहीं मानछे । कैसें भुलाय कन्हयानछे ॥२॥
भूली भूली जाई मानछे । कहीं मिलन मोरे ध्यानछे । एका जनार्दन से पगछे । अखंड चित्त जडो गावढीछे ॥३॥
९४
भूली भटकी आई कान्हा तोरे गांवछे । मारो नंदनंदन चित्त जडे तोरे पावछे लालना ॥१॥
चली आई परपंच हाटसे । तुं केव धरियों मेरे वाटछे ॥२॥
आब तूं नंदनंदन लालछे । मैं गारी देऊं तुजसे लालना ॥३॥
एका जनार्दन नाम तोरे गावछे । पीरीत वसे तारे चरणछे लालना ॥४॥
९५
हो भलो तुम नंदन लालछे । मुजे गांवढी बतावछे ॥१॥
आगल पिछिल ध्यानमें आवछे । मंगल नाम तोरा मे गावछे ॥२॥
तरो सुंदर रुप मोरे मनछे । प्रीत लगी कान्हा हमछे ॥३॥
एक जनार्दनीं तोरे नामछे । गावत ध्यावत हृदयमेछे ॥४॥
९६
याहांकी बात नहीं मेरी आवछे । तोरे चरण कमल मैं द्यावछे ॥१॥
सुंदरतुन नंदनंदन लालछे । गळां शोभे वैजंयती मालछे ॥२॥
पीत पीतांबर घोंगरीयाछे । गोपाल नाचती तोरे सातछे ॥३॥
एका जनार्दनी रखत गावढीछे । चित्त जडे मोरे पावडीछे ॥४॥
९७
गोकुळीं गोमाई गवळणी । तिच्या सुना चवघी जणीं । यमुने गेल्या एके दिनीं । त्यांनी कृष्ण पहिला ॥१॥
कृष्णा पाहतां मधुसूदन । मोहिलें चवघीचें मन । कृष्ण कृष्ण लागलें ध्यान । देहभान विसरल्या ॥२॥
सर्वें एके होती शेजारीण । आली सदनासी धांवुन । गोमाईसी वर्तमान । अवघे विदित केलें ॥३॥
राखी लपवी आपुल्या सुना । सुनेचें नख दृष्टी पडुं देइना । जर कां येशील माझे सदना नासिका चुना तीन बोटें ॥४॥
कृष्ण काय म्हणे तिसीं । येणें जाणें नाहीं आम्हांसी । जें कां वदली रमनेसे । तिची प्राप्ती तुजलागीं ॥५॥
देव ब्राह्मणीचा वेष । धरिता जाला जगन्निवासा । हा रस ऐकतां सायास । मुढ जन उद्धरती ॥६॥
पांढर्‍या पातलाची कासोटी । जीर्ण चीर वेष्टिलें कंठीं । हाता घेउनी धाकुटी । काठी धरुनी चालिली ॥७॥
वार्‍यासारखी चाचरी जाये । तोल सांभाळुनी उभी राहे । अवसान धरुनिया पाहें । गोमाइनें देखिली ॥८॥
गोमाई म्हणे अहो ब्राह्मणि । कोठें जातेस आसीस कोठुनी । आशापाश नाहीं कोणी । माझी मीच ऐकली ॥९॥
करुनी आले वाराणाशी । पुढें जाणें रामेश्वरासी । आणिक जाणे बहु तीर्थासे । ऐसी गोमाईसी बोलली ॥१०॥
येवढ्या नगरामध्ये कोणी । दयाळु नाहीं तुजावांचुनी । जागा देई वृंदावनीं । रातचे रात करमीन ॥११॥
अस्ता गेला वासरमणी । सुखें राहें वृदावनी । आज्ञा केली इंद्रालागुनी । सत्वर मेघा पाठवी ॥१२॥
वीज लावली मेघमंडळी । ढग निवाला तेच काळीं । मेघानें सोडिल्या फळीं । जनलोकक पाहतसे ॥१३॥
मेघानें सोडिल्या धारा । थंड गार सुटला वारा । शामाई कांपतसे थरथरां ॥ गोमाइने देखिली ॥१४॥
गोमाई म्हणे अहो साजणी । आंत येई वो ब्राह्मणी । मरुनी जाशील वृंदावनीं । प्रायश्चित्त मजवरी येईल ॥१५॥
मरूनि जाईल वृंदावनीं । परी मी येईना कोणाचे सदनीं । देव राखीव मजलागुनी । ऐशी शामाई बोलली ॥१६॥
इतुका मेघ वर्षला थोर । भिजलें नाहीं तुझे वस्त्र । शामाई म्हणे आम्हांवर । इश्वराची बहु कृपा ॥१७॥
तुम्ही शुद्ध गे ब्राह्मणी । देव तुम्हीं केला ऋणी । आम्ही नरदेहासी येऊनी । प्रपंचसदनीं बुडालों ॥१८॥
दारावाटे बोलावुन । नेत्रीं पाहे अवलोकुन । चक्रपाणी ओळखुन ।चरणीं ठाव मज देई ॥१९॥
आतां उठावेना करुं काई । हाती धरुनि उठवी गोमाई । कवाड उघडोनि लावलाही । बळे सदना लोटलीं ॥२०॥
बळें सदनीं लोटलें मला । मजवर बलात्कार केला । मी सांगेन नंदजीला । म्हणोनी गलबला करितसे ॥२१॥
सदनी जातां तत्क्षाणी । चवघी उद्धरल्या कामिनी । दारापाशी येऊनी । हाकां मारी गोमाई ॥२२॥
गोमाई येऊनी लागे चरणां । पुनीत केल्या आमुच्या सुना । नासिका लावियेला चुना । पाहुन पळे गोविंद ॥२३॥
गोमाई उद्धरली कथा । आपण होऊनि श्रोता वक्ता । एका जनार्दनी दाता । सत्य वार्ता ही माझी ॥२४॥
९८
दही दुध चोरुनी दे सर्वांना । ऐसें मज सांगताती । आई मज मारुं नको । नाहीं नाहीं म्या पाहिली माती ॥१॥
तें न ऐकिलें म्हणोनि मजवर । रुसले सांगाती । बळीरामही जो भेटला । तोही माझा पक्षपाती ॥२॥
एका जनार्दनीं पूर्ण कृपेनें । आम्हीं भजूं दीनराती ॥३॥
९९
बाळ रांगणें रांगतु । दुडदुडां पुढें पळतु ।धरितां तो न कळें मातु । वेदशास्त्रीं जया ॥१॥
तो बाळरुपें नंदाघरीं । खेळ खेळे नानापरी । न कळे लाघव निर्धारी । इंद्रादिकां गे माय ॥२॥
लोणी चोरावया घरोघरीं जाय । दहीं दूध तूप लोणी आपण खाय ।
त्यांचे सुनेचे मुखा हात पुशी वो माय । ऐसे करुनियां पळोनी जाय ॥३॥
वासुरें सोडी घरीं जाऊन । मुलांसि उठवी चिमटुन ।
माथणी रांजणा करी चुर्ण । ऐसे विंदान करुनी पळे ॥४॥
शेजे असता उभयतं । जाय सोवळ्यातुन तत्त्वतां ।
दाढी वेणी बांधी सर्वथा । जाय परता पळोनी ॥५॥
ऐशा खोडी करी नानापरी । नटनाटक वैकुंठ जिव्हारी ।
एक जनार्दनीं नवल परी आगमां निगमां न कळे परोपरी ॥६॥
१००
दिसे सगुण परि निर्गुण । आगमां निगमां न कळे महिमान ।
परा पश्यंती खुटलीया जाण । त्यांचे न कळे शिवाजी महिमान ॥१॥
पहा हो सांवळा नंदाघरीं । नवनीताची करीतसे चोरी ।
गौळणी गार्‍हाणी सांगती नानापरी ॥ त्यांचे महिमान न कळे श्रमले सहाचारी ॥२॥
कोणी म्हणती यासी शिक लावूं । कोणी म्हणती आला बाऊ ।
दाखवी लाघव नवलाऊ । अगम्य खेळ ज्याचा कवणा न कळे कांहीं ॥३॥
चोरी करितां बांधितीं उखळी दावें । येतो काकुळती माते मज सोडावं ।
एका जनार्दनी दावीं सोंग बरवें । ज्यांची कीर्ति ऐकतां अघ नासे सर्वे ॥४॥
१०१
आवरीं आवरीं आपुला हरी ।दुर्बळ्यांची केली चोरी । घरा जावयाची उरी । कृष्णें ठेविली नाहीं ॥१॥
गौळणी उतावेळी । आली यशोदेजवळी ।अवरीं आपुला वनमाळी । प्रळय आम्हां दिधला ॥२॥
कवाड भ्रांतीचें उघडिलें कुलुप मायेचे मोडिलें । शिंके अविद्येचें तोडिलें । बाई तुझिया कृष्णें ॥३॥
होती क्रोधांची अर्गळा । हळूचि काढिलोसे बळां । होती अज्ञानाची खिळा । तीहि निर्मूळ केली ॥४॥
डेरा फोडिला दंभाचा ।त्रिगुण तिवईस ठाव कैसा । प्रंपंच सडा हा ताकाचा । केला तुझिया कृष्णें ॥५॥
अहंकार होता ठोंबा । उपडिला धुसळखांबा । तोहि टाकिला स्वयंभा । बाई तुझिया कृष्णें ॥६॥
संचित हें शिळें लोणी । याचि केली धूळीधाणीं । संकल्प विकल्प दुधाणीं । तीहीं फोडिली कृष्णें ॥७॥
प्रारब्ध हें शिळें दहीं । माझें खादलें गे बाई । क्रियमाण दुध साई । तींही मुखीं वोतिली ॥८॥
द्वेष रांजण सगळे । स्पर्शे होती हात काळे । होतें कामाचें तें पाळें । तेंहि फोडिलें कृष्णें ॥९॥
सुचित दुश्चित घृत घागरी । लोभें भरल्या अहोत्या घरीं । त्याही टाकिलय बाहेरी । तुझिया कृष्णें ॥१०॥
कल्पनेची उतरंडी । याची केली फोडाफॊडी । होती आयुष्याची दुरडी । तेंही मोडिली कृष्णें ॥११॥
पोर रे अचपळ आमुची । संगती धरली या कृष्णाची । मिळणी मिळाली तयांची । संसाराची शुद्धी नाहीं ॥१२॥
ऐशी वार्ता श्रवनीं पडे । मग मी धांवोनि आलें पुढे । होतें द्वैताचें लुगडें । तेंही फिटोनि गेलें ॥१३॥
आपाअपणा विसरणें । कृष्णस्वरुपीं मिळालें । एका जनार्दनीं केलें । बाई नवल चोज ॥१४॥
१०२
ब्रह्मादिक वेडे जयासाठीं होती । तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी ॥१॥
कवाड ते जैसें आहे तैशापरी । येतो जातो हरी न कळेचे ॥२॥
पाळती पाहतां ब्रह्मांड सकळ । तयाचा प्रतिकाळ करीतसे ॥३॥
एका जनार्दनीं चोरीचें तेंमीस । हरित सारांश नवनीत ॥४॥
१०३
येणें छंदे छंद लागली नव्हाळी । हा कान्हो वनमाळी वेध याचा ॥१॥
सरितां सरेना बैसला हृदयीं । तो आतां ठाईचें ठायीं जडलासे ॥२॥
एका जनार्दनी नोहेची परता । संपूर्ण पुरता भरला देहीं ॥३॥
१०४
चंद्राहुनी शीतळ रवीहुनी सोज्वळ तेणे मज केवळ वेधियलें ॥१॥
वेध कैसा मज लागला वो बाई ॥धृ॥
अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदु । रुपेंविण आनंद देखिला बाई ॥२॥
ऐका जनार्दनी आनंदु परिपूर्ण । काया वाचा मनें वेधिलें वो बाई ॥३॥
१०५
दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली । गौळणी गोरस म्हणों विसरली ॥१॥
गोविंदु घ्या कोनी दामोदरु घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे ॥२॥
दुडीया माझारी कान्होंबा झाला भरी । उचंबळे गोरस सांडे बाहेरी ॥३॥
एका जनार्दनी सबलस गौळणी । ब्रह्मानदु न समाये मनीं ॥४॥
१०६
गौळणीचा थाट निघाला मथुरे हातालागीं । तें देखोनि जगदीश धांवला गोप घेऊनी वेगीं ॥१॥
कान्हयां सरसर परता नको आरुता येऊं । तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊं ॥धृ॥
सासुरवासिनी आम्ही गौळणी जाऊं दे रे हरी । बहु वेळ लागतां सासु सासरे कोपतील घरीं ॥२॥
आम्हीं बहुजनी येकला तु शारंगपाणी दिससी येथें । हृदयमंदिरीं ठेऊनी तुंतें जाऊं मथुरांपथें ॥३॥
एका जनार्दनी ब्रह्मावादिनी गोपिका बरवटां । कृष्णापदीं त्या लीन झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ॥४॥
१०७
ऐक एक सखये बाई नवल;अ मी सांगुं काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ॥१॥
देवकीने वाईला यशोदेनें पाळिला । पांडवाचा बंदिजन होऊनियं राहिला ॥२॥
ब्रह्माडाची साठवन योगीयाचें निजधन । चोरी केली म्हणऊनी उखळासी बंधन ॥३॥
सकळ तीर्थें जया चरणीं सुलभ हा शूलपाणी । राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ॥४॥
शरण एका जनार्दनीं कैवल्याचा मोक्षदानीं । गाई गोप गोपीबाळां मेळवीले आपुलेपणीं ॥५॥
१०८
भिंगाचे भिगुलें खांद्यावर आंगुलें । नाचत तान्हुलें यशोदेचें ॥१॥
येती गौळणी करीती बुझावणी । लागती चरणी कान्होबाच्या ॥२॥
गोविंद बाळिया वाजविती टाळिया । आमुचा कान्हया देवराज ॥३॥
कडदोरा बिंद्ली वाघनखें साजिरी । नाचत श्रीहरी यशोदेचा ॥४॥
पायीं घागरीया वाक्य साजरीया । कानीच्या बाळ्या ढाळ देती ॥५॥
एका जनार्दनी एकत्व शरण । जीवें निबंलोण उतरती ॥६॥
१०९
कृष्णमूर्ती होय गे काळी आली सोयं गे । प्राणाचाही प्राण पाहतां सुख सांगुं काय गे ॥१॥
तुळशी माळ गळां गे कस्तुरीचा टिळा गे । आर्धांगी रुक्मिणी विंझणे वरित गोपी बाळा गे ॥२॥
पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे । नारद तुंबर गायन करती पुढें निजदास गें ॥३॥
भक्त कृपेची माय गे वोळखिली विठाई गे । एका जनार्दनीं विटे जोदियेले पाय गे ॥४॥
११०
ब्रह्मा कैसें वेडावलें गे बाइये ॥धृ॥
निर्गुण होतें सगुणा आलें । त्रिभुवन उद्धारित्ने बाईयें ॥१॥
घेऊनि वसुदेव गोकुळा नेलें । यशोदेने खेळविलें गे बाईये ॥२॥
एका एकपण तेंही नेलें । जनीं जनार्दनें केलें गे बाईये ॥३॥
१११
कृष्णाला भुलविलें गोपीने ॥धृ॥
यशोदे तुझा हा कान्हा राहीना । मी मारीन क्रोधाने ॥१॥
नंदजी तुमचा कृष्ण लाडका हाका मरितो मोठ्यानें ॥२॥
वेताटी घेउनी नावेंत बैसला । वांचविले देवानें ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण कृपेनें । नाहीं ऐकिलें मातेनें ॥४॥
११२
देखिला अवचिता डोळा सुखाचा सागरु । मन बुद्धी हारपला झाले एककारु । न दिसे काया माय कृष्णी लागला मोहरु ॥१॥
अद्वया आनंदा रे अद्वया आनंदा रे । वेधियल्या कामिनी अद्वया आनंदा रे ॥२॥
खुटले येणें जाणें घर सासुर । नाठवे आपपर वेधियलें सुंदर । अति सब्राह्म व्यापिलें कृष्ण पराप्तर नागर वो ॥३॥
सावजी कळलें आतां लोधलें निर्गुणा । एका जनार्दनीं कृपा केली परिपुर्णा । गगनीं गिळियलें येणें उरी नुरेचि आपणा ॥४॥
११३
दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती अगणीत लावण्या तेज प्रभा दिसती गे माये ॥१॥
कानडा वो सुंदर रुपडा गे । अंतरीं बाहेरीं पाहतां दिसे उघडा गे ॥२॥
आलिंगनालागीं मन उताविळ होय । क्षेम द्तां माझें मीपण जाय ॥३॥
मागें पुढें चहुकडे उघडे पाही । पाहावयासी गेलें मजला ठक पडले बाई ॥४॥
बाहेरी पाहुं जातां आतंरी भासे । जें जें भासेम तें तें येकीयेक समरसें ॥५॥
एका जनार्दनीं जिवीचा जिव्हाळा । एक पणें पाहतां न दिसे दृष्टीवेगळा ॥६॥
११४
सुंदर बाळका म्हणती गोपिका यशोदा रोहिणी सन्मुखा । आदि नाटका नाच व्यापका मिळालिया अनेका ।
सर्व पाळका सकळ चाळका सुखदाता सकळिका । धिमी धिमी बाळा नाचे वहिला म्हणती मायादिका ॥१॥
कृष्णा नाव रे व्यापका । म्हणाताती गोपिका ॥धृ॥
दणदण मेदनी वाजत वाम चरणनिघातें । थोंगीत थोंगीत थाक तोडीत चित्त अनुकारें संगीतें ।
टाळछंदें मन वेधें टाळी वाजे अनुहातें । धिम धिम धिमतांग थोंकीत ताळछंदें सांवळें नाचतें ॥२॥
गुप्त प्रगटीत थाक दावित स्थुळ सुक्ष्म आनंदें । धिगीतां धिगीतां वाजती गजरें शास्त्राचेनी विवादें ।
घटतन घटतनं शब्दे बोलती तार्किक गेले भेदें । गर गर गर गर भोवरी देत अवतार संबंधे ॥३॥
रणुझुणु रणझुणु वाजती श्रुति नेति नेति उअच्चारी । आत्मा हा व्यापक नाटक त्रैलोक्य पडलें फेरी ।
यशोदा रोहिणी वृद्ध गौळणी नाचत देह विसरी । पक्षी चारा विसरलें पवन मुख पसरे अंबरी ॥४॥
देव विमानीं पहाती गगनीं ब्रह्मा नाचताहे येउनी । इंद्र ऐरावत नाचत जवळील ब्रह्मास्पती तो मुनी ।
गण गधर्व देव सर्व तेहतीस कोटी मिळोनी । कुबेर पोटा नाचत मोठा कृष्णांछंन घेउनी ॥५॥
शेष वासुकि नाचत वेंगीं चवदा भुवनें माथां । वराह गाढा पृथ्वी दाढां नाचे विसरुनि चिंता ।
तृणें तरुवरें पर्वत कुंजर लाचावले अनंता । सगुण निर्गुण अजंगम स्थावर वेधले अच्युता ॥६॥
घुळु घुळु घुळु घुळु कंकण वाजती बाहुभूषित भूषणां । तो परात्पर त्रैलोक्य सुंदर जगाचिया जीवना ।
खुण खुण संतबोलती संत घांगुरले हरिचरणा । दृष्टी देखिला सबाह्म निवाला एकशरण जनार्दना ॥७॥
११५
गोकुळीं लाघव दावितो चक्रपाणी । भोवंत्या वेष्टित बैसल्या अवघ्या गौळणी ।
मध्येम सुकुमार सांवळा शारंगपाणी । चिमणी पितांबर पिवळा ।
गळां वैजयंती माळा । घवघवीत घनसांवळा । पाहे नंदराणी ॥१॥
नाच रे तू कृष्णा मज पाहुं दे नयनी ॥धृ॥
नाचतो सांवळा सुंदर निमासुर वदन । वाळेघोळ घागरीयांच्या क्षणत्कार पूर्ण ।
आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुनी भुले मदन । हातीच्या मुद्रिका झळकती ।
क्षुद्र किंकणी सुस्वर गती । वाकी नेपुरे ढाळा देती । पहाती गौळणी ॥२॥
सप्तही पाताळें नाचती हरिचिया गण गंधर्व देव सर्व अक्षर हरिपदें ।
वैकुंठ कैलास नाचती । चंद्र सुर्य रसनायक दीप्ति । ऋषिमंडळ धाक तोडिती । अदभुत हरिकिरणी ॥३॥
नाचती सर्वही फणीपाळ । परिवारेस नाचती पृथ्वेचे भूपाळ । मेरू पर्वत भोगी नायक ।
वनस्पती नाचती कौतुक । वेदशास्त्र पुराण पावक । नाचत शुळपाणी ॥४॥
नाचती गोपाळा गोपिका सुंदर मंदिरें । उखळें जाती मुसळें पाळीं आणि देव्हारें ।
धातुमुर्ति नाचुं लागल्या एकसरें । गौळणी अवघ्या विस्मित ।
देहभाव हरपला समस्त । यशादेसी प्रेम लोटत । धरिला धांउनि ॥५॥
शिणलासी नाचतां आतां पुरें करी हरी । विश्वरुप पाहतां गोपी विस्मित अंतरीं ।
यशोदेनें कृष्ण घेतला कडियेवरी । एका जनार्दनी भक्तिभाव ।
अनन्य भक्ता दावी लाघव । निज भक्तांचे काज सर्व । करितां शिण न मानीं ॥६॥
११६
न माये चराचरीं त्रैलोक्य उदरीं । तो यशोदेचे कडेवरी शोभतो कैसा ॥१॥
गोपवेष मिसें ब्रह्माया लाविलें पिसें । तो गोपावत्सवेंषेम शोभतो कैसा ॥२॥
एके घटिकेवरी सोळा सहस्त्र घरीं । नोवरा श्रीहरी शोभतो कैसा ॥३॥
आंगनंविण अंगे गोपी भोगिल्या श्रीरंगें । तो कृष्ण निजांगें शोभतो कैसा ॥४॥
सच्चिदानंदाघन तान्हुलें आपण । एका जनार्दन शोभतो कैसा ॥५॥
११७
प्रथम मत्स्यावतारीं तुमचें अगाध चरित्र । न कळे ब्रह्मादिकां वैष्णव गाती पवित्र ॥१॥
उठोनि प्रातःकाळीं गौळणीं घुसळन घुसळिती । गाती कृष्णाचे पोवाडे हृदयीं परोपरी ध्याती ॥२॥
द्वितीय अवतारीं आपण कच्छरुप झाला । सृष्टी धरुनी पृष्ठी शेवटी सांभाळ केला ॥३॥
तृतीय अवतारीं आपण वराहरुप झाला । धरणी धरुनी दाढे हिरण्याक्ष वधिला ॥४॥
चतुर्थ अवतारीं आपण नरहरि रुप । रक्षुनि प्रल्हाद वधिला हिरण्यकश्यप ॥५॥
पांचवें अवतारीं आपाण वामन झाला । बळी घालुनि पाताळीं शेखीं द्वारपाळ ठेला ॥६॥
सहावे अवतारीं आपण परशुराम झाला । धरुनी परशु हातीं सहस्त्रभुजा वध केला ॥७॥
सातवें अवतारी आपण दाशरथी राम । वधोनी राव्ण कुंभकर्ण सुखी देव परम ॥८॥
आठवें अवतारी आपण अवसुदेवाघरीं । वधोनि कंसादिक असुर मारिले भारीं ॥९॥
नववे आवतारीं आपन बौद्धरुप झाला । धरुनियां मौन भक्तघरीं राहिला ॥१०॥
दहावए अवतारीं आपण झालासें वारु । एका जनार्दनीं वर्णिला त्याचा बडिवारु ॥११॥
११८
अविद्या निशींचा लोटला पहार । रजेंसी लोपला तम अंधकार ।
सत्व शोधित शुद्ध सुमनहार । प्रबोध पाहतां परतला कृष्ण वीरवो ॥१॥
आला रे आला रे म्हणती पहा कृष्ण । जैसा निर्जीवा मीनला जीवप्राण ।
श्रुती परतल्या आत्मासाक्षात्कार देखोनि । तैशा विव्हळ गोपिका हरि पाहुन वो ॥२॥
कृष्णापाशीं मिनल्या व्रजनारी । कां हो निष्ठुर तूं जालासी हरी ।
स्नेह धरिती तयासी होसी दुरी । लोभु सांडीती त्यापाशी निरंतरी वो ॥३॥
थोर शिणलाती तुम्हीं मजविण । माझे स्वरुपीं ठेविला जीव प्राण ।
माझे भेटीसी तंव नाहीं खंडन । सब्राह्मा अंतरी माझे अधिष्ठान वो ॥४॥
ऐसें वचन ऐकोनि हरिमुखें थोर चकल्या वियोगाचे दुःखे ।
आम्हांमारिले शस्त्राविण वचन तिखें । शेखी हें ना तें केले संगदोषें वो ॥५॥
कृष्णां गोपिका वेधल्या एका मनें । माना मुरडिती प्रीति प्रेमाचें रुसणं ।
जेवी श्रुति परतल्या नेति या वचनें । एका जनार्दनी धरुनी ठेल्या मौन्ये वो ॥६॥
११९
आजी वो कां हो कृष्ण नाहीं आला । म्हणोनि खेद करी गौळणी बाळा ।
काय हो ऐसा देहीं लागला चाळा । कां रे न येसी बाळा नंदाचिया ॥१॥
कवण देवा नवसी नवसू । कवणा गुरुतें मार्ग पुंसुं ।
कैसा भेटेल हा हृषीकेशु म्हणोनि । मन जाहलें उदासू ॥२॥
हा कृष्ण आजी कां घरी नये । आतां काय करुं यासी उपाय ।
एका जनार्दनी धरुं जाय पाय । तैच दरुशन होय आजी याचें ॥३॥
१२०
वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग । सर्व सांडियेला मोह ममता संग ।
जीवीं जिवला जाला अनंग । भेटता भेटवा मज श्रीरंग ॥१॥
ऐशी विरहिण बोले बोली । कां रे हरी तु सांडी केली ॥धृ ॥
समभाव तुज पहावया । मन आमुचे गुंतलें देवराया ।
तुं तंव मध्यें घालिसी माया । नको आतां विरह पायां ॥२॥
आमुचा विरह कोण निवारी । विरहिनी बोले ऐशिया परी ।
एका जनार्दनी श्रीहरी । जन्ममरणाचा विरह निवासी ॥३॥
१२१
कोण्या वियोगे गुंतला कवर्णे हातीं । परा पश्यंती मध्यमा जया धाती ।
श्रुति शास्त्र जया भांडती । तो कां हो रुसला श्रीपती ॥१॥
येई येई कान्हा देई आलिंगन । भेटी देऊनि पुरवीं मनोरथ पुर्ण ।
विरहाविरहा करी समाधान । दावी तु आपुले चरण ॥२॥
येथें अपराध आमुचा नाहीं । खेळ सर्व तुझा पाहीम ।
एका जनार्दनी नवल काई । एकदां येउनी भेटी देई ॥३॥
१२२
कसा मला टाकुनी गेला राम ॥धृ॥
रामविणा जीव व्याकुळ होतो । सुचत नाही काम ॥१॥
रामविण मज चैन पडेना । नाही जीवासी आराम ॥२॥
एका जनार्दनी पाहुनीं डोळा । स्वरुप तुझे घनःश्याम ॥३॥
१२३
विरहिणी विरहा विरहित बोले । कां वो पुर्वकर्म आड ठेलें ।
वाचें न येती नाम सावळें । तया विरहा मन माझें वेधलें ॥१॥
ऐशा परी बोलती गोपबाळा । कोठें गेला नेणो सांवआळा ।
पहातां पहातां ठकविलें गोपाळा । ऐसा याच विरह लागला ॥२॥
नेणो कांही कर्म आड ठेलें । वियोग वियोगाचें वर्म ऐसें जाले ।
एका जनार्दनीं कौतुक बोले । ऐशा दुःखा विराहिणा बोले ॥३॥
१२४
नको नको रे दुर देशीं । आम्हां ठेवी चरणापाशीं ।
मग या विरहा कोन पुसी । ऐसी इच्छा देई आम्हांसी ॥१॥
पुरे पुरे संसार विरह छंद । तेणें तुं अंतरासी गोविंद ।
द्वैताचा नसो देऊं बाधा । हृदयीं प्रगटोनी दावी बोध ॥२॥
विरह हरी सत्वर देवराया । परेपरता प्रगटोनि दावीं पायां ।
दुजें मागणें आणीक नाहीं काह्मा । एका जनार्दनीं शरण तुझिया पायां ॥३॥
१२५
समचरणीं मन माझे वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें ।
हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिनी विरह बोले ॥१॥
सांवळीया कान्हया नको जाऊं दुरी । राहे पेरपरता परतोनि हरी ।
पश्यंती मध्यमा मरुनी वैखरी । चारी वाचा तटस्थ जाहल्या हरी ॥२॥
तुझ्या वियोगाचा न व्हावा संग । अखंड नामीं असो अनुसंधान ।
शरण एका जनार्दने । काया वाचा मनें जाणोन ॥३॥
१२६
आशा मनीषाचा विरह लागला । तेणें सांवळा दुरी ठेला ।
जवळी असोनी बोलती अबला । कवणें गुणें कान्हु रुसला ॥१॥
धांवे धावे कान्हई नंदनंदना । पुरवीं तूं आमुची वासना ।
आणिक नको दुजी कल्पना । विरह निवारी देई दर्शना ॥२॥
छंदे छंदें विरहिणी बोलें । कां वो बोलण्या अबोलणें जालें ।
एका जनर्दनी ऐसें केलें । नंदनंदना चित्त गुंतलें ॥३॥
१२७
जन्म जन्मांतरी विराहिणी । होती दुश्चित्त अंतःकरणी ।
दुःखी सेशिलें होतें मागें जन्मीं । ये खेपे निरसलें स्थुळ कारणीं ॥१॥
येउने भेंटी देहीं देहातीत । तयाचा विरह मजलागीं होत ।
मना समुळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ॥२॥
दुःख फिटलें मान जालें थोर । हर्षें आनंदें आनंद तुषार ।
एका जनार्दनीं भेटला परात्पर । तेणें संसार विरह गेला निर्धार ॥३॥
१२८
काम क्रोध वैरी हे खळ । लोभ अहंकार आशा बरळ ।
कर्म बळीवंत लागलें सबळ । तेणें वेधिलें आमुतें निखळ ॥१॥
नको नको वियोग हरी । येई येई तूं झडकरी ।
आम्हा भेटें नको धरुं दुरी । वियोग झाला तो आवरीं ॥२॥
तुझिया भेटिंचे आर्त मनीं । याकारणें विरह बोलणें वाणी ।
एका शरण जनार्दनीं । वियोग गेला पाहतां समचरणीं ॥३॥
१२९
मागें विरह बहुतंशी झाला । संसारश्रम वायां केला । क्षणभरीं विश्रांती नाहीं मला । तो सदगुरु जिवलगा भेटला ॥१॥
आतां विरहाची सरली गोठीं । डोळेंभरी पाहिल्या जगजेठी । जाउनी चरणीं घालावी मिठी । विरह गेला समुळ दृष्टी ॥२॥
एका जनार्दनीं पाहतां आनंदलें । जन्म जन्मातरींचें दुःख । फिटलें विरहाविरहें हर खुंटलें । काया वाचा मनें वेधलें वो ॥३॥
१३०
बहुत जन्में विरहें पीडली । नेणो कैसी स्थिर राहिली । मन अशा गोविंदी वेधिली । तो मध्यमा वैखारीये गुंतलो वो ॥१॥
चारी वाचा परता सावळां । विरहिनीसी छंद लागला । चौपरता कोठें गुंतला । तेंणों आम्हीं अबला वो ॥२॥
विरह जाईल कैशा परी । पुर्वपुण्या सुकृत पदरीं । एका जनार्दनीं भेटलें हरी । तैं विरह नोहे निर्धारी ॥३॥
१३१
येई वो श्रीरंगा कान्हाबाई । विरहाचें दुःख दाटलें हृदयीं । कोण सोडवील यांतुन पाहीं । दैवयोगें सांपडला सगुण देहीं ॥१॥
सगुण निर्गुण याचा वेध । वेधें वेधलें मन झालें सद्गद । वाचा कुंठित हारपला बोध । नेणें आणिक परमानंद ॥२॥
स्थित स्थित मति झाली । वृत्ति विरक्ति हारपली समाधि उन्मनी स्थिरावला । ऐशी विरहाची मति ठेली वो ॥३॥
संगविवर्जित मन झालें । काया वाचा मन चित्त ठेलें । एका जनार्दनीं ऐसें केलें । विरह दुःख निरसिलें ॥४॥
१३२
भिन्न माध्यान्हीं रात्रीं नारी । विरह करी बैसोनि अंतरीं । केधवा भेटले श्रीहरी । तो नवल जालें अंतरीं वो ॥१॥
अवचित घडला संतसंग । विरहाचा झाला भंग । तुटोनि गेला द्वैतसंग । फिटला जन्ममरणाचा पांग वो ॥२॥
एका जनादनीं संतसंग । फिटला संसारपांग । विरह गेला देहत्याग । सुखें सुख झालें अनुराग वो ॥३॥
१३३
विषय विरह गुंतले संसारीं । तया जन्म जन्मातरीं फेरी । कोणी न सोडवी निर्धारीं । यालागी न गुंता संसारीं ॥१॥
मज सोडवा तुम्हीं संतजन । या विषयविरहापासोन ॥धृ ॥
क्षणिक विषय संसार । भरला दिसे भवसागर । यांतुनी उतरीं पैलपार । संतसंग मिळविया ॥२॥
यासी शरण गेलिया वांचुनी ।संतसंग न जोडे त्रिभुवनी । शरण एकाभावें जनार्दनी । विरह गेला समूळ निरसोनी ॥३॥
१३४
ऐशीं निर्धारें विरहिण करी । परेपरता देखेन श्रीहरी । मन पवन साधन न करीं । संतसंग घडलिया धन्य संसारीं ॥१॥
धन्य धन्य संतमहिमा । विरह गेला पावलें सुखधामा ॥धृ॥
नामविरहित विरह तो कोण । विषय विरह थुंकीन मी जाण । नामांवांचुनी नेणें साधन । तो विरह न व्हावा पुर्ण ॥२॥
एका जनार्दनी सत्य वचन । विरहविरह गेला मुळीहून । नाम जपतां स्थिर झालें मन । विरह गेला त्यागुना ॥३॥
१३५
रात्रदिवस मन रंजलें । हरिचरणीं चित्त जडलें । विरहाचें दुःख फिटलें । धन्य झालें संसारीं ॥१॥
विरह गेला सुख झालें वो माया । पुढतोपुढती आनंद न समाये ॥धृ॥
संतसंग घडला धन्य आजीं । मोह ममता तुटली माझी । भ्रांती फिटोनि गेली सहजीं । विरह गेला सुख झालें आजीं ॥२॥
धन्य धन्य संतसंगती । अवधी झाली विश्राती । एका जनार्दनी चिंत्तीं । विरहभ्रांति निरसली ॥३॥
१३६
आनुपातें विरहिण बैसे । कां वो कर्म बळिवंत दिसे । संगवर्जित मज झालें ऐसें । कोणी योगे भेटी नसे ॥१॥
मज भेटवा संतसंगती । तेणे निवारेण सर्व भ्रांती ॥धृ॥
विरहें बहुत पीडिली बाळा । कोन शांतवी तया अबलां । वेधे श्रीरंग जीवी लागला । तया भेटलीया सुख होईल तयाला ॥२॥
नेणें आपपरावे दुजें कांहीं । विरहें विरह जडला हृदयीं । कोण सोडवी गुरु मज देहीं । या विराहा अंतपार नाहीं ॥३॥
ऐसा विरह करिता दुःख । दैव योगें घडलें संतसुख । तापत्रय विरह गेला देख । सुखें सुख अपार झालें देख ॥४॥
संतसंग निरसे विरह । पावन देह झाला विदेह । एका जनार्दनी आनंद पाहे । विरह निरसला सुख झालें गे माय ॥५॥
१३७
युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवीं ध्यानीं मनीं चक्रपाणी । म्हणोनी वियोगाची जाचणी । तो भेंटला संतसंग साजणी ॥१॥
विरह गेला सुख झालें अपार । जन्मोजन्मी चीं तुटे वेरझार वो ॥धृ॥
घडतां संतसंग विश्रांती । तुटली माया पडळभ्रांति । भव संसार याची झाली शांती संतमहिमा वर्णावा किती ॥२॥
महिमा वर्णितां विरहा फिटलें । एका जनार्दनी तया भेटलें । सुख अनुभवे अंतरीं दाटलें । विरहाचें बीज भाजिलें वो ॥३॥
१३८
बोला बोल विरहिणी बोले । गगनी चांदणे शुद्ध शोभलें । त्यामाजीं घनसांवळे खेळे । कर्मदशें वियोग जाला बळें ॥१॥
दावा गे दावा गे कृष्णवदन । विरहाचें दुःख् दारुण कोण्या कर्में झालें खंडन । कां हो यदुनंदन न बोले ॥२॥
विरहतांपे तापलं भारीं । कोण आता दुजा निवारी । श्रीगुरु भेटला झडकरी । एका जनार्दनी दाविला श्रीहरी ॥३॥
१३९
उठोनि एके दिनीं म्हणे यशोदा कान्हया । गोधनें घेऊनियां जाई वनासी लवलाह्मा ॥१॥
सवें मिळालें चिमणे सवंगडी । शिदोरी काठी कांबळी जाळी घेती आवडी ॥२॥
एका जनार्दनी गाई सोडिल्या सार्‍या । रामकृष्ण सवंगडीया देव येती पहावया ॥३॥
१४०
घेऊनि गोधनें जाती यमुने तटीं । नानापरी खेळ खेळताती जगजेठी ॥१॥
मेळेवोनि गोपाळ मध्यें खेळे कान्हा । न कलेचि महिमान ऐसा यादवांचा राणा ॥२॥
नानापरींचे खेळ खेळती गोपाळ । नाचती गदारोल मिळोनी सकळ ॥३॥
एका जनार्दनी खेळे मदनपुतळा । नंदरायाचा कुमरु म्हणतात सांवळा ॥४॥
१४१
आनंद सोहळा वृंदावनीं पाहों । नंदजीचा कृष्ण तेणें केला नवलावो ॥१॥
धाकुले संवंगडे गौलणींचा थाट । वेणु पावां वाजविती नाचती दाट ॥२॥
एका जनार्दनीं वेधलें मन । पाहतां पाहतां चित्त जालें उन्मन ॥३॥
१४२
सैराटगोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ॥१॥
सांवळे चतुर्भुज मेघःश्याम वर्ण । गाईगोपाळां समवेदा खेळे मनमोहन ॥२॥
यमुनेचे पाबळीं मिळोनियां सकळीं । खेळें चेंडुफळी गाडियांसम ॥३॥
एका जनार्दनीं मदनपुतळा । देखियेला डोळां नंदरायाचा ॥४॥
१४३
विष्णुमूर्ति चतुर्भुज शंख चक्र हातीं । गदा पद्म वनमाळा शोभती ॥१॥
गाई गोपाळ सवंगडे वनां । घेऊनीयां जाय खेळे नंदाचा कान्हा ॥२॥
विटी दांडु चेंडु लागोरी नानापरी । खेळ मांडियेला यमुनेचे तीरीं ॥३॥
एका जनार्दनीं पाहतां तन्मय । वेधलें मन वृत्तिसहित माय ॥४॥
१४४
जो परिपुर्ण परब्रह्मा व्यापक गे माये । तो गोकुळीं गाई चारिताहे ॥१॥
पहा हो भुलला भक्ति प्रेमासी । शिदोर्‍या चोरुनी खाये वेगेंसी ॥२॥
एका जनार्दनी व्यापक देखा । तो गोकुळीम चोरी करी कौतुका ॥३॥
१४५
जयाच्या दरुशनें शिवादिकां तृप्ती । योगी हृदयीं जया ध्याती ।
सहा चारा अठरा जया वर्णिता । सहस्त्रमुखा न कळे जायाची गती ॥१॥
तो हा नंदनंदनु यशोदेचा तान्हा । संवगदे गोपाळ म्हणती कान्हा ।
पराश्ययंती मध्यमा वैखरी नातुडे जाणा । वेडावले जया ठायी रिघाले साधना ॥२॥
आष्टांग साधन साधितां अटी । नोहे नोहे मुनिजना ज्यांची भेटी ।
एका जनार्दनी हातीं घेऊनी काठी । गोधनें चारी आवडीं जगजेठी ॥३॥
१४६
परब्रह्मा सांवळा खेळे यमुना तीरीं । सर्वें घेउनी गायी गोपवत्स नानापरी ॥१॥
कान्होबा यमुनेसी जाऊं । आदरें दहीभात खाऊं ॥२॥
नाचती गोपाळ एक एकाच्या आवडी । परब्रह्मा सांवळा पहातसे संवगडी ॥३॥
एका जनार्दनी ब्रह्मा सारांचे सार । धन्य भाग्य गौळियांचे कृष्ण खेळे परिकर ॥४॥
१४७
उठोनि प्रातःकाळीं म्हणे यशोदा मुरारी । गोपाळ वाट पाहती उभे तुझ्या द्वारीं । शिदोरी घेउनि वेगीं जाय रानीं ॥१॥
यमुनेचे तीरीं खेळ खेळतो कान्हा । नानापरी क्रीडा करी यादवांचा राणा ॥धृ॥
मागे पुढे गोपाळ मध्यें चाले हरी । सांवळा सुकुमार वाजवीं मुरलीम अधरीं । पुच्छे वर करुनी गाई नाचती नाना ॥२॥
मुरलीचा नाद समाय त्रिभुवनीं । किती एक नादें भुलल्या गौळणी । देह गेह सांडोनि चालताती वनीं ॥३॥
खग मृग गायी व्याघ्र नसे दुजा भाव । सकळीं उच्चारण एक कॄष्ण नांव । काया वाचा मनें शरण एका जनार्दनीं ॥४॥
१४८
मनमोहन मुरलीवाला । नंदाचा अलबेला ॥१॥
भक्तासाठीं तो जगजेठी । कुब्जेसी रत जाला ॥२॥
विदुरा घरच्या भक्षुनि कण्या । परमानंदें धाला ॥३॥
भक्तिसुखें सुखावला । एका जनार्दनीं निमाला ॥४॥
१४९
नंदनवन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥
प्रपंच धंदा नाठवे कांहीं । मुरलीचा नाद भरला हृदयीं ॥२॥
पती सुताचा विसर पडिला । याच्यामुरलीचा छंद लागला ॥३॥
स्थावर जंगम विसरुनि गेले । भेदभाव हारपले ॥४॥
समाधि उन्मनी तुच्छ वाटती । मुरली नाद ऐक्तां मना विश्रांती ॥५॥
एका जनार्दनी मुरलीचा नाद । ऐकता होती त्या सदगद ॥६॥
१५०
मुरली मनोरह रे माधव ॥धृ॥
श्रीवत्सलांछन हृदयीं विलासन । दीन दयाघन रे ॥१॥
सुरनर किन्नर नारद तुंबर । गाती निरंतर रे ॥२॥
एका जनार्दनीं त्रिभुवनमोहन । राखी गोधन रे ॥३॥
१५१
तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडिला कानीं । विव्हळ जालें अंतःकरणी । मी घरधंदा विसरलें ॥१॥
अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ॥धृ॥
मुरली नोहे केवळ बाण । तिनें हरीला माझा प्राण । संसार केला दाणादीन । येउनि हृदयी संचरली ॥२॥
तुझ्या मुरलीचा सुर तान । मी विसरले देहभान । घर सोडोनि धरिलें रान । मी वृंदावना गेले ॥३॥
एका जनार्दनीं गोविंदा । पतितपावन परमानंद । तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ॥४॥
१५२
तुझें श्रीमुख सुंदर । कुसुम शुभकांति नागर । कासें पीतांबर मनोहर । पाहुनी भुल पडली । करुणाघना ॥१॥
मुरली नको वाजवुं मनमोहना ॥धृ ॥
सर परता होय माघारा । देहभाव बुडाला सारा नाहीं सांसारासी थारा । भेदाभ्रम गेला । कमलनयना ॥२॥
ध्वनि मंजुळ ऐकिली कानीं । सर्व सुखां जाली धनी । एका जनार्दनीं ध्यानी मनीं । एकपणा जगजीवना ॥३॥
१५३
मुरली धरुनी अधरीं । वाजवीं छंदें नानापरी । भोवतें गोपाळ नाचती गुजरीं । यमुनातीरी आनंदें ॥१॥
तो हा नंदनंदन गे माये । त्याचा वेध लागला मज सये । कांहीं केलीया तो न राहें । नाठवे देह गेह गे माय ॥२॥
स्थूल सूक्ष्म कारणांपरतां । चहु वाचा वेगळा तत्त्वतां । आगमांनिगमांही वरतां । ज्याचा वेध शिवाचिया चित्ता गे माय ॥३॥
अचोच अवेदा चोजवेना । श्रुतीशास्त्रं नये अनुमाना । शरण एका जनार्दना । एकपणें जाणा सर्वा ठायीं ॥४॥
१५४
भुलाविलें वेणुनादें । वेणु वाजविला गोविंदें ॥१॥
पांगुळलें यमुनाजळ । पक्षी राहिले निश्चळ ॥२॥
तृणचरें लुब्ध जालीं । पुच्छ वाहुनियां ठेलीं ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनीं । एका भुलला जनार्दनीं ॥४॥
१५५
कशी जाऊं मी वृंदावन । मुरली वाजवी कान्हा ॥धृं॥
पैलतीरीं हरी वाजवीं मुरली । नदी भरली यमुना ॥१॥
कांसे पितांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करु बाई कोणाला सांगुं । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरीने कौतुक केलें । जाणे अंतरीच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनीं म्हणा । देवा महात्म्य कळेना कोणा ॥५॥
१५६
तुझी संगती नाहीं कामाची । मी सुदंरा कोवळ्या मनाची । मज दृष्टी होईल साची । मग तुझी घेइन चर्या ॥१॥
कसें वेड लाविलें कान्हों गोवळियां ॥धु॥
माझा वंश आहे मोठ्याचा तुं तंव यातीहीन गौळ्याचा । ऐक्य जालीया नांवरुअ पाचा । ठावाचि पुसलिया ॥२॥
तुझ्या अंगेची घ्रट घाणी । तनु काय दिसती वोगळवाणी । मुरली वाजविसी मंजुळवाणी । मनमोहन कान्हया ॥३॥
तुझ्या ठिकाणी अवगुणा मोठा । चोरी करुनी भरिसी पोटा । व्रजनारी सुंदरा चावटा । अडविसी अवगुणीया ॥४॥
सर्व सुकहची कृष्णासंगती । वेणुनादें गाई गोप वेधती । एका जनार्दनी हरिरुपी रमतीं । त्या व्रज सुंदरीया ॥५॥
१५७
सुंदर मुख साजिरें कस्तुरी मळवटीं । मुरली वाजवीत उभा यमुनेचे तटीं ।
गोपवेष शोभे खांदा कांबळी हातीं काठी । तो नंदनंदन देखीला जगजेठी वो ॥१॥
मजुंळ मंजुळ वाजवी मुरली । ऐकता माझी चित्तवृत्ति हरली ॥धृ ॥
चारी वेद जया गाताती आनंदें । तो गोकुळीं गाई चारी परमानंदें ।
श्रुतिशास्त्रें वेधला जयाचिया छंदें । तया गोवळा म्हणती कान्हा आनंदें ॥२॥
ऐशी आवडी भक्तिंची देखा । उच्छिष्ट खातां कांहीं न धरी शंका ।
एका जनार्दनीं भुलला तयाचिया । सुखा वैकुंठ नावडेचि देखा ॥३॥
१५८
काळी घोंगडी हातीं काठी । लागला धेनुंचे पाठी ॥१॥
अरे हरी व्रज वांकुंडा कीं तुजसाठीं । बैसला यमुनेचे तटीं ॥२॥
राधा गोरटीं हातीं वाटी । लागली कृष्णाचे पाठी ॥३॥
एका जनार्दनीं झाली दाटी । घातली पायांवर मिठी ॥४॥
१५९
भक्ति गोकुळी नवविधा नारी । गजरे चालती भारी वो । सुनीळ जळीं अति संतोषं । क्रीडाती यमुनातीरीं वो ॥१॥
स्थिर स्थिर माधवा विआर धरीं । आम्हीं परात्पर परनारी । वासना वास अलक्ष लक्षोणी । दह्माची करिसी चोरी रे ॥२॥
आकंठ मग्न सुनीळ निरी । घनसांवळा देखोनि वरी । येथोनि निघतां लाज मोठी । विनोद न करी रे ॥३॥
लाज सांडोन धरा चरण । तंव मी होईन प्रसन्न । एका जनार्दनीं निःशंक झाल्या । जीवींची जाणुनि खुण वो ॥४॥
१६०
यमुनेचे तीरीं नवल परि वो । तेथें गोपाळ वत्सें स्वयं झाला हरी वो ॥१॥
नवल देखा ठक तिन्हीं लोकां । भुली ब्रह्मादिकां पार नाहीं सुखा ॥२॥
कृष्णवत्साची ध्वनी गाइ पान्हा । तेथें वोळलें निराळे विस्मयो गौळीजनां ॥३॥
गोपाळांचे वचनीं सुखें सुखा भेटी । तेथें वोसंडला आनंद माय कृष्णीं भेटी ॥४॥
ऐसा रचिला आनंद देखोनि निवाडा । तेथे सृष्टिकर्ता तोहि झाला वेडा ॥५॥
ऐसें अचोज पै मना नये अनुमाना । अचुंबीत करनें एका जनार्दना ॥६॥
१६१
कृष्णारुपीं भाळल्या गोपिका नारी । नित्य नवा कृष्ण जीवा आवडतो भारी ।
पवन वेगीं चालिल्या कालिंदीतीरीं । चिदानंद भावें भोगावा श्रीहरीं ॥१॥
वाजती गाजती अनुहत टिपरी । बारा सोळा मिळोनी गौळ्याच्या नारी ।
प्रातः काळी जाती यमुनातीरीं । कृष्णप्राप्तिलागीं पूजिती गौरी ॥२॥
एकमेकींतें खुणाविती दृष्टी । हरिरुपीं आवड जीवा लागली मोठी ।
समयीं एकांत होईल काय भेटी । मनींचे आर्त सांगुं गुज गोष्टी ॥३॥
कृष्नारुपीं वेधल्या विसरल्या अन्नपान । माया विलास नेघे अंजन चंदन ।
रात्र आणि दिवस कृष्नाचें ध्यान । एका जनार्दनीं चरणी वेधलें मन ॥४॥
१६२
देह गेह कर्म सारुनी । शेजे पहुडली निज समाधानी ।
कृष्ण वेणु गीत ये श्रवणीं । वृत्ति उचलली भेटी लागुनी वो ॥१॥
जीवीं लागलें हरीचें ध्यान । कांही केलिया न राहें मन ।
प्रेम पडीभरें येतसे स्फुदोन । हरिचरणीं तें वेधिलें मन वो ॥२॥
लाज सांडोनि जालें निर्लज्ज । सासू सासर्‍यांसी नाहीं मज काज ।
माया माहेर अंतरलें सहज । हरिचरणीं तो वेधलें निज वो ॥३॥
चिदाकाशींचे स्वच्छ चंदिणे । कृष्ण प्रभा ते चंद्र परिपुर्ण ।
ध्येय ध्याता खुंटले तेणें गुणे । एका जनार्दनीं सहज एकपणें वो ॥४॥
१६३
गोधनें चाराया जातो शारंगपाणी । मार्गीं भेटली राधिका गौळणी ।
कृष्ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी ॥१॥
यशोदा म्हणे नाटका हृषीकेशी । परनारीसी कैसा रे झोंबसी ।
येरु रुदत सांगतो मातेपाशीं । माझा चेंडुं लपविला निरिपाशीं ॥२॥
राधिका म्हणे यशोदे परियेसी । चेंडु नाही नाहीं वो मजपाशी ।
परि हा लाटिका लबाड हृषीकेशी । निरी आसडितां चेंडु पडे धरणीसी ॥३॥
यशोदा म्हणे चाळका तुम्ही नारी । मार्गीं बैसतां क्षण एक मुरारी ।
एका जनार्दनीं विनवीं श्रीहरी । नाम घेतां पातकें जती दुरी ॥४॥
१६४
कृष्णालाजे ती राधिका राहे घरी । जीवनालागीं जिवें जीव भरी ।
कृष्णदृष्टी तो माझी नुरे उरी । यमुने जातां सन्मुख देखे हरी ॥१॥
कृष्ण पावलावो हरी पावलावो ॥धृ॥
एकाएकी एक हा एकटु । माझ्या संसारा झाला शेवटु ।
मी पतिव्रता तो झोंबतो आलगटु । आपपर नाहीं तुं होसी क्रियानष्टु ॥२॥
दृश्य न दिसे तंव जाली दुपारी । रळीया वासना ते वास फेडी हरी ।
सुटली लिंग देह गाठी अभ्यंतरीं । सर सर निर्लज्जा मी परात्परा नारी वो ॥३॥
कृष्णा मागे मागे ते माया आली जाणा । पुसे यशोदा बा काय जालें कान्हा येऊ ।
स्फुंदस्फुंदे करितो रुदना । भावचेंडु चोरिला गोपांगंना वो ॥४॥
गोपी म्हणती हा कर्मनष्ट कुडा । क्रिया प्रमाणेंसी बोल याचा खुडा ।
हा बोलतसे अवाडीच्या चाडा । कृष्ण म्हणे तु माग इसी झाडा वो ॥५॥
वासना वास तें फेडी प्रमदा । भाव चेंडुवातें तंव देखें यशोदा ।
हरी कृष्ण येरु हांसे खदाखदां । स्वेदु रोमांचित वरी कांपत गदागदां वो ॥६॥
नष्ट गवळणी विजन व्यभिचारी । परा रातली या निर्लज्ज निर्धारी ।
दैवें आलीये मा चुकली कुमरी ॥७॥
कृष्णें लाधव तें कैसें केलें पाहें । गोपी उपरमोनि पाठिमोरी राहे ।
माथा वंदीतसे कान्हयाचे पाय । एका जनार्दनीं दोष नाहीं वो माय ॥८॥
१६५
ज्ञातिकुळ सांडिलें आम्हीं वेंगीं । माय माहेर त्याजिलें तुजलागीं ।
अंग अर्पिलें अंगीचिये अंगीं । शेखीं रतलासे दासी कुब्जेलागीं ॥१॥
सर सर निर्गुणा तु अगुणाचा हरी । जवळीं असतां जालासीं कैसा दुरी ।
चित्त उतटे चितिंता निरंतरी । मन मावळलें न दिसे दृश्यकारी ॥२॥
तुजलागी सांडिला देहसंग । तुजविण विटला विषयभोग ।
जळो तुझा उपदेश सांगसी योग । आम्हा देई सप्रेम संयोग ॥३॥
एक म्हणती गे सांडा शब्द आटी । शब्दा नातुडे कोरड्या ज्ञानगोष्टी ।
आजिचा सुदीन श्रीकृष्नीं झाली भेटीं । हरुषें निर्भर स्वानंद भरली सृष्टी ॥४॥
एक म्हणती गे सांडा शब्दज्ञान । ध्येय जोडलें कोईसें आतां ध्यान ।
भज्य भजन एक झालें भजन । गेली त्रिपुटी मिथ्या मोक्षबंधन ॥५॥
एक म्हणती गे चला मांडु रासु । म्हणे उगवेल मायामय दिवसु ।
दैवें जोडला गे कृष्ण परमहंसु । शोधा निजतत्व सांडोनि आळसु ॥६॥
गोपी मंडळी मिळाली कृष्णापाशीं । जैशीं रश्मि मिनल्या रविबिंबासी ।
कृष्ण भोगितां नाठवे दिननिशीं । एका जनार्दनीं ऐक्यता प्रेमेसी ॥७॥
१६६
वनमाजीं नेती गोपिका तयासीं । राम क्रीडा खेळावयासी एकांती ॥१॥
जैसा जया चित्ती हेत आहे मनीं । तैसा चक्रपाणी खेळतसे ॥२॥
जया जैसा भाव तैसा पुरविणें । म्हणोनि नारायणें अवतार ॥३॥
एका जनार्दनी घेऊनी अवतार । भक्ताचे अंतर जैसें तैसें ॥४॥
१६७
जैसा केला तैसा होय आपोआप । संकल्प विकल्प न धरी कांहीं ॥१॥
न म्हणे उंच नीच यातीकुळ । वर्ण व्यक्ति शील न पाहेची ॥२॥
उच्छिष्ट तें प्रिय गौळियांचे खाये । हमामा हुंबरी नाचतसे घायें ॥३॥
एका जनार्दनीं सांडोनियां थोरपणा । खेळतांहीं न्युन न बोलें कांहीं ॥४॥
१६८
चला बाई वृंदावनीं रासक्रीडाम पाहुं । नंदाचा बाळ येणें केला नवलाऊ ॥१॥
कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचु । देहभाव ठेऊनी पायां ब्रह्मापदीं नाचुं ॥२॥
सर्व गर्व सोडूनी बाई चला हरेपाशीं । द्वैतभाव ठेवुनी पायीं हरिरुप होसी ॥३॥
एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहतां अवघें स्वप्नवत वाव ॥४॥
१६९
पहा हो पहा वृदांवनीं आनंदु । क्रीडा करी यशोदेचा बाळ मुकुंद ॥१॥
गोपाळ गौळिणी मिळवोनि गोधनें । काला वाटी हमामा खेळे मांडोनि देहुंडें ठाणे ॥२॥
रासमंडळ रची आडवितसे गौळणी । जाऊनियां धरी राधिकेची वेणी ॥३॥
एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहतां अवघें स्वप्नवत वाव ॥४॥
१७०
खांद्यावरे कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥
राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥
एका एक गौळनी एकएक गोपाळा । हातीं धरुनि नाचती रासमंडळा ॥३॥
एका जनार्दनी रासमडळ रचिलें । जिकडे पाहे तिकडे अवघें ब्रह्मा कोंदलें ॥४॥
१७१
गोपिका त्या बोल बोलती आवडी । एकताती गडी संभोवतें ॥१॥
सभोंवतें तया न कळेची खूण । पहाती विंदान श्रीहरींचें ॥२॥
गोपिका कामातुर त्या मनीं । जाणोनि चक्रपाणी रास खेळे ॥३॥
षण्मास खेळ खेळती अबला । एका जनार्दनीं कळा न कळे कोण्हा ॥४॥
१७२
रासक्रीडा खेळ खेळॊनिया श्रीहरी येती परोपरी गोकुळासी ॥१॥
न कळेची कवणा कैसें हें विंदान । वेदादिकां मौन पडिलेंसे ॥२॥
तें काय कळे आणिकां जीवांसी । ऋषी मुनी तापसी धुंडीताती ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा खेळे खेळां । परब्रह्मा पुतळा नंदाघरीं ॥४॥
१७३
रासक्रीडा करुनी आलिया कामिनी । कृष्णी लांचावल्या आन न रिघे मनीं ॥१॥
जें जें दृष्टी दिसे तें तें कृष्ण भासे । गोपिका समरसे नित्य बोधु ॥२॥
आसनीं शयनीं भोजनीं गमनागमनीं सर्व कर्मीं सदा कृष्णमय कामिनी ॥३॥
एका जनार्दनी व्याभिचार परवडी । गोपिका तारिल्या सप्रेम आवडीं ॥४॥
१७४
येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळीतां शिनले हात लावी वहिली ॥धृ॥
वैराग्य जातें मांडुनी विवेक खुंटीं थापटोनी । अनुहात दळण माडुनि त्रिगुण वैरणी घातलें ॥येई ॥१॥
स्थुळ सूक्ष्म दळियलें देहकारणसहित महाकारण दळियलें औट मत्रेसहित । येई ॥२॥
दशा दोनी दाळिल्या द्वैत अद्वैतासहित । दाही व्यापक दळियेंले अहं सोहं सहितं ॥येई ॥३॥
एकवीस स्वर्ग दळियेलें चवदा भवनासंहित । सप्त पाताळें दलियेंलीं सप्त सागरांसहित । येई ॥४॥
बारा सोळा दळियल्या सत्रावीसहित । चंद्र सुर्य दळियलें तारागणांसहित ॥येई ॥५॥
नक्षत्र वैरण घालुनी नवग्रहांसहित । तेहतीस कोटी देव दळियेलें ब्रह्मा विष्णुसहित ॥येई ॥६॥
ज्ञान अज्ञान दळियेलें विज्ञानसहित । मीतुंपण दळियेलें जन्ममरणसहित । येई ॥७॥
ऐसें दळण दळियेलें दोनी तळ्यासहित एका जनार्दनीं कांहीं नाहीं उरलें द्वैत ॥येई ॥८॥
१७५
माया जिवलगा जातां बैसली कृष्ण म्हणे गे आई ।दळण दळिण शिणलिसी हात लावुं गे आई ।
समान तळी तळींवरी ठेवी पावो ठायीं ॥ क्षणामाजी मी वो दळीन तु कोतुक पाहीं ॥ धृ ॥
येई गे येई गे येई गे कान्हाई हात लावी तु वहिली । जातीये जातां शिणलीये किती दळुम एकली ।
विसावा निजाचा तूं माझा विश्रांती साऊली । येइ गे येई गे कान्हाई ॥१॥
ब्रह्माहमस्मि टाकिया उकटी द्वैत दळी । अधिष्ठान खुंटा निश्चय दोहीं एकची बोली ।
पाहिले चारी निरसोनी निज नित्य न्याहाळीं । सहासी वैरण वेरुणी अठराही दळी ॥२॥
पंच भुतें पंच धान्यें दळियेलें जातां । शशी सुर्य दोन्हीं दाळिले प्राण्याच्या समता ।
ध्येय ध्याता ध्यान दळियेलें धारणा धरितां । पंचविषय तेही दळियेलें वैराग्य राहतां ॥३॥
वैकुठं कैलास दळिलें गती एक देशी । क्षीरसागर तोही दळियेला शेषशयनेसी ।
ध्रुव तोही जातां वैरिला अढळ पदेशी । जें जें देखें तेही दळियलें दृश्या दृश्यासी ॥४॥
वासना मिथ्या भाजुनि वैरिलिया जातां । मेळवणी गुण घातले समान समता ।
गुणा गुणातेंहि दळियेलें पहातें पाहाता ।ब्रह्मा विष्णु रुद्र दळिलें ओवीया गातां ॥५॥
कर्माकर्मा कैसें दळिलें जन्ममरणेसी । मीतुपण दोन्ही दळियलें जीवाशिवेसी ।
पुडे वैरिणिया कांहीं न दिसे पाहतां चौपाशी । मायो तेहीं जाता दळिली दळते दळणेसी ॥६॥
वृत्तीए तेहि निवर्तली पडियली ठका । समाधि उत्थाना दळियलें देहबुद्धीसी देखा ।
दळितें जातें तेंहि दळियलें कवतुक देखा । स्वभावें लीला हे खेळे जनार्दनी एका ॥७॥
१७६
विवेक कांडणीं कांडितें साजणी । निजबोध स्मरणी फिरतसे ॥१॥
देह हें उखळ मन हें मुसळ । काडिलें तांदुळ विवेकाचे ॥२॥
एका जनार्दनीं कांडन कांडितां । ब्रह्मा सायुज्यता प्राप्त झाली ॥३॥
१७७
पिंगा बाई पिंगा गे । अवघा धांगडधिंगा गे ॥१॥
सांडोनी संतांची गोडी गे । कासया पिंगा जोडी गे ॥१॥
नको घालूं पिंगा गे । तुम्हींरामरंगी रंगा गे ॥३॥
एका जनार्दनीं पिंगा गे । कायावाचा गुरुचरणीं रंगा गे ॥४॥
१७८
निराकाराचा आकार झाला । त्यांतच माझा पिंगा जन्मला । निराकारासी घेऊन आला ॥१॥
माझा पिंगा घालितो धिंगा ॥धृ॥
पिंग्यापासुन शंकर झाला । ढवळ्या नदींवर बसुन आला । माझ्या पिंग्यानें धक्का दिला । माझा ॥२॥
पिंग्यापासुन मच्छ झाला । शंकसुराचा प्राण घेतला । चारी वेद घेउनी आला ॥माझा ॥३॥
पिंग्यापासुन कूर्म झाला । पर्वत पाठीवर घेतला । चौदा रत्‍नें घेऊन आला ॥माझा ॥४॥
पिंग्यापासुन वराह झाला । हिरण्याक्षाचा प्राण घेतला । पृथ्वी वरती घेऊन आला ॥ माझा ॥५॥
पिंग्यापासुन नरसिंह झाला । हिरण्यकश्यप दैत्य वधिला । प्रह्लाद भक्त रक्षिला ॥ माझा ॥६॥
पिंग्यापासुन वामन झाला । बलीदान मांगु लागला ॥ बळी पाताळीं घातला ॥ माझा ॥७॥
पिंग्यापासुन भार्गव झाले । मातेचें शिर छेदियेलें । अवघे राजे नाहीसे केलें ॥ माझा ॥८॥
पिंग्यापासुन राम झाले । पितृवचन सांभाळिलें । रावण कुंभकर्ण मरिले ॥ माझा ॥९॥
पिंग्यापासुन कृष्ण झाला । कंसाचा प्राण घेतला ॥ गोकुळ सोडुन मथुरेसी आला ॥ माझा ॥१०॥
पिंग्यापासुन बौद्ध झाला । दिलें जगन्नाथ नांव त्याला । भक्तांनी दहींभात चारिला ॥ माझा ॥११॥
ऐसा निराकाराचा पिंगा । त्यांत माझा श्रीरंगा । एका जनार्दनीं पाडुरंग । माझा पिंगा घालितो धिंगा ॥१२॥
१७९
फुगडी घाली मीपणाची । वेणी गुंफी त्रिगुणाची ॥१॥
चाड नाहीं कोनाची । आण सदगुरुचरणांची ॥२॥
फुगडी घाली आज गे । नाचू सहजा सहज गे ॥३॥
एका जनार्दनीं निज गे । वंदू संतचरणरज गे ॥४॥
१८०
खेळ मांडिला वो खेळ मांडिला वो । या संसाराचा खेळ मांडिला वो ॥१॥
पंचप्राणांचे गडी वाटिले । तेथें जीवशिव नाम ठेविलें वो ॥२॥
एका जनार्दनी खेळ मांडिला । शाहाणा तो येथें नाही गुंतला वो ॥३॥
१८१
यमुने तटीं मांडिला खेळ । मेळवोनी गोपाळ सवंगडे ॥१॥
जाहले गडी दोहींकडे । येकीकडे रामकृष्ण ॥२॥
खेळती विटीदांडु चेंडु । भोवरें लगोर्‍या उदंडु ॥३॥
ऐसा खेळ खेळे कान्हा । एका जनार्दनीं जाणे खुणा ॥४॥
१८२
खेळसी टिपर्‍या घाईं रे । वाचे हरिनाम गाई रे । टिपरीस टिपरी चुकुं जातां भाई । पडसी यमाच्या घाई रे ॥१॥
सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे । टिपरीयांचा खेळ खेळा रे । एका खेळा दोन्हीं गुतला । यमाजी घालीला डोळा रे ॥२॥
वायं खेळ खेळतीसी बाळा रे । सावध होई पाहें डोला रे । एक एका जनार्दनी शरण जातां । चुकशील कळिकाळारे ॥३॥
१८३
अनुहत टिपरी घाई खेळ जाणें तो भाई रे । खोटा खेळ खेळोनि काय स्वतः अनुभव घेई रे ॥ धृ॥
मत्स्येद्रं कुळीं एक गोरख जाला । तो बहुत खेळ खेळला रे । पवन साधुनि अष्टांग योगे तेणेंचि बळें मातला रे ।
खेचरीं भूचरीं चाचरी धरुनीं अगोचरी मिळाली रे । गोल्हाट योग साधुनि तेणें काळ तो जिंकुनि गेला रे ॥१॥
निवृत्तिचा पोर एक ज्ञाना जाण तो खेळियामाजी शहाणा रे । कवित्व केला प्रकाश मातला प्रवृत्ति गाळिलें घाणा रे ।
असोनि भेला नसोनि गेला काळ केला आंकणा रे । भले भले गडी मिळाविले तेणें अकाय सांगु कवणा रे ॥२॥
जनार्दनाची सात पाँच पोरें त्यामाजी लाडका येका रे । एकही साधन न करी परी तो बळेचि मातला फुका रे ।
आपपर देही कांहींच नेणें रायासी म्हणे तो रंका रे । भलेंभले गडी मेळवोनि तेनें खेळ दाविला असका रे ॥३॥
तिघा जिणांचें खेळणें जालें चवर्थे एक उठविलें रे । अनन्यभावें सदगुरुचरणीं गुरुसी शरण गेलें रे ।
भवासी न भ्यालं कळलें म्हणोनि तिघांचि समान जालें रे । आपण जैसें पुर्ण तैसें एका जनार्दनी केलें रे ॥४॥
१८४
आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडुं । खेळे विटिदांडु पोरा खेळे विटिदांडु ॥१॥
सत्व विटी घेउनि हातीं धीर धिर दाडु । भावबळें टोला मारी नको भिऊं गांडु ॥२॥
ब्रीदबळें खेळ खेळूं लक्ष लावीतिसी । मूर्खापाशीं युक्ति नाहीं उडोनि गेली उशी ॥३॥
वकट लेंड मूंड नाल पुढें आणी लेका । भावबळें खेळ खेळ जनार्दन एका ॥४॥
१८५
बारा सोळा अठरा गडियांचा मेळा । मांडियेला डाव कोण आवरीं तयाला ॥१॥
खेळा भाई विटिदांडु । खेळा भाई विटिदांडु । खेळ खेळतां परी बरा नोहे सहज दांडु ॥२॥
पांच सात बारा नव तेरा यांची नका धरुं गोडी । खेळ खेळता दांत विचकुन पडाल घशींतोंडीं ॥३॥
एका जनार्दनीं काय वाचा शरण रिघां पायीं । खेळ तो अवघा सोपा मग प्रेमा उणें नाहीं ॥४॥
१८६
एक पांच सात मिळोनि खेळती विटिदांडु । डाव आलिया पळूणि जातां तया म्हणती गांडु ॥१॥
खेळों विटिदांडु खेळॊं विटिदांडु ॥धृ ॥
मुळींचा दांडुं हातीं धरुनि भावबळें खेळूं खेळा । भक्तिबळें टोला मारुं नभिऊं कळिकाळा ॥२॥
आपुली याची सांडोनि आस जावें गुरुसी शरण । काया वाचा मनें चरणींलोळे एका जनार्दन ॥३॥
१८७
विटिदांडु खेळसी वांया । चौर्‍यायंशी वेरझारा होती पाया ॥१॥
नको विटिदांडु सांडीं हा छंदु । आवडी वदे रामगोविंदू ॥२॥
किती वेरझारी करीसी पा वायां । शरण रिघे एका जनार्दन पायां ॥३॥
१८८
विटिदांडु चेंडु भला रे । मनीं समजोनी मारा टोला रे ॥१॥
खेळूं विटिदाडुं चेंडु । काळा नका भिऊ गांडु रे ॥धृ॥
सहा चारएकत्र करुनी अवघे पुढें रहा । सावध होऊनि धरा चेंडु कोणी कोणाकडे न पहा ॥२॥
प्रपंचाचे घाई धन वित्त म्हनता भाई । हातीचा चेंडु सोडुनी देई पुढें मारील डोई ॥३॥
खेळ खेळा परी मनीं धरा जनार्दन । तेणे चुके जन्ममरण शरण एका जनार्दन ॥४॥
१८९
मिळवोनी पांच सात गडी मेळी । डाव खेळती चेंडुफळी ॥१॥
खेळ चेंडुंचाझेला रे झेला बाळा । विचारुन खेळ खेळां न पडुं प्रवाही काळा ॥२॥
यंदु यरडु मारु नाकु मिळालेती गडी । जनार्दनीं शाण अनुपम्य धरा गोडी ॥३॥
१९०
सहज तो चेंडु समान फळी । झेलुं जाणेतो खेळियां बळी ॥१॥
झेला रे भाइनों झेलारे सदगुरुवचनें झेला रे ॥धृ ॥
अवघे गडी समान रहा । येतां यावा सावध पहा ॥२॥
सुटे सुटाए तंव सरिसाचि पावे । लक्ष जाणें तो माघारा नव्हें ॥३॥
गडियांने गडियची न धरावी आस । आपुलिया बळें घालावी कास ॥४॥
अभिमाना चढे तो बाहेरी पडे । हतींचे जाय मग उगलाचि रडे ॥५॥
एका जनार्दनी येकची बोली । भावार्थी तो सदगुरुवचनें झेली ॥६॥
१९१
खेळ मांडिला लगोरी । खेळताती नानापरी । चेंडु घेउनि अपुलें करीं । खेळताती एकमेक ॥१॥
देती आपुलाला डाव । ज्याचा जैसा आहे भाव । तोचि जिंकीतसे वैभव । आणिक पहाती उगे वाव ॥२॥
बरोबर करुं गडी । नाहीं विषमता जोडी । चेंडु हाणती तांतडी । येती हरिया बैसती गडी ॥३॥
एका जनार्दनी कान्होबा भला । खेळा गोविलें कीं सकळां । आपण असेचि निराळा । नवल कळा पाहे डोळा ॥४॥
१९२
त्रिगुणात्मक माडियेला डाव । सहा चार अठरा गडी वांटिले एका त्यांचे नाव ॥१॥
कान्होबा खेळूं लागोरीचा खेळ । तुम्ही आम्ही मिळूं एका ठायीं सहज होईलमेळा ॥२॥
चौदा बारा सोला पंचविसाचा करुनी मेळ । एक एका पुढे पळती अवघा हलकलोळ ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे कन्होबा खेळ अतु आवरीं । खेळ खेळतां शिणलों आम्हीं पुरे बा वेरझारी ॥४॥
१९३
भ्रम धरुनियां वायां कासया खेळसी भोवरां । यम मारी कुच्चा फिरशील चौर्‍याशीं घरां ॥१॥
पुढे शुद्धी करीं वाचें स्मरे हरी । वायां भ्रमें फिरशी गरगरां पडसी मायाफेरी ॥२॥
एका वारी एक मारिताती घाय । दया नाही येत कोणाखाली न ठेविती पाय ॥३॥
एका शरण जनार्दनीं तरीच चुके फेरा । नाहींतरी फिरशी गरगरां ॥४॥
मेळवीं संवगंडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥
सांवळा सुंदरा वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥
मुगुट कुंडलें चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळां कौस्तुभमणी ॥३॥
एका जनार्दनीं वेधलेसे मन । नाहीं भेद भिन्न गौळनींसी ॥४॥
१९४
खेळें भोवरां गेबाई भोंवरां । राधिकेचा नवरा ॥धृ॥
माझ्या भोंवर्‍यांची अरी । सप्त पाताळें त्यावरी । फिरे गरगरां । राधिकेचा नवरा ॥ खेळे॥१॥
भोवरां बनला र्निगुणीं । त्यावर चंद्र सुर्य दोनी । जाळीं शंकर गवरा । राधिकेचा नवरा ॥ खेळे०॥२॥
एका जनार्दनीं खेळिया । भोवरां खेळुन पाहे चेलिया । नाद देतो हरिहरा । राधिअकेचा नवरा ॥ खेळे॥३॥
१९५
कृष्णा कैशी खेळूं लपंडाई । अनंत लोचन तुझे पाही । तेथें लपावें कवणे ठायीं । तुझें देखणे लागलें पाहीं ॥१॥
कान्होबा पाववी आपुल्या खुणा ॥धृ॥
लपुं ममतेच्या पोटीं । जेथेंतेथें तुझीच दृष्टी । तेथें लपायाची काय गोष्टी । तुझे देखणें लागलें पाठीं ॥२॥
लपुं गिरीं कपाटीं कडवसा । जेथें तेथें तुझाचि ठसा । एका जनार्दनी सरिसा । तेणें मोडली खेळायाची आशा ॥३॥
१९६
उघड जगीं दिसोनियां कां झांकितीसी डोळां । पाहतां पाहतां खेळामध्ये वरपडा होसी काळा ॥१॥
नको खेळूं लंपडाई नको खेळूं लपडाई । मिळाले ते गडी जाती पळुनि पडाल दांत विचकुन भाई ॥२॥
उगाचि डोळे झांकुनि कांरे होसी अंध । संसारमायामोह याचा टाकी बा छंद ॥३॥
शरण एका जनार्दनीं जातां चुके हा खेळ । नाहीं तरी पडसी गुतोंनि कोण करील कळवळ ॥४॥
१९७
घेऊनियां हातीं काठी । पोरा खेळसी सुरकांडी रे ॥१॥
खेळे सुरकांडी पोरा खेळे सुरकांडी । विषयांची वासना धरुनी चढसी प्रपंचाचे झांडी ॥२॥
बुडापासुन शेंडा रे चढसी फांडोफादी रे । कामक्रोध पोरें लागती पाठींम्हणती माझा दादा रे ॥३॥
धरीं एका जनार्दनी गोडी तरी खेळ जोडा रे । वायां खेळ खेळू जाती होईल भ्रकवडी रे ॥४॥
१९८
अलक्ष केली वावडी । लक्षाचा दोर परवडी । उडविती बारा चौदा गडी । भरली ती गगनी उडी ॥१॥
भली चंग वावडी । दादांनों भली चंग वावडी ॥धृ॥
औट हात सोडोनी दोरा । मध्यें कामटी लाविल्या बारा । आत्मास्थितीच्या चंग उबारा । वावडी उडती अंबरा ॥२॥
साहा चार मिळवोनी गडी । अठराजण सोडिती वावडी । एका जनार्दनीं त्यांची जोडी । जनार्दनाचे पायी गोडी ॥३॥
१९९
एकीबेकी पोरा सांग झडकरी । एकी जिंकीशी बेको म्हणतां हरी ॥धृ ॥
नव्हें काई बाई तेथें झालें एक शुन्य । त्यासी फाटां फुटतां मग लेखा आलें जाण ॥ एकी ॥१॥
एक दोनी तीन पांच विस्तारिला जाण । दहापासुनी सहस्त्रवरी एक झाली पुर्ण । एकी ॥२॥
एक ब्रह्मा पुर्ण तेथें फाट झाली माया । एका जनार्दनी नित्य लक्ष लावीं पायां ॥ एकी ॥ ३॥
२००
खेळ खेळुं सुरकवडी । कान्होबा उगाचि पाहे गोडी ॥१॥
एकीबेकी पोरा खेळ भला बेकी । साडुनि एकीबेकी धरितां शेवटीं होईल फुकी ॥२॥
एका दोन तीन चार पांच सहाच्या पडो नको डाई । सहास्त्र लक्ष कोट गेले उगाचि शीण पाहीं ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे कान्होबा वाउगा नको गोऊं । जेणे करुनी संसार खेळ तुटोन लक्ष तुझें पायीं लाऊं ॥४॥

श्रीसंतएकनाथ गाथा – भाग पहिला -2

श्रीसंतएकनाथ गाथा – भाग पहिला -2

२०१
वायां खेळ एकीबेकी । पडलीस काळाचे मुखीं ॥१॥
आधींच एक निर्गुण रे । मायेनें केलें सगुण रे ॥२॥
एकीबेकी म्हणतां एकलें रे । दोन म्हणतां सर्व आतलें रे ॥३॥
एका जनार्दनीं ऐकलें रे । एक जण अवघें फिटलें रे ॥४॥
202
पटपट सांवली खेळूं या रे । सावध गड्यांनो कां वेळू लावा रे । भीड तया सोडोनी सहा गडी मारुं या रे ॥१॥
निजानंदी खेळोनी मित्रतनया हारुं या रे ॥धृ ॥
अवघे गडी एकवटोनी जाऊं दे या रे । बहु कष्टे फेरे फिरतां मन तेथें लावा रे ॥२॥
एका जनार्दनीं खेळतां ब्रह्मारुप काया रे । जेथें पाहे तेथें दिसे जनार्दनीं छाया रे ॥३॥
२०३
तारुण्याचें मदें घेशी एकमेंकां झोबीं । वायां जाईल नरदेह धरीं हरीशी झोंबी ॥१॥
तरीच खेळ भला रे वायां काय गलबला । एकावरी एक खाली पडतां मारी यमाजी टोला रे ॥२॥
हातीम हात धरुनियां घालिसी गळां गळाखोडा रे । फजीत होसी खालीं पडतां हांसतील पोरें रांडा रे ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे खेळ नोहें भला रे । आपण न पडतां दुजियासी पाडी तोचि खेळिया भला रे ॥४॥
२०४
धरितां हातीं हात न सुटे चिकाटी । पडली ती मिटाही नोहे कदा सुटी ॥१॥
वायां काय बळ वेंचितोंसी मुढा । न सुटतां हातीं हात वायां जिनें दगडा ॥२॥
ऐशी मिठी घालीअं एकदां जनार्दन पायीं । न सुटेचि कालन्नयी सर्वत्र देती ग्वाही ॥३॥
कायावाचामनें शरण एका जनार्दनीं । मिठी पडली ते न सुटे भावें चरणीं ॥४॥
२०५
बैसोनियां निवांत घालिसी उमान । एका हरिविण सर्व वायां न धरी गुमान ॥१॥
नको खेळ खोटा सांडीं मनाचा ताठा । उमान गुमान दोन्हीं न कळे होतील जगीं चेष्टा ॥२॥
उ म्हणनें उकार रे मा म्हणणें मकार रे । न म्हणणे नश्वर देह या तिहींचा आकार रे ॥३॥
एका जनार्दनीं उमार रें । सांगो जातां न कळे खुण तया म्हणिजे गुमान रे ॥४॥
२०६
हमामा पोरा हमामा । घुंबरींवाजे घमामा ॥१॥
हमाम्यांचे नादानी । घुंबरी वाजली रानीं ॥२॥
हमाम्यांची शीतळ शाई । पोरा मेली तुझी आई ॥३॥
काम क्रोध पोरा नाशी । अहंकार तोंड वासी ॥४॥
एका जनार्दनांशीं । पोरा वहिल्या गांवा जाशीं ॥५॥
२०७
हमामा बाळा घालीं । नको पडों काळाचे चालीं ॥१॥
हमामा पोरा हमामा ॥धृ॥
हमामा घालीं बरव्यापरी । क्रोधकामा सारुनी दुरी ॥२॥
हमामा घालीं नेटें । धरीं भक्तींचे बळ मोठे ॥३॥
हमामा घालसील जरी । एका जनार्दनाचे चरण धरीं ॥४॥
२०८
हमामा घालूं सोई । सांभाळूं शिवा दोही ॥१॥
हमामा रे भाई । कान्होबाचे बळे घालुं हमामा ॥२॥
हमामा घालुं ऐसा । भक्तिबळें कान्होबा बैसा ॥३॥
हमामा घालूं नेटें ।एका जनार्दनांचे बळ मोठें ॥४॥
२०९
हमामा माडिला कान्होबा भाई । हमामा खेळूं भाई कान्ह्बा तुझें पायीं ॥१॥
हमामा रे हमामा । कान्होबा खेळूं हमामा ॥धृ॥
हमामा खेळा वेंगीं । सांडुनीं द्वैताच्या संगीं ॥२॥
हमामा खेळूं नेटें । कान्होंबाचे बळ मोठें ॥३॥
हमामा खेळॊं सोई । एका जनार्दनाचे पायीं ॥४॥
२१०
हमामा घाली राम अवतारीं । कैकईची भीड तुला भारी । प्रस्थान ठेविलें लंकेवरी ॥१॥
हमामा तुं घाली । कान्होंबा हुतुतुतु खेळुं ॥धृ॥
हमामा घाली नंदाघरीं । मिळोनि गौळियांच्या नारी । गोपाळ नाचती गजरीं ॥२॥
हमामा घाली पंढरपुरी । पुंडलीकाची भीड भारी । गोपाळ नाचती गजरीं ॥३॥
हमामा आषाडीकार्तिकीचा । साधुसंत गर्जती वाचा । एका जनार्दनीं म्हणे त्याचा ॥४॥
२११
हमामा बोला बाळा । खोटा सोडुनी द्यावा चाळा ॥१॥
बोला हमामा बोला हमामा ॥धृ॥
हमामा बोला होटीं । बुद्धी सांडोनि द्यावी खोटी ॥२॥
हमामा बोला भाई । पुन्हां जन्मा येणें नाहीं ॥३॥
एका जनार्दनांचे पायीं । भावें ठेवियेली डोई ॥४॥
२१२
कान्होबा खेळ खेळू रानीं । तुम्हीं आम्हीं दोघे मिळोनी ॥१॥
हमामा रे भाई हमामा ॥धृ॥
हमामा घाली मत्स्य अवतारी । शंखासुरा धरुनी मारी ॥२॥
हमामा घाली समुद्रतीरीं । धरुनी पर्वत पाठीवरी ॥३॥
हमामा घाली नानापरी । पृथ्वी धरुनी दाढेवरी ॥४॥
हमामा घाली हिरण्य कश्यपाघरीं । प्रगटुनी स्तंभामाझारीं ॥५॥
हमामा घाली बळीचे द्वारीं । आपण होऊनि भिकारी ॥६॥
हमामा घाली परशु हातीं । निःक्षात्री पृथ्वी केली जगतीं ॥७॥
हमामा घाली लंकेवर । केला बिभीषण राज्यधर ॥८॥
हमामा घाली नंदाघरीम । गोपाळ नाचती गजरीं ॥९॥
हमामा घाली भीमातटीं । उभाचि धरुनि कर कटीं ॥१०॥
एका जनार्दनी खेळ । नानापरीचा आकळ ॥११॥
२१३
हमामा भाई हुंबरी । खेळों भाई हमामा हुंबरी ॥१॥
राम रावण हमामा घालितीं । हनुमान बेळें खेळीया निज ज्योंती ॥२॥
अर्जुन भीष्म हमामा खेळती । कृष्णे सुदर्शन धरिलें हातीं ॥३॥
एका जनार्दनीं हमामा जाहला ।अवघा खेळ ग्रासोनि ठेला ॥४॥
२१४
हमामा हुंबरी घालुं नका एक भावें । जेथे वसे कान्होबा तें घर आम्हां ठावें ॥१॥
हमामा घालुं आवडीं । कान्होंबा तुं आमुचा गडी ॥२॥
हमामा घालुं सोई । आमुचा कान्होबा भाई ॥३॥
हमामा घालुं रानीं । एका जनार्दनाचे चरणीं ॥४॥
२१५
हमामा भाई हुंबली । गोपाळ वासुरें कान्होबा जाला ना ब्रह्मामाया बोंबली रे ॥१॥
हमामा भाई बार कोंडे । वासुरें लेकुंरें कान्होबा जाला ठकविलें ब्राह्मण चहुं तोडें ॥२॥
हमामा भाई बारकोंडा । कंआचा केशीया कान्होबा मरिला हांसता आला होऊनियां घोडा रे ॥३॥
हमामा भाई खोल पाणी । यमुनेमाझारी कान्होबा पोहतां कुटिला काळिया फणी रे ॥४॥
हमामा भाई तोंड वासी । शिंक्याचें लोटकें कान्होबा भेदिलें लागली धार गोड कशी रे ॥५॥
हमामा भाई तोंड वासी ॥ औटचि मात्रा कान्होबा भेदिली लागली गोड कैसी रे ॥६॥
हमामा भाई चाट बोटे । चोरीचें दुध गोड मोठें ॥७॥
हमामा भाई गटगोळे । स्वर्गीच्या देवां लाळ गळे ॥८॥
हमामा भाई गट गोळी । जेविती खेळीमेळीं ॥९॥
हमाम भाई मिठी मिठी । आजचें भोजन गोड सुटी ॥१०॥
एका जनार्दनीं तृप्त झाला । ब्रह्मादेव लाळ घोटी ॥११॥
२१६
न लगो विषय गोपांच्या पाठीं । न संडु स्वत्मा घोंगडें काठी । विषयभोगें होईल तुटी । कृष्ण जगजेठी अंतरे ॥१॥
म्हणवोनि हुंबली बोधाची । कृष्णेची आमुची ॥धृ॥
न टाकूं प्रेम शिदोरी कुरुधनें । नेघों सायुज्य पळसपानें । विषय ताटीचें मिष्टान्न । तेणें जनार्दन न भेटें ॥२॥
ब्रह्मा सेवुं करुनी ठोमा । एका जनार्दनीं गोविलें कामा । अष्ट भोग भुलवी रमा । तोही आम्हां श्रीकृष्ण ॥३॥
२१७
राम रावण हुंबली खेळती । खेळीया हनुमान तीरे ॥१॥
खेळ माडिला खेळ मांडिला कान्होबाचे बळें खेळ मांडिला ॥धृ॥
राम कृष्णा हुंबली खेळती । खेळ्या अर्जुन झाला रे ॥२॥
अठरा अक्षौहिणी कौरव मारिले । शिशुपाळसह वक्रदंत वधिले रे ॥३॥
एका जनार्दनीं खेळतां खेळतां हुंबली आनंद बहु जाला ॥४॥
खेळ खेळतां अवघे निमाले मीतुपणा ठाव नाहीं उरला ॥५॥
२१८
माडियेला डाव पोरा हुतुतुतुतु । नको घालुं फेरा पोरा हुतुतुतुतु ॥१॥
लक्ष चौर्‍याशींचा डाव खेळ मांडियेला । लक्ष जाणे तोचि तेंथोनि सुटला ॥२॥
सहा चार अठरा यांचे पडों नको । एका जनार्दनी संता शरण जाई ॥३॥
२१९
विवेक वैराग्य दोघें भांडती । ज्ञान अज्ञान पाहाती रे । आपुले स्वरुपीं होऊनि एक चित्त झाली सकळ सृष्टी रे ॥१॥
हुतुतुतुतु खेळूं रे गडिया हुतुतुतुतु खेळू रें । रामकृष्ण गोविंद हरी नारायण निशिदिनीं भजन करा रे ॥धृ॥
हिरण्यकश्यप प्रल्हादपुत्र खेळतां आले हातघाई रे । बळेंचि आला फळी फोडुनी गेला पित्यासी दिधलें डायीं रें ॥२॥
राम रावण सन्मुख भिडता बरवा खेळ मांडिलां रे । कुंभकर्ण आखया इंद्रिजितासी तिघांसी पाडिले डायीं रे ॥३॥
कौरव पांडव हुतुतु खेळती खेळिया चक्रपाणी रे । कामक्रोध जीवें मारिला उरुं दिला नाहीं कोणी रे ॥४॥
एका जनार्दनीं हुतुतु खेळतां मन जडलें हरी पायी रे । विवेक सेतु त्यांनी बांधिला उतरुन गेलें शायीं रे ॥५॥
२२०
आंगीचिया बळें खेळसी हुतुतु । वृद्धपण आलिया तोंडावरी थुथुथु ॥१॥
कासया खेळसी वायां भजें गुरुराया । चुकविल डाया हुतुतुतु ॥२॥
एका जनार्दनीं हुतुतु नको भाई । मन जिंकुनियां लागे कान्होबाचे पायीं ॥३॥
२२१
गाई राखतां दिससी साना । तैं म्हणों यशादेचा कान्हा ॥
आतां न मानिसी अवघ्या गगना ।तुं ना कळसी ध्यानामना रे कान्होबा ॥१॥
कान्होबा आमुचा सखा होसी । शेखीं नीच नवा दिससा रे कान्होबा ॥धृ॥
गाई राखितां लागली संवे । तैं जेऊं आम्हीं तुजसवें ।
तुं मिटक्या मारिसी लाघवें । तुझीं करणी ऐशी होये ॥२॥
धांगडतुतु खेळुं सुरक्या । डायीं आलीया मारुं बुक्या ।
आतां महिमा ये देख्या । काय कीर्ति वर्णावी सख्या ॥३॥
तूं ठायींचा खादाड होसी । तुं शोकिली बा मावसी ।
आतां माया गिळुं पाहासी । उबगलों तुझ्या बा पोटासी ॥४॥
तुज लक्षिता पारुषे ध्यान । ध्यातां ध्येय हारपलं मन ।
एका अवलोकीं जनार्दन । तुझें हुंबलीनें समाधान रे कान्होबा ॥५॥
२२२
माडियेला खेळ हमामा हुंबरी । मारुनी हिरण्यकश्यपु प्रल्हाद खेळिया करी ॥१॥
हुतुतुतु हुमरी हुतुतुतु हुमरी ॥धृ॥
जाउनी लंकेवरी खेळ मांडियेला । रावण कुंभकर्ण वधोनि शरणगत रक्षिला ॥२॥
माडियेला खेळ खेळें अर्जुनाचे रथीं । मारुन कौरव खेळे नानापरींची गती ॥३॥
धरुनी गोपेवेष मरियेला कंसमामा । नानापरी खेळ खेळे गोपाळांसी हमामा ॥४॥
येउनी पंढरेपुरा पुंडलिकासाठीं । एका जनार्दनीं कर ठेवुनीं उभा राहिला काटीं ॥५॥
२२३
हमामा हुबरी खेळती एक मेळा । नानापरींचें गोपाळ मिळती सकळां ॥१॥
एक धावें पुढें दुजा धावे पाठीं । एक पळें एकापुढें एक सांडोनि आटी ॥२॥
ऐसें गुतलें खेळा गाई धांवती वनीं । परतेनाची कोण्हा एका जनार्दनीं ॥३॥
२२४
अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथें आम्हां कैचें बळ ॥१॥
कान्होबा भला भला तुं होसी । चोरी करुनि दिसों न देसी रे कान्होबा ॥२॥
चोरुनी शिदोर्‍या आमुच्या खासी । शेखी वळतीया धाडिसी रे कान्होबा ॥३॥
एका जनार्दनीं आमुचा होंसी । दास्यात्व करुनी दिसों न देसी कान्होबा ॥४॥
२२५
बहु खेळतं खेळ । कळॊं आले सकळ । शेवटीं तें निर्फळ । जालें बाळकृष्ण ॥१॥
कान्होबा पुरे पुरे आतां खेळा । येता जातां श्रम जाला रे कान्होबा ॥धृ ॥
आम्हीं न खेळु विटिदांडुं । भोवरं लागोर्‍या रे चेंडु ।
एकीबेकीतें सांडुं । मीतूपण अवघें खंडुं रे कान्होबा ॥२॥
लक्ष लावुं तुझे खेळा । न गुंतु आणिका चाळा ।
एका जानर्दनीं पाहुं डोळां तुझ्या खेळाची अगम्य लीला रे कान्होबा ॥३॥
२२६
तुझिया खेळा बहु भ्याले । नेणों ब्रह्मादिक ठकले ॥१॥
कान्होबा आमुचा तुं गडी । न सोडिसी आपुली खोडी ॥२॥
चोरी करितां गौळणी बांधिती । तुझी न कळे वेदशास्त्रं गती ॥३॥
एका जनार्दनीं शरण । आम्हीं न सोंडुं तुझे चरण रे कान्होबा ॥४॥
२२७
गाई चारी कान्होबा । गोपाळ सांगाती उभा । अनुपम्य त्याची शोभा । नाचती प्रेमानंदें ।
गाताती भोगिता छंदे । मन वेधिलें परमानंदें रे कान्होबा ॥१॥
भला कान्होबा भला । भला कान्होबा भला ॥धृ॥
गौळियांची आंधळीं पोरें । गाईपाठीं धांवतीं सैरें । हरि म्हणे रहा स्थिरें ।
तुमची आमची बोली । पहिलीच आहे नेमिली । त्वा बरीच ओळखी धरली रे कान्होबा ॥२॥
तुझीं संगती खोटी । आम्हां धाडिसी गाईचे पाठीं । तुं बैससी जगजेठी ।
तिझें काय केलें आम्हीं । तुं जगाचा हा स्वामी ।
तुझा महिमा आगमनिगमीं । काहीं न कळे रे कान्होबा ॥३॥
माझी गाय आहे दुधाची । तुला सांपडली फुकाची । मला चोरी काय लोकांची ।
कां पडलासी आमुचे डायीं । भिन्न भेद नाहीं । एक जनार्दनीं मन पायी रे कान्होबा ॥४॥
२२८
कान्होबा सांभाळी आपुली गोधनें तुझ्या भिडेनें कांहीं न म्हणे ॥१॥
तुं बैसासी कळंबाखाली । वळती देतां आमुचे पाय गेली ॥२॥
तुझीं गोधनें बा अचाट । धांवती देखोनी विषय हिरवट ॥३॥
तूं बैसोनी करिसी काला । आमुच्या शिदोर्‍या करुनी गोळा ॥४॥
खातोसी दहीं भाताचा गोळा । आम्हाकदे न पहासी उचलोनी डोळा ॥५॥
वेधिलें आमुचे जीवपण । ठकविलें आम्हाकारण ॥६॥
एका जनार्दनीं परमानंद । आम्ही भुललों तुज गोविंदा ॥७॥
२२९
नको तु आमुचे संगतीं । बहु केलीसे फजिती ।
हें तुज सांगावें पा किती । ऐकती तुं नायकासी रे कान्होबा ॥१॥
जाई तु आपुली निवडी गोधनें । आम्हां न लगे तुझें येणें जाणे रे कान्होबा ॥धृ॥
तुझी संगती ठाउकी आम्हां । त्वां मारिला आपुला मामा ।
मावशी धाडिली निजधामा । जाणों ठावा आहेसी आम्हा रे कान्होबा ॥२॥
तुझें संगती नाश बहु । पुनः जन्मा न येऊं ।
एका जनार्दनीं तुज ध्याऊं । आवडीनें लोणीं खाऊं रे । कान्होबा ॥३॥
२३०
गडी मिळाले सकळ । यमुनेतटीं खेळ खेळती ॥१॥
धांवती ते सैरावैरा । खेळ बरा म्हणती ॥२॥
विसरलें तहान भुक । देखोनी कौतुक खेळांचे ॥३॥
भुललें संवगडी देखोनी । एका जनार्दनीं म्हणतसे ॥४॥
२३१
ऐकतां वचन कान्हया म्हणती गडी । काय खेळायाची आतां न धरुं गोडी ॥१॥
लावियेला चाळा त्वा जगजेठी । आतां आम्हां सांगसी तुं ऐशा गोष्टी ॥२॥
एका जनार्दनीं कान्होबा खेळ पुरे आतां । मांडु रे काला आवडी आनंता ॥३॥
२३२
ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ रामकृष्ण खेळती खेळ नाना ॥१॥
यमुनेचे तटीं कळंबा तळवटीं । मांडियला काला गोपाळांची दाटी ॥२॥
आणिती शिदोर्‍या आपाअपल्या । जया जैसा हेत तैशा त्या चांगल्या ॥३॥
शिळ्या विटक्या भाकरी दहीं भात लोणी । मिळेवोनी मेळा करी चक्रपाणी ॥४॥
एका जनार्दनीं अवघ्यां देतो कवळ । ठकविलें तेणें ब्रह्मादिक सकळ ॥५॥
२३३
वैकुठींचा हरी गोपवेष धरी । घूऊनि शिदोरी जाय वनां ॥१॥
धाकुले संवगडे संगती बरवा । ठाई ठाई ठेवा गोधनांचा ॥२॥
बाळ ब्रह्माचारी वाजवी मोहरी । घेताती हुंबरी एकमेंकां ॥३॥
दहीं भात भाकरी लोणचें परोपरी । आपण श्रीहरी वाढितसे ॥४॥
श्रीहरी वाढिलें गोपाळ जेविलें । उच्छिष्ट सेविलें एका जनार्दनीं ॥५॥
२३४
बैसोनी कळंबातळीं । गडी मिळाले सकळीं । मिळोनी गोपाळीं । करती काला ॥१॥
नानापरीचीं पक्कान्नें । वाढिताती उत्तम गुणें । सर्वां परिपुर्ण । मध्ये शोभे सांवळा ॥२॥
वडजा वांकुडा पेंदा । आणि सवंगडी बहुधा । काल्याच्या त्या मुदा । घेती आपुलें करीं ॥३॥
लोणचें ते नानापरी । वाढिताती कुसरीं । सर्व वाढिलें निर्धारी । परिपुर्ण अवघीयां ॥४॥
एका जनार्दनीं म्हणे । कृष्ना कवळ तुं घेणे । गडियांसी देव म्हणे । तुम्हीं घ्यावा आधीं ॥५॥
२३५
गडी म्हणती सकळ । कृष्णा तुं घेई कवळ । हरी म्हणे उतावीळ । घ्यावा तुम्हीं ॥१॥
गडी नायकती सर्वथा । हरी म्हणे मी नेहे आतां । म्हणोनी रुदोनी तत्त्वतां । चालिला कृष्ण ॥२॥
कृष्णा नको जाऊं जाण । तुझें ऐकूं वचन । म्हणोनि संबोखुन ।आणिला कृष्ण ॥३॥
एका जनार्दनीं । लाघव दावी चक्रपाणी । भक्ता वाढवुनीं । महिमा वदवी ॥४॥
२३६
काळ्या कांबळ्याची घडी । घालिताती सवंगडी बैसवुनि हरी । कवळ घेती ॥१॥
कृष्ण अपुलेनी हातें । कवळ घाली गडियातें । तयांचीं उच्छिष्ट शितें । घालितसे मुखीं ॥२॥
मुखामाजीं कवळ । सवंगडे घालिउती सकळ । वैकुंठीचा पाळ । ब्रह्मानंदें डुल्लत ॥३॥
तृप्त झाला जनार्दन । एका वंदीतसे चरण । काया वाचा मन । खुन भक्त जाणती ॥४॥
२३७
मिळोनि गोपाळ सकळीं । यमुनेतटीं खेळे चेंडुफळीं ।
गाई बैसविल्या कळंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ॥१॥
काला मांडिला वो काला मांडिला वो । नवलक्ष मिळोनी काला मांडिला वो ॥धृ॥
नानापरींचे शोभती दहीभात । पंक्ती बैसविल्या पेंदा बोबडा वाढीत ।
जो जया संकल्प तें तया मिळत । अनाधिकारिया तेथें कोणी न पुसत ॥२॥
पुर्वसंचित खालीं पत्रावळी । वाढती भक्तिभावाची पुरणपोळी ।
नामस्मरणाची क्षुधा पोटीं आगळीं । तेणें तृप्ती होय सहजीं सकळीं ॥३॥
ऐसे तृइप्त जाहले परमानंदें । कवळ कवळाचे निजछंदें ।
एक जनार्दनीं अभेदं । शुद्ध समाधिबोधें मुखसंवादें ॥४॥
२३८
अनंत नामाचा हा काला । पुराणें म्हणते पाहुं चला ॥१॥
हरिनामाचा कवळू घेतां। तेणें धालों पैअ सर्वथा ॥२॥
एका कवळासाठीं । गणीका बैसविली वैकुंठीं ॥३॥
एका जनार्दनीं कवळ । सेवुं जाणती ते प्रेमळ ॥४॥
२३९
बैसविती हरी अस्त्र घडीवरी । पूजा करती वरी पुष्पपत्रें ॥१॥
धाउनी गळां पाले माळा त्या वाहाती । गजरें नाचती पुढें येक ॥२॥
टिरीया माडिया वाजविती पाय । हरुषें नाचताहे देवराया ॥३॥
ऐसें नित्यानित्य क्रीडा ते करिती । देव ते पाहाती विमानीं तें ॥४॥
म्हणताती देव वंचलों या सुखा । एका जनार्दनीं देखा गोवियलें ॥५॥
२४०
देवा परिस उदार । भक्त जाणा निर्धार ॥१॥
याजसाठीं धावें पाठीं । देत लंगोटीं आपुली ॥२॥
आपण दिगंबरची असे । भक्त वस्त्र भूषणें सौरसें ॥३॥
म्हणोनि भक्ताचा अंकित । एका जनार्दनीं तिष्ठत ॥४॥
२४१
देव भक्त दोनी करिताती काला । तयांच्या सुखाला वर्णी कवण ॥१॥
धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचें । ठेवणें सदाशिवाचें खेळतसे ॥२॥
उच्छिष्ट तें काय खाय तयाचेनी होतें । नाहींकंटाळत तयालागीं ॥३॥
एका जनार्दनीं भक्तांची आवडी । वाढवीत गोडी नित्य नवी ॥४॥
२४२
नित्य तो सोहळा करिताती सुरवर विचार पहावयाला देव येतो ॥१॥
अंतरी सुरवर विचार करिती । काला श्रीपती करित स्वयें ॥२॥
उच्छिष्ट प्रसाद सेवुम धणीवरी । मत्स्यरुप निर्धारी घेती सर्व ॥३॥
एका जनार्दनीं जाणतसे खुण । म्हणोनि विंदान आरंभिलें ॥४॥
२४३
गोविंयेंलें देवें आम्हांसी अभिमानें । नामरुप पेणें अंतरलों ॥१॥
करिती विचार इंद्रादी देव । हें सुखवैभव न मिळे आम्हां ॥२॥
शेष उष्टावळी मिळतां आम्हांसी । पावन जन्मासी होऊं आम्ही ॥३॥
ऐसा विचार करुनियां देव । मत्स्यरुप सर्व धरिताती ॥४॥
गोपाळासी सांगे वैकुंठीचा रावो । आजी नवलावो तुम्ही करा ॥५॥
कवळ खाउनी हात टिरी पुसा । यमुनें सहसा जाऊं नका ॥६॥
कां तो सांगे हरी न कळे तयासीं । एका जनार्दनासी गुज पुसे ॥७॥
२४४
गडियासी सांगे वैकुंठीचा राव । आजीं आला भेवो यमुनेंत ॥१॥
जीवनालागीं तेथें कोण्ही पै न जावें । बाऊ आला आहे तया ठायीं ॥२॥
तयांचे बालेणें लागे सर्वा गोड । म्हणोनि धरिती चाड संवगडे ॥३॥
एका जनार्दनींऐकोनि वचन । पढती वचन पेंदा बोले ॥४॥
२४५
गोपाळ म्हणती कान्हया कृष्नातें । आजी यमुनेचे जळ वर्जा कां जी ॥१॥
हरी म्हणे तयातें तेथें बाऊ आला । म्हणोनि तया स्थळा नवजावें ॥२॥
ऐकोनियां पेंदा नाचतो दुपांडी । गदियांची मादि सवें घेत ॥३॥
बाऊ पहावया गडे हो अवघे चला । या कृष्णबोला राहुं नका ॥४॥
एका मागें एक गडी ते निघाले । एका जनार्दनीं आले यमुनेटीं ॥५॥
२४६
नव लक्ष गोपाळ यमुनेतटीं । उभे राहुनी दृष्टी पाहताती ॥१॥
खल्लाळाचा शब्द कानीं तो ऐकिला । पेंदा पुढें झाला सरसाउनी ॥२॥
पेंदा म्हणे गडिया आपणा पाहुनी यमुना । हुंबरी घेती जाणा पहा पहा ॥३॥
एका जनार्दनीं पाहुनिया देव । करितां उपाव नवलाचा ॥४॥
२४७
आजी कांहो कृष्ण वर्जिली यमुना ।बाऊ तो जाणा कोठोनि आला ॥१॥
कैसा आहे बाहु पाहिन तयातें । म्हणोनि त्वरित उठिलासे ॥२॥
वारितां वारितां पेंदा पै गेला । पहातसे उगला यमुनेंत ॥३॥
बाऊ तो न दिसे कोठें खल्लाळ वाजत । पेंदा तया म्हणत क्रोधयुक्त ॥४॥
म्हणतसे पेंदा यमुनेसी जाण । स्त्री तूं होऊन हुंबरी घेसी ॥५॥
मी कृष्णदास घेसी तुं हुबरी । तुज निर्धारी बळ बहु ॥६॥
मी काय निर्बळ घेसी तुं हुबरी । आतांची निर्धारी पाहें माझें ॥७॥
म्हणोनियां पेंदा तेथेंची बैसला । हुबरीं तो तयाला घालीतसे ॥८॥
पेंदा कां नये काय जाहलें त्याला । कृष्णें पाठविला दुजा एक ॥९॥
तोही मीनला तयांसी तत्काळ । गडी तों सकळ आलें तेथें ॥१०॥
उरलेसे दोघे कृष्ण आणि राम । गुंतलें सकाम गडी तेथें ॥११॥
काय जाहलें म्हणोनि आले उभयंता । पाहुनी तत्त्वतां हांसताती ॥१२॥
सावध करितां न होती सावध । लागलासे छंद घुमरीचा ॥१३॥
एका जनार्दनीं कौतुकें कान्हया । आली असे दया भक्तांची ते ॥१४॥
२४८
गुडघेमेटाइ बैसले तोंडी खरस आलें । ते असे देखिले रामकृष्णें ॥१॥
मोहरी काढोनि लावियली मुखा । नांदे तिहीं लोकां मोहियलें ॥२॥
तयांमध्ये म्हणे गडे हो ऐका । पळालीसे देखा भिउनी तुम्हां ॥३॥
मोहियलें मन सर्वांचे भावें । एका जनार्दनीं देवें नवल केलें ॥४॥
२४९
पाहुनियां हरी गोपाळांचे चोज । म्हणे येणें तो निर्वाणीचें निज मांडियले ॥१॥
मेठा खुंटीं येउनी हुंबरी घालिती । खर तोंडाप्रती येती जाहली ॥२॥
कळवळला देव जाहालासे घाबरा । मुरली अधरा लावियेली ॥३॥
मुरलीस्‍वरे चराचरी नाद तो भरला । तेणें स्थिर झाला पवनवेंगीं ॥४॥
यमुनाहि शांत झाली तेच क्षणीं । म्हणे चक्रपाणी सावध व्हा रे ॥५॥
पेंदीयानें तो शब्द ऐकिला कानीं । एका जनार्दनीं स्थिर झाला ॥६॥
२५०
ऐकतां तो नाद मोहिलेसे मन । न कळे विंदान तिहीं लोकां ॥१॥
सावध हो उनी गडी ते पहाती । स्थिर पई होती यमुना ते ॥२॥
एकाजनार्दनीं ऐसा दासाचा कळवळा । म्हणोनि भक्तलळा पाळितसे ॥३॥
२५१
येवोनि गोपाळ कृष्णासी बोलतीं । यमुनेचा बाऊ पळाला वो श्रीपती ॥१॥
धन्य बळीया आम्हीं की वो त्रिभुवनी । धन्य धन्य कृष्णा म्हणोनि नाचती अवनी ॥२॥
एका जनार्दनीं ऐकोनी तयांचे बोल । आनंदे गोपाळ तयाशीं खेळे ॥३॥
२५२
पेंदा म्हणे देवा बाऊ तो पळाला । आमुचे भेणेम गेला देशोधडी ॥१॥
देव म्हणे गोपाळ धन्य तुम्हीं बळी । पळविला बळी बाऊ तुम्हीं ॥२॥
ऐसें समाधान करी मनमोहन । एका जनार्दनीं चरणीं लागे ॥३॥
२५३
वाऊगे तें वायां । कुंथाकुंथी खेळावया ॥१॥
हा खेळ नोहेरे बरा । गाई आधी ते आवरा ॥२॥
करा आपुले स्वाधीन तेणें तुटेल बंधन ॥३॥
एका गुंतूं वायां । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥
२५४
खेळतां सांवळा गडियांसी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणें ॥१॥
आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणें खेळ सांडावया भाई ॥२॥
धांवती संवगडी पाठोंपाठ लवलाह्मा । गुंतल्या त्या गाई वळती न येती वळाया ॥३॥
येवोनि दीन मुख करिती हरिपुढें । एका जनार्दनीं तया पाहतां प्रेम चढें ॥४॥
२५५
गोपाळ म्हणती कान्हा । सांभाळीं आपुल्या गोधळा ।
पळतां सैराट धांवती राना । गेल्या ठेल्या त्या तुम्हीं जाणां ॥१॥
कान्होबा पुरे पुरे तुझी गडी । आम्हा गाईनें केली ओढाओढी ॥धृ॥
तूं बैससी टेकावरी । आम्हीं श्रमतों वेरझारीं ।
ऐसें कैसें तुझें मुरारी । आपुलीं गोधनें जतन करीं ॥२॥
तुझ्या न लगती आम्हां गाई । तुझी संगती पुरे भाई ।
जरी कोपेल तुझी आई । तरी करील आमचें काई रे ॥३॥
तुझी गोधनें सैराटें । दाहीं पळतां दाही वाटे ।
वळितां कष्ट होताती मोठे । ठेचा लागुनी फुटली । बोटें ॥४॥
पैल श्रवणीं पाहे गाये । ते साद होये तिकडे जाये ।
उभी क्षणभरीं न राहे । वळितां जाती आमुचे पाय ॥५॥
पैल सावळीं डोळे सुटी । देखोनि धांवे हिरवटी ।
वळीतां धाप न साहे पोटीं । ती तु सांभाळी जगजेठी ॥६॥
पैले हुंगी कैसा सुजाण । स्वाद घे परी न खाये तृण ।
इसी हिंडवया थोडकें रान । वळीतां जाती आमुचे प्राण ॥७॥
पैल चोरटी रसाळ रंगी । कळप सांडोनी वाढे वेगीं ।
वळितां न वळे ती आम्हालांगीं । तुझी संगत नको वेंगीं ॥८॥
पैल सर्वांग सुकुमार मोठी । चहूंकडे ती धांवत खोटीं ।
मऊ रान देखोनियां अंग लोटी । तिसी वळितं जालों हिंपुटी ॥९॥
पैल लोभिष्ट हुंबरे कैशी । उगा न राहे हुंबरे द्वेषी ।
वळीतसं न वळे ती आम्हांसी । ती तु सांभाळी हृषीकेशी ॥१०॥
पैल हाताळ वोढाळ येकी । तेणे पाते गुड हाकी ।
ऐशी खट्याळ नाहीं आणिका । वळितां वळित्या घेती निकी ॥११॥
पैल पाय करिती भारी । उभी न राहे क्षणभरीं ।
वळतां शिणलों बहु मुरारी । तें तुं आपुलें जतन करीं ॥१२॥
पैल पोटफुगी खादाड । कैशी खाउनी हागे बाड ।
धुतां कधींच नव्हे धड । तुझीं गोधने न लगती गोड ॥१३॥
पैल मुतरीं मुंजी लांडी । कैशी सांचलीं घेत होडी ।
धांवे जेथें गोड लागे तोंडीं । वळतां पडती आमुची मुरकुंडी ॥१४॥
पैल मनमोहन सुंदर । कोणें काळी नव्हें स्थिर ।
इसी हिंदावया थोर वावर । हांव धरुनी धावती फार ॥१५॥
ऐसी गोधनें आमुच्या माथां । घालूं पहातोसी अनंता ।
एका जनार्दनीं विनवितं कृपा आली आलिंगी निजभक्ता ॥१६॥
२५६
काकुलते गोपाळ म्हणती रे कान्हया । गाई न येती माघारी कोन बळी कासया ॥१॥
आमुची खुंटली गति आवरीं तुं हरी । तुजवांचुनी कोण रेखा आमुचा कैवारी ॥२॥
नको वेरझारा पुरे आतां हरी । एका जनार्दनीं ऐशी करुणा करी ॥३॥
२५७
गडियांचे उत्तर ऐकोनी सांवळा वेधियलें मन तटस्थ सकळां ॥१॥
घेउनी मोहरीं गाई पाचारी सकळां । नवल तें जाहलें गोपाळा सकळां ॥२॥
नको वेरझारा पुरे आतां हरी । एका जनार्दनीं ऐशी करुना करी ॥३॥
एका जनार्दनी विश्वांचा निवासी । गाई आणि गोपाळां वेधिला सर्वासी ॥४॥
२५८
भक्तांसी सान न धरीच मान । खाय भाजीपान भाविकांचें ॥१॥
उच्छिष्टांची आस धरुनिया जीवीं । गोकुळीं तें दावी चोज सर्व ॥२॥
खेळे विटिदांडुं हमामा हुंबरी । वाजवी मोहरी सवंगडियासी ॥३॥
एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । म्हणोनि तिष्ठत उभा असे ॥४॥
२५९
काळे गोरे एकापुढें एक । धांवताती बिदो बिदीं देख ।
अलक्ष लक्ष्या नये सम्यक । तो नंदनंदन त्रिभुवननायक गे माय ॥१॥
गाईवत्स नेताती वनां । गोपाळ म्हणती अरे कान्हा ।
जो नये वेदा अनुमाना । ज्यासी चतुरानन ध्यानीं ध्यातसे ॥२॥
जें योगिजनांचे ध्येय ध्यान । ज्याकरणें अष्टांग योगसाधन ।
तयांसि नोहे कधीं दृश्यमान । तो गौळ्यांचें उच्छिष्ट खाय जाण गे माय ॥३॥
एका जनार्दनीं व्यापक । सर्वां ठायीं समसमान देख ।
अरिमित्रां देणें ज्यांचे एक । तो हा नायक वैकुठींचा ॥४॥
२६०
कृष्ण देखतांचि गेलें । शेखीं बुडविली महिमान ॥१॥
भली नव्हें हे कृष्णगती । सखे पळविलें सांगाती ॥२॥
मायेचा करविला बंदु । शमशमादि पळविलें बंधु ॥३॥
द्रष्टा दृश्य आदि दर्शन । तिन्हीं सांडिलें पुसुन ॥४॥
ब्रह्माहमास्मि शुद्ध जाण । तेथील शून्य केला अभिमान ॥५॥
एका जनार्दनाची प्राप्ती । ज्ञान अज्ञान हारपती ॥६॥
२६१
करुनियां काला सर्व आले गोकूळीं । गोपाळांसहित गाईवत्स सकळीं ॥१॥
वोवाळिती श्रीमुख कुर्वडी करिती । रामकृष्णातें सर्व वोवाळिती ॥२॥
जाहला जयजयकार आनंद सकळां । एका जनार्दनीं धणी पाहतां डोळां ॥३॥
२६२
जाहला अस्तमान आले गोकूळां । वोवाळिती आरत्या गोपिका बाळां ॥१॥
जाती सवंगंडी आपुलाले घरां । राकाकृष्ण दोघे आले मंदिरां ॥२॥
नानापरीचीं पक्कान्नें वाढिती भोजना । यशोदा रोहिणी राम आणि कृष्णा ॥३॥
एका जनार्दनीं पहुडले देव । गोकुळामाजीं दावी ऐसें लाघव ॥४॥
२६३
अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले घरोघरीं ॥१॥
आपुलिया गृहीं रामकृष्ण आले । यशोदेनें केलें निंबलोण ॥२॥
षड्रस पक्वान्नीं विस्तारिलें ताट । जेविती वैकुंठ नंदासवें ॥३॥
नंदासवें जेवीं वैकुंठीचा हरी । ब्रह्मादिक सरी न पावती ज्यांची ॥४॥
एका जनार्दनीं ऐसी लीला खेळे । परब्रह्मा सांवळें कृष्णरुप ॥५॥
२६४
गौळणी म्हणती यशोदेला । कोठें गे सांवळां । कां रथ शृंगारिला ।
सांगे वो मजला । अक्रुर उभा असे बाई गे साजरी ॥१॥
बोले नंदाची आंगणीं । मिळाल्या गौळणी ॥धृ॥
बोले नंदाची पट्टराणी । सद्गदेत होउनी । मथुरेसी चक्रपाणी ।
जातो गे साजणी । विव्हळ झाले मन वचन ऐकोनी ॥२॥
अक्रुरा चांडाळा । तुज कोनी धाडिला । कां घातां करुं आलासी ।
वधिशी सकळां । अक्रुरा तुझे नाम तैशीच करणी ॥३॥
रथीं चढले वनमाळी । आकांत गोकूळीं । भूमि पडल्या व्रजबाळी ।
कोण त्या सांभाळी । नयनींच्या उदकांनें भिजली धरणी ॥४॥
देव बोले अक्रुरासी वेगें हांकी रथासी । या गोपींच्या शोकासी ।
न पहावेंमजसी । एका जनार्दनीं रथ गेला निघोनि ॥५॥
२६५
कृष्ण आला परिसुनी मथुरे नारी । चपळा धांवती अति सुंदरी ।
एकी त्या कवळ करीं । एकीं त्या आलिया मार्जन शिरीं ॥१॥
अरे कृष्णा अरे कान्हा मनमोहना । गोपिका भाळल्या तुझिया गुणा ।
जय जय मानस मनमोहना । जीवीं जीवें गुंतल्या नंदनंदना ॥२॥
कृष्णदृष्टी पहावया प्राणपिसा । एकी त्या आलिया मुक्तकेशां ।
एकी त्या आलिया विगुंतवासा । देह गेह नाठवे कृष्णमानसा ॥३॥
कृष्णदृष्टी पहावया वेगु कामिनी । अस्ताव्यस्त इंद्रिया बाणलीं लेणीं ।
एकी त्या आलिया कर्म सांडोनी बाणलीं लेणीं । तत्नुमन वेधला सांगपणी ॥४॥
एकी त्या काजळ सुदल्या मुखीं । जावड कुंकम लाविती नाकीं ।
तांबुल विडीया खोविती मस्ताकीं । कृष्णदृष्टी इंद्रिया नाहीं वोळखी ॥५॥
एकी त्या तानवडे लेइल्या पायीं । पायींची पोल्हारे कानीं वो बाई ।
वाळे वाक्या बांधिल्या कंठाचे ठायीं । लाहे लाहे नेपुरें बांधिली डोई ॥६॥
एकी त्या आलिया चोखणा शिरीं । नागवें शरीर नेणें सुंदरीं ।
मोतियाचे हार नेसल्या नारीं । पाटाउ विसरल्या घरच्या घरीं ॥७॥
एकी त्या अर्धांगी लेईल्या चोळी । गुढरिया बांधिली मोतिया जाळी ।
नाकींचे मुक्ताफळ खोविती भाळीं । देह गेह नाठवें कृष्ण स्नेहाळी ॥८॥
एकी त्या कडिये घेतिल्या झारी । बाळकें विसरल्या घरींच्याघरीं ।
दृष्टीं सम दृश्या न दिसे नारी । पुत्र स्नेहें नाठवे देखोनि हरी ॥९॥
रंगी रंगल्या आल्हादें भारी । आपपर नाठवे तया सुंदरी ।
एका जनार्दनीं वेधल्या नारी । परतोनी संसारा नुरेची उरी ॥१०॥
२६६
उद्धवासे एकांतीं बोले गुज सांवळा । गोकुळासी जाऊनी बोधीं सुंदरीं गोपीबाळा ।
रथीं बैसोनी निघाला वेगीं पावला गोकुळां । तो उद्धव देखोनी दृष्टी गोपींन वेढींला ॥१॥
उद्धवा जाय मथुरेला । आणी लौकरे हरीला ॥धृ॥
मुखसुंदर शोभे कपाळीं टिळक रेखिला । नवरत्नजडित मुद्रिका हार कंठी घातिला ।
झळकती कुंडलें कानीं शिरीं मुगुट शोभला । मुरली धरुनी अधरीं नाचे यमुना तीरीं देखिला ॥२॥
मथुरेसी राहिला हरी विसरोनी आम्हांसी । कुब्जेनें मोहिला भाळल्या तिच्या रुपासी ।
डोळे पिचके खुरडच जे चाले काय वानुं मुखासी । शुद्ध भाव देखोनी तिच्या अनुसरला तियेसा ॥३॥
रासमंडली नाचे मुरारी कधीं भेटेल न कळे । वेणु वाजवी सुस्वर सोज्वळ पदकमळें ।
धणी न पुरे तया पाहातां मन आमुचें वेधिलें ॥४॥
हा अक्रुर कोठोन आला हरी गेला घेउनी । तोवियोग जाळी न जाय जीव आमुचा अझुनी ।
घरदार सोडोनी जावें गोकुळ हें सांडोनी । उद्धवा कधीं भेटविसी हरीला आणुनी ॥५॥
घडी घडी घरां येतो चोरिती श्रीहरी । तो झडकरी दाखवीं उद्धवा लौकरी ।
धन्य प्रेम तयांचें सदगदित अंतरीं । एका जनार्दनीं हरिरुपीं । वेधल्या नारी ॥६॥
२६७
कपटें पयपानसी । मोहें मोहनराशी । विषयी विष स्तनासी ।देवों आली ॥१॥
तंव तो सावध निजमुखीं । जिवासहित शोखी । सायुज्याच्या समसुखीं । समाधान बा ॥२॥
स्वरुपी घडोघडीं । म्हणें बापा सोंडीं । कृष्णमुखीं कुडी । सरती झाली बा ॥३॥
योगियां न कळे चित्तीं । सिद्धा दुर्लभ प्राप्ती । अंतीं कृष्णमुर्ती । हृदयावरी बा ॥४॥
पाजु आली विष । तियेसी परमसुख । कृष्णभजनीं दुःख । कवणा नाहीं बा ॥५॥
भक्ता परम प्राप्ती । द्वेषियां तेचि गती । एका जनार्दनीं प्रीति । वैरियां चार्‍हीं मुक्ति बा ॥६॥
२६८
निज पैसा समरसें । गोकुळा आली द्वेषे । कृष्णामुखीं विषें । निर्विष जाली ॥१॥
सोडीं सोडीं बा कान्हा । आक्रंदे पुतना । मागुती जनार्दना । मी न ये येथें ॥२॥
कृष्ण स्वानंदाचा कंदु । कंसासी विरोधु । विषय विषा पाजुं । पुतना आली ॥३॥
मी म्हणे बाळ तान्हें । त्वा शोषिलें जीवें प्राणें । मागुतें येणें । खुटलें बापा ॥४॥
ऐसा कैसा रे होसी । मी तुझी रे माउशी । परतोनी गोकुळासी । मी नये बापा ॥५॥
ऐसा कैसा बाळ । माझ्या शोखिल्या जीवनकळा । यशोदा वेल्हाळा । वाचली कैसी बा ॥६॥
एका जनार्दनी । द्वेषाच्या भावना । सायुज्यसदना । अरि वर्ग ॥७॥
२६९
अहं तृणावर्त बळी । प्रवेशला गोकुळीं । मोहममतेची राहाटोळी । भवंडीतसु ॥१॥
रज उधळले तेणें बळें । झाकोळले बुद्धीचे डोळे । कृष्ण आहे नाहीं हें न कळे । सकळिकांसी हो ॥२॥
श्रद्धा यशोदा म्हणे । माझा कृष्ण नेला कोणें । न दिसें रजोगुणें । मायें काय करुं वो ॥३॥
कैसें निबीड निबीड रज । मीचि न देखें मज । तेथें कृष्ण सोय निज । कवण दावी ॥४॥
तळमळीताहे मन । गेलें निधान । संतां सोय सविघ्र । बाधीना बा ॥५॥
बाळ सांवळें देखोनियां दिठी । आला धांवोनि उठाउठीं । कृष्णें घातली मिठी । अद्वैतपणें ॥६॥
वेगें नेला गगनावरी । कृष्णची गगनभरी । यावया जावया तिळभरी । वावो नाहीं बा ॥७॥
जडला कृष्ण अंगीं । कृष्णचि जाला वेंगीं । द्वैतभाव भंगीं । गेला त्याचा ॥८॥
संकल्प विकल्प पांख । उपडिलें दोन्हीं देख । येणें जाणें निःशेष । खुंटलें त्यांचें ॥९॥
कृष्णकारणीं हेंदुर्घट । आली भुलविली वाट । जिवनीं जेवीं मीठ । विरोनि जाय ॥१०॥
तृणावर्ता आवर्तु । भवंडी कृष्णनाथु । करणें देहा घातु । करुनी ठेला ॥११॥
पाहतां वेदविधी । द्वेत दृष्ट बुद्धी । एका जनार्दनीं । बैसविली निजपदीं ॥१२॥
२७०
गोकुंळींचा कान्हा अवतरला तान्हा । प्रथम पूतना शोषियेली ॥१॥
जन्मला वोखट घालुं आला वीट । पिढें महाबळभट पिटविला ॥२॥
वारा वाजे थोर सुटला आवर्तु । कृष्णें तृणावर्तु मर्दियेला ॥३॥
पाय होनोनिया मोडिला शकटु । कृष्ण अलगटु देवकीचा ॥४॥
मृतिका खादली वरितां पै देख । उदरीं तिन्हीं लोक दाखविलें ॥५॥
दहीं दुध चोरी आली बा मुरारी । माया दावें वरी बांधितसे ॥६॥
नऊ लक्ष गोप न पुरती उदरा । माया दामोदरा बांधितसे ॥७॥
दावा दामोदरु बांधिला मायेनें विमलार्जुन दोन्ही उद्धरिलें ॥८॥
वत्साचोनि रुपें आला पै असुर । झाडीं वत्सासुर झाडियेला ॥९॥
ध्यानस्थाचें परी बैसलासे तीरीं । बका दोन्हीं चिरी केल्या कृष्णें ॥१०॥
चेंडु वाचे मिसें नाथिला काळिया । फणीरंगी कान्हया नृत्य करी ॥११॥
इंद्रा मान हरी गोवर्धन करीं । धरोनि श्रीहरी व्रज राखे ॥१२॥
ताडाफळासाठीं धेनुक उठिला । कृष्णें निवटिला क्षणमात्रें ॥१३॥
वणवा गिळिला राखिलें गोपाळ । संतोषे सकळ नाचताती ॥१४॥
गोपाळ वासुरें अघासुर गिळी । कृष्णें दोन्हीं केली पहिल्या ऐसी ॥१५॥
वत्स वत्सपाळ नेले सत्य लोकां । अवघीं कृष्ण देखा होऊनि ठेला ॥१६॥
वळितं गोधनें गोपाळांशी खेळे । पाहतां निवतीं डोळे गोपिकांचे ॥१७॥
शरदऋतु शोभा शोभली रजनी । कृष्ण वृंदावनीं वेणु वाहे ॥१८॥
वेणुनादध्वनी वेधिल्या कामिनी । कृष्णादीपें हरिणी दीपियेल्या ॥१९॥
गोपीप्रती गोपी कृष्ण एक एकु । सहस्त्रघटीं अर्कू नसोनि दिसे ॥२०॥
वेणुनाद ध्वनि वेधिल्या गोपिका । रंगी त्या मायिका नाचविय्ल्या ॥२१॥
अरिष्टा अरिष्ट झाला कृष्णनाथु । केशिया आघातु केला तेणें ॥२२॥
गोकुळीं दैत्यासी केला आडदरा । थोर कंसासुर धाक पडे ॥२३॥
गोकुळा अक्रुर पाठविला रांगे । म्हणे आणी वेगें रामकृष्णा ॥२४॥
भाग्य भाव माझा कंसाचिया काजा । वैकुंठीचा राजा देखेन आजीं ॥२५॥
गाईचे रे खुर विष्णुपदांकित । पृथ्वी शोभत अक्रुर देखे ॥२६॥
ध्वजवज्राकुम्श कुंकुमांकित पदें । अक्रुर आनंदें डोलतसे ॥२७॥
तृणतरुवरां घाली लोटांगण । पुढती कृष्णचरण कैं देखेन ॥२८॥
पावला गोकूळां तंव वैकुंठ थोकडें । व्रज तेणें पांडे कृष्णमुखें ॥२९॥
देखोनियां कृष्ण विसरलां आपणां । आक्रुर श्रीकृष्ण चरणीं लोळे ॥३०॥
जाणोनि त्याचा भावो वेगीं निघे देवो । चला मथुरा पाहों आजीं आम्हीं ॥३१॥
व्रजीच्या अंगना करिताती रुदना । मागुता कैं कान्हा देखो आतां ॥३२॥
रथारुढ हरी पाहाती नरनारी । यमुना परतीरीं उतरले ॥३३॥
मारुनी रजक घेतलीं लुगडीं । गोपाळ आवडीं श्रृंगारिले ॥३४॥
पाटाउ परिकर नेसले पितांबर । कासे मनोहर नाना मेचु ॥३५॥
अक्रुरें जाउनी कंसा जाणविलें । मथुरेसी आले रामकृष्ण ॥३६॥
ऐसें ऐकोनि कंस दचकला मनीं । सर्व रुप नयनीं कृष्ण देखे ॥३७॥
चंदन कचोळी भेटली कुब्जा । वैकुंठीचा राज चर्चियेला ॥३८॥
कुब्जा म्हणे हरी चला माझे घरीं । सुमनेंही वरी श्रुंगारिली ॥३९॥
हातीं धरोनी बरी ते केली साजिरी । कंस भेटीवरी येईन घरां ॥४०॥
माळीयें सुमनें श्रृंगारिला हरी । वैकुंठ पायरीं केली तया ॥४१॥
मुक्त मुमुक्ष विषयीं हे लोक । पाहाती कौतुक कृष्णलीला ॥४२॥
मथुरे चोहाटाचा चालिला राजवाटा । टाकिला दारवंटा धनुर्याग ॥४३॥
तेथें अतिबळें कुवलया उन्मत्त । पेली महावुत कृष्णावरी ॥४४॥
त्यासी हाणोनिया लात उपडिलें दोन्हीं दांत । घायें महावत मुक्त केलें ॥४५॥
यागीचें कादडें केलें दुखंड । बळी ते प्रचंड रामकृष्ण ॥४६॥
घेऊनि गजदंत पावले त्वरित । मारिले अमित वीर कृष्णें ॥४७॥
न धरत पैं वेगीं आला मल्लरंगीं । कंस तो तवकेकें चाकाटला ॥४८॥
माल मल्लखडा करीतसे रगडा । कृष्ण तो निधडा एकपणें ॥४९॥
मुष्टीकचाणुर घायें केला घातु । कोपला अंनतु कंस पाहें ॥५०॥
चाणुर मुष्टिक हातें निवटिलें । दैत्य धुमसिलें अनुक्रमें ॥५१॥
रणरगडा अशुद्धचा सडा । कृष्ण कंसा कडा उठावला ॥५२॥
न लगतां घायें धाकें सांडी देहो । मथुरे केला रावो उग्रसेन ॥५३॥
सोडिलीं पितरें तोडिलें बंधनें । एका जनार्दने मुक्त केली ॥५४॥
२७१
जो साक्षात परब्रह्मा । करुं निघाला चोरीकर्म ।
धरुनी बाळलीला संभ्रम । आवडी परम नवनीताची ॥१॥
सवें नवलक्ष संवगडे । पशुपाल वेडे बागडे ।
सुदामा बोले बोबडें । ते आवडे गोविंदा ॥२॥
थोगला अत्यंत वांकुडा । जो निजाचा निजगडा ।
कृष्ण गुज सांगे त्या पुढां । होई गाढा चोरीकार्मा ॥३॥
घ्या रे सामुग्री चोखट । खेडे सराटे निकट ।
माजीं बांधारे बळकटा । शब्द कांहीं करुं नका ॥४॥
वस्त्र गाळिव मृत्तिका । घेउनी प्रवेशतं शंकु नका ।
सकळ गृहींचा आवांका । मज ठाउक समाचार ॥५॥
गोपाळ म्हणती चक्रपाणी । चोरीकर्म ऐकिलें श्रवणीं ।
परी खडे सराटे मृतिका घेउनी । न देखो कोणीही रिगाले ॥६॥
कृष्ण म्हणे एका निवाडे । रचिताती पत्रांचे उतरंडे ।
पाहतां न दिसती दृष्टीपुढे । जैं अंधार पडे रजनीचा ॥७॥
भीतरी प्रवेशोनी एकीकडे । सव्य अपसव्य टाकावे खडे ।
पात्रीं नाद उमटती धडाडे । जाउनी रोकडे आणावे ॥८॥
शिंकीं लांबविलीं अंतराळीं । काठी टोंचुनी पाडावी दुळी ।
धार लागेल मोकळी । मिळोनि सकळीं प्राशन करा ॥९॥
साचल एकतील गौळणी । कवाडें धरतील धांवोनी ।
सराटे पसरा आंगणीं । पायीं चुंबकोनी गुंतती ॥१०॥
तेहि चुकवोनि येती अबला । तरी मृत्तिका घाला त्यांचे डोळां ।
नेत्र चोळतील तंव तुम्हीं पळा । नवलकळा सांगितली ॥११॥
हांसें आलें कृष्णातरीं । मग प्रवेशलें घरोघरीं ।
कवाडें उघडोनि भीतरीं । अंतरीं प्रवेशलें ॥१२॥
हळुं हळूं ठेविती पाउलें । तंव गर्जती वांकीया वाळे ।
जन ऐकतील म्हणोनि गोपाळें । कर्णीं अंगोळी घातलीं ॥१३॥
कृष्ण नायके तंव जग बधीर । कृष्ण न देखे तंव अंध जगत्रय ।
कृष्ण न चाले तंव पांगुळ सर्वत्र । चालक सर्व श्रीकृष्ण ॥१४॥
सांचलें दहींपात्रें काढिती । थिजलें घृत करीं घेती ।
कांही भक्षिती कांही खाती । तोंडा मखिती निजल्यांच्या ॥१५॥
एकापुढें एक धांवती । एक एकाचें लोणी हिरोनी घेती ।
एक एकातें झोंबती । वाटा मागती चिमटोनी ॥१६॥
देखोनी नवनीताची भांडीं । पेंदा नाचे दुपांडी ।
उगा पोरा म्हणोनी धरी शेंडी । गोळा तोंडी लाविला ॥१७॥
शिकें उंच न पावे कर । काठी टोचोनी पाडिलें छिद्र ।
कृष्ण निजमुखीं लावी धार । देखोनी गोपाळ गजबजिलें ॥१८॥
गोपाळ म्हणती कृष्णासी । जाई बा सकळ दुधतुपेंसी ।
येरु म्हणे लागा रे कोपराशी । घ्या रे सावकाशी दोहींकडे ॥१९॥
तंव वाकुंड्यानें केली टवाळी । टांचें तुडवोनि पोरें उठविलीं ।
ती मातेसी बोभाईली ॥ तंववत्से सोडिलीं वडजानें ॥२०॥
वत्सें करिती स्तनपान । बाळकें करिती रुदन ।
गोपी उठल्या गजबजोन । तंव नवनीतें वदन माखलें ॥२१॥
वृद्धा सांडोनि शेजेसी । उठतां देखिलें सुनेसी ।
सासु देखतां तोंड पुसीं । येउनी केशी धरियेली ॥२२॥
तुंचि भक्षिणी नवनीत । आणि दुसर्‍याचें नांव सांगत ।
ऐशा सासु सुना भांडत । आपण तेथोनि निघाले ॥२३॥
मग पळाले सकळ । दुजे गृहीं प्रवेशलें गोपाळ ।
गौळणी निद्रें व्यापिल्या सकळ । टवाळी नवल मांडियेली ॥२४॥
शिंकी लांबविलीं दुरीं । यत्न करिती परी न येती करीं ।
मग वेंघोनी एक एकाच्या खांद्यावरी । उतरती दहींपात्रें ॥२५॥
उतरंडी दुरी लाविल्या न कळती । सव्य अपसव्य खडे टाकिती ।
पात्रीं लागतां नाद उठती । तेंचि घेउनि येती हरिपाशीं ॥२६॥
सुखसेजे गोपी बाळी । निद्रिस्त देखोनि अंबरें फेडिलीं ।
तरुण देखोनी मुली । टवाळी थोर मांडिली ॥२७॥
तंव गजबजोनी सुंदरा । एके करें सांवरी चिरा ।
जाउनी धरी मधलीया द्वारां । सकळ चोरां कोंडिलें ॥२८॥
तंव पुढें देखोनी वनमाळी । म्हणे भला रे सांपडलासी ये वेळा ।
तंव धरुं वेल्हाळी । नयनीं गुरळीं घातली ॥२९॥
नेत्र चोळी व्रजकामिनी । आपण तिचा हात धरुनी ।
गोपाळातें खूनवोनी । सकळ तेथोनी पळाले ॥३०॥
येरी धावें पाठोपाठे । तंव पायीं चुबकले सराटे ।
वाम करी धरुनि बोटें । बैसे गुतोंनी धरणीवरी ॥३१॥
तंव दुसरी धांवली गोपिका । तिच्या नयनीं घातली मृत्तिका ।
नेत्र चोळीत अधोमुखा । देखोनि यदुनायक हांसतसे ॥३२॥
मग चोरीकर्म सोडिनी । सकळ प्रवेशले सदनीं ।
प्रातःकाळ झालिया गौळनी । गार्‍हाणीं सांगों आलिया ॥३३॥
यशोदे म्हणती सकळां । तुझिया पुत्राची नवलकळा ।
कानी न ऐकीली न देखों डोळां । सुना सकळीं विटंबिल्या ॥३४॥
एक मह्णती यशोदेम सुंदरे । तुझी गांवची वस्ती पुरे ।
उठवितो निजलीं पोरें । फेडी चिरें करी नग्न ॥३५॥
खालीं ठेवोनि नवनीत मांजरामुखी चाटवीत ।
आपण खदखदां हांसत । ऐसें विटबित नानापरी ॥३६॥
एक म्हणे गौळणी । माझे भक्षिलें क्षीण लोणी ।
उच्छिष्ट मुखासी लावोनी । आपण तेथोनि पळाला ॥३७॥
एक म्हणे माझी सोडिलीं वासुरें । उठविलीं निजली पोरें ।
शिंकी तोडिलीं एकसरें । फोडिल्या त्वरें माथणी ॥३८॥
गोपिकांसी बुझविते सुमती । म्हणे निर्गुणासी गुण लविती ।
तुमचें खादलें किती निश्चिती । संगा तितुके देईन ॥३९॥
किती भक्षिलें रें गोविंदा । तंव कृष्णापुढेंअ आली राधा ।
तिचे स्तन धरुन हांसे गदगदां । म्हणे येवढा मुद्धा होता तिच्या ॥४०॥
हांसों आलों राधिकेसी । गौळणी गेल्या घरासी ।
यशोदा म्हणे कृष्णासी । सोडी वेगेसी गोधनें ॥४१॥
जो वेदासी अगोचरा । श्रुतीसी न कळे ज्याचा पार ।
वर्णितां श्रमाला फणीवर । तो गुण गंभीर श्रीकृष्ण ॥४२॥
माथां मुगुट तेजःपुजं । नयन श्रवनीं सांगे गुज ।
ललाटी कस्तुरी नोज । तळपे तेज तळवीया ॥४३॥
वैजयंती वनमाआळा । सुरंग गुजाहार गळां ।
कंठी मिरवे मेखळा । झलके कळा कौस्तुभाची ॥४४॥
मुगुटा सुमने वैष्टिलीं मयुरपिच्छें शिरी खोविलीं ।
मग चालिले तये वळीं । जाळी पृष्ठीवरी टाकिलीं ॥४५॥
काळीं कांबळी खांद्यावरी । कासे खोविली शृंग मोहरी ।
जाला नंदाचा खिललरी । हांकिली झडकरी गोधनें ॥४६॥
बळिराम राजीवनयनु । अलंकारमंडित शुद्ध तनु ।
चालिले गोपाळ घेऊनी धेनु । दोघे बाळ नंदाचे ॥४७॥
सवें नव लक्ष संवगडे । पशुपाळ वेडेबागडे ।
गोरज उधळले चहुकडें । पावले थंडी यमुनेच्या ॥४८॥
गाई सोडिल्या सैरावैरा । भ्रमती सुखें खाती चारा ।
वडज्या म्हणे पेद्यां पोरा । आणी सत्वर पलशपत्रें ॥४९॥
मथुरेचे मीष करुनी । हाटा निघालिया गौळणी ।
माथा दहीं दुध घृत लोणी । त्यामाजीं मुख्य राधा ॥५०॥
गगन गर्जे वाक्या वाळे । घनदाट चालती उताविळे ।
मनीं इच्छिती कृष्णसोहळे । तंव देखिलें वदज्यानें ॥५१॥
टाळी पिटोनी उठे वोजे । म्हणे कृष्ण आलें खाजें ।
धावोणी आला गोपीसमाजे । उभ्या थोकविल्या गौळणी ॥५२॥
तंव वडज्या करी झगडा । एकसरें धांवला वाकुडा ।
पात्रें फोडिलीं कडाडा । धरुनी रोकड्या आणिल्या ॥५३॥
कृष्णें राधा धरली करीं । एका करें लोणी चोरी ।
एका करेकं फेडी निरी । एका करें कंचुकीं ॥५४॥
हांसों आले राधिकेसी । सोंडी गोवळ्या सलगीं कायसी ।
भुलली कृष्णरुपा झाली पिसी । लोणी पुसी कृष्णमुखा ॥५५॥
ऐस विनोद विचित्र केला । करीतसे घननीळा सावळा ।
घ्या रे आतां सामुग्री चला । अति क्षुधा लागली ॥५६॥
पाहुनी कल्पतरुची छाया । घडिया घालिती बैसावया ।
बैस म्हणती यदुराया । करुं काला आवडीं ॥५७॥
पेंदा घाली पत्रावळी । वडज्या सोडी मोटा जाळीं ।
वांकुडा बैसवीं गोपाळमंडळी । वाढिताती पत्रशाखा ॥५८॥
नानापरेंचीं पक्कान्नें । षडरस बहुत अन्नें ।
गोडी सांगतां अनन्यें । पसरतीं पदर इंद्रादिकीं ॥५९॥
सकळां वाढिलें परिपुर्ण । सकळ म्हणती ब्रह्मार्पण ।
संतासीं कळली खुण । घालिती ग्रास कृष्णमुर्खीं ॥६०॥
तंव जेवितां केली टवाळी कृष्णापुढें होती गुळपोळी ।
ती उचलोनी पत्रावळी । न राहे जवळी दुरी गेला ॥६१॥
वाकुल्या दावी कृष्णापुढां । नेत्रा खूणवितसे गाढा ।
वाकुड्यातें हाणोनि थोबाडा । धरुनी रोकडा आणिला ॥६२॥
धरिली वांकुड्याची शेंडी । उच्छेष्ट घाली तयां तोडीं ।
पेंदा नाचे दुपांडीं । थोगला गडी सांपडला ॥६३॥
सरलें पुढलें पक्वान्न । कृष्णें आणिलें दध्योदन ।
मग पेंदा म्हणे आपण । कृष्नासी पैं ॥६४॥
आवड वडज्याची थोरी । पेंदा म्हणे टाका दुरी ।
कां टाकितां म्हणोनी रुदन करी । बुझावी श्रीहारी स्वानंदें ॥६५॥
एकांसी दाउनी शेखीं । घालिती दुसर्‍याचे मुखीं ।
कां रे पोरें म्हणोनी तवकी । डोळे रोखी वांकुडा ॥६६॥
ऐसे खेळती सकळ मिळोनी । तंव देव पाहाती विमानीं ।
वंचलों म्हणती अभिमानी । कृष्णशेष न मिळेची ॥६७॥
नोहे श्रीकृष्णची शेषप्राप्ती । मग एकमेकंसी बोलती ।
गोपाळ यमुनेतीरीं येती । चला शीघ्र गती जाऊं तेथें ॥६८॥
विमानें ठेवोनी अंतराळीं । कृष्ण शेषालागीं तें वेळीं ।
देवीं मत्स्यरुपें धरलों । यमुनेमाजीं रिगती ॥६९॥
ब्रह्मादिक मत्स्य जालें । हें श्रीकृष्णासी कळलें ।
जाणोनि गोपाळां बोलें । म्हणे हात धुवुं नका ॥७०॥
सहज उदकाची वाटाळी ॥ अकर्मकार गोवळी ।
हात पुसिले कांबळी । एक टिरीसी पुसती ॥७१॥
उठलें घोंगडीया झाडोनी । खेळ खेळत आले वृदांवनीं ।
तुळही प्रदक्षणी करुनी । खोविल्या शिरीं मंजुरीया ॥७२॥
तंव इतक्यांत लोपल्या माध्यान्ह । आस्तमान गेला दिनमान ।
श्रीकृष्णा म्हणे वचन । चला जाऊं घराप्रती ॥७३॥
देहुडा उभा राहुनी गायी खुणविल्या वेणुधनी ।
टवकारिल्या चारा विसरुनी । आल्या मुरडोनीं त्वरित ॥७४॥
गाई मेळविल्या हरी । गोपाळ घालती हुंबरी ।
डांगा झेलिती अंबरीं । पावे मोहरी वाजविता ॥७५॥
सुदामा जाला वेत्रधारी ।\ ऐसे गोपळ गजरीं ।
चालिले मग झदकरी । पेंदा छरीछत्र तरुचें ॥७६॥
वडजा घेऊनि अशोक डाहाळी । वारीतसे मुखावरील धुळी ।
वाकुंडा फोडी कौतुकें आरोळी । ग्रामाजवळी पातलें ॥७७॥
रामकृष्ण आले ऐकोनी । उताविळ झाल्या गौळणी ।
रांगोळ्या नानापरी आंगणीं । घालिताती सप्रेमें ॥७८॥
नव लक्ष आरत्या करी । घेऊनि उभ्या गोपिका नारी ।
भावें ओवाळिला श्रेहरी । लोण उतरी यशोदा ॥७९॥
गाई निघाल्या गोठनी । गोपाळ गेले आज्ञा घेउनी ।
आपण प्रवेशले निजभुवनीं । सिंहासनीं बैसलें ॥८०॥
ऐसा बाळक्रीडेचा सोहळा । आनंद जाहला सकळां ।
एका जनार्दनी देखिला श्रीबाळक्रीडा संपविली ॥८१॥
२७२
ॐ कारा परतें निर्गुणा आरुतें । भक्तांसी निरुतें गोकुळीं वसे ॥१॥
सांवळें सगुन चैतन्य परिपुर्ण । संवगदियासी जाण क्रीडा करी ॥२॥
आदि मध्य अंत न कळे ज्या रुपाचा । तोचि बाळ नंदाचा म्हणताती ॥३॥
एका जनार्दनीं वेगळाचि पाहीं । हृदयीं धरुनी राही सांवळियासी ॥४॥
२७३
सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई । वेधियलें मन आमुचें तें पायीं ॥१॥
नवल लाघव न कळे ब्रह्मादिकां । वेदश्रुतीं शिणल्या ठक पडलें सकळिकां ॥२॥
साही दरुशनें वेडावलीं जयासाठीं । खांदी घेऊनी कांबळा गोधन राखी जगजेठी ॥३॥
एका जनार्दनीं ब्रह्मा गोकुळीं उघडें । पाहतां चित्त तेथें वेधलें ॥४॥
२७४
निर्गुण सगुण श्रुतीसी वेगळें । तें रुप सांवळें गोकुळीं वसे ॥१॥
डेळियांची धनी पाहतां न पुरे । तयालागीं झुरे चित्त माझें ॥२॥
वेडावलीं दरुशनें भांडती अखंड । वेदांचे तें तोंड स्तब्ध जाहलें ॥३॥
एका जनार्दनीं सांवळें सगुण । खेळतसे जाण वृदांवनीं ॥४॥
२७५
ब्रह्मादिकां न कळे तें रुप सुंदर । गोकुळीं परिकर नंदाघरीं ॥१॥
रांगणां रांगतु बाळलीले खेळतु । दुडदुडां धांवतु गायीपाठीं ॥२॥
गौळणीचे घरीं चोरुनि लोणी खाये । पिंलंगतां जाये हतीं न लगे ॥३॥
एका जनार्दनी त्रैलोक्यां व्यापक । गाई राखे कौतुक गौळियांसी ॥४॥
२७६
जाणते नेणते होतु ब्रह्माज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची ॥१॥
सुलभ सोपारे गोकुळामाझारीं । घरोघरीं चोरी खाय लोणी ॥२॥
न कळे ब्रह्मादिकां करितां लाघव । योगियांची धांव खुटें जेथें ॥३॥
एका जनार्दनीं चेंडुवाचे मिसें । उडी घालितसे डोहामाजीं ॥४॥
२७७
विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी । नये अनुमानासी वेदशास्त्रां ॥१॥
नवल गे माय नवल गे माय । चोरुनियां खाय नवनीत ॥२॥
धरिती बांधती गौळणी बाळा । वोढोअनि सकळां आणिताती ॥३॥
एका जनार्दनीं येतो काकुलती । न कले ज्यांची गति वेदशास्त्रां ॥४॥
२७८
मेळवीं संवगडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥
सांवळां सुंदर वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥
मुगुट कुंडले चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळी कौस्तुभमणी ॥३॥
एका जनार्दनीं वेधलेंसे मन । नाही भेद भिन्न गौळणीसी ॥४॥
२७९
मिळती सकळां गौळणी ते बाळा । लक्ष लाविती डोळां कृष्णमुखा ॥१॥
धन्य प्रेम तयांचे काय वानुं वाचें । न कळे पुण्य त्यांचे आगमानिगमां ॥२॥
आदरें गृहा नेती मुख पैं धृताती । जेवूं पै घालिती दहींभात ॥३॥
एका जनार्दनीं प्रेमाची पैं लाठी । धांवुनी इठी मिठी घेतो बळें ॥४॥
२८०
पाहुनी कृष्णासी आनंद मानसी प्रेमभरित अहर्निशीं कृष्णनामें ॥१॥
आजीं कां वो कृष्ण आला नाहीं घरां । करती वेरझारा नंदगृहीं ॥२॥
भलतीया मिसें जातीं त्या घरासी । पाहतां कृष्णासी समाधान ॥३॥
एका जनार्दनीं वेधल्या गौळणी । तटस्थ त्या ध्यानीं कृष्णाचिया ॥४॥
२८१
वेधल्या त्या गोपी नाठवे आपपर कृष्णमय शरीर वृत्ति जाहली ॥१॥
नाठवे भावना देह गेह कांहीं । आपपर त्याही विसरल्या ॥२॥
एका जनर्दनीं व्यापला हृदयीं । बाहेर मिरवी दृष्टिभरित ॥३॥
२८२
जगाचें जीवन ब्रह्मा परिपुर्ण । जनीं जनार्दन व्यापक तो ॥१॥
तो ह्री गोकुळीं रांगणा नंदाघरीं । गौळणी त्या सुंदरीं खेळविती ॥२॥
वेद गीतीं गातीं शास्त्रें विवादतीं । खुंटलीसे मति शेषादिकांची ॥३॥
एका जनार्दनी चहूं वाचां परता । उच्छिष्ट सर्वथा भक्षी सुखें ॥४॥
२८३
परब्रह्मा सगुण असे परात्पर । वेदादिकां पार न कळे ज्याचा ॥१॥
पाहतां पाहतां वेधलेसें मन । नये अनुमोदन शास्त्रादिकां ॥२॥
एका जनार्दनी व्यापुनी वेगळा । त्यासी गौळणी बाळा झकविती ॥३॥
२८४
आकार निराकार विश्वरुपाचा ॐकार । तो हा सर्वेश्वर बाळरुपें ॥१॥
रांगणारांगतु हळुच पिलंगतुं । आनंदभरितु नंदराय ॥२॥
अंगणीं धांवतु सर्वेंचि बैसतु । अचोज दावितु भक्तालागीं ॥३॥
एका जनार्दनीं नित्य निरामय । न कळे वो माया काय बोलूं ॥४॥
२८५
चहुं वाचांपरता चहुं वेदां निरुता । न कळे तत्त्वतां चतुर्वक्त्रा ॥१॥
चौबारा खेळतु सौगंडी सांगातु । लोणी चोरुं जातु घरोघरीं ॥२॥
चौसष्ट वेगळा चौदांसी निराळा । अगम्य ज्याची लीळा सनकादिकां ॥३॥
एका जनार्दनीं चहुं देहावेगळा । संपुष्टी आगळा भरला देव ॥४॥
२८६
लक्षांचे जें लक्ष तो दिसे अलक्ष । तो असे प्रत्यक्ष नंदाघरीं ॥१॥
बाळरुप गोजिरें वाळे वांकी साजिरें । पाहतां दृष्टीचे पुरे कोड सर्व ॥२॥
ध्यानाचें निज ध्यान मनाचें अधिष्ठान । व्यापक विधान महेशाचे ॥३॥
एका जनार्दनीआं शब्दाची नातुडे । गौळणी वाडेंकोडें जेवाविती ॥४॥
२८७
अबोलणें बोल कुंठीट पै जाहलें । तें निधान देखिलें नंदाघरीं ॥१॥
अधिष्ठान मुळ व्यापक सकळ । जगाचें तें कुअळ कल्पद्रुम ॥२॥
एका जनार्दनीं बिंबी बिंबाकार । सर्वत्र श्रीधर परिपुर्ण ॥३॥
२८८
शेषादिक श्रमले न कळे ज्याचा पार । आगमानिगमा निर्धार न कळेची ॥१॥
तें हें बाळरुप यशोदे वोसंगा । पाहतां दोषभंगा जाती रया ॥२॥
करितसे चोरी खोडी नानापरी । यशोदा सुंदरी कोड वाटे ॥३॥
बांधिती गळिया धांवोनी दाव्यानें । नका नका म्हणे दीनवाणी ॥४॥
त्रिभुवनासी ज्याचा धाक तो ब्रह्मांडी । त्यासी म्हणती भांडी आला बाऊ ॥५॥
भिऊनियां लपे यशोदे वोसंगा । ऐशा दावी सोंगा भाविकांसी ॥६॥
एका जनार्दनीं दावितो लाघव । ब्रह्मादिकां माव न कळे ज्यांची ॥७॥
२८९
तिहीं त्रिभुवना ज्याची सात्त वाहे । तो चोरी करिताहे घरोघरीं ॥१॥
न कळे न कळे लाघव तयाचें । ब्रह्मादीक साचे वेडावती ॥२॥
वेद शास्त्र श्रुती कुठित पै होती । तया गौळणी बांधिनी धरुनियां ॥३॥
योग मुद्रा साध्न योगी साधिताती । तयांसि नाहे प्राप्ति हेंचि रुप ॥४॥
तें बाळरुप घेउनि वोसंगा । हालविती पई गा बाळकृष्णा ॥५॥
जयाचेनि होय तृप्ति पैं सर्वांसी । तो मागे यशोएसी दहींभात ॥६॥
दहींभात लोनी खाउनी न धाय । घरोघरीं जाय चोरावया ॥७॥
एका जनार्दनीं न कळे वैभव । दावितसे माव भोळ्या जना ॥८॥
२९०
रखितो गोध्नेआं मनाचेनी मनें । न पुरे अवसरु धावण्यां धावणें ।
कुंठित जाहली गति पवनाची तेणें । तो हा नंदाचा नंदन यशोदेचें तान्हें ॥१॥
देखिला देखिला मंडित चतुर्भुज । वैकुठींचा भूपति तेजःपुंज ।
पहातांचि तय नावडे काहीं दुजें । ऐसें लाघव याचें सहज ॥२॥
चित्त चैतन्य पडिली मिठी । कामिनी मनमोहना जगजेठी ।
तुझ्या वेधे ध्यानस्थ धुर्जटी । ऐसा गोवळु योगीयांसीनोहे भेटी ॥३॥
एका जनार्दनी शब्दवेगळा । आंगमांनिगमां कांहीं न काळे लीळा ।
सोहं कोहं शब्दावेगळा । पहा पहा परब्रह्मा पुतळा ॥४॥
२९१
सानुले तानुले राम आणि कृष्ण । गोकुळीं विंदान दाविताती ॥१॥
गाई राखिताती लोनी चोरिताती । अकळ खेळताती नानापरी ॥२॥
एका जनार्दनी नये अनुमाना । ब्रह्मादिक चरणा वंदिताती ॥३॥
२९२
धन्य भाग्य गोकुळींचे राज्य । जेथें क्रीडा केली यादवराजें ॥१॥
काय तें वानुं सुख आनंदु । सुख संतोष गोकुळीं परमानंदु ॥२॥
एका जनार्दनीं जगाचे जीवन । मूर्ति पाहता दिसे सगुण निर्गुण ॥३॥
२९३
योगी शिणताती साधनकपाटीं । तया नोहे भेटीं कांही केल्या ॥१॥
तो हरी गोकुळीं बाळवेषे खेळे । पुरती सकळ मनोरथ ॥२॥
गोपिका तयासी कडेवरी घेती । वालादुला म्हणती माझे माझें ॥३॥
एका जनार्दनीं जया जैसा हेत । तैसा पुरवीत देवराव ॥४॥
२९४
यशोदेचा हरी जाय यमुनातीरीं । वाजवीतो मुरली पोवा नानापरी ॥१॥
छंदे छंदे वाजे वृंदावनीं फुजें । वेधलें मन माझें नाठवें कांहीं ॥२॥
ऐसें येणें पिसें लाविलें गे माये । एका जनार्दनीं पाहिला यादवराय ॥३॥
२९५
रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणू वाजवीं वृदांवना गोधनें चारिताहे ॥१॥
रुणझुण रुणझुण वाजवी वेणु । वेधीं वेधलें आमुचें तनमुन वो माये ॥२॥
गोधनें चारी हातीं घेऊनी काठी । वैकुंठीचा सुकुमार गोपवेषें जगजेठी ॥३॥
एका जनार्दनीं भुलवी गौळणी । करिती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥
२९६
आदि नाटक सर्व व्यापक व्यापुनी निराळा । गोप गोधनें गौळणीयांसी लाविला चाळा ॥१॥
मनमोहन कृष्ण यशोदेचा बाई । चोरी करी नानापरी धरितां न सांपडे बाई ॥२॥
जयाचे विंदान न कळे ब्रह्मादिकां वो माये । ठकविलें देवा आपणाचि काला खाये ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा चौदेहा वेगळा । पुराणें वेडावलीं न कळे अगम्य ज्याची लीला गे माये ॥४॥
२९७
पांघुरला घोंगडे काळें । वृदांवनीं गोपाळा माजीं खेळे ।
काला वाटीं निजांगें गोपाळ । खेळ खेळे नानापरी ॥१॥
पाहती देव बैसोनि विमानीं । ब्रह्मादिक ध्याती जया मनीं ।
आराध्यदैवत सनकादिकांचे हृदयभुवनीं । शिवादि पायावणी वंदिती ॥२॥
नानापरी विटीदांडु चेंडु । हमामा हुमरी लगोर्‍या मांडुं ।
नव लक्ष मिळावे सवंगडु । यमुनेथडी कळंबातळीं ॥३॥
गोंधने ठाई ठाईं बैसविले । गोपाळ सवंगडे भोवते शोभले ।
मध्येम घननीळ ते सांवळें । नंदरायाचें गोठुलें गे माये ॥४॥
एका जनार्दनींशरण । पाहतां देहीं विरालें देहपण ।
संपुर्ण जनीं जनर्दन । पाहतां पाहतां गेलों भुलोन गे मायें ॥५॥
२९८
चतुर्भुज शामसुंदर । गळां गुण्जींचे हार ।
निढळीं चंदन शोभे परिकर । मिरवे नंदरायाचा किशोर ॥१॥
हातीं काठी खांदी कांबळीं । गाई राखे यमुनेचे पाबळी ।
नाचती गोपाळ धुमाळी । पृष्टी जाळी दहींभात ॥२॥
जे निगमांचे ठेंवणें । सनकसनंदाचे घोसुलें येणें ।
शंभुचे आराध्यदैवत केणें । तें चरित गोधनें नंदाची ॥३॥
ऐसा अकळ नाकळें हरी । वेणु वाजवी छंदे नानापरी ।
एका जानार्दनी गोपेवेषें निर्धारीं । वाटी शिदोरी गोपाळं ॥४॥
२९९
खेळे कान्हा यमुनेचे तटीं । राखितो गोधनें घेउनी हातीं काठी ॥१॥
पांघुरला घोंगडें रत्नजडित गे माये । नंदरायाचा खिल्लारी तो होय ॥२॥
गोप गोंधनें सवंगडे नानापरी । दहींभात काला वांटितो शिदोरी ॥३॥
एका जनार्दनीं खेळे नानापरी । वेधोनि नेलें मन नाठवे निर्धारी ॥४॥
३००
लाहे लाहे सोडीत गोधनें । भोंवतें गोपाळ वेष्टित तारांगणें ।
शोभला तो बाळवेषें परिपुर्ण । वेधु लाविला आम्हांसी तेणें वो ॥१॥
छंदे छंदें वाजवितो वेणु । आमुचा गुंतला तेथे जीवप्राणू ।
नाठवे दुजा हेत कांहीं आनु । तो हा नंदनंदुनु यशोदचा ॥२॥
खेळे खेळे यमुनेचे तटीं । सुकुमार सांवळा जगजेठी ।
खांदा घोगडें शोभे हातीं काठी । गोपाळांसी वळत्या दे सये घाली मिठी ॥३॥
एका जनार्दनीं कळंबातळीं । मिळोनियां गोपाळमंडळीं ।
काला मांडियेला मिळोनि सकळीं । लाहे लाहे वाटी शिदोरी ॥४॥
३०१
राखीत गोधनें भक्ताचियां काजा । उणीव सहजा येवो नेदी ॥१॥
आपुलें थोरपणा सारुनी परतें । भक्तांचे आरुतें काम करी ॥२॥
उच्छिष्ट काढणें सारथ्य करणें । उच्छिष्टं तें खाणें तयांसवें ॥३॥
चुकतां वळती आपण वोळणें । एका जनार्दनीं पुण्य धन्य त्यांचें ॥४॥
३०२
नीच कामें न धरी लाज । धांवें देखोनि भक्तांचे काज ।
ऐसा सांवळां चतुर्भुज । रुप धरी गोजिरें ॥१॥
उच्छिष्ट गोपाळांचे खाये । वळत्या त्यांचे देणे आहे ।
राखुनी गोधनें माय । मागें मागें हिंडतसे ॥२॥
काला करी यमुनेतीरीं । स्वयें वाटितो शिदोरी ।
उच्छिषाटाचि भारी । हाव अंगें स्वीकारी ॥३॥
ऐसा कृपेचा कोंवळा । उभा यमुनेचे पाबळा ।
एका जनार्दनी लीळा । अगम्य ब्रह्मादिकां ॥४॥
३०३
न देखतां कृष्णवदन । उन्मळती तयांचे नयन ।
न घेती अन्नजीवन । कृष्णमुख न पाहतां ॥१॥
कोठें गुंतला आमुचा कृष्ण । ऐशी जया आठवण ।
गायी हुंबरती अधोवदन । कृष्णमुख न पाहतां ॥२॥
सवंगडे ठायीं ठायीं उभे । कृष्णीं दृष्टी ठेवुनी लोभें ।
आजी कृष्ण कांहो नये । आम्हांशी खेळावया ॥३॥
ऐशी जयांची आवडी । तयां पदो नेदी सांकडी ।
एका जनार्दनी उडी । अंगे घाली आपण ॥४॥
३०४
सांवळा देखिला नंदाचा । तेणें आनंदाचा पुर झाला ॥१॥
काळीं घोंगडी हातामध्यें काठी । चारितो यमुनातटीं गोधनें तो ॥२॥
एका जनार्दनीं सावंळा श्रीकृष्ण । गौळणी तल्लीन पाहतां होती ॥३॥
३०५
पाहिला नंदाचा नंदन । तेणें वेधियलेम मन ॥२॥
मोरमुकुट पितांबर । काळ्या घोंगडीचा भार ॥२॥
गोंधनें चारी आनंदे नाचत । करी काला दहीं भात ॥३॥
एका जनार्दनीं लडीवाळ बाळ तान्हा । गोपाळांशीं कान्हा खेळे कुंजवना ॥४॥
३०६
जयांचे उदारपण काय वानुं । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु ।
वेधीं विधियेलें आमुचें मनु । तो हा देखिला सावळा श्रीकृष्ण ॥१॥
मंजुळ मंजुळ वाजवी वेणु । श्रुतीशास्त्रा न कळें अनुमानु ।
जो हा परापश्यंती वेगळा वामनु । तया गोवळा म्हणती कान्हू ॥२॥
रुप अरुपाशीं नाहीं ठाव । आगमीनिगमां न कळे वैभव ।
वेदशास्त्रांची निमाली हांव । एका जनार्दनीं देखिला स्वयमेव ॥३॥
३०७
गोकुळी गोपाळसवें खेळतसे देव । ऐक प्रेमभाव तयांचा तो ॥१॥
गोधनें राखणें उच्छिष्ट खादणें । कालाहि करणे यमुनेतीरी ॥२॥
सवंगडियांचे मेळी खेले वनमाळी । घोंगडी ते काळी हातीं काठी ॥३॥
त्रैलोक्यांच्या धनीं वाजवी मुरली । भुलवी गौळणी प्रेमभावें ॥४॥
घरोघरीं चोरी करितो आदरें । एका जनार्दनीं पुरे इच्छा त्यांची ॥५॥
३०८
त्यांचिया इच्छेसारखें करावें । त्यांच्या मागें जावे वनांतरीं ॥१॥
वनासी जाऊनी नानापरी खेळे । हमामे हुतुतु बळें गडी घेती ॥२॥
सर्वांघडी संतां सर्वावरिष्ट देव । तयावरी डाव गाडी घेती ॥३॥
अंगावरी डाव आला म्हणती गोपाळ । देई डाव सकळ आमुचा आम्हां ॥४॥
पाठीवरी बैसती देवतें म्हणती । वांकरे श्रीपति वेंगीं आतां ॥५॥
एका जनार्दनी गडियांचे मेळीं । खेळें वनमाळी मागें पुढें ॥६॥
३०९
मागें पुढें उभा हातीं घेउनी काठी वळत्या धांवे पाठीं गाईमागें ॥१॥
गोपाळ बैसती आपण धांवे राणा । तयांच्या वासना पूर्ण करी ॥२॥
वासना ते देवें जाया दिली जैशी । पुरवावी तैसी ब्रीद साच ॥३॥
ब्रीद तें साच करावें आपुलें । म्हणोनियां खेळे गोपाळांत ॥४॥
एका जनार्दनीं खेळतो कन्हया । ब्रह्मादिकां माया न कळेची ॥५॥
३१०
तिहीं त्रिभुवनीं सत्ता जयाची । तो गोपाळाचि उच्छिष्टे खाय ॥१॥
खाउनी उच्छिष्ट तृप्तमय होय । यज्ञाकडे न पाहे वांकुडे तोंडे ॥२॥
ऐसा तो लाघव गोपाळांसी दावी । एका जनार्दनीं काहीं काळों नेदी ॥३॥
३११
न कळे लाघव तया मागें धांवे । तयांचे ऐकावे वचन देवें ॥१॥
देव तो अंकित भक्तजनांचा सदोदित साचा मागें धावें ॥२॥
गोपाळ आवडीं म्हणती कान्हया । बैसे याची छाया सुखरुप ॥३॥
सुखरुप बैसे वैकुंठींचा राव । भक्तांचा मनोभाव जणोनियां ॥४॥
जाणोनियां भाव पुरवी वासना । एका जनार्दनी शरण जाऊं ॥५॥
३१२
भक्तांचा पुरवी लळा । तो सांवळा श्रीकृष्ण ॥१॥
उचलिला पर्वतगिरी । नाथिला काळ्या यमुनेतीरीं ॥२॥
अगबग केशिया असुर । मारिला तो कंसासुर ॥३॥
उग्रसेन मथुरापाळ । द्वारका वसविलीं सकळ ॥४॥
द्वारकेमाजीं आनंदघन । शरण एका जनार्दनी ॥५॥
३१३
कमळगभींचा पुतळा । पाहतां दिसे पूर्ण कळा । शशी लोपलासे निराळा । रुपवासही ॥१॥
वेधक वेधक नंदनंदनु । लाविला अंगीं चंदनु । पुराणपुरुष पंचाननु । सांवळां कृष्ण ॥२॥
उभे पुढे अक्रुर उद्धव । मिळाले सर्व भक्तराव । पाहाती मुखकमळभाव । नाठवे द्वैत ॥३॥
रुप साजिरें गोजिरें । दृष्टि पाहतां मन न पुरे । एका जनार्दनीं झुरे । चित्त तेथे सर्वदा ॥४॥
३१४
द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरीं ॥१॥
कैशी बरवेपणाची शोभा । पाहतां नयनां निघती जिभा ॥२॥
घरोघरीं आनंद सदा । रामकृष्न वाचे गोविंदा ॥३॥
ऐशी द्वारकेपरी । एका शरण श्रीहरी ॥४॥
३१५
जगांचे जीवन भक्तांचे मोहन । सगुण निर्गुण ठाण शोभतसे ॥१॥
तें रुप गोकुळीं नंदाचिये घरीं । यशोदे मांडिवरी खेळतसे ॥२॥
इंद्रादी शंकर ध्यान धरती ज्यांचें । तो लोणी चोरी गौळ्यांचे घरोघरीं ॥३॥
सर्वावरी चाले जयाची ते सत्ता । त्यांची बागुल आला म्हणतां उगा राहे ॥४॥
एकाचि पदें बळीं पाताळी घातला । तो उखळीं बांधिला यशोदेनें ॥५॥
जयाचेनी तृप्त त्रिभुवन सगळे । तो लोणीयाचे गोळे मागुन खाय ॥६॥
एका जनार्दनी भरुनी उरला । तो असें संचला विटेवरी ॥७॥
३१६
खेळसी तुं लीळा । तुझी अनुपम्य काळा ।१॥
बारवा बरवा श्रीमुकुंद । गाई गोपाळी लावला वेध ॥२॥
खेळसी बाळपनीं । बांधीताती तुज गौळणी ॥३॥
ऐसा नाटकी हरी । उभा ठेला विटेवरीं ॥४॥
विटे उभा समचरणीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥
३१७
अर्जुनाचे रथीं श्रमला जगजेठी । म्हणोनि कर ठेउनी कंटीं उभा येथें ॥१॥
धरुनी गोवर्धन उभा सप्तदीन । म्हणोनि कर जघन ठेउनी उभा ॥२॥
कंसादी मल्ल मारी जरासंध । ते चरणरविंद उभे विटे ॥३॥
धर्माघरीं उच्छिष्टपात्र काढी करें । म्हणोनि श्रमें निर्धारें ठेविले कटीं कर ॥४॥
पुंडलीक भक्त देखोअनि तल्लीन जाला । एका जनार्दनीं ठेविला कटाई कर ॥५॥
३१८
द्वारकेचा सोहळा । परणियत्नी भीमकबाळा ॥१॥
सोळा सहस्त्र युवती । अष्टनायका असती ॥२॥
पुर पौत्र अपार । भगवती तो विस्तार ॥३॥
करुनिया राधामीस । देव येती पंढरीस ॥४॥
रुक्मिनी रुसली । ती दिंडिर वनां आली ॥५॥
तया मागें मोक्षदानीं । येतां जाला दिंडीर वनीं ॥६॥
गाई गोपाळांचा मेळ । गोपाळपुरी तो ठिविला ॥७॥
आपण गोपवेष धरी । एका जनार्दनीं श्रीहरीं ॥८॥
३१९
जेथें वाजविला वेणु शुद्ध । म्हणोनि म्हणती वेणुनाद ॥१॥
सकळीक देव आले । ते भोंवती राहिले ॥२॥
जोडिलें जेथे समपद । तया म्हणती विष्णूपद ॥३॥
भोवंतालीं पदें उमटली । तेथे गोपाळ नाचती ॥४॥
जेथें उभे गाईचें भार । ते अद्यापि दिसत खुर ॥५॥
गोपाळांची पदें समग्र । ठाई शोभते सर्वत्र ॥६॥
एका जर्नादनीं हरी शोभले । कार कटावरी ठेऊनि भले ॥७॥
३२०
पूर्वापार परंपरा । संत सोयरा वानिती ॥१॥
सांगे कृष्ण उद्धावासी । सुखमिरासी पंढरी ॥२॥
स्वयें नांदे सहपरिवार । करीत गजर भक्तिचा ॥३॥
संत सनकादिक येती । भावें वंदिती श्रीचरण ॥४॥
एका जनार्दनीं वेधलें मन । नुठें बैसलें तें तेथुन ॥५॥
३२१
द्वारका समुद्रांत बुडविली । परी पंढरी रक्षिली अद्यापि ॥१॥
द्वारकेहुनि बहुत सुख । पंढ रीये अधिक एक आहे ॥२॥
भीमातीरीं दिंगबर । करुणाकर विठ्ठल ॥३॥
भक्तांसाठीं निरंतर । एका जनार्दनी कटीं धरिले कर ॥४॥
३२२
जो हा उद्धार प्रसवे ॐ कार । तें रुप सुंदर विटेवरी ॥१॥
ध्याता ध्यान ध्येय जेथें पैं खुटलें । तें प्रगटलें पंढरीयें ॥२॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान प्रेमाचें आथिलें । तें रुप सानुलें पंढरीये ॥३॥
एका जनार्दनीं रुपांचे रुपस । वैकुंठनिवास पंढरीये ॥४॥
३२३
जाश्वनीळ सदा ध्याये ध्यानीं मनीं । बैसोनी स्मशानीं निवांतपणें ॥१॥
तें हें उघडें रुप विठ्ठ्ल साचार । निगमांचे माहेर पंढरी हें ॥२॥
न बुडे कल्पांती आहे तें संचलें । म्हणोनि म्हणती भए भूवैकुंठ ॥३॥
एका जनार्दनी कल्पाचें निर्धारी । निर्विकल्प पंढरी उरतसे ॥४॥
३२४
रमा रमेश मस्तकी हर । पुढे तीर चंद्रभागा ॥१॥
मध्यभागीं पुंडलीक । सुख अलोलिक न वर्णवे ॥२॥
बहुता वैष्णवांचा मेळ । गदरोल नामाचा ॥३॥
वामभागीं रुक्मिनी राही । जनार्दन तेथें पाहीं ॥४॥
३२५
धन्य पृथ्वी दक्षिन भाग । जेथें उभा पांडुरंग ।मधे शोभे पुंडलीकक लिंग । सन्मुख चांग भीमरथी ॥१॥
काय वानुं तो महिमा । दृष्टी पाहतांचि भीमा । पैलथडी परमात्मा । शिवास जो अगम्य ॥२॥
दोन्ही कर धरुनि जघनीं । वाट पाहे चक्रपाणी । एका शरण जनार्दनीं । भक्तांसाठीं घाबरा ॥३॥
३२६
सारांचे सार गुह्मांचें निजगुह्मा । तें हें उभें आहे पंढरेये ॥१॥
चहुं वांचापरतें वेदां जें आरुतें । ते उभे आहे सरतें पंढरीये ॥२॥
शास्त्रांचें निज सार निगमां न कळे पार । तोचि हा परात्पर पंढरीये ॥३॥
एका जनार्दनी भरुनि उरला । तोचि हा देखिला पंढरीये ॥४॥
३२७
गाई गोपांसमवेत गोकुळिंहुन आला । पाहुनि भक्तिं भुलला वैष्णवाला ॥१॥
मुगुटमनी धन्य पंडलिक नेका । तयालागीं देखा उभा गे माय ॥२॥
युगें अठ्ठावीस जालीं परी न बैसे खालीं । मर्यादा धरली प्रेमाची गे माय ॥३॥
ऐसा व्यापक जगाचा जीवन । एका जनार्दनीं शरण गे माय ॥४॥
३२८
त्वंपद तत्पद असिपद यांवेगळा दिसे । खोल बुंथी घेऊनी विटेवरी उभा असे गे माय ॥१॥
वेडावला पुंडलिके उभा केला । तेथोनी कोठें न जाय गे माय ॥२॥
भक्तां अभयकर देतुसे अवलीळ । मेळवोनी मेळा वैष्णवांचा गे माय ॥३॥
पुंडलिकें मोहिला उभ उघाडचि केला । एका जनार्दनी ठसावला रुपेंविण गे माय ॥४॥
३२९
जयाकारणें श्रमलें भांडती । वेदादिकां न कळे मती । वोळला सगुण मूर्ती । पुंडलिकाकारणें ॥१॥
धन्य धन्य पावन देखे । पुण्यभूमि पावन सुरेख । तया गातां होतसे हर्ष । प्रेमानंदे डुल्लती ॥२॥
एका जनार्दनीं शरण । पाहतां पाहतां वेधलें मन । मोक्ष मुक्ति कर जोडून । उभे तिष्ठती सर्वद ॥३॥
३३०
उदंड भक्त भाग्यवंत देखिले । परी निधान दाविलें पुंडलिकें ॥१॥
धन्य धन्य केला जगाचा उद्धार । नाहीं लहानथोर निवडिले ॥२॥
एका जनार्दनीं दावियेला तारु । सुखाचा सागरु विठ्ठल देव ॥३॥
३३१
पुंडलिकापुढें सर्वेश्वर । उभा कटीं ठेउनी कर ॥१॥
ऐसा पुंडलिकापुढें हरी । तो पुजावा षोडशोपचारी ॥२॥
संभोवता वेढा संतांचा । आनंद होतो हरिदासांचा ॥३॥
एका जनार्दनीं देव । उभा विटेवरी स्वयमेव ॥४॥
३३२
पंढरीचें सुख पुंडलीक जाणें । येर सोय नेणें तेथील पैं ॥१॥
उत्तम हें स्थळ तीर्थ चंद्रभागा । स्नानें पावन जगा करितसे ॥२॥
मध्यभागीं शोभे पुंडलीक मुनीं । पैल ते जघनी कटीं कर ॥३॥
एका जनार्दनी विठ्ठल बाळरुप दरुशनें ताप हरे जगा ॥४॥
३३३
पूर्वापार श्रीविठ्ठलमूर्ति । ऐसे वेद पै गर्जती ॥१॥
भक्त पुंडलीका निकट । वसतें केलें वाळुवंट ॥२॥
गाई गोपाळांचा मेळ । आनंदे क्रीडे तो गोपाळ ॥३॥
ऐसा स्थिरावला हरी का जनार्दनी निर्धारीं ॥४॥
३३४
वैकुंठीचे वैभव पंढरीसी आलें । भक्तें सांठविलें पुंडलिकें ॥१॥
बहुतांसी लाभ देतां घेतांजाहला । विसावा वोळला पाडुरंग ॥२॥
योग याग साधने करिती जयालागीं । तो उभाचि भक्तालागीं तिष्ठतसे ॥३॥
हीन दीन पापी होतुका भलते याती । पाहतां विठ्ठलमूर्ती मुक्त होती ॥४॥
एका जनार्दनीं सुखाचे माहेर । बरवें भीमातीर उत्तम तें ॥५॥
३३५
तीन अक्षरी जप पंढरी म्हणे वाचा । कोआटी या जन्मांचा शीण जाय ॥१॥
युगायुगीं महात्म्य व्यासें कथियेलें । कलियुगें केलें सोपें पुंडलिकें ॥२॥
महा पापराशी त्यांची होय होळी । विठ्ठलनामें टाळी वाजवितां ॥३॥
एका जनार्दनीं घेतां पैं दर्शन । जद जीवा उद्धरण कलियुगीं ॥४॥
३३६
अनुपम्य सप्तपुर्‍याअ त्या असती । अनुपम्य त्या वरती पंढरीये ॥१॥
अनुपम्य तीर्थ सागरादि असती । अनुपम्य सरती पंढरीये ॥२॥
अनुपम्य देव उदंडे असती । अनुपम्य विठलमूर्ति पंढरीये ॥३॥
अनुपम्य संत वैष्णवांचा मेळ । अनुपम्य गदारोळ पंढरीये ॥४॥
अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य चिंतनीं डुल्लतसे ॥५॥
३३७
अनुपम्य क्षेत्र अनुपम्य देव । नसे तोचि ठाव पंढरीये ॥१॥
अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । अनुपम्य भंगा दोष जाती ॥२॥
अनुपम्य होय पुंडलिक भेटी । अनुपम्य कोटी सुखलाभ ॥३॥
अनुपम्य संत नामाचा गजर । अनुपम्य उद्धार जडजीवां ॥४॥
अनुपम्य शोभा विठ्ठलचरणीं । एक जनार्दनीं गात गीतीं ॥५॥
३३८
अनुपम्य वाचे वदतां पंढरी । होतसे बोहरे महात्पापा ॥१॥
अनुपम्य ज्याचा विठ्ठली जो भाव । अनुपम्य देव तिष्ठे घरीं ॥२॥
अनुपम्य सदा कीर्तनाची जोडी । अनुपम्य गोडी मनीं ज्यांच्या ॥३॥
अनुपम्य संग संतांचा विसांवा । अनुपम्य भावा पालट नाहीं ॥४॥
अनुपम्य शरण एका जनार्दनीं । कायावाचामनीं छंद यासी ॥५॥
३३९
अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य ॥१॥
अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान । अनुपम्य दान नाम वाचे ॥२॥
अनुपम्य घडे क्षेत्र प्रदक्षिणा । अनुपम्य जाणा नारीनर ॥३॥
अनुपम्य सोहळा नित्य दिवाळी । अनुपम्य वोवाळी विठोबासी ॥४॥
अनुपम्य शरण एका जनार्दनीं । अनुपम्य ध्यानीं एक नाम ॥५॥
३४०
अनुपम्य नारीनर ते दैवाचे । अनुपम्य त्यांचे पुण्य देखा ॥१॥
अनुपम्य वास जयांसी पंढरी । प्रत्यक्ष वैकुंठपुरी अनुपम्य ॥२॥
अनुपम्य पहाती विठलरायातें । दरुशनें पावती मुक्तीने अनुपम्य ॥३॥
अनुपम्य भक्त नंदिती दैवाचे । अनुपम्य त्यांचे सुख देखा ॥४॥
अनुपम्य एका जनार्दनीं चरणीं । अनुपम्य विनवणी करितसे ॥५॥
३४१
अनुपम्य उपासना । अनुपम्य चरणी संताचिये ॥१॥
अनुपम्य भक्ति गोड । अनुपम्य लिगाड तुटत ॥२॥
अनुपम्य पंढरीचा वास । अनुपम्य दैवास दैव त्यांचे ॥३॥
अनुपम्य नाचती वैष्णव । अनुपम्य गौरव तयांचे ॥४॥
अनुपम्य एका जनार्दनीं । अनुपम्य चरणीं संताचिये ॥५॥
३४२
अनुपम्य उदार नाम । अनुपम्य सकाम संत तें ॥१॥
अनुपम्य पंढरीसी जाती । अनुपम्य नाचती वाळुवंटी ॥२॥
अनुपम्य टाळ घोळ अनुपम्य रसाळ वाद्यें वाजती ॥३॥
अनुपम्य संतमेळ । अनुपम्य प्रेमळ नाम घेती ॥४॥
अनुपम्य एका जनार्दनी । अनुपम्य आयणी चुकले ॥५॥
३४३
अनुपम्य पुराणं सांगर्ती सर्वथा । अनुपम्य तत्त्वतां पंढरीये ॥१॥
अनुपम्य योग अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरीये ॥२॥
अनुपम्य ध्यान । अनुपम्य धारणा । अनुपम्य पंढरीराणा विटेवरी ॥३॥
अनुपम्य क्षेत्र तीर्थ तें पवित्र । अनुपम्य गोत्र उद्धरती ॥४॥
अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य भुवनीं नांदतसे ॥५॥
३४४
उपदेश अनुपम्य खुण । विटे समचरण शोभले ॥१॥
अनुपम्य सदैव भाग्य ज्यांचें । अनुपम्य वाचे नाम गाती ॥२॥
अनुपम्य जातीं पंढरीये । अनुपम्य वस्ती होय पंढरीये ॥३॥
अनुपम्य ते भाग्याचे । विठ्ठल वाचे आळविती ॥४॥
अनुपम्य एका जनार्दनीं । अनुपम्य वदनी गाती नाम ॥५॥
३४५
अनुपम्य ज्ञान अनुपम्य मतें । अनुपम्य सरतें पंढरीयें ॥१॥
अनुपम्य वेद अनुपम्य शास्त्र । अनुपम्य पवित्र पंढरीये ॥२॥
अनुपम्य भक्ति अनुपम्य मुक्ति । अनुपम्य वेदोक्ती पंढरीये ॥३॥
अनुपम्य कळा अनुपम्य सोहळा । अनुपम्य जिव्हाळा पंढरीये ॥४॥
अनुपम्य दया अनुपम्य शांती । अनुपम्य विरक्ति एका जनार्दनीं ॥५॥
३४६
आनुपम्य भाग्य नांदतें पंढरी । विठ्ठल निर्धारीं उभ जेथें ॥१॥
अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । दोषा जातीं भंगा नाम घेतां ॥२॥
अनुपम्य मध्यें पुंडलीके मुनी । अनुपम्य चरणीं मिठी त्याच्या ॥३॥
संत शोभती दोही बाहीं । अनुपम्य देहीं सुख वाटे ॥४॥
अनुपम्य एका जनार्दनीं ठाव । अनुपम्य पंढरीराव विटेवरी ॥५॥
३४७
अनुपम्य घनदाट । करिती बोभाट अनुपम्य ॥१॥
पंढरीसी जाती अनुपम्य । धन्य जन्म अनुपम्य त्यांचा ॥२॥
अनुपम्य त्यांच्या पुण्या नाहीं पार । अनुपम्य निर्धार सुख त्यांसी ॥३॥
अनुपम्य दशा आली त्यांच्या दैवा । अनुपम्या देवा चुकले ते ॥४॥
अनुपम्य शरण एका जनार्दनीं । पंढरीं सांडोनि नेम नाहीं ॥५॥
३४८
पंचक्रोशीचें आंत । पावन तीर्थ हें समस्त ॥१॥
धन्य पंढरीचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥२॥
तीर्थ क्षेत्र देव । ऐसा नाहीं कोठें ठव ॥३॥
नगर प्रदक्षिणा । शरण एका जनार्दना ॥४॥
३४९
इच्छिताती देव पंढरीचा वास । न मिळे सौरस तयां कांहीं ॥१॥
ऐसें श्रेष्ठ क्षेत्र उत्तमा उत्तम । याहुनी सुगम आहे कोठें ॥२॥
जनार्दनाचा एक म्हणतसे भावें । तीर्थ ते वंदावें पंढरी सदा ॥३॥
३५०
प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक ॥१॥
मुंडन ती काया निराहार राहणें । येथेम न मुंडणें काया कांहीं ॥२॥
म्हणोनी सर्व तीर्थामाजी उत्तम ठाव । एका जनार्दनीं जीव ठसावला ॥३॥
३५१
उदंड मंत्र उदंड तीर्थे । परी पवित्र निर्धार पंढरीये ॥१॥
उदंड महिमा उदंड वर्णिला । परी या विठ्ठलावांचुनी नाहीं ॥२॥
उदंड भक्त उदंड शिरोमणी । एका जनार्दनीं चरण उदंडची ॥३॥
३५२
बहुत तीर्थ क्षेत्रें बहुतापरी । न पावती सरी पंढरीची ॥१॥
वाहे दक्षिणभाग भीमा । पैल परमात्मा विटेवरी ॥२॥
मध्य स्थळीं पुडंलीक । दरुशनें देख उद्धार ॥३॥
वाहे तीर्थ चंद्रभागा । देखतां भंग पातकां ॥४॥
एका जनार्दनीं सार । क्षराक्षर पंढरी हे ॥५॥
३५३
उदंड तीर्थें क्षेत्रें पाहातां दिठीं । नाहीं सृष्टी तारक ॥१॥
स्नानें पावती मुक्ति जगा । ऐशी चंद्रभागा समर्थ ॥२॥
पुडलिका नमस्कार । सकळ पूर्वजां उद्धार ॥३॥
पाहतां राउळाची ध्वजा । मुक्ती सहजा राबती ॥४॥
एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । मग लाभा नये तुटी ॥५॥
३५४
उदंड तीर्थ महिमा वर्णिला । परी नाहीं भेटला पांडुरंग ॥१॥
पंढरींसारखे तीर्थ महीवरी । न देखों चराचरीं त्रैलोक्यांत ॥२॥
ऐसा नामघोष संतांचा मेळ । ऐस भक्त्कल्लोळ नाहीं कोठें ॥३॥
एका जनार्दनीं अनाथा कारण । पढरीं निर्माण भूवैकुंठ ॥४॥
३५५
प्रभासादि क्षेत्रें सप्तपुर्‍या असती । परी सरी न पावती पंढरीची ॥१॥
दरुशनें चित्त निवे पाहतां बरवें । शंख चक्र मिरवे चहुं करीं ॥२॥
पीतांबर परिधान वैजयंती माळा । शोभे सोनसळा अंगावरी ॥३॥
एका जनार्दनीं पाहतां रुपडें । उभें तें उघडें विटेवरी ॥४॥
३५६
उदंड क्षेत्राची पाहिली रचना । पंढरी ते जाणा भुवैकुंठ ॥१॥
तीर्थ आणि देव संतसमागम । ऐसें सर्वोत्तम कोठें नाहीं ॥२॥
सागरादि तीर्थ पाहतां पाहिलें । परी मन हें वेधलें पंढरीये ॥३॥
एका जनार्दनीं सुखाची विश्रांती । पाहतां विठ्ठलमुर्ति लाभ बहु ॥४॥
३५७
उदंड तीर्थे उदंड क्षेत्रें । परि पवित्र पंढरी ॥१॥
उदंड देव उदंड दैवतें । परि कृपांवतं विठ्ठल ॥२॥
उदंड भक्त उदंड संत । परी कृपावंत पुडलीक ॥३॥
उदंड गातो एक एका । परी एका जनार्दनीं सखा ॥४॥
३५८
जें जें क्षेत्र जें जें स्थळीं । तें तें बळी आपुलें ठायीं ।१॥
परे ऐसें माहात्म्य नाहीं कोठें । जें प्रत्यक्ष भेटे हरिहर ॥२॥
ऐत संतसामगाम । ऐसा निरुपम नाममाहिमा ॥३॥
दिंडी टके मृदंग नाद । नाहींभेद यातीसी ॥४॥
एका जनार्दनीं निजसार । पंढरी माहेर भुलोकीं ॥५॥
३५९
बहु क्षेत्रें बहु तीर्थ । बहु दैवतें असतीं ॥१॥
परी नये पंढरीराम । वाउगा श्रम होय अंतीं ॥२॥
देव भक्त आणि नाम । ऐसें उत्तम नाहीं कोठें ॥३॥
एका जनर्दनी तिहींचा मेळ । पाहतां भूमंडळ पंढरीये ॥४॥
३६०
गंगा सागरादि तीर्थे भूमीवरी । परि पंढारीची सरी न पवती ॥१॥
श्रेष्ठांमांजी श्रेष्ठ तीर्थ पं समर्थ । दरुशनें मनोरथ पूर्ण होती ॥२॥
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक । ऐसे वैष्णव देखे नाही कोठें ॥३॥
गाताती वैष्णव आनंदें नाचती । सदोदित कीर्ति विठ्ठलाची ॥४॥
एका जनार्दनीं पंढरीचा हाट । भूवैकुंठ पेठ पंढरी देखा ॥५॥
३६१
प्रयागादि तीर्थे आहेत समर्थ । परी पुरती मनोरथ पंढरीये ॥१॥
बहुत ते साक्ष देती या स्थळासी । सदा तो मनासी शिव ध्याये ॥२॥
आनंद सोहळा त्रैलोक्य अगाध । पंढरीये भेदाभेद नाहींसत्य ॥३॥
एका जनार्दनी क्षेत्रवासी जन । देवा ते समान सत्य होती ॥४॥
३६२
समुद्रवलयांकित पृथ्वी पाहतां । ऐसें तीर्थ सर्वथा नाहीं कोठें ॥१॥
भाविकांचें माहेर जाणा पंढरपुर । विठ्ठल विटेवर उभा असे ॥२॥
एका जनार्दनीम तयाचाचि ठसा । भरुनि आकाशा उरलासे ॥३॥
३६३
उत्तम तें क्षेत्र उत्तम तें स्थळ । धन्य ते राऊळ पाहतां डोळां ॥१॥
एक एक तीर्थ घडती कॊटी वेळां । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥२॥
गंगा प्रदक्षिणा समुद्राचे स्नान । परी हें महिमान नाहीं कोठें ॥३॥
वैष्णवांचा मेळ करिती गदारोळ । दिंडी पताका घोळ नोहे कोठें ॥४॥
एका जनार्दानी सारांचे हें सार । पंढरी मोहरे भाविकांसी ॥५॥
३६४
देव भक्त दोन्हीं तीर्थ क्षेत्र नाम । ऐसा एक संभ्रम कोठें नाहीं ॥१॥
प्रयागादी तीर्थ पहाती पाहतां । न बैसे तत्त्वतां मन माझें ॥२॥
पंढरीची ऐसा आहे समागम । म्हणोनि भवभ्रम हरलासे ॥३॥
एका जनार्दनीं पाहतां विठ्ठल देव । फिटला तो भेव संसाराचा ॥४॥
३६५
सकळीक तीर्थे पाहतां डोळा । निवांत नोहे हृदयकमळा ॥१॥
पाहतां तीर्थे चंद्रभागा । सकळ दोष गेले । भंगा ॥२॥
पाहती विठ्ठल सांवळा । परब्राह्मा डोळां देखियेलें ॥३॥
एका जनार्दनीं पाहोनी ध्यान । भुललें मन त्या ठायीं ॥४॥
३६६
पावन क्षेत्र पंढरपुर । पावन तीर चंद्रभागा ॥१॥
पावन संत पुडलीक । पावन देख श्री विठ्ठल ॥२॥
पावन देह गेलीया तेथें । होती जीवनमुक्त सर्व जीव ॥३॥
एका जनार्दानीं पावन । पावन पंढरी अधिष्ठिन ॥४॥
३६७
अवघें आनंदाचें । क्षेत्रं विठ्ठल देवांचे ॥१॥
अवघें हे पावन । तीर्थ चंद्रभागा स्नान ॥२॥
अवघे संतजन । पुंडलिकासी वंदन ॥३॥
अवघा विठ्ठल देव । एका जनार्दनीं भाव ॥४॥
३६८
अवघें परब्रह्मा क्षेत्र ।अवघें तेथें तें पवित्र ॥१॥
अवघा पर्वकाळ । अवघे दैवाचे सकळ ॥२॥
अवघीयां दुःख नाहीं । अवघे सुखाचि तया ठायीं ॥३॥
अवघे आनंदभरित । एका जनार्दनीं सदोदित ॥४॥
३६९
अवघें क्षेत्र पंढरी । अवघा आनंद घरोघरीं ॥१॥
अवघा विठ्ठलचि देव । अवघा अवघिया एक भाव ॥२॥
अवघे समदृष्टी पहाती । अवघे विठ्ठलाचि गाती ॥३॥
अवघे ते दैवाचे । एका जनार्दनीं साचे ॥४॥
३७०
नाभीकमळी जन्मला ब्रह्मा । तया न कळे महिमा ॥१॥
पंढरी क्षेत्र हें जुनाट । भुवैकुंठ साजिरीं ॥२॥
भाळे भोळे येती आधीं । तुटती उपाधी तयांची ॥३॥
एकपणें रिगतां शरणा । एक जनर्दनीं तुटे बंधन ॥४॥
३७१
बहुता काळाचें हें क्षेत्र । सकळ देवांचें माहेर । सकळ संतांचे निजमंदिर । तें हें पंढरपुर जाणावें ॥१॥
धन्य पंढरीचा महिमा । नाहीं आणीक उपमा । जेथें वास पुरुषोत्तमा । रुक्मिणीसहित सर्वदा ॥२॥
धन्य भक्त पुंडलीक । सकळ संताचा नायक । एका जनार्दनीं देख । श्रीविठ्ठल आवडी ॥३॥
३७२
महाक्षेत्र पंढरपुर । नांदे विठ्ठ्ल सचार ॥१॥
तया ठायीं सुख आहे ।संत जाणती तो लाहें ॥२॥
विश्रांतीचें स्थान । भावाभाव समान ॥३॥
दुःख दरिद्र नाहीं । वाचे म्हणतां विठाबाई ॥४॥
नोहे बाधा काळाची । ऐसी मर्यादा संताची ॥५॥
जनार्दनाचा एक म्हणे । घ्यावें पेणें तेथींचें ॥६॥
३७३
ऐसें पंढरीचें स्थान । याहुनी आणिक आहे कोण ॥१॥
विष्णसहित कर्पूरगौर । जेथे उभे निरंतर ॥२॥
पुढें भीवरा शोभती । पुंडलिकांची वसती ॥३॥
ऐसें सांडोनी उत्तम स्थळ । कोठें वास करुं निर्मळ ॥४॥
म्हणे जनार्दनाचा एका । प्रेमळ संत नांदती देखा ॥५॥
३७४
ऐसे विश्रांतींचे स्थान । आणिके ठायीं नाहीं जाण ॥१॥
तें हें जाणा पंढरपुर । मुक्त मुमुक्षुचें माहेर ॥२॥
जगीं ऐसें स्थळ । नाहीं नाहीं हो निर्मळ ॥३॥
एका जनार्दनीं निकें । भूवैकुंठं नेटकें ॥४॥
३७५
वेदाभ्यासं श्रमलें । पुराण वक्ते ते भागले ॥१॥
तया विश्रांतीस स्थान । अधिष्ठान पंढरी ॥२॥
शास्त्राभ्यास नेहटीं । वादावाद दाटोदाटीं ॥३॥
एका जनार्दनीं शरण । पंढरी स्थान ऐशिया ॥४॥
३७६
ज्या सुखा कारणें योगाभ्यास । शरीर दंड काय क्लेश । तें उभें आहे अपैस । भीमातीरीं वाळुवंटीं ॥१॥
न लगे दंडन मुंडनी आटी । योगायागाची कसवटी । मोकळी राहाटी । कुंथाकुंठी नाहीं येथें ॥२॥
न लगे अष्टांग धूम्रपान । वायु आहार पांचग्र्नि साधन । नग्न मौन एकांत स्थान । आटाआटी न करणे ॥३॥
धरुनियां संतसंग । पाहें पाहे पांडुरंग देईन । सुख अव्यंग । एका जनार्दनीं निर्धारें ॥४॥
३७७
जप तपें तपता कोटीं । होती हिंपुटी भाग्यहीन ॥१॥
तया विश्रांतीसी स्थान । पंढरी जाण भुमंडली ॥२॥
योगयाग धूम्रपान करिती । नोहे प्राप्ति तयासी ॥३॥
तो उभा कटीं कर ठेवुनी । समचरणीं विटेवरी ॥४॥
एका जनार्दनीं पाहातां । दिठीं कंदर्प कोटी वोवाळिजे ॥५॥
३७८
दुस्तर मार्ग आटाआटी । पंढरी सृष्ती तारक ॥१॥
कोणा न लगे दंडन । कायापीडन कष्ट ते ॥२॥
नको उपवास विधीचा पडदा । शुद्ध अशुद्धा न पहावें ॥३॥
मुगुटमणीं पुंडलीक । दरुशनें पातक हरतसे ॥४॥
एका जनर्दनीं निर्मळ । पंढरी स्थळ सर्वांसी ॥५॥
३७९
जें देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण ॥१॥
या ब्रह्माडांमाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ॥२॥
एक एक पाऊल तत्त्वतां । घडे अश्वमेध पुण्यता ॥३॥
एका जनार्दनीं ठसा । विठ्ठल उभाची सरसा ॥४॥
३८०
उभा देव उभा देव । निरसी भेव भविकांचे ॥१॥
न लगे कांही खटाटेप । पेठ सोपी पंढरी ॥२॥
नको नको वेदपाठ । सोपी वाट पंढरी ॥३॥
शास्त्रांची तो भरोवरी । सांडी दुरी पंढरीचे ॥४॥
योगयाग तीर्थ तप । उघडती अमुप पंढरीये ॥५॥
एका जनार्दनीं स्वयं ब्रह्मा । नांदे निष्काम पंढरीये ॥६॥
३८१
बहु मार्ग बहुतापरी । परी न पावती सरी पंढरीची ॥१॥
ज्या ज्या मार्गे जातां वाता । कर्म कर्मथा लागती ॥२॥
जेथें नाहीं कार्माकार्मा । सोपें वर्म पंढरीये ॥३॥
न लगे उपास तीर्थविधी । सर्व सिद्धि चंद्रभागा ॥४॥
म्हणोनि पंढरीसी जावें । जीवेभावें एका जनार्दनी ॥५॥
३८२
व्यास वाल्मिक नारद मुनी । नित्य चिंतित चिंतनी । येती पंढरपुरभुवनीं । श्रीविठ्ठल दरुशना ॥१॥
मिळोनि सर्वांची मेळ । गाती नाचती कल्लोळ । विठ्ठल स्नेहाळ । तयालागीं पहाती ॥२॥
करिती भीवरेचें स्नान । पुंडलिका अभिवंदन । एका जनार्दनीं स्तवन । करिती विठ्ठलाचें ॥३॥
३८३
देखोनिया देवभक्त । सनकादिक आनंदात ॥१॥
म्हणती जावें पंढरपुरा । पाहूं दीनांचा सोयरा ॥२॥
आनंदें सनकादिक । पाहूं येती तेथें देख ॥३॥
विठ्ठलचरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
३८४
देव भक्त एके ठायी । संतमेळ तया गांवीं ॥१॥
तें हें जाणा पंढरपुर । देव उभा विटेवर ॥२॥
भक्त येती लोटांगणीं । देव पुरवी मनोरथ मनीं ॥३॥
धांवे सामोरा तयासी । आलिगुन क्षेम पुसीं ॥४॥
ऐशी आवडी मानी मोठी । एका जनार्दनीं घाली मिठी ॥५॥
३८५
उभारुनी ब्राह्मा पाहतसे वाट । पीतांबर नीट सांवरुनी ॥१॥
आलियासी इच्छा मिळतसे दान । जया जें कारण पाहिजे तें ॥२॥
भुक्ति मुक्ति तेथें लोळती अंगणीं । कोन तेथें मनीं वास नाहीं ॥३॥
कामधेनु कल्पतरु चिंतामणी । लोळती अंगणीं पढरीये ॥४॥
एका जनार्दनीं महा लाभ आहे । जो नित्य न्हाये चंद्रभागे ॥५॥
३८६
जो परात्पर परेपरता । आदि मध्य अंत नाहीं पाहतां ।
आगमानिगमां न कळे सर्वथा । तो पंढरीये उभा राहिला ॥१॥
धन्य धन्य पाडुरंग भोवतां शोभें संतसंग ।
धन्य भाग्याचे जे सभाग्य तेचि पंढरी पाहती ॥२॥
निरा भिवरापुढें वाहे । मध्य पुडंलीक उभा आहे ।
समदृष्टी चराचरी विठ्ठल पाहें । तेचि भाग्याचे नारीनर ॥३॥
नित्य दिवाळी दसरा । सदा आनंद पंढरपुरा ।
एका जनार्दनी निर्धार । धन्य भाग्याचे नारी नर ॥४॥
३८७
तयां ठायीं अभिमान नुरे । कोड अंतरीचें पुरे ॥१॥
तें हें जाणा पंढरपूर । उभ देव विटेवरी ॥२॥
आलिंगनें काया । होतासे तया ठाया ॥३॥
चंद्रभागे स्नान । तेणें पुर्वजा उद्धरणा ॥४॥
एका जनार्दनीं शरण । पंढरी भूवैकुंठ जाण ॥५॥
३८८
पंढरीये अन्नादान । तिळभरी घडती जाण ॥१॥
तेणें घडती अश्वमेध । पाताकापासोनि होती शुद्ध ॥२॥
अठरा वर्न यती । भेद नाही तेथें जाती ॥३॥
अवघे रंगले चिंतनीं । मुर्खी नाम गाती कीर्तनीं ॥४॥
शुद्ध अशुद्धची बाधा । एका जनार्दनीं नोहे कदा ॥५॥
३८९
वसती सदा पंढरीसी । नित्य नेमें हरी दरुशनासी । तयां सारखे पुण्यराशी । त्रिभुवनीं दुजे नाहीत ॥१॥
धन्य क्षेत्र भीवरातीर । पुढे पुंडलीक समोर । तेथें स्नान करती नर । तयां जन्म नाहीं सर्वथा ॥२॥
करती क्षेत्र प्रदक्षिणा । त्याच्यां पार नाहीं पुण्या । जगीं धन्य ते मान्य । एका जनार्दनीं म्हणतसे ॥३॥
३९०
पाहुनियां पंढरीपुर । मना आनंद अपार ॥१॥
करितां चंद्रभागें स्नान । मना होय समाधान ॥२॥
जातां पुंडलीकाचे भेटीं । न माय आनंद त्या पोटीं ॥३॥
पाहतां रखुमादेवीवर । मन होय हर्षनिर्भर ॥४॥
पाहा गोपाळपूर वेणूनाद । एका जनार्दनी परमानंद ॥५॥
३९१
नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठलदरुशन ॥१॥
त्याच्या पुण्या नोहे लेखा । पहा द्रुष्टी पुंडलिका ॥२॥
उजवें घेतां राऊळासी । जळती पातकांच्या रासी ॥३॥
संतांसवें कीर्तन करितां । आनंदे टाळी वाजवितां ॥४॥
मोक्ष जोडोनियां हात । तयाची वाट तो पहात ॥५॥
धन्य पंढरीचा संग । एक जनार्दनीं अभंग ॥६॥
३९२
भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्वतां कलीमाजीं ॥१॥
प्रातःकाळीं नमस्मरण जो गाय । तीर्थीं सदा न्हाये पुण्य जोडे ॥२॥
वदतां वाचें नाम घडतां एक स्नान । पुनरपि न आगमन मृत्यूलोकमें ॥३॥
एक जनार्दनीं भीमरथीं वदतां । प्रयागीं समता सरी न पवे ॥४॥
३९३
चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंधरीये ॥१॥
क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करितां जाय महत्पाप ॥२॥
सनकसनंदनसम पुंडलीक । शोभा आलोलिक वर्णु काय ॥३॥
लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही । एका जनार्दनीं पायीं लीन जाला ॥४॥
३९४
पुष्पावती चंद्रभागे । करितां स्नान भंगे दोष ॥१॥
पाहतां पुंडलीक नयनीं । चुके जन्म नये अयनीं ॥२॥
घेतां विठ्ठलदरुशन । होती पातकी पावन ॥३॥
करितां प्रदक्षिना । पुन्हा जन्म नाहीं जांणा ॥४॥
एका जनार्दनीं शरण । कळस पाहतां मुक्त जाण ॥५॥
३९५
अवलोकितां चंद्रभागा । सकळ दोष जाती भंगा ॥१॥
स्नान करितं भीवरेसी ॥ तरती पातकी अपैसी ॥२॥
दृष्टीं पाहतां विठठल देव न राहे काळाचें भेव ॥३॥
हरुषें वाहातां टाळीं । एका जनार्दनी मुक्त केलीं ॥४॥
३९६
दृष्टी पाहतां भीमातरी । स्वर्गीं वास तया निरतरां ॥१॥
ऐसा तेथीचा महिमा । आणिक नाहीं दुजी उपमा ॥२॥
दक्षिन द्वारका पंढरी । वसे भीवरेचे तीरीं ॥३॥
जेथें वसे वैकुंठ देवो । एका जनार्दनीं गेला भेवो ॥४॥
३९७
जयां आहे मुक्ति चाड । तयांसी गोड पंढरी ॥१॥
देव तीर्थ क्षेत्र संत । चहूंचा होत मेळा जेथ ॥२॥
कृष्णरामादि नामगजर । करिती उच्चार अट्टाहास्ये ॥३॥
स्त्रियाआदि नर बाळें । कौतुक लीळे नाचती ॥४॥
एका जनार्दनीं तयांसंगीं । विठ्ठलरंगी नाचतुसे ॥५॥
३९८
त्रिविधपातें तापलें भारी । तया पंढरी विश्रांती ॥१॥
आणिके सुख नाही कोठें । पाहतां नेटें कोटि जन्म ॥२॥
कालाचेहि न चले बळ । भुमंडळ पंडरीये ॥३॥
भुवैकुंठ पंढरी देखा । ऐसा लेखा वेदशास्त्री ॥४॥
एका जनार्दनी धरुनि कास । पंढरीचा दास वारकरी ॥५॥
३९९
तापत्रयें तापलीया पंढरीसी यावें । दरुशनें मुक्त व्हावें हेळामात्रें ॥१॥
दुःखाची विश्राती सुखाचा आनंद । पाहतां चिदानंद विठ्ठल देव ॥२॥
संसारीं तापलें त्रितापें आहाळले । विश्रांतीये आले पंढरीसी ॥३॥
सर्वांचे माहेर भाविकंचे घर । एका जनार्दनी निर्धान केला असे ॥४॥
४००
तिहीं त्रिभुवनीं पातकी पीडिले । ते मुक्त जाहले पंढरीसी ॥१॥
पाहतां सांवळा अवघीयां विश्रांती । दरुशनें शांतीं पातकीयां ॥२॥
एका जनार्दनीं पाहतां रुपडे । कैवल्य उघडे विटेवरी ॥३॥

हनुमान प्रासादिक भजन मंडल ( वासळई )

हनुमान प्रासादिक भजन मंडल ( वासळई )

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जग्दगुरुम्

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ||

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥
म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥

अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥

रुप पाहता लोचनी | सुख झाले हो साजणी ||
तो हा विठ्ठल बरवा | तो हा माधव बरवा ||
बहुत सुकृताची जोडी | म्हणुन विठ्ठले आवडी ||
सर्व सुखाचे आग | बाप रखुमादेविवर ||

सुंदरते ध्यान उभे विटोवरी | कर कटावरी ठेऊनीया ||
तुळशी हार गळा कासे पितांबर | आवडे नीरंतर हेचि ध्यान ||
मकर कुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणी विराजीत ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहिन श्रीमुख आवडीने ||

देवाचिये द्वारी उभाक्षण भरी | तेणे मुक्तिचारी साधियेल्या ||
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा | पुण्याची गणणा कोण करी ||
असोनि संसारी जीवे वेगु करी | वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ||
ज्ञानदेव म्हणे व्यासचीया खुणा | द्वारकेचा राणा पांडवा घरी ||

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था | अनाथाच्या नाथा, तुज नमो ||
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना | तोडी या बंधना मायामोहा ||
मोहोजाळ माझे कोण नीरशील | तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर | त्रैलोक्या आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश | ज्यापुढे उदास चंद्र-रवि
रवि, शशी, अग्नि, नेणती ज्या रूपा | स्वयंप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी, गुरू परब्रम्ह | तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥

शुद्धब्रम्ह परात्पर राम कालात्मक परमेश्वर राम |
शेषतल्प सुखनिद्रीत राम ब्रम्हद्यमर प्रार्थित राम |
चण्डकिरण कुलमण्डण राम श्रीमद् दशरथनंदन राम |
कौसल्यासुखवर्धन राम विश्वमित्रप्रियधन राम |

फिरवीले देऊळ जगा मधी ख्याती | नामदेवा हाती दुध प्याला ||
भरीयली हुंडी नरसीह मेहत्याची | धनाजी जाटाची शेते पेरी ||
मीराबाईसाठी घेतो विष प्याला | दामाजीचा झाला पडेवार ||
कबीराचे मागी विणुलागे शेले | ऊठविले मुल कुंभाराचे ||
आता तुम्ही दया करा पंढरी राया | तुका विनवी पाया वेळोवेळा ||

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा | मन माझे केशवा का बा न घे |
सांग पंढरीराया काय करु यांसी | का रूप ध्यानासी न ये तुझे ||
किर्तनी बैसता निद्रे नागविले | मन माझे गुंतले विषयसुखा ||
हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती | नये माझ्या चित्ती नामा म्हणे ||

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी, एकएका लागतील पायी रे॥
नाचती आनंद कल्लोळा पवित्र गाणे वनमाळी रे ।
कळी कामावरी घातली काम एक एकाहुनी बळी रे ॥
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे ॥
लुब्धली नादी लागली समाधी मुढजन नारी लोका रे ।
पंडीत ज्ञानी योगी महनुभव एकची सिद्ध साधका रे ॥
वर्ण अभिमान विसरली याती, एकेका लोटांगणी जाती रे।
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे ॥
होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे।
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे ॥

संत भार पंढरीत | किर्तनाचा गजर होत ||
तेथे असे देव ऊभा | जैसी समचरणांची शोभा ||
रंग भरे किर्तनात | प्रेमे हरीदास नाचत ||
सखा विरळा ज्ञानेश्वर | नामयाचा जो जिव्हार ||
ऐश्या संता शरण जावे | जनी म्हणे त्याला ध्यावे||

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ||
तुझ्या सारखा तूच देवा | तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिसी मानवा ||
वेडा होऊनी भक्तीसाठी | गोप गड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकीशी गोकुळी यादवा ||
वीर धनुर्धर पार्थासाठी | चक्र सुदर्शन घेऊनी हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा ||

ॐकार प्रधान रूप गणेशाचे | हे तीन्ही देवांचे जन्म स्थान ||
अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णु | मकार महेश जाणियेला ||
ऐसे तीन्ही देव देखोनी उत्पन्न | तो हा गजानन मायबाप ||
तुका म्हणे ऐसी आहे वेद वाणी | पहावी पुराणी व्यासाचिया ||

धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर
ह्रुदय बंदी खाना केला | आत विठ्ठल कोंडीला
शब्दे केली जडा जुडी | विठ्ठल पायी घातली बेडी
सोहं शब्दे मारा केला | विठ्ठल काकुळ्ती आला
जनी म्हणे बा विठ्ठला |जीव्हे न सोडी मी तुला

देवा तुझा मी सोनार | तुझ्या नामाचा व्यवहार ||
मन बुद्धीची कातरी | राम नामे सोने चोरी ||
नरहरी सोनार हरीचा दास | भजन करी रात्रंदिवसा||

एवढा मनीचा पुरवा हेतु | पंढरी नाथा भेट द्या हो ||
मग मी तुमच्या लागीन पाया | करीन काया कुरवंडी ||
निळा म्हणे दास झालो | विनंती तुम्हास करीन आता ||

कृपाळु हा पंढरीनाथ, वडिलांचे दैवत ||
पंढरीसी जाऊ चला, भेटु रखुमाई विठ्ठला ||
पुंडलीके बरवे केले, कैसे भक्तिने गोविले ||
एका जनार्दनी नीट, पायी जोडीले सेवेत ||

आता तरी पुढे हाच उपदेश | नका करू नाश आयुष्याचा ॥धृ॥
सकळाच्या पाया माझे दंडवत | आपुलाले चित्त शुद्ध करा ॥१॥
हित ते करावे देवाचे चिंतन | करुनिया मन शुद्ध भावे ॥२॥
तुका म्हणे हित होय ती व्यापार | करा काय फार शिकवावे॥३॥

तुझ्या कृपेने दिन उगवे हा | करुनी तव भजना ||
वंदितो तुजला गजवदना ||
सिंदुर वदना तुजला नमितो, तु अमुची प्रेरणा ||
सुखकार तू दु:ख हरोनिया, तारी प्रभु सकळा ||
विघ्नविनाशक म्हणती तुजला, तू आमची प्रेरणा ||
सर्व सुखाचा तू प्रभुदाता, विद्येच्या देवा ||
कर्पुगौरा गणनायक तू , गाऊनी तव भजना ||

अजि सोनियाचा दिनु ।
अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥
हरि पाहिला रे हरि पाहिला रे । सबाह्यभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥
दृढ विटे मन मुळी । विराजीत वनमाळी ॥३॥
बरवा संत समागमु ।प्रगटला आत्मारामु ॥४॥
कृपासिंधु करुणाकरु । बाप रखमादेविवरु ॥५॥

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू
अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥
चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥
तो सावळा सुंदरू कासे पितांबरू ।लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥
बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥

अधिक देखणें तरी निरंजन पाहणे
अधिक देखणें तरी निरंजन पाहणे | योगिराज विनवणें मना आलें वो माये ॥१॥
देह बळी देऊनी साधिलें म्यां साधनीं । तेणे समाधान मज जोडलें वो माये ॥२॥
अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें । सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥
चंदन जेवीं भरका अश्वत्थ फुलला । तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥
पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें । निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥
ऐसा ज्ञानसागरु रखुमादेविवरु । विठ्ठलीं निर्धारु म्यां देखिला वो माये ॥६॥

अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज ध्यान कळो आले ॥१॥
तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फिटला संदेह अन्यतत्वी ॥२॥
मुरडूनियां मन उपजलासी चित्तें । कोठें तुज रेतें न दिसे रया ॥३॥
दीपकीं दिपक मावळल्या ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥
वृत्तीची निवृत्ती आपणांसकट । अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥
निवृत्ति परमानुभव नेमा । शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

अगा करुणाकरा करितसे धांवा ।
अगा करुणाकरा करितसे धांवा ।या मज सोडवा लवकरी ॥१॥
ऐकोनियां माझी करुणेची वचने ।व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥
मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव ।ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥
उशीर तो आतां न पाहिजे केला ।अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥
उरलें तें एक हेंचि मज आतां ।अवघें विचारितां शून्य झालें ॥५॥
तुका म्हणे आतां करीं कृपा दान | पाउलें समान दावीं डोळा ॥६॥

हरिभजनाविण काळ घालवू नको रे
हरिभजनाविण काळ घालवू नको रे
दोरीच्या सापा भिवुनी भवा | भेटी नाही जिवा-शिवा
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे |1|
विवेकाची ठरेल ओल |ऐसे की बोलावे बोल
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे |2|
संत संगतीने उमज |आणुनि मनी पुरते समज
अनुभवावीण मान हालवू नको रे |3|
सोहिरा म्हणे ज्ञानज्योती | तेथ कैचि दिवस-राती
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे |4|

अगा करुणाकरा करितसे धांवा
अगा करुणाकरा करितसे धांवा । या मज सोडवा लवकरी ॥१॥
ऐकोनियां माझी करुणेची वचने । व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥
मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥
उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥
उरलें तें एक हेंचि मज आतां । अवघें विचारितां शून्य झालें ॥५॥
तुका म्हणे आतां करीं कृपा दान |पाउलें समान दावीं डोळा ॥६॥

अबीर गुलाल उधळीत रंग
अबीर गुलाल उधळीत रंग |
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा |मन माझे केशवा का बा न घे ॥धृ.॥
सांग पंढरीराया काय करू यांसी |का रूप ध्यानासी न ये तुझे ॥१॥
किर्तनी बैसता निद्रे नागविले |मन माझे गुंतले विषयसुखा ॥२॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती |नये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥३॥

अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।तुझें तुज ध्यान कळो आले ॥१॥
तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव ।फिटला संदेह अन्यतत्वी ॥२॥
मुरडूनियां मन उपजलासी चित्तें ।कोठें तुज रेतें न दिसे रया ॥३॥
दीपकीं दिपक मावळल्या ज्योती |घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥
वृत्तीची निवृत्ती आपणांसकट ।अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥
निवृत्ति परमानुभव नेमा ।शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

संत तुकडोजी महाराज

संत तुकडोजी महाराज

· अखिल विश्व मंदिर माझ्या आत्ममूर्तिचे । खेळ हे निसर्गे त्याच्या कार्य-पूर्तिचे ॥धृ॥ वाहती नदी-सागर हे, स्नान घालण्या तयासी । पृथ्वी हेच सिंहासन त्या चक्रवर्तिचे ॥माझ्या०॥१॥ वसंतबाग फुलला फलला, हार अर्पिण्या तयासी । सुंगधित चंदनकाष्ठे, गंध हे पुजे ॥माझ्या०॥२॥ पृथ्वी अन्न शिजले जे जे, भोग द्यावयास यासी । जळति द्रव्य-धातू सगळे, हवन होतसे ॥माझ्या०॥३॥ सूर्यचंद्र नंदादिप हे, जळति ज्योत द्यावयासी । पवन मंद वाहे सुखवी, हृदय हे तिचे ॥माझ्या०॥४॥ निर्विकल्प चिद्‍ आत्मा हा, भोगुनी अभोक्ता राही । दास सांगतो तुकड्या हे भाव स्फूर्तिचे ॥माझ्या०॥५॥

· अनुभव-योगी सद्गुरु माझा, एकांती बोले । स्वप्नसुखाला पाहुनि का रे ! ब्रिद खोबिशि अपुले ॥धृ॥ शोधि गड्यारे ! सत्य वस्तुला, हो सावध आता । मायावी हे त्रिगुण जाणुनि, नच जा या पंथा ॥१॥ चिन्मयरूपा पाहि स्वरूपा, कां भुलला बापा ! सहजासनि बैसुनी सोडवी, चौर्‍यांशी खेपा ॥२॥ चवथा देह शोधुनी पाही, नवलाचे नवल । अधो-ऊर्ध्व त्या शुन्य-महाशून्यात असे बाळ ॥३॥ नाद-बिंदु साधुनी, ध्वनीला अंतर्गत ठेवी । ध्यानी ध्याता साक्षी होशी, मग अमृत सेवी ॥४॥ नसे पाच मुद्रांची थोरी, अंत नसे रंगा । तुकड्यादास म्हणे स्वानंदी, पावे भव भंगा ॥५॥

· अवकळा अशी का आली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥धृ॥ किति धनिक तुझे कुल होते, तुज भानचि याचे नव्हते । ही विघ्ने कुठुनी आली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥१॥ तव गोत ऋषींनी भरले, क्षत्रिये द्वार रक्षीले । का अघटित चिंता व्याली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥२॥ अति कलावान तव स्नेही, ज्या पहातचि परके राही । भिक्षेची वेळ ही आली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥३॥ या एकचि कारण झाले, तव घरी ऎक्य ना उरले । घरभेदी दिवटी व्याली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥४॥ तुकड्याची भोळी वाणी, घेशिल का थोडी कानी ? । तू दुजा भीक ना घाली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥५॥

· अवचित हा संत-संग, लाभल अम्हा ॥धृ॥ पावन हा देह होय, क्षणभरि जरि बोध लाहे । उघडुनि घे कर्ण जरा, सोडुनी भ्रमा ॥१॥ दूर प्रभू राहतसे, पाप-पुण्य पाहतसे । कर्म-फळा देत तसे, करुनिया जमा ॥२॥ चुकविति हे कर्मबंध, लावुनिया कृष्ण छंद । दुर्दैवहि होत मंद, दाविती सिमा ॥३॥ तुकड्याची मात ऎक, घे गुरुचे बोध-सौख्य । तोडी भव-क्लेश दुःख, पुण्य-पथ क्रमा ॥४॥

· अशुध्द शेतीवरी पिकेना सुंदर फल रे गड्या ! । शुध्द कर मृतिका नरबापुड्या ! ॥धृ॥ वर-वर घेउनि पिके, बुडविले शेत कसे त्वा अरे ? । अता का घेशि कर्म-नांव रे ? ॥ वाढविले शेतात वृक्ष बहु, काम जयांचे नसे । उडविले पैसे, खाली खिसे ॥ पूर्वपुण्य तव उदय पावुनी शेत मिळाले बरे । हरे जरि करशिल सुखहाव रे ! ॥ (अंतरा) श्रीमंत संत तो धनी जगी धरवरी । जा शरण तयाला चरण धरी वरवरी । घे मत त्याचे मग शेत पिके भरपुरी । विवेकशस्त्रा घेउनि हाती, वृक्ष तोडि शुर गड्या ! । शुध्द कर मृतिका नरबापुड्या ! ॥१॥ धर नांगर, ज्ञानाग्नि चक्षुने जाळि अज्ञ-वृक्षया । पालवी-खोड मुळासह तया । बैल कामक्रोधादि जुंपुनी, माया-जू धर वरी । साफ कर देह-शेत अंतरी ॥ असत्य दिसते सत्य जये, ते फेकि विषय बाहिरी । फळे मग ब्रह्म पीक भूवरी । (अंतरा) हो धन्य सुखे खाउनी फळे निर्मल । फलरूप दिसे मग शेत कुणी पाहिल । पाहुनि करी जग तुझेचि हे राहिल । ब्रह्मफलाच्या रुपे दिसे तनु-शेती चांगुल गड्या ! । शुध्द कर मृतिका नरबापुड्या ! ॥२॥ देह-शेत हे अशुध्द जाणुनि, शुध्द करी रे ! तया । धरी सत्संग स्वच्छ व्हावया ॥ पुण्यपिके ही संस्कारे तू शेतीवरि कमविली । नष्ट कर्मात स्पष्ट गमविली ॥ विषय वृक्ष हे पाच जाण रे ! कुबुध्दि-जलि वाढले । शस्त्र लावुनि न ते काढले ॥ (अंतरा) शेतिने बध्दपण आले गा ! तुजवरी । मारिती श्रृंग कामादि बैल गुरगुरी । होउनी स्वार तुजवरी दिली नोकरी । घेइ तुती श्रीगुरुनामाची, मारि तयासी गड्या ! शरण तो मग येईल तुकड्या ॥३॥

· असं वेड लावशिल कधी ? मी विसरिन माझी सुधी ॥धृ॥ तुज वाचुनि कवणा रुसू ? गे माय ! कुणाला पुसू ? ॥१॥ ‘हा देह मी’ म्हणता भला, स्वात्मता न उरली मला ॥२॥ संशयी वृत्ति पाहुनी, अग ! लाज वाटते मनी ॥३॥ नच विरे गर्व बापुडा, सोडिचना अपुला धडा ॥४॥ जाणीव वाढली जरी, तरि अंधपणा वावरी ॥५॥ तुकड्यास ठाव दे अता, नच भासो देहात्मता ॥६॥

· असुरासी मानवबाणा, पुरवील आस ही कोणा ! वाटते ? ॥ ज्या दया-मया मुळि काही, उपजली जराशी नाही । क्षणभरी ॥ इतिहास मागचा ऎसा, वाचुनी पहा थोडासा । बंधुनो ! ॥ (अंतरा) जे दुष्ट, मनाचे भ्रष्ट , राहती स्पष्ट । दया ना त्यांना, दया ना त्यांना । सोडतील कैचे प्राणा, आपुल्या ? ॥१॥ मानवी बुध्दिचे पाश, होतील क्षणि तरि नाश । खात्रिने ॥ होईल त्रास थोडासा, परि दयार्द्रता गुण साचा । मानवी ॥ क्रोधे जरि मनि जळजळला, तरि सारासारे वळला । शूर तो ॥ (अंतरा) परि क्रूर, न होई दूर, त्रास दे फार । गांजिती नाना, गांजिती नाना । पाहती लवविण्या माना, आमुच्या ॥२॥ भस्मासुर जव बल दावी, तव युक्ति प्रभुस शोधावी । लागली ॥ घाबरले शंकर भोळे, पळती त्या रानोमाळे । पाहुनी ॥ मदमत्त हत्तिसम झाला, मरणास्तव बुध्दि त्याला । फावली ॥ (अंतरा) विष्णुनी, वेष घेउनी, बनुनी मोहिनी । गर्वि असुरांना, गर्वि असुरांना । जाळिले त्याचि हातांना, लावुनी ॥३॥ हा आजवरीचा खेळ, मग मिळेल कैचा मेळ । आमुचा ? ॥ यासाठी एकचि आहे, सुचतो मज तो सदुपाय । अंतरी ॥ दैवि-शक्ति प्रगट करावी, अभ्यासे हृदयी ल्यावी । आपुल्या ॥ (अंतरा) मग राम, पुरवि हे काम, देइ आराम । भक्त लोकांना, भक्त लोकांना । मानवा मिळे जिवदाना, निश्चये ॥४॥ धर्माची इभ्रत जावी, मंदिरे स्मशाने व्हावी । पाहता ॥ अबलासि क्रूर भेटावे, सति-सेव दुजाकरि जावे । पाहता ॥ गाइचे रक्त वघळावे, नेत्रांनी आम्हि बघावे । पाहता ॥ (अंतरा) हे कसे, शोभते असे ? दुःख मरणसे । दया हो प्राणा, दया हो प्राणा । का दया तुम्हा यावी ना, बंधुनो ! ॥५॥ या उठा उठा सगळेची, आळवा प्रभू-हृदयासी । गर्जुनी ॥ तो सखा आमुचा आहे, संकष्टी भक्ता राहे । रक्षुनी ॥ ‘धावुनी ये’ ब्रिद हे त्याचे. पाहिजे आर्त जीवांचे । सर्वही ॥ (अंतरा) मग चक्र, धरी करि शक्र, चिरोनी नक्र । पाडि असुरांना, पाडि असुरांना । हा त्या देवाचा बाणा, सर्वथा ॥६॥ चाहुल द्या लागू कानी, सांगू त्या प्रभुसि कहाणी । आपुली ॥ अपराधाविण मनुजांना, मारणे शास्त्र हे कोणा । सांगते ? ॥ ‘आपुले हक्क मिळवावे, न्याये’ हे कथिले देवे । अजवरी ॥ (अंतरा) मग पाश, कसा आम्हास, बनवितो दास । प्रभु असताना, प्रभु असताना ? तुकड्याची वार्ता कानी, घ्या जरा ॥७॥

· असुरासी मानवबाणा, पुरवील आस ही कोणा ! वाटते ? ॥ ज्या दया-मया मुळि काही, उपजली जराशी नाही । क्षणभरी ॥ इतिहास मागचा ऎसा, वाचुनी पहा थोडासा । बंधुनो ! ॥ (अंतरा) जे दुष्ट, मनाचे भ्रष्ट , राहती स्पष्ट । दया ना त्यांना, दया ना त्यांना । सोडतील कैचे प्राणा, आपुल्या ? ॥१॥ मानवी बुध्दिचे पाश, होतील क्षणि तरि नाश । खात्रिने ॥ होईल त्रास थोडासा, परि दयार्द्रता गुण साचा । मानवी ॥ क्रोधे जरि मनि जळजळला, तरि सारासारे वळला । शूर तो ॥ (अंतरा) परि क्रूर, न होई दूर, त्रास दे फार । गांजिती नाना, गांजिती नाना । पाहती लवविण्या माना, आमुच्या ॥२॥ भस्मासुर जव बल दावी, तव युक्ति प्रभुस शोधावी । लागली ॥ घाबरले शंकर भोळे, पळती त्या रानोमाळे । पाहुनी ॥ मदमत्त हत्तिसम झाला, मरणास्तव बुध्दि त्याला । फावली ॥ (अंतरा) विष्णुनी, वेष घेउनी, बनुनी मोहिनी । गर्वि असुरांना, गर्वि असुरांना । जाळिले त्याचि हातांना, लावुनी ॥३॥ हा आजवरीचा खेळ, मग मिळेल कैचा मेळ । आमुचा ? ॥ यासाठी एकचि आहे, सुचतो मज तो सदुपाय । अंतरी ॥ दैवि-शक्ति प्रगट करावी, अभ्यासे हृदयी ल्यावी । आपुल्या ॥ (अंतरा) मग राम, पुरवि हे काम, देइ आराम । भक्त लोकांना, भक्त लोकांना । मानवा मिळे जिवदाना, निश्चये ॥४॥ धर्माची इभ्रत जावी, मंदिरे स्मशाने व्हावी । पाहता ॥ अबलासि क्रूर भेटावे, सति-सेव दुजाकरि जावे । पाहता ॥ गाइचे रक्त वघळावे, नेत्रांनी आम्हि बघावे । पाहता ॥ (अंतरा) हे कसे, शोभते असे ? दुःख मरणसे । दया हो प्राणा, दया हो प्राणा । का दया तुम्हा यावी ना, बंधुनो ! ॥५॥ या उठा उठा सगळेची, आळवा प्रभू-हृदयासी । गर्जुनी ॥ तो सखा आमुचा आहे, संकष्टी भक्ता राहे । रक्षुनी ॥ ‘धावुनी ये’ ब्रिद हे त्याचे. पाहिजे आर्त जीवांचे । सर्वही ॥ (अंतरा) मग चक्र, धरी करि शक्र, चिरोनी नक्र । पाडि असुरांना, पाडि असुरांना । हा त्या देवाचा बाणा, सर्वथा ॥६॥ चाहुल द्या लागू कानी, सांगू त्या प्रभुसि कहाणी । आपुली ॥ अपराधाविण मनुजांना, मारणे शास्त्र हे कोणा । सांगते ? ॥ ‘आपुले हक्क मिळवावे, न्याये’ हे कथिले देवे । अजवरी ॥ (अंतरा) मग पाश, कसा आम्हास, बनवितो दास । प्रभु असताना, प्रभु असताना ? तुकड्याची वार्ता कानी, घ्या जरा ॥७॥

· अहो ! पळता कुठे आता ? घराशी आग ही आली । लागला ज्वाळ हृदयाला, वेळही कायशी उरली ? ॥धृ॥ गमे हा मार्ग हिंदुंचा, बिघडला लोपता झाला । पाहती तोंड दुसर्‍याचे, सोडुनी नीति ही अपुली ॥१॥ कुणी त्या चर्चला जाती, कुणी पुजताती पीराला । आपुली सोडुनी नीती, हिंदुची भ्रष्ट मति झाली ॥२॥ न यांना धर्मही कळतो, समाजी देह ना वळतो । न ठावे राजकारण ते, गती अधरापरी झाली ॥३॥ कारणही व्हावया ऎसे, एकची वाटते मजला । पारतंत्र्यी भरत-भू ही, आपुली माउली पडली ॥४॥ करा हो एकमेकांना. संघटित प्रेम लावूनी । जागवा राष्ट्र-भक्ती ही, म्हणे तुकड्या त्यजा भूली ॥५॥

· आपत्काली धैर्य नसावे, ब्रीद कसे तुमचे ? । साच बोलुनी साचचि करशी, वाटे मज साचे ॥धृ॥ श्रृती-वेद बहु शास्त्रे वर्णिती ‘भक्ती प्रिय तुजला’ । ‘याविण काहीच न रुचे आणिक’, सत्य बोल मजला ॥१॥ राख राख प्रभु ! लाज आज रे ! घे पोटी पापी । तुकड्यादास म्हणे मी उरलो, पायी संतापी ॥२॥

· आपत्ती पासुनी काढि गे ! माय विठाबाई ! । जाइल वाया ही नरकाया, वेळ बरी नाही ॥धृ॥ बाळपणापासुनी व्यर्थ ही, तनु गेली वाया । कोठवरी दुःखाचे डोंगर, सोसु शरिरी या ? ॥१॥ ‘हे माझे ते माझे’ म्हणता, नच निवती डोळे । विषयसुखाच्या गरळी माते ! रात-दिवस खेळे ॥२॥ सुख नाही क्षण-मात्र जिवाला, गति श्वानावाणी । पोटाच्या कारणे धडपडी, सुकरवत जाणी ॥३॥ भले पसरले अधोर वन हे, पडलो त्या माजी। काम-क्रोध-मद-मत्सर श्वापद, शरिरांतरि गाजी ॥४॥ ऎसि ऎकिली मात दयाळे ! तूचि दया करिशी । भक्तकामकल्पद्रुम जाणुनि, आलो तुजपाशी ॥५॥ तुकड्याला दे ठाव, पार कर नाव अभाग्याची । न तरी गेले ब्रिद हे वाया, तुला लाज याची ॥६॥

· आवडली भक्ति आम्हा, हरिचीया पायिची । त्याविण ना सुख वाटे, या देहा अन्यची ॥धृ॥ तुटकीशी झोपडी ही गमते महालापरी । जव नांदे भक्ति-भावे, माझा तो श्रीहरी ॥१॥ कुंपण आणि बोरिबारी, गमतो हा बागची । तुळशीची दाट झाडी, शोभा ही स्वर्गिची ॥२॥ अम्हि हरिचे म्हणविताना, बहुमाना पावतो । ऎश्वर्य फोल सारे, त्याविण ते समजतो ॥३॥ जरि न मिळे अन्न खाया, ल्यायासी चिंधुडी । तुकड्याची रंगि रंगो, हरि-भक्ति चौघडी ॥४॥

· आवडिचा मोहन हा, सोडु नये वाटे ॥धृ॥ जीवभाव तोचि अम्हा, धनिकासी जेवी जमा । विसरताचि एक क्षण, अंगि येति काटे ॥१॥ नेत्रि सगुण रूप सदा, वाटे सुख शांति-सुधा । त्याविण ना गात जरा, क्षण न एक कंठे ॥२॥ मधुर ध्वनि बंसरिचा, नाश करी षड्‍ -अरिचा । बाग फुले या उरिचा, निर्मळ जल दाटे ॥३॥ तुकड्याचा देव एक, परि हा नटतो अनेक । त्या पदि मन हे निशंक, कमलामृत चाटे ॥४॥

· उठा रे आर्य पुत्रांनो ! चला सांगू प्रभुपाशी । प्रभु का कोपला ऎसा ? जरा ना सौख्य आम्हासी ॥धृ॥ उडाली भूमिची सीमा, पिकेना तिळभरी शेती । खर्च ही ना निघे काही, राहती लोक उपवासी ॥१॥ सदाचा त्रास हा देहा, गुलामी सान थाराला । नृपाचा धाक बहु मोठा, गांजितो फार जनतेसी ॥२॥ विषारी चित्त जनतेचे, पसरले वैर-वन सारे । निघाले वक्ष पापांचे, फळांच्या वाढल्या राशी ॥३॥ गुप्त हे जाहले साधू, भोंदुचा भार बहु झाला । नीतिशास्त्री-पुराणांची, फजिती वाढली खाशी ॥४॥ जगाला सौख्य तरि द्यावे, नाहि तरि मृत्यु अर्पावे । हाल हे नावरे आता, भारताची गती कैसी ? ॥५॥ म्हणे तुकड्या चला गाऊ, आपुली खास ही दैना । ‘सखा तो तारि भक्तासी’, पुराणे गर्जती ऎसी ॥६॥

· उणा पाहशील दुसर्‍याला, उणीवेने उणा होशी । समजशी पूर्णता सगळी, अमर सुख अनुभवा घेशी ॥धृ॥ न जग हे तिळ उणीवेचे, असे भरले सुखत्वाचे । प्रभू नटुनीच जग साचे, पाहतो मौज ही खाशी ॥१॥ कुठे तो वृक्ष होऊनी, पाहतो शांतता अपुली । कुथे नदिच्या प्रवाही हा, राहुनी तृप्ति दे त्यासी ॥२॥ कुठे होऊनिया राजा, प्रजेला सूख दे सगळ्या । कुथे होऊनि अतिदीन, मागतो भीक जनतेसी ॥३॥ सर्व हा देवची नटला, जाणुनी अनुभवा घेणे । तो तुकड्यादास सांगतसे, भागवति रीत ही ऎसी ॥४॥

· उभा का मंदिरी रामा ! पहा बाहेर येवोनी । गर्जती भक्त तव दारी, जरा तरि ऎक बा ! कर्णी ॥धृ॥ दुष्ट संहारण्याकरिता, तुझा अवतार तो होता । अता का जानकीनाथा ! दिसेना भूवरी कोणी ? ॥१॥ कितीतरि त्रास भक्तांना, कुणाला हाल बघवेना । मिळेना अन्न पोटाला, किती मरती दुखे प्राणी ॥२॥ ऊठ घे चाप धर हाती, असुर मर्दावयासाठी । राख बा ! लाज भक्तांची, न तुजविण दान दे कोणी ॥३॥ सांग हनुमंत ताताला, कि ‘वर दे आपुल्या भक्ता । पाहशी अंत किती आता ? धरी तुकड्या सदा चरणी ॥४॥

· कठिण मन का हरी ! केले, नसे का तुज दया थोडी ? तुझ्याविण अखिल या जगती, कोण आम्हासि रे ! जोडी ? ॥धृ॥ अशाश्वत दृश्य हे सगळे, कधी दिसते, कधी नसते । राहते नी किती जाते, साथ हा घाट मम सोडी ॥१॥ स्वार्थि या लोकिचे गाणे, प्रेमही स्वार्थिचे जाणे । कळेना कोण हे जीणे ? कुठे वाढे, कुठे मोडी ? ॥२॥ अनुभवे पाहता जगती, न काही सत्यसे दिसते । प्रभू ! तूची खरा असशी, म्हणुनि ही गर्जना फोडी ॥३॥ पदरि घे दास-तुकड्याला, उरु न दे देह-भावाला । रंग तव लाव जीवाला, देह तुजवरुनि कुरवंडी ॥४॥

· कठिण ही वेळ प्रभुराया ! आणली का अम्हावरती ? सुखी नच तिळभरी जनता, विपत्तीची अती भरती ॥धृ॥ न कोणी वीर हे धजती, रक्षण्या दीन लोकांसी । लूटती चोर मनमाने, न त्यांना ये दया खंती ॥१॥ मने नास्तीक ही झाली, प्रभूची यादही गेली । बोलती आपुल्या बोली, अभिमाने सुख फिरती ॥२॥ मिळेना अन्न कोणाला, कुणी धन सांचुनी ठेवी । प्रेम स्वार्थाविना कोठे, कुणाचे ना कुणावरती ॥३॥ न साधू बोध दे कोणा, मौन धरि बघुनि पापासी । तो तुकड्यादास सांगतसे, तुझ्याविण ना मिटे भ्रांती ॥४॥

· कठिण ही वेळ प्रभुराया ! आणली का अम्हावरती ? सुखी नच तिळभरी जनता, विपत्तीची अती भरती ॥धृ॥ न कोणी वेर हे धजती, रक्षण्या दीन लोकांसी । लूटती चोर मनमाने, न त्यांना ये दया खंती ॥१॥ मने नास्तीक ही झाली, प्रभूची यादही गेली । बोलती आपुल्या बोली, अभिमाने सुखे फिरती ॥२॥ संतही सांगती ऎसे, पुराणे गर्जती ऎसे । अनुभवा सांगती ऎसे, धडपडी व्यर्थ का धरिशी ? ॥३॥ धरी सत्संगती जाई, मने मनि उन्मनी लावी । तो तुकड्यादास दे ग्वाही, सुखी मग तू स्वये होशी ॥४॥

· कधी भेटशिल माय दयाळे ! दीन अभाग्यासी ? बहु त्रासलो मन आवरता, ने अपुल्या पाशी ॥धृ॥ बहिर्सग हा भोवति पाहता, भय वाटे भारी । धीर न धरवे पहाडी राहता, चोरांची नगरी ॥१॥ भयाभीत हो उनी, नेत्र धावती तुझ्या पायी । या षड्‍ रिपुचा मेळा पाहता, घाबरलो आई ! ॥२॥ नाहि योग-साधना समजली, वर नेऊ प्राणा । शिकावयाची नुरली इच्छा, सोडुनिया चरणा ॥३॥ भक्त-काम कल्पद्रुम तू गे ! घे करुणा माते ! । तुकड्यादासा प्रेम दावुनी, ने अपुल्या पंथे ॥४॥

· कर आपुला गुरु सगा, गड्या रे ! कर अपुला० ॥धृ॥ सद्गुरुज्ञानाविण सुख नाही, का भ्रमलासी उगा ? ॥१॥ चलतीचे जगि सगे-सोयरे, शेवटि देतिल दगा ॥२॥ गुरु-भजनाचे अंजन घालुनि, दुर कर माया-ढगा ॥३॥ तुकड्यादास म्हणे नित नेमे, विसरु नको लक्ष्य गा ॥४॥

· करा रे ! कृष्ण गडी अपुला । मिटे न मैत्री जन्म-जन्मि ही, देह जरी गळला ॥धृ॥ फुकाचे नाम जपा त्याचे । धन-संपत्तिस वाण न राहे, लक्ष्मि घरी नाचे ॥१॥ लावता चित्त तया पायी । अखंड अमृत-झरा जिवाला पावे लवलाही ॥२॥ धरिता ध्यान सगुण त्याचे । विश्व ब्रह्म हे कृष्णचि जिकडे तिकडे जगि भासे ॥३॥ देह अर्पिता तया चरणी । वैकुंठाचे राज्य मिळे, करिती जन मनधरणी ॥४॥ जरासे देता अति भेटे । तुकड्यादास म्हणे कानी घ्या, लक्षि धरा नेटे ॥५॥

· करुणाघना ! दीनपावना ! कुलभूषणा ! दे दर्शना ॥धृ॥ तुजवीण त्राता न कुणी आम्हाला, सुख दे मना । दे० ॥१॥ भवसागरी दुःख नी भय भारी, सुध ना मना । दे० ॥२॥ गति तुकड्याची वाहो स्वरूपी, पदि याचना । दे० ॥३॥

· कसा हरि ! स्वस्थ तू आता ? वेळ ही काय उरलीसे ? । राहिला धर्म किती ऎसा, तुला का याद नुरलीसे ? ॥धृ॥ जनाची वृत्ति बहिरोनी, पुरी नास्तीकता आली । न कुणि पुसताति कोणाला, प्रेम-मायाच हरलीसे ॥१॥ न साधू लक्ष दे धर्मा, न पंडित सांगती वर्मा । स्वार्थता भासते सगळी, दयेची वाट सरलीसे ॥२॥ अशी ही अवदशा आता, कोठवरि ठेविशी देवा ! । हाक घे दास तुकड्याची, वासना हीच धरलीसे ॥३॥

· का धरिशी मनि कोप दयाळा ! वद गिरिजा-रमणा ! । नको दुरावू दीन अभाग्या, घे अपुल्या चरणा ॥धृ॥ तात-मात-गणगीत तुझ्याविण, कोणि नसे वाली । का लोटियशी निष्ठुर हो उनि, कृपणा वनमाली ! ॥१॥ सोडुनिया तव चरण दयाळा । जाउ कुठे रानी ? । निर्बळासि भय दावुनि म्हणशी ‘मजला नच मानी ‘ ॥२॥ नको मला हा प्रपंच-भारा, तुझ्या मायिकांचा । येउनिया दे भेट कृपाळा ! निश्चय अंतरिचा ॥३॥ भक्त-काम-कल्पद्रूम म्हणविशि, वेद-मुखेकरुनी । तुकड्याची ही आशा पुरवी, भव ने हा हरुनी ॥४॥

· काळ प्रभु-चिंतनी जावा, जिवाला वाटते ऎसे । दुःख हे मोहपाशाचे, अता तिळमात्र ना सोसे ॥धृ॥ क्षणक्षण काळ हा टपला, लिहाया कर्म जे केले । चुकेना भोग कोणाला, करू जैसे भरू तैसे ॥१॥ स्वार्थि हे लोक अवघेची, न कोणी साथ दे अंती । न कामी देह-इंद्रिय हे, न लागू याचिये कासे ॥२॥ सखा जो पंढरी-राणा, जिवाचा एक कनवाळू । भजू त्यासी मनोभावे, यथामति जाणतो जैसे ॥३॥ म्हणे तुकड्या जगाची ही, उपाधी घात करणारी । कळो आले अता सगळे, न कोणी यात संतोषे ॥४॥

· किति गोड तुझी गुणनाथा, वाटते मधुर भगवंता ! अंतरी ॥धृ॥ जे भजति तुला जिवभावे, ते पुन्हा जन्मि ना याचे करिशि तू ॥ काय हे मीच सांगावे ? श्रुति-शास्त्र पुराणा ठावे । सर्व हे ॥ प्रत्यक्ष पाहता यावे, मग प्रमाण कैचे द्यावे । त्याजला ? ॥ (अंतरा) जे धीर, करिति मन स्थिर, देउनी शीर । रंगती गाता, रंगती गाता । ठेविशी वरद त्या माथा । श्रीहरी ! ॥१॥ जे तुझी समजुनी झाले, ते कळिकाळा ना भ्याले । सर्वथा ॥ सुखदुःख तयावरि आले, हसुनिया सहन ते केले । सर्वही ॥ गिरिपरी विघ्न कोसळले, तिळमात्र न मनि हळहळले ! भक्त ते ॥ (अंतरा) द्रौपदी, न भ्याली कधी, सभेच्या मधी । वस्त्र ओढिता, वस्त्र ओढिता । धांवला घेउनी हाता । अंबरे ॥२॥ प्रल्हाद भक्त देवाचा, ऎकिला चौघडा त्याच्या । कीर्तिचा ॥ केला बहु छळ देहाचा, परि सोडि न जप नामाचा । तिळभरी ॥ विष-अग्नि-व्याघ्र सर्पाचा, करविला कडे लोटाचा । यत्नही ॥ (अंतरा) किति प्रेम ? ‘न सोडी नाम, जाउ द्या प्राण’ । तारिशि त्या हसता हसता । धावुनी ॥३॥ सम स्थान भक्त वैर्‍यासी, ही उदारता कोणासी । गवसली ? ॥ यशोदेसि ती पुतनेसी, भक्तासी ती कंसासी । दाविशी ॥ घेऊनि माग वेळेसी, भक्तांच्या वचना देशी । पुरवुनी ॥ (अंतरा) ती कणी, गोड मानुनी, पिशी धावुनी । विदुरा-हाता, विदुरा-हाता । निर्मळ प्रेमाचा दाता । तू हरी ! ॥४॥ पांडवा साह्य देउनी, फिरशी तु रानो-रानी । त्यासवे ॥ किति दासाची तुज प्रीती, खाजविशी घोडे हाती । आपुल्या ॥ बहु दीन सुदामा भक्त, बसवी कांचन-महालात । आवडी ॥ (अंतरा) अम्हि दीन, तुझ्या पदि लीन, गाउ तव गुण । लक्ष्मीकांता ! लक्ष्मीकांता ! । तुकड्यासी घे पदि आता । उचलुनी ॥५॥

· किति शांत उदात्तहि मूर्ति तुझी । मनि लावितसे अति वेड मला ॥धृ॥ पद-कमलावर तुळशि-दले ही, शोभति उटिया पद-युगुला ॥१॥ वक्षस्थळावर माळ विराजे, कटि पीतांबर हा कसला ॥२॥ मोरमुकुट हा अति झळके शिरि, अधरि धरी पावा अपुला ॥३॥ तुकड्यादास म्हने मज शेवटि, देशिल ना प्रभु ! भेट खुला ॥४॥

· किति सांगती, संत तुला बोध । सुटेना अजुनि कामक्रोध ॥धृ॥ काय तुज ठाव, असेल संतांचा ? अवेळी जाशिल रे ! साचा । शेवटी कुणी, साथ-संगतीचा, नसे कर शोध अंतरीचा । समज मानसी, कोण तू कवणाचा ? , सुसेवक होई संतांचा । कृपा घेउनी, तोडिशि ना नाद । सुटेना अजुनि ० ॥१॥ उदरिं नवमास, त्रासहि सोसोनी, अचानक पडला या भुवनी । स्मरण ते वेळी, केले स्थिर ध्यानी, अता का होशी अभिमानी ? जन्म पावला, झाला वयमानी, ‘बाळपण खेळण्यास’ मानी । विषय सेविता, किति झाला बध्द । सुटेना अजुनि ० ॥२॥ पुरा मायेत, होउनिया दंग, सेविली विषयांची भांग । सुचेना काही, दुःखाचा रंग, धरिला वृध्दपणी संग । श्वास लागला, पुत्र म्हणे ‘रोग ?, मांडिले बुडग्याने ढोंग’ । काढि येथुनी, न तोडिशी बंध । सुटेना अजुनि ० ॥३॥ जगी मानती, तुच्छ तुला प्राण्या ! न होशी हुशार तरि शहाण्या ! मूर्ख बनतोसी, का खोट्या नाण्या, अजुनि ‘अविनाश’ पाहि प्राण्या ! स्वरुप विसरला, अंतरला कान्हा, अजर अमृत रे ! निज पान्हा । दास तुकड्या हा, म्हणे होइ शुध्द । सुटेना अजुनि ० ॥४॥

· किती बघशि अंत आमुचा ? श्रीहरी ! ये धावुनी । सुख नाहि जगी तुजविना, भाव हा घे पाहुनी ॥धृ॥ (अंतरा) जग नाशिवंत हे चळले । मेंढरावाणि खळबळले । हे जया ज्ञानिया कळले । नच राहि जरा तुजबिना, दया मनि घे निरखुनी ॥१॥ (अंतरा) हा विषय विषासम भासे । लागलो तुझ्या अम्हि कासे । नच त्रास कुणाचा सोसे । या अशा लेकरा करी, सख्या घे ये उचलुनी ॥२॥ (अंतरा) कोवळे मनाचे आम्ही । संस्कारजन्य अति कामी । लागलो अता तव नामी । तुकड्यादास भेट दे हरी ! चित्त झुरते गाउनी ॥३॥

· कुणाचा धाक बाळगुनी, आपुला धर्मे त्यजता का ? । नीति ही सोडुनी सारी, प्राण परक्यासी विकता का ? ॥धृ॥ आठवा बाळ अज्ञानी, गुरु गोविंदसिंहाचे । पुरवि भिंतीमधी त्यांना, न सोडी धर्म तरि ते का ? ॥१॥ सोडता धर्म जरी संभा , न उंचचि राहती डोकी । मर्द हा मरती गळ फासे, न दुसर्‍यासी म्हणे ‘काका’ ॥२॥ धर्म तो शिकवितो सकळा, अमर हा अंतरी आत्मा । मराया का भिता ऎसे ? ना तरी देह राहिल का ? ॥३॥ बाळगा धाक देवाचा, जरी पापे करी कोणी । आपुल्या सुखस्वातंत्र्या, म्हणे तुकड्या विसरता का ? ॥४॥

· कुणि काहि म्हणो न म्हणो जन हे, नच साधु ढळे हरिच्या भजना ॥धृ॥ वाहताति कुणि फल, पुष्प शिरी, कुणि भावबळे घरि ने अपुल्या । कुणि निंदिती मार्गि, शिव्या वदनी, सुखदुःख न होय जराहि मना ॥१॥ कुणि देति किती, कुणि नेति किती, कुणी खाति किती, गणतीच नसे । कधि लाडु पुरी, कधि भूक उरी, कळणा-घुगरी हरि देत तना ॥२॥ कुणि मान कराया नेत सभे, कुणि प्राण हराया नेत गिरी । समतोल तयाची वृत्ति सदा, नच द्वेष-प्रीती कुजना-सुजना ॥३॥ शित-उष्ण असो वा वृष्टि असो, जनलोक असो वा कानन हो । मरणी जननी नच खेद जिवा, सदनीहि जसा तैसाचि रणा ॥४॥ नच रंग कधी विसरे अपुला, आनंदस्वरूप अनादि सदा । पदि लीन तया तुकड्या नमुनी, ज्याच्या न कळे कवणास खुणा ॥५॥

· कुणि दत्त पाहिला का माझा ? अवधूत पाहिला का माझा ? ॥धृ॥ दंड-कमंडसु त्रिशूल हाती, औदुंबर-तटि वास करी । पायी खडावा भस्म तनुवरि, भक्तांच्या धावे काजा ॥१॥ कोल्हापुर ला मागत भिक्षा, वास करी माहुरधामा । स्नान करी जान्हवी तटाकी, योगिराज सद्गुरुराजा ॥२॥ जपता भावे प्रसन्न होई, फळ देई झणि धावुनिया । तुकड्यादासा आस तयाची, पुरविल तो अमुच्या काजा ॥३॥

· कुणि भावबळे आणा हरिला । कुणि प्रेमबळे आणा हरिला ॥धृ॥ ना कळतो तो यम-नियमांनी, ना कळतो तप साधुनिया । ना कळतो वनि जप करण्याने, भक्तीने वश होय भला ॥१॥ कठिण मार्ग हा असाध्य बहुता, योग-याग-विधि-प्रणवाचा । साध्य होय प्रभु गोड गाउनी, जैसा द्रौपदिला झाला ॥२॥ कृत-त्रेता-द्वापारी बघता, कठिण मार्ग वेदे वदला । ‘कलीयुगी प्रभु नाम-बळाने, वश होई’ संती कथिला ॥३॥ तुकड्यादास म्हणे आला हरि, भारतभू ही बघण्याला । म्हणा ‘धर्म हा जात लया, प्रभु ! का ऎसा निष्ठुर झाला ?’ ॥४॥

· कुणि येउनि मज वेड तुझे, लाविले हरी ! । नव्हतीच अशी मोहनी, तुझी मनावरी ॥धृ॥ काम-धाम नाठवते, मार्गि चालता । पाहु कुठे तुजसि ? गमे, अंतरी वरी ॥१॥ बोलता कुणाशि याद ये, तुझी झणीं । वेडियापरीच पाहती, मला तरी ॥२॥ झोप नाहि नेत्रि, जाग नाहि जागता । कार्य साधता न कार्य, वाटते करी ॥३॥ रंग एकसा, निशेपरीच वाटतो । तुकड्याची वेळ ही, अशीच राखजो तरी ॥४॥

· कुणि सांगिता पता हरिच्या, गावि जावया । मन बावरे सदा फिरते, त्यासि पहावया ॥धृ॥ म्हणताति संतही देती, मार्ग दावुनी । इतुका करा उपकार, तया भेटवा कुणी । अर्पीन तुम्हापायि तनू, भेट घ्यावया ॥१॥ रानी वनी कुणी फिरती, लाभण्या रुपा । दरी-खोरी कुणी फिरती, लाभण्या रुपा । परि दूर हरि हा न दिसे, कष्ट करुनिया ॥२॥ कुणि सांगती जनी हरि हा, येई धावुनी । परि भक्त पाहिजे त्यासी, प्रेमभावनी । तुकड्यासि दया द्या इतुकी, लाभावा तया ॥३॥

· क्षण एक धरीना धीर, कसे मन हे बावरे । करु काय सुचेना काहि, जरा तरि ना आवरे ॥धृ॥ (अंतरा) जरि योग-याग बहु केले । मन-पवन समाधी नेले । वनि निर्जनि घर बांधियले । तरि व्यर्थ तयांची कास, खास विषयी हावरे ॥१॥ (अंतरा) जगि तीर्थधामही नाना । दरिकंदरि ऋषिच्या स्थाना । जी मोहविती शरिरांना । ना राहि जरा टिकुनिया, कुसंगाने पाझरे ॥२॥ (अंतरा) अति पंथ-मतांतर लोकी । परि आस पुरेना एकी । जळजळती एकामेकी । नच शांति वृत्तिला येइ, करी हृदया कावरे ॥३॥ (अंतरा) सत्‍ संग सुगम यासाठी । व्हावया वृत्ति उफराटी । परि बोध पाहिजे गाठी । विश्वास असा तुकड्यास,’अनुभवा दे भाव’ रे ! ॥४॥

· गुरु येउनी मज भेटला, नि ‘भक्ति कर’ म्हणे । ‘विसरूच नको श्रीहरी, अति प्रेम धर’ म्हणे ॥धृ॥ ‘अति लीन वाग लोकि या, परलोक साधण्या । जे दुष्ट लोक त्यांची, संगतीच हर’ म्हणे ॥१॥ ‘नच एक क्षणही खोवी, निंदनी कुणाचिया । मन शुध्द करी, द्रोह-कपट सर्व हर’ म्हणे ॥२॥ ‘दिसताति सर्व जीव, प्रेम भरुनि पाहि त्या । प्रभुची सखा जनी-वनी हा, भाव धर’ म्हणे ॥३॥ ‘नीती नि न्याय ठेवुनी, संसारि वाग तू’ । तुकड्यास सदा ‘सत्यप्राप्ति, हाचि वर’ म्हणे ॥४॥

· गुरु-बोधावाचुनीया, पथ नाही भुक्तिचा । बोधाने सुलभ होई, पथ प्रभुच्या भक्तिचा ॥धृ॥ विण भक्ती ज्ञान नोहे, प्रभुचीया सृष्टीचे । विण ज्ञाने व्यर्थ होते, कळणे हे व्यष्टीचे ॥१॥ जरि कळले देह-धर्मे, कळणेची ते नव्हे । जरि वळले एकपोटा, वळणेची हे नव्हे ॥२॥ म्हणुनीया संत गाती, गुरु-भक्ती सर्वदा । तुकड्याची हाक तेची, गुरु शोधावा सुदा ॥३॥

· गुरुराज कृपाकर ठेवुनिया, अजि ! चारितसे निजज्ञान-फळे ॥धृ॥ सत्वगुणी करवूनि भुमी, श्रध्दा-बिज पेरितसे मधुनी । सत्संग-जलाने ओलवुनी, तो बोध-तरूवर लावि बळे ॥१॥ शांति-दया अति कोमलसे, फुटती तरुसी त्या पल्लव हे । शाखा अष्टादिक भाव जया, संलग्न अती रमताति जुळे ॥२॥ भक्ति-फुलांचा भार बहू बहरावरि चित्त रमे भ्रमरू । आनंद मृदु पवनी डुलतो, सुख देत सदा तरु प्रेमबळे ॥३॥ ज्ञान-फळे अति गोड रुचे, रस सेवु मुखाविण त्या तरुचे । तुकड्या म्हणे घ्या रे ! ज्यास रुचे, या या पुढती, व्हा मुक्त बळे ॥४॥

· चल ऊठ हरी ! तव झोप द्वाड ही आम्हा ! करु ना दे कामाधामा ॥धृ॥ तू निजला रे ! नीजरूप घेवोनी, टेकती असूर निशानी । कुणि कोणाला ना पुसती अभिमानी. निती सोडलि ज्यांनी त्यांनी । ऋषि गोंधळले मठी मंदिरी रानी. त्रासले कामदेवानी । (अंतरा) मातामरि सुटल्या गावा । खंडोबा भैरवबाबा । काँलरा प्लेग वाघावा । उघड रे हरी ! नेत्र जरा घनश्यामा ! करु ना दे कामा धामा ॥१॥ बघ लोकांची दैना ही अति भारी, अन्नान्नि मरति नरनारी। दुःखद विघ्ने कोसळताती सारी, जनता ही जर्जर भारी । बहु चोरांची दाटी, डाके-मारी, नाटके तमाशे द्वारी । (अंतरा) पेटती अग्निच्या ज्वाला । धरणिकंप होतो भू-ला । अति पूर नदी-नाल्याला । पहा पहा जरा मधुसुदन विश्रामा ! करु ना दे कामा धामा ॥२॥ तव गोधन रे ! असुरांनी कापाचे, तुज नेत्रि कसे हे बघवे ? । तव भारतभू पारतंत्र्य गाठावे, शोभते कसे हे बरवे ? । (अंतरा) निंदक भक्ता छळताती । कोणि ना कुणाला पुसती । ऋतु काळवेळ ना बघती । ना सोसवते दुःख सख्या घनश्यामा ! करु ना दे कामा धामा ॥३॥ करि पावन रे ! जीव दशे हे पडले, पाहण्या तुला जे अडले । रुप दाखिव रे ! ध्यान जयांचे नडले, तव प्रेम अंतरी जडले । योगींद्र मुनी सनकादिक हे आले, दर्शनार्थ उत्सुक झाले । (अंतरा) चल ऊठ येइ सामोरी । मिटवि या तमाची थोरी । सुखवि ह्या भक्त नरनारी । दे तुकड्याला तव पद-पंकज-प्रेमा, करु ना दे कामा धामा ॥४॥

· चल ऊठ हरी ! तव झोप द्वाड ही आम्हा ! करु ना दे कामाधामा ॥धृ॥ तू निजला रे ! नीजरूप घेवोनी, टेकती असूर निशानी । कुणि कोणाला ना पुसती अभिमानी. निती सोडलि ज्यांनी त्यांनी । ऋषि गोंधळले मठी मंदिरी रानी. त्रासले कामदेवानी । (अंतरा) मातामरि सुटल्या गावा । खंडोबा भैरवबाबा । काँलरा प्लेग वाघावा । उघड रे हरी ! नेत्र जरा घनश्यामा ! करु ना दे कामा धामा ॥१॥ बघ लोकांची दैना ही अति भारी, अन्नान्नि मरति नरनारी। दुःखद विघ्ने कोसळताती सारी, जनता ही जर्जर भारी । बहु चोरांची दाटी, डाके-मारी, नाटके तमाशे द्वारी । (अंतरा) पेटती अग्निच्या ज्वाला । धरणिकंप होतो भू-ला । अति पूर नदी-नाल्याला । पहा पहा जरा मधुसुदन विश्रामा ! करु ना दे कामा धामा ॥२॥ तव गोधन रे ! असुरांनी कापाचे, तुज नेत्रि कसे हे बघवे ? । तव भारतभू पारतंत्र्य गाठावे, शोभते कसे हे बरवे ? । (अंतरा) निंदक भक्ता छळताती । कोणि ना कुणाला पुसती । ऋतु काळवेळ ना बघती । ना सोसवते दुःख सख्या घनश्यामा ! करु ना दे कामा धामा ॥३॥ करि पावन रे ! जीव दशे हे पडले, पाहण्या तुला जे अडले । रुप दाखिव रे ! ध्यान जयांचे नडले, तव प्रेम अंतरी जडले । योगींद्र मुनी सनकादिक हे आले, दर्शनार्थ उत्सुक झाले । (अंतरा) चल ऊठ येइ सामोरी । मिटवि या तमाची थोरी । सुखवि ह्या भक्त नरनारी । दे तुकड्याला तव पद-पंकज-प्रेमा, करु ना दे कामा धामा ॥४॥

· चला गडे हो ! चला पंढरी, भाव धरुनिया मनी । विठोबा भेट देइ धावुनी ॥धृ॥ पुंडलिकाने करुनि कमाई, देव आणिला जगी । पहाया चला घेउनी सगी ॥ संसाराच्या सरोवरी ते, सौख्य न मिळते कुणा । विचारा विचारा करुनी मना ॥ (अंतरा) मनपणा सोडुनी हो उनिया मोकळे । देहभाव सगळा ओसंडावा बळे । मग रूप पहावे विटेवरी सावळे । आनंदाची नुरते सीमा, पहा पहा पर्वणी । निघा हो निघा अहंतेतुनी ॥१॥ वाटे भू-वैकुंठ उतरले, चंद्रभागेच्या तिरी । न दुसरे स्थान असे भूवरी ॥ सुकृत ज्यांचे उदया येई, ते जन वारी करी । विसरती भव-भय दुरच्या दुरी ॥ चहु मार्गांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ ध्वनी उठे अंबरी । वाटतो प्रेमभाव अंतरी ॥ (अंतरा) कडिकोट किले मजबूत बांधल्या गढ्या । निर्भये भक्तजन मार्गि घालत उड्या । नाचती लोळती घेउनिया सोंगड्या । काळ जाइना फुका, लाजतो यम पाहुनि दूरूनी । भक्ति जे करिती हृदयातुनी ॥२॥ आषाढी-कार्तिकीस येती, अफाट जन भक्तिने । रंगती हरुनि भेद उन्मने॥ दिंडी-पताका, मृदुंग-वीणे, असंख्यसे वाजती । कुंठते कर्णि ऎकता मती ॥ धो धो कर्णे, टाळ-झांजरी, आणिक वाद्ये किती । गर्जती भक्त मुखे अगणिती ॥ (अंतरा) "पुंडलीक वरदा हरि विठ्ठल" ऎकता । ती अफाट सेना डोळ्याने पाहता । पालख्या पादुका क्षणही सहवासिता । देहभाव हरतसे, काय मी सांगु पुढे काहणी ? पहा रे ! पहा एकदा कुणी ॥३॥ करुनि कृपा श्रीज्ञानदेव बोलले ग्रंथिच्या खुणा । जयांनी तुटति जीव-यातना ॥ सुलभ व्हावया मार्ग तुकोबा अभंग वदती जना । अभंगी लागे मन चिंतना ॥ एकनाथ एक नाथ आमुचा उदार होउनि मना । प्रगटवी गुप्त-गुह्य भावना ॥ (अंतरा) वसविली अशी ही पावन-भू भूवरी । सुख संतांचे माहेर खरी पंढरी । मी बघता झालो देहिच वेड्यापरी । तुकड्यादास म्हणे नरदेही घ्या सार्थक करवुनी । वेळ ही दवडु नका हो कुणी ॥४॥

· चला पंढरी, पंढरी पहायासी । विटेवर उभा हृषिकेशी ॥धृ॥ कटेवरि कर, कर ठेवूनिया, वाट पाहतो म्हणतो ‘या या’ । दया ये तया, सर्व जिवाची या, कष्टतो भक्तांच्या कार्या ॥१॥ दासि जनीच्या, गोवरिया वेची, शेती राखतो सावताची । रसिद नेउनी, बेदरि दामाजीची, मडकी घडवित गोराची ॥२॥ सोडि वैकुंठ, वैकुंठ मूळपीठ, धरिली मृत्युलोकि वाट । भीवरे तिरी, बसवुनीया पेठ, उघडले दुकान चौहाट ॥३॥ खरेदी केली, पुंडलीके सारी, घेतला विकतचि गिरिधारी । भक्तिभावाने, काय त्याचि थोरी, आपण तरुनि दुजा तारी ॥४॥ अती आनंद, आनंद वर्णवेना, भक्त नाचति मिळुनि नाना । टाळ-तंबुरे, मृदंग-ध्वनि ताना, मारती रंगुनिया ध्याना ॥५॥ दास तुकड्याची मति कुंठित झाली, पाहता विठ्ठल वनमाळी । बघा एकदा, येउनिया जन्मा, करा सार्थक रे ! गा नामा ॥६॥

· चला हो ! चला पंढरीला । विठ्ठल राजा वाट पाहतो, जिवा तारण्याला ॥धृ॥ कुणीही भाविक जरि गेला । शांतवि त्याच्या जिवा, देउनी अमर धाम त्याला ॥१॥ सुखावे सगुण रूप बनला । उभा विटॆवरि, कटावरी कर, बघतो दासाला ॥२॥ भीवरेतिरी वास केला । भक्त-जनांच्या-भक्ति-सुखाने, तिथेच स्थिर झाला ॥३॥ पुंडलिक-सेवा बघण्याला । आला तै पासुनी हरी हा, मूळ गाव भुलला ॥४॥ रंगला भाविक-भजनाला । ज्ञानोबाचे सुरस काव्य हे, आवडले त्याला ॥५॥ पाहुनि भक्ती गहिवरला । नामासंगे हरी कीर्तनी, देवपणा भुलला ॥६॥ नाचतो थै-थै रंगाला । संत तुकाचे प्रेम पाहुनी, राखी शेतीला ॥७॥ जनीच्या वेचत शेणीला । गोरोबाची घडवित मडकी, अती हर्ष त्याला ॥८॥ किती सांगू हरिची लीला ? भक्त-काम-कल्पद्रुम भक्तासाठी महार झाला ॥९॥ खजाना नेइ बेदरीला। दासासाठी त्या यवनाच्या जात सलामीला ॥१०॥ प्रीय हा एकनाथ त्याला । घेउनिया रुप तया घरी वाहतो कावडीला ॥११॥ भक्त चोखोबा प्रिय झाला । ओढू लागे ढोर तयासी, नाहि जात याला ॥१२॥ असा हा ठेवा भक्ताला । न सांगताची करितो कामे, ठावुक सकलाला ॥१३॥ जवळ हा आहे पंढरीला । उठा उठा रे ! चला पहाया या आषाढीला ॥१४॥ मेळ संतांचा बहु जमला । धो-धो वाद्ये कर्ण-तुतारी, सैन्यभार आला ॥१५॥ जणू या मृत्यू-लोकाला । तुकड्यादास म्हणे वैकुंठचि, ठाव खरा गमला ॥१६॥

· चला हो ! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू । भीवरे स्नान करुनीया, संत-पद-धूळ शिरि लावू ॥धृ॥ बोधरुप तुळशिच्या माळी, श्रवण-मणि चंदनहि भाळी । करू मननाचिया चिपळी, निजध्यासे हरी गाऊ ॥१॥ आत्मरुप-देव बघताना, हरे मन-भावना नाना । प्रकाशे ज्ञानदिप सदना, सोहळा डोळिया दावू ॥२॥ विठू सर्वत्र घनदाट, पंढरी विश्विची पेठ । दुजा नाहीच वैकुंठ, सदा येथेचि दृढ राहू ॥३॥ न मरणे, जन्मणे आम्हा, न भेदाभेदही कामा । म्हणे तुकड्या घनश्यामा-पदांबुजि शीर हे वाहू ॥४॥

· जगाचा मोह ना सोडी, कसा होशील रे ! साधू ? ॥धृ॥ बहु लोकेषणा मागे, न मिळतो वेळ ध्यानासी । खोवुनी वेळ ही ऎसी, कसा होशील रे ! साधू ? ॥१॥ इंद्रिये स्वैर चहू देशी, विषय भोगावयासाठी । लावुनी पाश हा पाठी, कसा होशील रे ! साधू ? ॥२॥ फसविती वासना सगळ्या, जगाच्या सौख्य-मोहाने । न वृत्ती स्थीर करिशी तू, कसा होशील रे ! साधू ? ॥३॥ म्हणे तुकड्या गृहस्थी हो, करी संसार नीतीने । जराशा पोट-भीतीने, कसा होशील रे ! साधू ? ॥४॥

· जाइल हा नरदेह गड्या ! मग काय पुढे करशील मजा ? ॥धृ॥ चार दिवस हे हौसेचे, समजोनि राहशी अंतरी तू । अति दुःख पुढे यम देइ जिवा, मग कोण तुला देईल रजा ? ॥१॥ करशील जसे भरशील तसे, चुकते न कसे कोणीही असे । तुकड्यादास म्हणे काय अम्हा करणे ? हुशियार रहा भरशील सजा ॥२॥

· जिवलग गुरुविण कोणि न मनुजा ! जग हे स्वार्थ-सुखाचे सगळे, शेवटि साथि न येई मनुजा ! ॥धृ॥ धनद्रव्यावर नाती टपती, द्रव्य जाय मग झुकुनि न बघती । सकळ जगाची ऎसी रीती, हीन-दिना कुणि जाणि न मनुजा ! ॥१॥ देह साजरा तोवरि कांता, रोगि होय मग घेई माथा । सांग सांग मग कोण अनाथा ? पाजिल तिळभर पाणि न मनुजा ! ॥२॥ दीनाचा एक सदगुरु दाता, दावुनि बोध देतसे संथा । तुकड्यादास म्हणे भ्रम आता, सोडी गुरुविण मानि न मनुजा ! ॥३॥

· झणि आला हा घनश्याम, गमे हा भास जिवा ॥धृ॥ झुणु झुणु वाजति भूवरी पर्णे, कोकिळ गाती हर्षभराने । मयुर नाचती अति प्रेमाने, मन घेइल हे विश्राम । गमे हा० ॥१॥ नीलवर्ण आकाशी उठला, वाटे हरि गरुडावरि आला । झू-झू ध्वनि कर्णी आदळला, वाटली बंसिची तान । गमे हा० ॥२॥ किरण मंद पिंगटसे उठले, मंद मंद वायू हा चाले । झिलमिल पाणी सुरू जाहले, झाले इंद्रिय एकतान । गमे हा० ॥३॥ गर्व तरूवर हलती सगळे, ऎकति पशु काननिचे चाळे । तुकड्यादास म्हणे गोपाळे, उरि भेटतसे बेफाम । गमे हा० ॥४॥

· ‘झणि हासति काय मला जन हे’, ही लाज मनी तिळमात्र नको ॥धृ॥ कार्य करा प्रभुला स्मरुनी, निःस्वार्थपणी प्रियता धरुनी । मग वानो कुणि निंदाहि कुणी, अभिमान मनी तिळमात्र नको ॥१॥ हे विश्व मकान खरे अपुले. समजोनि करी मग जीव-दया । अति क्रूर असूर असेल कुणी, वधण्यासि दया तिळमात्र नको ॥२॥ निर्माण करा प्रभुची, प्रभु देइल मोक्ष ययाचि मता । तुकड्या म्हणे काय अरे ! बघता ? घ्या कार्य करी अजि, वेळ नको ॥३॥

· टिकेना मोह कोणाचा, मनी का लोभ हा धरिशी । उगिच पापे करुनिया ही, जिवाला कष्टमय करिशी ॥धृ॥ किती राजे, महाराजे, होउनी जाति नी येती । न कोणी साथ दे काही, तूच का या भ्रमी मरशी ? ॥१॥ कांचनाची पुरी शोभे, रत्नमय रावणाची ती । ढसळता रीत कर्माची, न उरली कौडि ही सरशी ॥२॥ अती लोभे, अती पापे, कंस हा मातला होता । प्रभु धावोनिया त्याची, राख केली गृहासरसी ॥३॥ अरे ! जे शोभते तेची, करावे जीव-उध्दारा । सांगतो दास तुकड्या हा, प्रभू स्मर सत्य तू सरशी ॥४॥

· ठेवु कुणावर भार ? कन्हैया ! कोण करिल उपकार ? कन्हैया ॥धृ॥ स्वार्थलोभि ही जनता सारी, मज तारक कोणी न मुरारी ! ॥ जीव कसा जगणार ? कन्हैया ! ॥१॥ जिकडे पहावे तिकडे माया, मोहविकारे जळते काया । भक्ति कशी घडणार ? कन्हैया ! ॥२॥ तुकड्यादास म्हणे दिन आम्ही, लावी देह सख्या ! तव कामी । मज तुचि उध्दरणार कन्हैया ! ॥३॥

· तुझे सगुण रूप ध्यावे । माधवा ! केशवा ! ध्यावे तुला जीवभावे ॥धृ॥ मोरमुकुट साजिरा, धरुनी कटासी करा । पीतांबर पिवळा, विटेवरी लक्ष द्यावे ॥१॥ मूर्ती दिसे सावळी, शोभे तुळशी गळी । लागे मना आवडी, वाटे सदा नाम गावे ॥२॥ नको कुणी साधना, तूची असो मन्मना । तुकड्याची ही भावना, संती सदा टिकवावे ॥३॥

· त्या प्रीय शंकराला, जिव पाहण्या भुकेला । कैलासिच्या शिवाला, कुणि भेटवा अम्हाला ॥धृ॥ नरमुंड-माळधारी, विष-सर्प ते शरीरी । अवधूत वेषवाला, जिव पाहण्या भुकेला ॥१॥ व्याघ्रासनी विराजे, लल्लाटे चंद्र साजे । डमरू-त्रिशूलवाला, जिव पाहण्या भुकेला ॥२॥ शोभे जटेत गंगा, राही पिवोनि भंगा । अलमस्त बैलवाला, जिव पाहण्या भुकेला ॥३॥ नाचे पिशाच्च संगे, जो भिल्लिणीशि रंगे । वश होय भाविकाला, जिव पाहण्या भुकेला ॥४॥ करि शंख, नाद रुंजे, मुखि राम-राम गुंजे । क्षणि जाळिले मदाला, जिवे पाहण्या भुकेला ॥५॥ तुकड्या तयास ध्यायी, ध्यानी दिसो सदाही । हा हेत पुरविण्याला, जिव पाहण्या भुकेला ॥६॥

· दवडु नको रे ! रत्न गवसले, दगडाचे पोटी । पाहि दगड शोधुनी, लाव संधान तनूकाठी ॥धृ॥ शरिराचे शरिरात शोधुनी, आत शरिर पाही । आंतर शरिरी नेत्र प्रगटती, किति देऊ ग्वाही ॥१॥ तोचि नेत्र पाहता उमेचा, वर शंकर धाला । त्रैलोक्याचे जहर प्राशिता, भय नाही त्याला ॥२॥ नेत्राचे बिंदुले शोधता, हरपे मन-दृष्टी । जोवरि न मिळे नेत्रि ‘नेत्रिया’ तोवरी तू कष्टी ॥३॥ सोड पाश हा धर्म-कर्म-संस्कार खटाटोपी । पाहि गड्या ! ‘डोळ्याचा डोळा’ प्रगट दिसे आपी ॥४॥ धन्य धन्य ते गुरूराज, वैभवी स्वरूपाचे । तुकड्यादासा दिला ठाव, नित तत्-स्वरुपी नाचे ॥५॥

· धन्य जाहलो, सदगुरुचे चरणी । दाविली अघटित निज करणी ॥धृ॥ अजब ते घर, सुंदर साजाचे, दिसतसे औट हात साचे । तयाचे मधी, जगचालक नाचे, स्वरुप का बोलु अता वाचे । मुखे वदवेना, श्रमली वेदवाणी । दाविली अघटित ० ॥१॥ रत्न लाविले, आत दिव्य सात, तयांचा उजेड चकचकित । सदा झगमगे, न बोलवे मात, डुलतसे अजपा दिनरात । स्मरण स्फुरणाचे, आवाज घुमघुमित, त्रिवेणीसंगम झुरझुरत । सप्त हौदांचे, लहरावे पाणी । दाविली अघटित ० ॥२॥ बंद ठेविले, ते दसवे द्वार, नऊ खिडक्या त्या चौफेर । आत नांदती, स्त्रिया तिथे चार, तयांचे नावी घरदार । मनाजी गडी, करी कारभार, सदा पाहतसे व्यवहार । धनी सर्वांचा, एकविसा वरुनी । दाविली अघटित ० ॥३॥ गुंग जाहला, तया पुढे ज्ञानी, वृत्तिशून्यत्व अंगि बाणी । तेज फाकले, नच मावे नयनी, संशय विरले सर्व मनी । दंग होतसे, निज स्वरुपी प्राणी, सद्गुरु आडकुजी-ध्यानी । दास तो तुकड्या, सहज समाधानी । दाविली अघटित ० ॥४॥

· धरी निर्धार गुरु वचनी, भय हरेल या संसाराचे ॥धृ॥ ज्ञानामृत अंजन त्या नेत्री, नाशे पडळचि मोहाचे । षडविकार अंतरिचे नासुनि, प्रेम मिळे परमार्थाचे ॥१॥ गुरु-वचनी विश्वास धरूनी, किति तरले, तरती जगती । देव-ऋषी गुरुच्याचि प्रसादे, भव तरले निर्भयि साचे ॥२॥ तुकड्यादास म्हणे गुरुज्ञाने, प्रभुचे रुप हृदयीच मिळे । जळेल तम-अज्ञान मतीचे, मन रंगी हरिच्या नाचे ॥३॥

· धर्म कसला गुलामांना ? खेळ हा पोरखेळांचा ॥धृ॥ आज जी देवळे बघतो, उद्या त्या मसजिदी होती । कधी त्या चर्चची बनती, न उरला नेमची त्यांचा ॥१॥ दुजाच्या सांगणी वागे, कशाची भक्ति मग जागे ? न साधे धर्म या योगे, कळे हा भावची साचा ॥२॥ तुम्ही बोला तसे वागू, परी अम्हि धर्मची सांगू । देह हा जाहला पंगू, न उरला लेश शक्तीचा ॥३॥ न एका निश्चयी लागे, फिरे दुजियाचिया मागे । तो तुकड्यादास हे सांगे, बिघडला मार्गची त्याचा ॥४॥

· नटला हरि सुंदर विश्व कसा, मन मोहुनि ने बघता जिव हे ॥धृ॥ कुणि पंख सुरम्य दिसे म्हणुनी, मज दावित काननि या नटुनी । कुणि गोड स्वरे रव काढुनिया, मन रंगविती क्षण या ध्वनिनी ॥१॥ कुणि क्रूर मुखाते फाडुनिया, मनज दाखविती भय काननि या । कुणि दीन गरीब अम्ही म्हणुनी, पळती ‘भ्या भ्या’ हे वदुनीया ॥२॥ कुणि रम्य तुरंब फाकुनिया, वन साजविती मन लाजविती । कुणि सुंदर रंग सुगंध भरे, फुलवोनि फुले मजसी दिसती ॥३॥ अति सुंदर बाग दिसे असली, हरि ! जाण तुवा रचली सजली । तुकड्याची मती-गति कुंठुनिया, पहाता पाहणेपणिही बसली ॥४॥

· नवल वानु मी किती गुरुचे ? नवल वानु० ॥धृ॥ दुःसंगाने भ्रमलो आम्ही, त्यांनी दिली सुमती ॥१॥ अंधाराते दावुनि बोधे, लावि प्रकाशा-पथी ॥२॥ जग हे भ्रमबाजारी भुलले, विसले तव निश्चिती ॥३॥ तुकड्यादास म्हणे निज ओळख, दावित सत्संगती ॥४॥

· नसावा लोभ दुष्टांचा, मित्र जरि जाहला अपुला । असावा प्रेम थोरांचा, वैरि जरि भासला अपुला ॥धृ॥ कुणि अति प्रेम दावोनी, कापताती गळा वेळी । फसे हा जीव त्या योगे, नासतो जन्म हा अपुला ॥१॥ कुणी अति वैरही दावी, आपुले सार्थकासाठी । परी तो वेळ साधोनी, कामी ये थोर तो आपुला ॥२॥ धरावा संग ऎशाचा, जिवासी सत्यता लाभे । म्हणे तुकड्या हरी-भजने, सुसंगी मोक्ष हा अपुला ॥३॥

· निरशुनी बघ जरा देवा ! गती अमुच्या समाजाची । भारता भीक दे काही, बिघडली रीत रक्ताची ॥धृ॥ कुणाचा मान ना उरला, विषयरस धुंदसा भरला । कुणी दाता नसे उरला, हाव बहु धाव स्वार्थाची ॥१॥ प्रेम निष्कामि ना कोठे, भक्तिचे ये तनू काटे । जाति पापाचिया वाटे, ढसळली चाल लोकांची ॥२॥ साधुचे कोणि ना ऎकी, भोंदुपण वाढले लोकी । उसळली वृत्ती असुरांची, भाविकासी बहू जाची ॥३॥ म्हणे तुकड्या कली आला, निशाणी टेकला झाला । संति आधीच गौरविला, तशी झाली खुशी यांची ॥४॥

· पंढरपुरच्या बादशहाचे सज्ज शिपाईगडी । निघाले दरबारी तातडी ॥धृ॥ बादशहाचे हुकुम पावता पेश व्हावया पुढी । घालती निर्भयमार्गी उडी ॥ आर्त होउनी निघती वाटे, भेटाया धडपडी । अंतरी बाहेरी आवडी ॥ (अंतरा) घरकाम कशाचे ? काहि सुचेना तया । चढविती आपुल्या निर्मळ पोषाखिया । खांदि पताका झळकत भगव्या, जाति मिळुनि सोंगडी । निघाले दरबारी तातडी ॥१॥ अफाट सैनिक जमले मार्गी शस्त्र घेउनी भले । टाळ आणि मृदंग, तंबुरि खुले ॥ ‘विठ्ठल’ नामे करित गर्जना अंतरंगि रंगले । नाचती घडि घडि सुख चांगले ॥ धो-धो वाद्यहि रणवाद्यासम समरांगणि गर्जले । विठुचे सैनिक येती खुले ॥ (अंतरा) पालख्या-पताका घड्या-चौघड्या किती । कोंदला नाद बहु, टाळ-वाद्य अगणिती । भेरिया नगारे मृदंगही वाजती । असंख्य गर्दी, अपुर्व शोभा, धन्य धन्य ती घडी । निघाले दरबारी तातडी ॥२॥ गजबजली चौफेर पंढरी, सैन्यभार लोटला । ध्वनी-प्रतीध्वनी एक ऊठला ॥ मस्त हत्तिसम थै-थै नाचत सैनिक येती पुढे । ‘जय जय ज्ञानदेव’ कडकडे ॥ ‘ज्ञानदेव सोपान निवृत्ती मुक्ताई’ चे धडे । गर्जती ‘तुकाराम’ चौघडे ॥ (अंतरा) नच रीघ उरे पै-पाय मुंगि जावया । जन असंख्य येती सैनिक हे पहावया । दणदणे विठूचे महाद्वार नादि या । वाटे की वैकुंठ उतरले मृत्युलोकिच्या थडी । निघाले दरबारी तातडी ॥३॥ पंढरपुरचे निर्मळ दैवत आहे आमुच्या घरी । वाडविलास त्याचि चाकरी ॥ आजे-पणजे वारिच करिता पंढरीस अर्पिले । विठूच्या दरबारी ठेविले ॥ खांदि पताका, हाति टाळ आणि गळा माळ तुळशिची । मुखी नामावलि पंढरिची ॥ (अंतरा) भाग्याचे आम्हा पंढरपुर भेटले । आषाढिस जाता हे सोहळे पाहिले । मन उन्मत्त झाले मस्त डोलु लागले । तुकड्यादास म्हणे साधा तरि, एकवेळ ती घडी । निघाले दरबारी तातडी ॥४॥

· पावना सख्या श्रीरामा ! मनमोहन मेघश्यामा ! ॥धृ॥ मशि भेट एकदा वाटे, हा जीव जरा ना कंठे । ये मुनिजन-मन-विश्रामा ! मनमोहन मेघश्यामा ! ॥१॥ नर-जन्माचे सार्थक हे, तव रूप पाहणे सुख हे । मग कोणि न येति कामा, मनमोहन मेघश्यामा ! ॥२॥ अनुभवी सांगतो ऎसे, तू जीवाचा सुखराशी । तुकड्याचा पुरवी प्रेमा, मनमोहन मेधश्यामा ! ॥३॥

· पाहतात तरी का कोणी ? तुझि दैना केविलवाणी । गायिगे ! ॥धृ॥ गेला तव रक्षक आता, श्रीकृष्ण जगाचा त्राता । गायिगे ! ॥ श्री दत्त गुप्त ते झाले, मज वाटे तुजवर रुसले । गायिगे ! ॥ (अंतरा) शिव हरे, लाविले पुरे, नेत्र साजिरे, बैसले ध्यानी, तुझि हाक घेइना कोणी । गायिगे ! ॥१॥ उरले हे हिंदूधर्मी, कृषिप्रधान देशी कर्मी । गायिगे ! ॥ त्यांचिया बुध्दिची गाणी, सांगतो ऎक गार्‍हाणी । गायिगे ! ॥ अति स्वार्थ तयांना झाला, धर्माचा आदर गेला । गायिगे ! ॥ (अंतरा) सुर्मती, तुला काढती, बाजारी किती, विकती हौसेनी, कटि खोचति रुपये नाणी । गायिगे ! ॥२॥ नच जरुर तुझी लोकाला, वाटते असेची मजला । गायिगे ! ॥ मग दूध कशाला देशी ? पुत्रासम सेवा करिशी । गायिगे ! ॥ किती गोड तुझा हा पान्हा, पाजशी दुष्ट लोकांना । गायिगे ! ॥ (अंतरा) किति प्रेम, तुझे हे नेम, अंतरी क्षेम, क्रोध ना आणी, नच उदार तुजसा कोणी । गायिगे ! ॥३॥ किति सुंदर गोर्‍हे देशी, जुंपण्या अम्हा शेतीसी । गायिगे ! ॥ नच काहि मनी आणोनी, पुरविशी दही-दुध-लोणी । गायिगे ! ॥ दुष्टांना आणि सुष्टांना, अपुल्यांना अणि परक्यांना । गायिगे ! ॥ (अंतरा) ही कीव. घेति जरि देवम चुके तव भेव, प्रार्थितो चरणी, तुकड्या हा करुणा-वाणी । गायिगे ! ॥४॥

· पाहतोसि अंत काय, नंद-नंदना रे ! ॥धृ॥ दीन अम्ही घाबरलो, भवचक्री सापडलो । ‘सुख’ म्हणुनी गडबडलो, ऎक वंचना रे ॥१॥ पाहुनि जनि सृष्टि-खेळ, नटलो बहु करुनि मेळ । खोवियली ऎसी वेळ, कोणि ना सखा रे ! ॥२॥ सोसियले दुःख किती, परि येईना सुमती । अंतकाळि काय गती, होइल गिरिधारे ! ॥३॥ बुध्दि दे अम्हास अता, लागू तव नाम पथा । होउ नकोसी परता, देइ दर्शना रे ! ॥४॥ वेळ गेलिया निघून, काय पाहशी दुरून ? । तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देइ बारे ! ॥५॥

· पुनित हा देह करू आपुला । बहु कष्टाने बहु पुण्याने प्राप्त अहो ! झाला ॥धृ॥ खोविता देहाची वेळा । कोटी धन वेचता मिळेना दुरावोनि काळा ॥१॥ अमोलिक देहाची संधी । हरि नामाने पुनित करू या, लागू प्रभु-छंदी ॥२॥ चला रे ! चला उठा वेगे । संत-महंतहि अनुभवि गेले, जाऊ त्या मार्गे ॥३॥ म्हणे तुकड्या या भक्तीने । संत तुकोबा साधुनि गेला देवाच्या धामे ॥४॥

· प्रपंचहि का असा व्हावा ? जिथे हरिचे नसे नाम । कृपाळू श्रीहरीने हो ! दिले नरकायि शुभ काम ॥धृ॥ मनाची धाव ती सगळी विषय-भोगतची लोळे । कुठे करतील तप भोळे ? नसे एका मुखी ‘राम’ ॥१॥ मनी घरदार हे खळे, म्हणे ‘कोठे गडी सगळे ?’ । सदा धन-संपत्ती लोळे, पहाया वाढला नेम ॥२॥ ‘मला हे द्या, मला हे द्या, मला द्या सर्व घरदार । बुडविले यातची थोर, कशाचा तो पुढे श्याम ? ॥३॥ प्रपंच लावुनी आस, स्व-घरचा सोडला ध्यास । म्हणे तुकड्या तया नाश, कधी ना भेटतो राम ॥४॥

· प्रभु ! बोल बोल अनमोल, प्रेम तू का सोडला ? । विपरीत असा हा काळ, भारता का ओढला ? ॥धृ॥ (अंतरा) शेतीत पिके ना होती । ऋतु काळवेळ ना बघती । दुःखद विघ्ने कोसळती । हे सर्व दिसुनिया असे, बघवते हे का तुला ? ॥१॥ (अंतरा) अन्नान्न भरतभू झाली । कांचने होति ओतियली । ती वेळ कुठे रे ! गेली ? । रुसलासि अम्हावरि काय, कृपा कर का ओढला ? ॥२॥ (अंतरा) अति शूर धुरंधर होते । प्राणापरि जपसी त्याते । ते भक्त तुझे का होते ? । लेकरा विसरुनी अता, मार्ग हा का मोडला ? ॥३॥ (अंतरा) देवळे स्मशाने झाली । अबलांची इभ्रत गेली । दास्यात भरतभू पडली । तुज कसे शोभते हरी ! ब्रीद-पथ का सोडला ? ॥४॥ (अंतरा) गर्जती पुराणि ज्ञाते । ‘राखील प्रभू आम्हाते’ । किती वेळ ? सांग तरि बा ! ते । तुकड्याची हाक घे आता, प्रेम अधि का जोडला ? ॥५॥

· प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ? ॥धृ॥ कुणाला भाग्य देवोनी, बसविले मंचकावरती । कुणी किति कष्ट जरि केले, तरी राहतात उपवासी ॥१॥ कुणाला झोपडी नाही, रहाया तिळभरी कोठे । तया मुल-बाळ बहु देशी, मजा बहु लांबुनी बघशी ॥२॥ कुणी करताति नवसाला, करोडो द्रव्य देवोनी । न देशी पुत्र एखादा, असा का भेद तुजपाशी ? ॥३॥ कुठे हे दे, कुठे ते दे, न देशी सर्व कोणाला । सुखास्तव झुरती सारे, कळेना मार्ग कोणासी ॥४॥ म्हणे तुकड्या तुझी लीला, पहाता वेद मौनावे । दीन अम्हि काय सांगावे, तुझी माया असे कैसी ? ॥५॥

· फोल ते संत आम्हासी, वागण्यावीण जे ज्ञानी । मुखे करि ब्रह्म-चर्चेला, पळे इंद्रीय अडरानी ॥धृ॥ ‘तयाविधि-नेम-ना’ म्हणती, जरी चालोत ते कुरिती । शक्य हे होईना संता- ‘कधी करतील मनमानी’ ॥१॥ तयांना कर्म ना उरले, तरी ते जगति का उरले ? । भोगण्या भोग देहाचा, होतसे पाप का कळुनी ? ॥२॥ जगाच्या पाप-पुण्याची, जरी ना कल्पना त्यांना । खाति आणि राहती कैसे, चटुरे माल खावोनी ? ॥३॥ बुडविला धर्मची त्यांनी, भोंदुना वाव देवोनी । संत ना राहती ऎसे, सारिही ढोंगमय करणी ॥४॥ संत ते मानतो आम्ही, राहती संगती तैसे । तो तुकड्यादास सांगतसे, न इतरा ठाव द्या कोणी ॥५॥

· बघु नको अशी डोळ्यांनी, अग गायी ! केविलवाणी । मजकडे ॥ वाटते दुःख अति भारी, नेताति तुला हे वैरी हाकुनी । द्रव्याचा अपव्यय करुनी, पापांच्या राशी भरुनी । नेति हे ॥ (अंतरा) ना दया, जरासी मया, तया पापिया, उपजली ध्यानी, ठेवती सुरी तव मानी । गायिगे ! ॥१॥ जा सांग सुखे देवासी, "हिंदुची बुध्दि का ऎसी । घातली ? ॥ मी दूध देतसे यांना, तरि विकती माझ्या प्राणा" । सांग हे ॥ "वत्सास जुंपती शेती, अणि माझी ऎशि फजीती" । सांगहे ॥ (अंतरा) "अति उंच, हिंदुचा धर्म, परी हे कर्म, सोडुनी वर्म, पळति अडरानी । नुरला मम त्राता कोणी" । सांग हे ॥२॥ "गोपाळ कशाचे हिंदू, गो-काळाचा त्या छंदू । लागला ॥ मौजेने विकती मजला, अति स्वार्थ तयांना झाला । आवडी ॥ मज तोडतील जे काळी, मी देइन शाप उमाळी । हिंदुना" ॥ (अंतरा) ‘घ्या चला, विका आईला, रिकामी तिला, म्हणोनी कोणी, आवडेल का ही गाणी । आमुची ? ॥३॥ मज क्रूर समज तू आता, तरि काय करू मी माता ! सांग हे ॥ नच द्रव्य आमुच्या पाशी, घेतो तरि जोरच यासी । पाहिजे ॥ मनि तळमळ अतिशय वाटे, तव काळ कसा गे ! कंठे ? दुःख हे ॥ (अंतरा) करु काय, नाहि उपाय कष्टतो माय ! सांगतो कानी, तुकड्याची ऎका कोणी विनवणी ॥४॥

· बा ! प्रपंच-वन हे दाट, सुचेना वाट, चढाया घाट, तुझा श्रीहरी ! कर दया, आवरी माया अजुनी तरी ॥धृ॥ वनि मद-मत्सर जंबुके, अवेळी भुके, करिति गर्जना । कधि बा ! धरती हे ? भिववुन सोडिति मना ॥ वासना-वीज कडकडे, घडी-घडी उडे, विषय-अंधारी । मार्गात लागते ठेच जिवाला भारी ॥१॥ कधि काम-व्याघ्र खळबळे, क्रोधे जळफळे, आरळी मारी । धाव रे धाव ! करु कायच वाटे हरी ! ॥ आशा-तृष्णा ह्या नद्या, न वाहति सुद्या, ओढिती धारी । टाकताचि पाउल पुढे फजीती सारी ॥२॥ करु काय ? सांग सदुपाय, वाटतो पाय कठिण देवाचे । पाश हे कधी तुटतील पापि जीवाचे ? ॥ तुकड्यादास ठाव दे अता, नसे तारिता, तुझ्याविण कोणी । दे प्रकाश मज या भयाण काननस्थानी ॥३॥

· बोल बोल बा ! बोल भारता ! चिंतातुर का असा ? हाल-बेहाल तुझी लालसा ॥धृ॥ स्वातंत्र्याच्या उन्नत शिखरी निर्भय सेना तुझी । सोडुनी आज दशा का अशी ? ॥ वेदांताची उंच गर्जना, भार ऋषींचे तसे । सोडुनी वन-वन का फिरतसे ? ॥ भारतमय श्रृंगार तुझा तो काय कुठे लोपला ? बावरा फिरशी का एकला ? ॥ (अंतरा) तव मुकुत भक्त-हिरकणे विखुरले कसे ? । तव हृदय-कवच पंडीतहि जागी नसे । कर-कमालीची तरवार वीर ना दिसे । धैर्य-तेज-विजयता लीपलो, प्रसंग दुर्दैवसा । सांग बा ! प्राप्त जाहला कसा ? ॥१॥ तुझ्या कीर्तीची ध्वजा पहाता आयुष्यही ना पुरे । गंज-अधिगंज पुराणे भरे ॥ रत्नजडित किति कनक रुप्याचे जडाव तव साजिरे । गजावर लक्ष्मि भरार्‍या करे ॥ सदा सुखी आनंदित जनता, वीर वृध्द-लेकुरे । खेळती सिंह जसे वनि फिरे ॥ (अंतरा) श्रीमंत-संत आणि राव-रंक एकसे । नच भेद कुणाला तयी कधी गमतसे । अधिकारान्वघि ते आरुढले, समरसे । अघोर संकट दिसे अचानक, जशी उतरली नशा । नसातुनि रंग दिसे भलतिसा ॥२॥ कष्ट करीता ढोरासम ही पिके न शेती जरा । द्रव्य व्यसनात होतसे चुरा ॥ विषयांधासम फिरती तरुणहि, तरुणी दुसर्‍या घरा । शांति ना मना तयांच्या जरा ॥ ऋतु काळ ना बघे, कधी जल, उष्ण वाढती मधे । वाहती वेळ-अवेळी नदे ॥ (अंतरा) काय ही दुर्दशा आली ग्रहणे जशी । निर्जली निर्फली दुर्बल झाली कृषी । ती गजांतलक्ष्मी पळे, गमे परकिसी । चिन्ह दिसेना बरे, ऊठ तरि सावध होई कसा । कळेना काय ? स्वस्थ तू असा ॥३॥ निरिक्षुनी पाहता तुजकडे दिसशी वेड्यापरी । कोण हे ओढिति तुज बाहेरी ? ॥ परिस्थितीच्या लाल धुरंधर ज्वाला भवतालुनी । पोहोचल्या पेट घेत आतुनी ॥ निसर्ग वन साजिरे, धैर्य-बलवीर वृक्ष कडकडे । अग्निने जागि जळोनी पडे ॥ (अंतरा) कुणि शांतविता नाहीच तुझ्या बाजुला । हे पुत्र असुनिया करिती अरि-गलबला । ओढती आप आपुल्याकडॆ तुजला । काळ वेळ ही अशी पातली, पाहतो का प्रभु असा ? । पुढे तरि देइल का भरवसा ? ॥४॥ भयाण ऎशा कठिण प्रसंगी साथ कोण दे तुला ? बोल हा आठवतो का खुला ? ॥ राहु-केतुच्या कचाटियातुनि बंध तोडुनी तुझे । कोण उचलतील बा ! हे वझे ? ॥ अर्धोन्मिलितापरी प्राण तव, छिन्न-भिन्न गमतसे । कोण तव यश घेइल सायसे ? ॥ (अंतरा) दे हाक रामकृष्णासम व्हाया उभे । तुझि सत्य हाक ही कळेल त्यांच्या सभे धावतील ओढाया असुरांच्या जिभे । तुकड्यादास म्हणे पाहवेना, अम्हा त्रास हा असा । मिळो स्वातंत्र्य पुन्हा जगदिशा ! ॥५॥

· बोलु काय ? बोलवेन , आपुलिया दोषा । तूचि सर्व-साक्षी आदी, अनादी परेशा ! ॥धृ॥ त्रिविध तापांचा संग, न पाहावे डोळा । रिपु क्लेश त्रास देती, वाढवोनि ज्वाळा ॥१॥ आसक्ति गुंतवी, तुझ्या सोडुनिया प्रेमा । कर्म-धर्म नष्ट होती, ढासळिता नेमा ॥२॥ ऎसिया चिंतनी वेळ, जातसे निधाना ! लाज वाटे सांगताचि, तुज घनश्यामा ! ॥३॥ करि कृपा त्रास टाळी, जाचणी यमाची । तुकड्यादास ठाव देई, मागणे ते हेची ॥४॥

· भगवंता ! लक्ष्मीकांता ! तारि बालका ॥धृ॥ मोहविकारे जीव थरारे, कोणि ना सखा । संसारी दुःख भारी, कावला फुका ॥१॥ तुझिये स्वरूपी चित्त वसू दे, घेउ दे सुखा । मन रंगो नाम गाता, न घे आणिका ॥२॥ मरणी मरू दे पाहता तुलाचि, नाहि पारखा । तुकड्याचि हाक घ्या हो, विसरू नका ॥३॥

· भटकला, कितिक भटक्शी ?, न झाली खुशी विषय-भोगाची ? । रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥धृ॥ हे अजब वाटते पिसे, तुला रे ! नसे, हौस तरण्याची । मग ओरडशी जव येइल फेरि यमाची ॥ ना कुणी येइ रक्षण्या, समज शाहण्या ! गतिच देहाची । तुज कशी नसे रे ! बुध्दी अपरोक्षाची ? ॥ वरि-वरी दावितो ज्ञान, असे अज्ञान, गोष्ट अंतरिची । रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥१॥ बहु फिरत फिरत येउनी, पावला झणी, तनू मनुजाची । धाडिली विचारा करिता-करिता साची ॥ वाचुनी बहूत पुरण, धरी अज्ञान, होत तू वाची । ना अनुभव ऎसा सर्व जनी बघलाचि ॥ रे ! जाण पशूपक्षि जे, ययानी किजे, धाव पुढच्याची । परि नसे फिकिर त्या खाण्याची दिवसाची ॥ जाहला नीच त्याहुनी, समज रे ! मनी, गोष्ट स्वहिताची। रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥२॥ सांगती संत ते बोध, तुला ये क्रोध, दुही सुजनाची । कर विचार आता, करि भक्ती ईशाची ॥ नवमास उदरि साहुनी, त्रासली मनी, जननि ते तुमची । का केली अपकीर्ति हो ! तिच्या नावाची ? ॥ तो तुकड्या सांगे सार, नसे आधार, स्थिति सर्वांची । रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥३॥

· भारत-तरुणांच्या कानी, ऎकवा हाक जोरानी । बंधुनो ! ॥धृ॥ सांगा मम कहाणी त्यांना, चुकवा देशाची दैना । आमुच्या ॥ सोपले तुम्हावर त्यांनी, शिव छत्रपति राजांनी । शेवटी ॥ (अंतरा) या उठा निर्भये दटा, भूमि चोर्‍हाटा । धरा गाठोनि, धरा गाठोनी । धरि राहु नका रे ! कोणी बंधुनो ! ॥१॥ रक्त हे देशभक्तीचे, उसळवा वीर-शक्तीचे । आपुल्या ॥ घ्या करा संघ निर्माण, धर्माकरिता द्या प्राण । अर्पुनी ॥ ज्वानीच्या कर्तव्याला, द्या ज्योत चेतवा ज्वाला । धावुनी ॥ (अंतरा) फडकवा, रंग भगवा, करोनी नवा । दिवा लावोनि, दिवा लावोनी । या या रे ! पुढती कोणी, तरुण हो ! ॥२॥ ‘दीनावर हल्ला करणे, हे पाप घोर’ थोराने । वर्णिले ॥ ‘दुष्टासी दंडण देणे, हे पुण्यमयाचे लेणे’ । वर्णिले ॥ हे ज्ञान सांगते गीता, मग का ऎसे रे ! भीता ? तरुण हो ! ॥ (अंतरा) घ्या मनी, उठा जागुनी, प्रभू तो धनी । जिवी चिंतोनि, जिवी चिंतोनी । तुकड्याची वार्ता कानी । घ्या जरा ॥३॥

· भारत-तरुणांच्या कानी, ऎकवा हाक जोरानी । बंधुनो ! ॥धृ॥ सांगा मम कहाणी त्यांना, चुकवा देशाची दैना । आमुच्या ॥ सोपले तुम्हावर त्यांनी, शिव छत्रपति राजांनी । शेवटी ॥ (अंतरा) या उठा निर्भये दटा, भूमि चोर्‍हाटा । धरा गाठोनि, धरा गाठोनी । धरि राहु नका रे ! कोणी बंधुनो ! ॥१॥ रक्त हे देशभक्तीचे, उसळवा वीर-शक्तीचे । आपुल्या ॥ घ्या करा संघ निर्माण, धर्माकरिता द्या प्राण । अर्पुनी ॥ ज्वानीच्या कर्तव्याला, द्या ज्योत चेतवा ज्वाला । धावुनी ॥ (अंतरा) फडकवा, रंग भगवा, करोनी नवा । दिवा लावोनि, दिवा लावोनी । या या रे ! पुढती कोणी, तरुण हो ! ॥२॥ ‘दीनावर हल्ला करणे, हे पाप घोर’ थोराने । वर्णिले ॥ ‘दुष्टासी दंडण देणे, हे पुण्यमयाचे लेणे’ । वर्णिले ॥ हे ज्ञान सांगते गीता, मग का ऎसे रे ! भीता ? तरुण हो ! ॥ (अंतरा) घ्या मनी, उठा जागुनी, प्रभू तो धनी । जिवी चिंतोनि, जिवी चिंतोनी । तुकड्याची वार्ता कानी । घ्या जरा ॥३॥

· भारता ! बलवान व्हाया, वाचवी जिव गायिचे ॥धृ॥ लोभ हा सोडी वृथा, का मांस विकसी तू तिचे ? । चाटुनी नख-पाउला, सुख पावशी का दूरचे ? ॥१॥ भारताचे पुज्य जे, अवतार कृष्णादीक हे । सांगती का हे तुम्हा ? ‘घ्या प्राण अपुल्या आईचे’ ॥२॥ याद ही ठेवा मनी, या भारताच्या बंधुनो ! । पुण्य हे फळले अम्हा, त्या अजवरी निज मायिचे ॥३॥ दास तुकड्या सांगतो, विसरू नका हो गायिला । घ्या दूध, निर्भय होउनी, मिळवा अमरपद स्थायिचे ॥४॥

· भारती रहवासियांनो ! वाचवा जिव गायिचा ॥धृ॥ सांगतो इतिहास ऎसा, भारताच्या ग्रंथिचा । ‘बहुमोल आम्हा गाय हे, जणु प्राणची मम आईचा’ ॥१॥ देश हा कृषि-उद्यमाचा, भोवताली वेष्टिला । धान्य बहु पिकती फळे, हा भाग त्या गो-मायिचा ॥२॥ कष्ट साहुनि देतसे, दहि-दूध-लोणी ही जशी । पुत्र देउनि आपुला, वाहवीतसे भर शेतिचा ॥३॥ दास तुकड्या सांगतो, शोधोनि पाहावे बुध्दिने । जीव का वधता तिचा ? हा घात निश्चयि आमुचा ॥४॥

· भाललोचना ! रे गड्या ! भेटि देइ आज । उध्दरिली महानंदा कृपेने सहज ॥धृ॥ उपमन्यु बाळासाठी केला दुग्धसिंधू । हलाहल प्राशूनिया राखियली लाज ॥१॥ ऎसी वेदग्रंथ कीर्ति वर्णिती अनंत । ऋषिमहंतांचे तुवा पुरविलेसि काज ॥२॥ घेउनि त्रिशूल डमरू, नंदिस्वार होत । अर्धांगि सती पार्वती, गणपती सिध्दिराज ॥३॥ भूत डाकिणी पिशाच, घेउनी सहीत । तुकड्या म्हणे कैलासी, उभारिला ध्वज ॥४॥

· भाविकाच्या भक्तिचा, नच पंथ कोणी पाहिला । प्रेम हा निरपेक्ष त्याचा, सर्वदेशी राहिला ॥धृ॥ विश्वव्यापी देव त्याचा , बाहिरी अणि अंतरी । पूजना हे कार्य त्याचे, देह त्यासचि वाहिला ॥१॥ सर्व पंथही होत त्याचे, शुध्द जे राहती जगी । ना दुजा कधि भाव त्याचा, ‘मी भला, माझा भला’ ॥२॥ रंजल्यासी गांजल्यासी, ‘आपुले’ म्हणवूनिया । कष्टतो सुख द्यावया, करि प्राण खर्चहि आपुला ॥३॥ अखिल जग हे मंदिरासम, मानुनी सेवा करी । तुकड्या म्हणे तो धन्य साधू, जो जगी या गाइला ॥४॥

· भुलु नका हो ! चमत्कारा, जगी ही थापची सारी । लूटती भोंदु अपणाते, दावुनी थोरवी भारी ॥धृ॥ संत जरि पुत्र हे देती, न मरते लोक पृथ्वीचे । निकामी स्वार्थि जन भलत्या, रडोनी सांगती थोरी ॥१॥ कावरे लोभि जे असती, भ्रष्ट होती तयाच्याने । न सुचते ज्ञान हे त्यांना, मिरविती भोंदुची थोरी ॥२॥ ठेवुनी साक्ष ‘ज्ञानोबा’, म्हणे ती भीत चालविली । कळेना वर्म संतांचे, वाहती मार्गि काटेरी ॥३॥ चमत्कारेच संतांची, परिक्षा होत जरि असती । गारुडी काय ना करिती ? लावती बाग आंबेरी ॥४॥ संत तोची जगी जाणा, जयाचे विषय हरि झाले । म्हणे तुकड्या निजज्ञाने, बोधुनिया जना तारी ॥५॥

· भोग हा चुकेना कोणा, देव-दानवा । सृष्टि भोग भोगी देही, मागचा नवा ॥धृ॥ संत-साधु योगी-मौनी, प्राक्तना चुकविना कोणी । मृत्युपरी पावे ग्लानी, दुःख या जिवा ॥कोणा०॥१॥ ब्रह्मनिष्ठ नारद स्वामी, भोग-भ्रसे रतला कामी । आपणची स्त्रीच्या उर्मी, प्रसवला भवा ॥कोणा०॥२॥ पुत्री विधात्याने धरली, पितृ-भावना ही हरली । भिल्लिणिची प्रीती स्फुरली, भोळिया शिवा ॥कोणा०॥३॥ सुख-दुःख दैवे पावे, सकळ शास्त्रियांसी ठावे । सांगतसे तुकड्या भावे, येई अनुभवा ॥कोणा०॥४॥

· मंजुळ हा नाद आला, कोठोनी बंसिचा । पहायासी कृष्ण ! झाला जिव वेडा आमुचा ॥धृ॥ कुणि सांगा मार्गियांनो ! दिसला तो का कुणा ? त्याविण या लोकि झालो, दुबळासा मी सुना ॥१॥ दचकोनी उठविताना, स्वप्नचिसा भेटला । झणि पाहो परि न भासे, ऎसा का करि भला ? ॥२॥ अजुनी ना विसरला तो, खेळवणे आपुले । अम्हि दुःखी बहुत त्याने, का ना हे जाणले ? ॥३॥ मज वाटे भेट द्याया, लपुनी तो येतसे । तुकड्याची हाक कानी, लांबुनिया घेतसे ॥४॥

· मंजुळ हा नाद आला, हरिचीया बंसिचा । मनि गमले शोध घ्याया, आला तो आमुचा ॥धृ॥ त्या कळते सर्वभावे, अंतरिच्या ह्या खुणा । लपवोनी काय चाले, भानूच्या भानुना ॥१॥ तो दिसतो हा उभा या नेत्रांचे आतुनी । नाचतसे पाहुनीया, नामाची मोहनी ॥२॥ घन कांती फाकलीसे, निल अंगीचा झगा । मुकुटाचे तेज शोभे, किरणांना या बघा ॥३॥ अति जवळी येउनीया, हासतसे श्रीहरी । तुकड्याचा भाव प्रेमे, उसळी घे श्रीहरी ॥४॥

· मज वेडिया पहाताच, तुम्हा वेड लागु द्या । बिघडा असेच भक्तिसी नि वृत्ति जागु द्या ॥धृ॥ हे ऎकता जसे मनी तसेच राहु द्या । मग वागुनी जनी, वनी, जिवासि रंगु द्या ॥१॥ मजहुनि अधीक थोर थोर, जन्म पावु द्या । जरि आज भासती तरी, अधीक वाढु द्या ॥२॥ हरिभक्त होउ द्या नि पाप-मुक्त होउ द्या । मज लोपवोनि अधिक तेज, लोकि सेवु द्या ॥३॥ तुकड्याचि आस येवढीच पूर्ण होउ द्या । मिटवोनि द्रोह-बुध्दि, लोकि प्रेम वाहु द्या ॥४॥

· मन चौर्‍यांशी फिरवीते हे । मन मोक्ष-सुखाला नेते हे ॥धृ॥ ऎक गड्या ! मन पवित्र कर हे, संतसमागम करुनीया । नाहि तरी जाशिल वाया, मन विषय-चिंतना देते हे ॥१॥ सद्ग्रंथांचे पठन करी, अभ्यास करी मन स्थिरण्याला । चिंतावा मुरलीवाला, मन अनन्यभक्ती घेते हे ॥२॥ तुकड्यादास म्हणे ही वेळा, मिळते काय पुन्हा बापा ! । चुकवी चौर्‍यांशी खेपा, मन जे करशी ते देते हे ॥३॥

· मन बावरे तुझ्या विरहे, काही सुचेना । जिव घाबरी अती भ्रमरा-परिस, बसेना ॥धृ॥ ‘असशी कुठे तू हरी ?’ ही चिंतना अती । ‘कुणि भेटवील का ?’ म्हणुनी भटकते मती ॥१॥ काशी नि द्वारका करुनी, तीर्थ फिरुनी । चारीहि धाम हे पहाता, ना दिसे कुणी । मनि शांति ना जरा दिसते, नेत्र फसेना ॥२॥ कुणि संत, साधुही वदती, जवळची हरी । पहा ज्ञान-दिवा लावुनिया, हृदय-मंदिरी । नच मार्ग मिळे हा दृढ या, व्हावया मना ॥३॥ ये भेटे सख्या ! पतितासी, रुक्मिणी-वरा ! तू सर्वसाक्षि हे कळले, तुजचि श्रीधरा ! तुकड्याची आस ही पुरवी, देइ दर्शना ॥४॥

· मना रे ! ध्यास धर हरिचा, विसरुनी लक्ष्य विषयाचे ॥धृ॥ प्रपंची कोण सुखि झाला ? न दिसला, एकिला ऎसा । जयाने राम वश केला, वंदिती पाय जन त्याचे ॥१॥ विषय हे नाडिती देहा, नि आयूही फुकी धाडी । प्रभु-सुख घे जीवी धरुनी, न भय मग जन्म-मरणाचे ॥२॥ म्हणे तुकड्या धरी नेमा, स्मराया श्रीहरी-नामा । नामची नेइ निजधामा, न इतरे कोणि कामाचे ॥३॥

· मना रे ! नाम जप हरिचे, सुखाचे घोस लाभाया । भटकशी कां विषय-मार्गी ? अधिकसे दुःख भोगाया ॥धृ॥ कुणी सत् प्रेम धरुनीया, हरीच्या ध्यानि रत होती । मिळे साम्राज्य मोक्षाचे, परी ना सोडि हरि-पाया ॥१॥ भक्तिच्या सुख-स्वातंत्र्यी, मोक्षही तुच्छ संतासी । अनुभवा घेउनी पाहे, भजुनिया पंढरीराया ॥२॥ म्हणे तुकड्या ऊठ वेगे, साध सत्संगती आधी । प्राप्त कर मार्ग प्रेमाचा. दुरावुनि संशयी माया ॥३॥

· मना वाटे, हरी ध्यावा कि गुरुचे पाय वंदावे ? । कोण ते श्रेष्ठ जाणोनी, शरण आधी कुणा जावे ? ॥धृ॥ प्रभू हा बोलिला शास्त्री, ‘शरण जा माझिया भक्ता’ । देव आणि भक्त हे दोघे द्वैत हे केवि मानावे ? ॥१॥ भिन्न मानू नये त्यांना, जये प्रभु दाविला सत्ते । धन्यता संतसेवेची, किती उपकार वानावे ? ॥२॥ देव मानी तया भक्ता, भक्त देवा सदा ध्याती । कळेना गुह्य हे त्यांचे, कुणा सरसावुनी घ्यावे ? ॥३॥ निभविली आस तुकड्याची, गुरूने देव दावोनी । तया मी श्रेष्ठ मानावे, मने हे घेतले भावे ॥४॥

· मराठे शूर-वीरांनो ! निकामा स्वस्थ का बसला ? धैर्यबल खोवुनी सगळे, भिकारी दास कां झाला ? ॥धृ॥ बघा इतिहास थोडासा, आपुल्या वाडवडिलांचा । शिवाजी ‘शिवबा’ म्हणवताना, रायगडि छत्रपति झाला ॥१॥ कधी शिवला न भीतीला, रंगला राजनीतीला । म्हणे ‘दंडीन दुष्टाला, वाकविन थोर जरि असला’ ॥२॥ गर्जला सिंह जणु धावे, मिळविला तोरणा किल्ला । राष्ट्रीचे दास्य खंडुनी, सुखी केले जना सकला ॥३॥ शोभते का तुम्हा ऎसे, तयाचे वंश म्हणवोनी ? । प्राण द्या राष्ट्र-सेवेला, भितीने भ्याड का झाला ? ॥४॥ अहो ! मरणे अणी जगणे, दोन्हिही सारखे अपणा । ती तुकड्यादास सांगतसे, चमकुनी प्राण द्या अपुला ॥५॥

· मशि बोल तरी बोल जरा, रुक्मिणी-वरा ! मन रंगु दे पदरी घे सख्या ! दीन-उध्दरा ! ॥धृ॥ भव-दुःख हे अती कठीण, पार ना मिळे । तव भक्तिसुखे चित्त सख्या ! सुखवु दे वरा ॥१॥ अति ज्वाल षडविकार महा, अग्निच्य परी । मज ओढतील क्षण न तुझी, दृष्टि श्रीधरा ! ॥२॥ जनि पाहता तुझ्याविणे, नच शांति ये जिवा । बघु सांग तरी काय कुठे, कुणाचिया घरा ? ॥३॥ नच तीर्थ शांति दे, न मंदिरे, मढी कुणी । तुकड्याचि हाक घेइ, भेटि देइ पामरा ॥४॥

· मशि बोल सख्या घननीळा रे ! ॥धृ॥ तव बोले मन उन्मत होते, लागे निजरुपि डोळा रे ! ॥१॥ निर्मळ रुप तव विमल सुदर्शन, दूर करी कळिकळा रे ! ॥२॥ मोरमुकुट पीतांबर शोभे, गळा वैजयंति माळा रे ! ॥३॥ तुकड्यादास म्हणे तव बोले, नाशे विषय-उमाळा रे ! ॥४॥

· मी पाहि तसा रुप धरशिल ना ? मज पावन तू हरि करशिल ना ? मी पाहता तुज तू दिसशिल ना ? मी हासता तू हरि ! हसशिल ना ? (अंतरा) सुंदर वनि वेलांच्या तळुनी । झुळझुळ नदि वाहे वळवळुनी । गर्द तरू हिरवळले मिळुनी । अधरि बंसि तू धरशिल ना ? ध्वनि मधुर कर्णि तू भरशिल ना ? ॥१॥ (अंतरा) मयुर-पिसारा मुकुटावरती । कांबळ खांदी, उरि वैजंती। कुंडल-शोभा झळके खुलती । मन्मंदिरि तू स्थिरशिल ना ? ह्या प्रेम-सुखी उध्दरशिल ना ? ॥२॥ (अंतरा) एकांताच्या हृदयाकाशी । मी पाहिन तव श्याम रुपासी । आळवीन तुज मग हृषिकेशी ! देह-भाव मग हरशिल ना ? मज तव स्वरुपी लिन करशिल ना ? ॥३॥ (अंतरा) नित्य असा मी करि अभ्यासा । स्फूर्ति सदा देशिल ना दासा ? । नाकरि हरि ! मम आस हताशा । कृपा-हस्त शिरि धरशिल ना ? हा तुकड्या अपुला करशिल ना ? ॥४॥

· या या रे सकळ गडी ! ‘कृष्ण कृष्ण’ गाऊ ॥धृ॥ कुंजवनी यमुनेतिरि, वाट पाहतो श्रीहरि । जाउ धावु पाहु तया, रंगि रंग लावू ॥१॥ बहु जमले धेनुपाळ, वाटतसे दिव्य माळ । कापतसे दुरुनि काळ, त्या रुपास पाहू ॥२॥ मोरमुकुट सुंदरसा, कटि पीतांबर सरसा । बंसरिच्या नाद-रसा, तल्लिन मनि राहू ॥३॥ रामरंग अमित संग, प्रभुची महिमा अभंग । तुकड्या म्हणे देहभाव, कृष्ण-पदी वाहू ॥४॥

· ये बोल बोल रे कन्हैया ! बोल एकदा । अंतरिचा भेद सख्या ! खोल एकदा ॥धृ॥ तुज भेटण्यास माझा, जीव भुकेला । दुःख हे अती विरहे, सांगु कुणाला ? । मनी डोल डोल रे कन्हैया ! बोल एकदा ॥१॥ कोणि ना तुझ्याविण या, प्रेमि जिवाचा । न्याहाळुनि पहा अमुच्या, भाव मनाचा । बोल एकदा तरि ते ! बोल एकदा ॥२॥ संसार तुझ्या नामे, सोडला हरी ! । सौभाग्य तुझे ल्यावे, ही आस अंतरी । तुकड्याची हाक घे कन्हैया ! बोल एकदा ॥३॥

· येइ रे भोळिया ! भेट झडकरी । पाहु दे डोळिया मूर्ति गोजिरी ॥धृ॥ कुंजविहारी ! गिरिवरधारी ! मनमोहन ! राधा-मनहारी ! ॥भोळिया ! ० ॥१॥ या भवधारी, मन दुःखारी । तुजविण कोण दुजा कैवारी ? ॥॥भोळिया ! ० ॥२॥ मधुर बासरी, ऎकवि तारी । तुकड्यादासा आज निवारी ॥भोळिया ! ० ॥३॥

· येउ दे दया, दया माय गंगे ! दाटला कंठ चंद्रभागे ॥धृ॥ नसे अधिकार, तव गुण गायासी, कितिक मम अंत सखे ! पाहशी ? जन्म लाधला, लाधला असे पापी, दूर झालो गे ! तव, तापी ! ॥१॥ झरा प्रेमाचा, प्रपंच-ध्वनि रतला, गुंग आसक्तपणी सुतला । दृष्टि सामोरी, सामोरी करि माते ! घेइ दासासी निज हाते ॥२॥ कुणावर घालू, ओझे शरिराचे ?, कोण भागिदार दैवाचे ? । प्रसवली कशी, उदरी आम्हाते ? घेइ गे ! पदरी मज माते ! ॥३॥ दृष्टि फिरवूनी, जाळि कटाक्षासी, चाखवी निज-आनंदासी । दास तुकड्या हा, जगपाशे श्रमला, संग निःसंग भवी गमला ॥४॥

· येशिल ना शेवती तू, गुरुराया ! धावुनी । जव नेती ओढुनीया, मम प्राणा काढुनी ॥धृ॥ मरण्याचे संकटाला, नच कोणी आपुले । देशिल ना साथ तै तू, शिरि धरुनी कर भले ॥१॥ जन म्हणती-‘लवकरी या, काढा ना आतुनी’ । मग रचती ना चिता या, देहासी निजवुनी ॥२॥ कुणि म्हणती-‘ठीक झाले, काळाने ओढला’ । म्हणशील ना-‘मीच नेला, माझा हा तान्हुला’ ॥३॥ तुकड्याची प्रेम-भक्ती, भोळी चहुबाजुंनी । परि अंती ध्यान लागो, तव स्मरणी रंगुनी ॥४॥

· रक्षि रक्षि सद्गुरूमाय ! मज कोणि दुजा नाही । जाइल वाया तुजविण काया, फसलो भवडोही ॥धृ॥ त्रैतापाचा अग्नि लागला, पडलो त्यामाजी । काम-क्रोध-मद-मत्सर वैरी, खाती मज आजी ॥१॥ स्पर्श-रूप-गंधादिक जमले, शरिरी भय भारी । त्या माजी मन चंचल झाले, बुडवी भवधारी ॥२॥ आयुष्याची दोरी, यमाजी-उंदिर तोड करी । झुरणी पडले वय हे सारे, ये सखये ! तारी ॥३॥ ऎशा या पाशातुनि सुटका, कशि होइल माते ! । तुकड्यादासा मुक्त करी, ने पदपंकजपंथे ॥४॥

· रमला हरि कुंजवनी सखये ! हुरहुर जिवा अति वाटतसे ॥धृ॥ किति वेळ असा राहील तिथे ? सांगा तरि जाउनिया हरिला । कुणि मोहिल काय झणी सगुणा ? अग ! दुःख असे उरि दाटतसे ॥१॥ किति गोड तयाची बंसि सये ! पशुपक्षि-जिवा रमवी विपिनी । मनमोहन-बंसि हरील कुणी, मम चित्त कसे होईल पिसे ॥२॥ शिरि मोर-पिसारा सुंदरसा, योगी बघती हृदयात जसा । कुणि काढिल काय हळूंच असा ? नेत्रातचि ते रुप साठतसे ॥३॥ चल जाउ झणी बघण्या मिळुनी, दहापाच जणी अति एकहुनी । तुकड्या म्हणे भाग्य खुलेल गडे, हरिच्या विरहे जिव फाटतसे ॥४॥

· रमले मन पंढरीराज पदी, न सुटेचि अता हा मोह जिवा ॥धृ॥ किती निर्मल कोमल पाउल रे, पाहताचि तनूचि सुध भुलते । डुलते जणु रूप विटे खुलते, फुलते फलते उरि रंग नवा ॥१॥ कटि साजे पितांबर सुंदरसा, जरदार जसा कनकासरिसा । शोभे जणु कौस्तुभ चंद्र जसा, फुलला उरि मंजरि-हार नवा ॥२॥ मकरकृति कुंडल हालतसे, शिरि रत्नमुकुट वरि मोर-पिसे । बघताचि विटेवर ध्यान असे, मन सोडुनि दे बहिरंग हवा ॥३॥ जणु सगुणरुपे परब्रह्मचि हे, पहायास सदा जिव ये अणि ये । तुकड्या म्हणे वाटे सोडु नये, तमनाशक हा किति गोड दिवा ॥४॥

· रमशील ना हरी ! तू भक्तिच्या सुमंदिरी । तुज कमल-दली, नेत्रांजलि, न्हाणि अंतरी ॥धृ॥ ही भाव-भक्तिची सुमने, माळ वाहि मी । बहु सत्वशील वृत्ति तुझ्या, पाऊली धरी ॥१॥ पद-पूजना करूनि, दीप ‘सोहं’ जाळुनी । तुज वरुनि फिरविताच ‘मी-तू’ भाव हा हरी ॥२॥ हे उरु न देइ देह-धर्म, आपुलेपणा । तुकड्याचि हाक घे सख्या ! ही आस कर पुरी ॥३॥

· रामतीर्थ अति रम्य ठिकाणी, गेलो मिळुनिया । रामेश्वर लिंगाचे दर्शन, झाले नेत्रा या ॥धृ॥ अती पुरातन भव्य स्थान हे, हेमाडी बांधी । नखशिखांत कोरुनी बसविला, सामोरी नंदी ॥१॥ सुंदर मनकर्णिका जलाने, भरली अति गोड । गमे जणू ही काशिच दुसरी, कोरियला पहाड ॥२॥ रूप मनोहर सांळुकेवरि, रामेश्वर लिंग । वेद-गर्जना, धार जलाची चालतसे चांग ॥३॥ सदा सोवळा हा शिए भोळा, अलंकार यासी । काशीमध्ये भस्म लावतो, उलट रीत इथची ॥४॥ उष्ण जले अभ्यंग स्नाने, बघली मी त्याची । अति श्रृंगार चढे अंगावर, शोभा बहु साची ॥५॥ घननन घननन वाजति घंटे, गर्जतसे भेरी । द्वारि चौघडा वाजंत्रेही, वाजे अति प्यारी ॥६॥ तल्लिन मन झाले बघताना, कृतार्थ जिव झाला । तुकड्यादास म्हणे दर्शनि हा, तारी सकलाला ॥७॥

· राष्ट्र-सुखाची कळकळ निर्मळ वाहताना अंतरी । नसू दे स्वार्थ सख्या ! तिळभरी ॥धृ॥ पर सुखदुःखे मान आपुली, निष्कामी हो उनी । कार्य कर न्याय-नीती सेवुनी ॥ सद्‍ धर्माच्या तत्त्व-तंतुला तोडु नको धावुनी । रुढीला नाचु नको घेउनी ॥ (अंतरा) राष्ट्रीय बंधु-भावना रमू दे जगी । वाढवी प्रेम आपुल्य-पराच्या मधी । जातिंचे कडक निर्बंध ढिले कर अधी । स्वैरपणे रंगु दे वीर स्वातंत्र्य धराया करी । लावि ही ध्वजा दिगंतावरी ॥१॥ तत्त्व शोधल्याविणा कुणाची करू नको खंडणा । अधिकसा मांडु नको फड दुणा । निसर्ग-जग हा बाग प्रभुचा, रमवी मनि भावना । दुःखवू नको कुणाच्या मना । फुले फळे ही सुंदर निघतिल, कोण जाणतो खुणा ? सुगंधे रुंजू दे मन्मना ॥ (अंतरा) वाहु दे लाट ही जोराची आतुनी । ‘कुणी उठा उठा हो ! या पुढती धाउनी । करु राष्ट्र-धर्म-हा जागा अपुल्यातुनी’ । ऎक्यपणाचे बाहु उभारुनि करू गर्जना बरी । होउ दे तरुण-वृत्ति बावरी ॥२॥ वेळ अवेळहि पाहुनि वर्तन ठेवावे आपुले । कर्म आचरोनि समयी भले ॥ देश सुखी व्हावया पाहिजे कार्य-क्रम चांगले । पाहिजे सदा मनी शोधिले ॥ पूर्वज अमुचे कार्यप्रसंगी कसे कसे वर्तले । चलावे थोरांच्या पाउले ॥ (अंतरा) ही याद असू दे, विसरु नको चालता । जरि काळ आडवा आला कर पालथा । सोड ही आता तरि भोळिव निर्जीवता । तुकड्यादास म्हणे घे कानी, तोड उरीची सुरी । पडु दे प्राण प्रसंगावरी ॥३॥

· राहु दे, मन हे तुझ्या पदि राहु दे । भेद सगळे जाउ दे, तव रूप निर्मळ पाहु दे ॥धृ॥ आस नाही दुसरी, हा जन्म सगळा वाहता । होउ दे सेवा प्रभू ! या नश्वरा देहे अता ॥१॥ कोण नेइल संपदा ही, अंतकाळी बांधुनी ? राहतिल हे जगि सारे, विषयसुख दिसते जनी ॥२॥ दास तुकड्या वांच्छितो, विसरू नको गरिबा हरी ! दीन आम्ही तव पायिची, या बालकासी सावरी ॥३॥

· वाजवी प्रभु ! गोड वेणू वाजवी । मोहिनी या बंसिची हृदयास लागू दे चवी ॥धृ॥ चित्त हे झुरते सदा, ती मधुर बंसी ऎकण्या। काढ हा पट आडवा, मन लागु दे रुप पाहण्या॥१॥ श्यामसुंदर कटि पितांबर, मूर्ति चिमणी साजिरी । कुंजवनिच्या गोपिकांना, तारिशी तू निर्भरी ॥२॥ दास तुकड्या प्रेमयोगी, बंसरी द्या मागता । ना हवे मग दुसरे मज, गंधही त्या स्वर्गिचा ॥३॥

· वाढवू नका हो वृत्ती, ‘मी कर्ता’ अथवा ‘भोक्ता’ ॥धृ॥ सर्व हे कार्य देवाचे, सर्वस्वी त्याची सत्ता । मी केले काहिच नोहे सर्व हा हरी करवीता । (अंतरा) हा अनुभव सकळा ठायी । येतसे पदोपदि पाही । जीव हा आमुचा ग्वाही । मग व्यर्थ कशाची चिंता, वाहता आपुल्या माथा ? ॥१॥ आलिया प्रसंगे व्हावे, सावधान कार्यासाठी । भिउ नये कुणा तिळमात्र, इच्छितो हेचि जगजेठी । नीति-न्याय-बुध्दी अपुली, लावावी कार्यासाठी । (अंतरा) अन्याय न पहावा डोळा । गमवूच नये ती वेळा । फिरु नये भिऊनी काळा । हेचि ज्ञान देते गीता, अणि धर्मही सांगे चित्ता ॥२॥ जव अधर्म झाला लोकी, कोणी न कुणाला मानी । साधु संत छळले गेले, अन्याय नसोनी कोणी । कंसाच्या सत्तेखाली, पापांच्या झाल्या गोणी । (अंतरा) ना धर्म राहिला लोकी । साधूजन पडले धाकी । राक्षसी वृत्तिच्या हाकी । गडबडली सारी जनता, नच उरला वाटे त्राता ॥३॥ ऎकताच प्रभुने वार्ता, दुःख हे न बघवे त्यासी । भक्तांचा छळ पहावेना, ब्रीदाची लाज तयासी । ना चैन पडे क्षण एक, गडबडले वैकुंठासी । (अंतरा) गरुडास सोडुनी आले । वैकुंठ दुरावुनि ठेले । देह-भाव विसरुनि गेले । देवकिच्या उदरा येता, जाहला जगाचा त्राता ॥४॥ लीलेने गोपाळासी, पुरविले प्रेम देवाने । प्रेमाची करुनी मोहनी, पाडिली गोपिंना त्याने । होते जे कइ अवतारी, फेडाया आला उसणे । (अंतरा) मर्दुनी असुर प्राण्यांना । भुलविला गर्वमय बाणा । शिर उचलूच ना दे कोणा । दाखवी मालकी त्राता, आमुची या जगती सत्ता ॥५॥ मानवी बुध्दिला धरुनी, खेळता समाजो खेळा । शिकविले राजकारण ते, जिव-भावे त्या पांचाळा । रणक्षेत्र पुन्हा गाजविले, उठवोनी अग्नि-ज्वाला । (अंतरा) श्रीकृष्णाच्या भक्तांनो ! । भरती हिंदुवीरांने ! । संतांनो नी लोकांनो ! । तुकड्याची ऎका वार्ता, का प्रसंग सोडुनि पळता ? ॥६॥

· वाहते किति सौम्य तू, तुज शांतता कोणी दिली ? । द्रोह ना तव अंतरी, गंभीर वृत्ती शोभली ॥धृ॥ कोटियांचे पाप वाहता, शीण ना तुजसी जरा । मुक्त करिशी पूर्वजाते, स्वर्गिची जणु माउली ॥१॥ शुध्द किति तव प्रेम गंगे ! ना कुणासी मागशी । जगविशी हे विश्व सारे, सोडुनी झरणे खुली ॥२॥ भाग्य किति तरी थोर त्यांचे, जे तुझ्या तटि राहती । ईश्वराच्या पूजना, जणु तूच त्यांची वाटुली ॥३॥ निर्मिली वेली-जुळे, तट साजिरा करवूनिया । शालु हा जणु नेसुनी, प्रिय भक्त पाहण्या चालली ॥४॥ दास तुकड्या चिंतितो, तुज भेटण्यासी एकदा । उघडुनी पट भेट दे गे ! धन्यता मज लाधली ॥५॥

· विपरीत हवा दिसते नयनी, हरि काय करील मना न कळे ॥धृ॥ नच रीत उचीत कुणा करवे, धरवे न ऋषी-वचना हृदयी । अति कामभरे नच नेम उरे, श्रृतिशास्त्र, तया मदने न कळे ॥१॥ करि त्याज्य न राज्य कुचाल जनी, हसताति मनी दुरुनी झुरुनी । ‘बिघडले कधी ही भारतभू ?’ परके जनही द्विविधा घुसळे ॥२॥ ऋतु चालति चाल कुचाल अती, नच पृथ्वि पिके उरती पुरती । मरतो कइ , अन्न मिळे न पुरे, नरनारि न लुगडी-वस्त्र मिळे ॥३॥ रुसल्या मरिमाय जरा कुलरा, वरि प्लेग-काँलरा भिति न ज्वरा । नच सुख जिवा इकडे तिकडे, मन घाबरले अति, धीर ढळे ॥४॥ नच धर्म न कम सुसंगतिही, वळती जन हे विषयी अतिही । तुकड्या म्हणे स्वाधिन हे हरिचे, कळते प्रभुला कळणे सगळे ॥५॥

· विरह न साहे सख्या ! तुझा हा, भेट एकदा तरी । पाहु दे मूर्ति स्वरुप-गोजिरी ॥धृ॥ व्याकुळ हे जिव-प्राण आमुचे, घ्याया तव दर्शना । येउ दे दया जरा तरि मना ॥ अगम्य महिमा तुझी वर्णिली, पूर्ण करी कामना । भेट रे ! भेट पतितपावना ! ॥ (अंतरा) फेक हा मोहमायापट जडभूमिचा । मालवी घनांधःकार भेद उर्मिचा । झळकवी दिवा झळझळीत ज्ञानाग्निचा । जीवभाव हा निरसुनि माझा, अंतःकरण मंदिरी । पाहु दे मूर्ति स्वरुप-गोजिरी ॥१॥ सप्तचक्ररत्नांकित ज्याच्या भ्रमती दारावरी । वायु अजपाजप अक्षय करी ॥ वृत्ति-अंकुरी ज्ञानवृक्ष हा खुलवुनि पल्लव-फुला । तुझ्या दर्शना धाव घे भला ॥ (अंतरा) नच वेळ करी तू हरी ! भेट एकदा । ना कधी तुला मग विसरिन मी सर्वदा । इच्छा पुरविच ही, दावि आपुल्या पदा । तुकड्यादासा तुजविण हे जग, फोल दिसे भूवरी । पाहु दे मूर्ति स्वरुप-गोजिरी ॥२॥

· विश्वव्यापी प्रेम शिकण्या, न्याल का मजला कुणी ? । दाखवा तरि ठाव तो, बहु आवडे माझ्या मनी ॥धृ॥ कोणि ना परका दिसो, मज तीनलोकी पाहता । द्रोहता ही नष्ट हो, वर द्याल का मजला कुणी ? ॥१॥ जो दिसे तो आपुलाची, पाहता अणि राहता । भेद हा जाई लया, स्थळ दाखवा ऎसे गुणी ॥२॥ धर्म कोणीही असो, वा देश कोणीही असो । शुध्द प्रेमा एक होवो, हो धनी या निर्धनी ॥३॥ दास तुकड्या सांगतो, मज त्याविणा नच चैनही । भेटवा या पामरा, जिव बावरा झाला मनी ॥४॥

· व्हा उभे धर्म-रक्षणा, धैर्य हे कां सोडता ? । गर्जु द्या वीर-गर्जना, मार्ग हा कां मोडता? ॥धृ॥ (अंतरा) चमकु द्या रक्त वीरांचे । उघडु द्या कर्ण शूरांचे । फोडु द्या भंड क्रूरांचे । द्या प्राण रणी खोचुनी, हात हे कां जोडता ? ॥१॥ (अंतरा) श्रीकृष्ण आमुचा ईश । सांगतो हाचि संदेश । ठाऊके आर्य-पुत्रास । लागेल पाप नैकता, वचन हे कां खोडता ? ॥२॥ (अंतरा) गाईचे वाचवा प्राण । अबलासी द्या जिवदान । राखा वडिलांचा मान । चला उठा उठा तरुण हो ! वेळ ही का दवडिता ? ॥३॥ (अंतरा) आळवा प्रभूसी ध्यानी । मागा यश या संग्रामी । घ्या उडी उधळवा उर्मी । तुकड्याचि आस ही पुरी, होउ द्या का तोडता ? ॥४॥

· व्हा पवित्र अपुल्या देही, याविण मार्ग कुणि नाही । शांतिचा ॥धृ॥ आचरा तसेची लोकी, होउनी मनी निःशंके । सर्वही ॥ स्वच्छता घराची ठेवा, शेजार तसाची करवा । आपुला ॥ कैचणे उकिरडे काढा, मळ होइल हृदयी गाढा । त्यासवे ॥ जा दिशेस दुर गावाच्या, ना बसा जवळ कोणाच्या । खंडरी ॥ (अंतरा) आपुल्या परीच लोक हे, समजणूक हे, धरुनि रहा हि, धरुनि रहा ही ॥ याविणा० ॥१॥ पावित्र्य आचरे अंगी, तो भक्त म्हणा सत्‍ संगी। रंगला ॥ तो थोर म्हणा वृत्तीचा, पावित्र्याचि आश्रम ज्याचा । वर्तनी ॥ स्वच्छ खादि अंगी घाली, हाताने कष्टुनि केली । जाणुनी ॥ गायिसी मनोभावाने, पाळितो स्वतः अंगाने । लक्षुनी ॥ (अंतरा) घरि सडा, पडे धडधडा, बनुनि निर्भिडा, झाडि मार्गाहि झाडि मार्गाहि, मज गमे मिळत स्वर्गाही, त्यागुणे ॥२॥ पावित्र्य रूप देवाचे, पावित्र्य अंग दासाचे । सर्वया ॥ तुळसी-वृंदावन दारी, भरि रांगोळी जरदारी । चमजती ॥ घर आजुबाजुनी साफ, ना जरा काटि आणि कुंप । सडविले ॥ अरुणोदय होण्यापूर्वी. कामे आटोपी सर्वी । आपुली ॥ (अंतरा) धन्य तो, घरधनी भला, दिसतसे मला, मनी ममताहि, मनी ममताहि, ज्या मत्सर तिळही नाही, अंतरी ॥३॥ बघताच पहाटे कोणी, आटपली स्नाने ज्यांनी । आपुली ॥ गीतापाठासी बसला, घालितो नमन सूर्याला । दंडसे ॥ धरि पुत्र-पौत्र सर्वांना, शिकवीत आपुला बाणा । बोधुनी ॥ अहो ! करा आचरा ऎसे, तरी भक्त बना देवाचे । निश्चये ॥ (अंतरा) ना तरी, बोलणे परी, न घरी आचरी, थोर तो नाहि, थोर तो नाही, ज्या शुध्द भावना काही, ना वसे ॥४॥ तुकड्याची ऎका वार्ता, हा प्रसंग कानी पडता । आचरा ॥ आचरा नि दुसर्‍या सांगा, सकळ गावि ऎसे वागा । बापहो ! ॥ तरि वाट मिळे शांतीची, खुंटेल रीत भ्रांतीची यामुळे ॥ घ्या कर्म आपुले हाता, व्हा तयार गावाकरिता । आपुल्या ॥ (अंतरा) सांगुनी, सतत वर्तुनी, प्रेम देउनी, बना हो ! ग्वाहि, बना हो ! ग्वाही, तरि देव सुखाला देई, आमुच्या ॥५॥

· व्हा पवित्र अपुल्या देही, याविण मार्ग कुणि नाही । शांतिचा ॥धृ॥ आचरा तसेची लोकी, होउनी मनी निःशंके । सर्वही ॥ स्वच्छता घराची ठेवा, शेजार तसाची करवा । आपुला ॥ कैचणे उकिरडे काढा, मळ होइल हृदयी गाढा । त्यासवे ॥ जा दिशेस दुर गावाच्या, ना बसा जवळ कोणाच्या । खंडरी ॥ (अंतरा) आपुल्या परीच लोक हे, समजणूक हे, धरुनि रहा हि, धरुनि रहा ही ॥ याविणा० ॥१॥ पावित्र्य आचरे अंगी, तो भक्त म्हणा सत्‍ संगी। रंगला ॥ तो थोर म्हणा वृत्तीचा, पावित्र्याचि आश्रम ज्याचा । वर्तनी ॥ स्वच्छ खादि अंगी घाली, हाताने कष्टुनि केली । जाणुनी ॥ गायिसी मनोभावाने, पाळितो स्वतः अंगाने । लक्षुनी ॥ (अंतरा) घरि सडा, पडे धडधडा, बनुनि निर्भिडा, झाडि मार्गाहि झाडि मार्गाहि, मज गमे मिळत स्वर्गाही, त्यागुणे ॥२॥ पावित्र्य रूप देवाचे, पावित्र्य अंग दासाचे । सर्वया ॥ तुळसी-वृंदावन दारी, भरि रांगोळी जरदारी । चमजती ॥ घर आजुबाजुनी साफ, ना जरा काटि आणि कुंप । सडविले ॥ अरुणोदय होण्यापूर्वी. कामे आटोपी सर्वी । आपुली ॥ (अंतरा) धन्य तो, घरधनी भला, दिसतसे मला, मनी ममताहि, मनी ममताहि, ज्या मत्सर तिळही नाही, अंतरी ॥३॥ बघताच पहाटे कोणी, आटपली स्नाने ज्यांनी । आपुली ॥ गीतापाठासी बसला, घालितो नमन सूर्याला । दंडसे ॥ धरि पुत्र-पौत्र सर्वांना, शिकवीत आपुला बाणा । बोधुनी ॥ अहो ! करा आचरा ऎसे, तरी भक्त बना देवाचे । निश्चये ॥ (अंतरा) ना तरी, बोलणे परी, न घरी आचरी, थोर तो नाहि, थोर तो नाही, ज्या शुध्द भावना काही, ना वसे ॥४॥ तुकड्याची ऎका वार्ता, हा प्रसंग कानी पडता । आचरा ॥ आचरा नि दुसर्‍या सांगा, सकळ गावि ऎसे वागा । बापहो ! ॥ तरि वाट मिळे शांतीची, खुंटेल रीत भ्रांतीची यामुळे ॥ घ्या कर्म आपुले हाता, व्हा तयार गावाकरिता । आपुल्या ॥ (अंतरा) सांगुनी, सतत वर्तुनी, प्रेम देउनी, बना हो ! ग्वाहि, बना हो ! ग्वाही, तरि देव सुखाला देई, आमुच्या ॥५॥

· शिकविते ज्ञान का गीता, बना हो सर्व संन्यासी ? । सोडुनी धर्म हे सारे, घरामधि झोप घ्या खाशी ॥धृ॥ वाहवा ! अर्थ करणारे, आणि लोकांसि वदणारे । भ्याडपण लावुनी सारे, राष्ट्र हे लावले फाशी ॥१॥ वीरांना भक्ति लावूनी, टाळ देऊनिया हाती । पिटविले टाळके त्यांचे, बनवुनी दास आणि दासी ॥२॥ अर्थ या भक्ति-ज्ञानाचा, असा नाहीच कोठेही । मेलियापरि जगी रहावे, वाढवोनी उरी खासी ॥३॥ गिता हे सांगते सर्वा, ‘लढा अन्याय-प्रतिकारा, । ‘प्रभू हा साथ दे सर्वा, धर्म हा श्रेष्ठ सर्वासी’ ॥४॥ म्हणे तुकड्या ‘अहंकारा न धरता मर्द व्हा सारे । गाजवा धर्म सत्याचा, जगाचा भारतीयासी’ ॥५॥

· श्रीकृष्णाच्या मुखोग्दताचा आठव होता मना । उसळती वीर-बोध-भावना ॥धृ॥ सळसळता तै लाट वृत्तिची गीता-वाणीतुनी । निघाला ज्ञानांकुर गर्जुनी ॥ रणांगणावरि कठिण प्रसंगी, बोध करी वेधुनी । ‘उभा हो पार्थ सख्या !’ म्हणउनी ॥ (अंतरा) ‘हो जागा कर्तव्याला, घे गांडिवा । उजळवी जगी या विजयश्रीचा दिवा । दाखवी जगाला नीतिमार्ग हा नवा । धर्म-रक्षणा करावयासी तूच सख्या ! शाहणा । भिउ नको लढण्या समरांगणा’॥१॥ ‘अन्यायाला सहन करूनी जगणे नाही बरे । मरावे धर्म रक्षुनी खरे ॥ पूर्वजांचिया कुळा पहा हा, कलंक नाही बरा । करावा नाश लढोनि पुरा ॥ क्षत्रिय-धर्मा शोभे जैसी रीत धरावी उरा । फिरु नये रणांगणाहुनि घरा’ । (अंतरा) विश्वासुनि सांगे कृष्ण आपुल्यापरी । ठसविता शब्द हे विजय होय भुवरी । या करा तातडी वेळ नसे ही बरी । उभा ठाकला वीर कुरुक्षेत्रात, करी गर्जना । वाजती रण-वाद्ये दणदणा ॥२॥ भारतभूच्या तरुणासाठी बोध देउनी सखे । जाहले जय घेउनि पारखे ॥ सांभाळाया इतिहासासी नित्य जपा सारिखे । विरु नका होउनि हृदयी फिके ॥ कर्तव्याची ज्योत जागती सदा असु द्या मनी । बोध घ्या गीताजयंतीतुनी ॥ (अंतरा) धन्य तो दिवस जै कृष्ण बोधि अर्जुना । थरथरा कापती शत्रुंच्या भावना । पुण्यात्मे करिती पुष्पवृष्टि त्या क्षणा । तोचि दिवस आजिचा गडे हो ! स्मरण व्हावया जना । धरा हृदयाशि नंद-नंदना ॥३॥ शरिरे कितिदा तरी गळाली, बोध गळेना कधी । नाहि त्या नाशक कुणि औषधि । धन वडिलांचे सांभाळाया अधिकारा घ्या अधी । बोध द्या तरुणा हृदयामधी ॥ उठ उठा रे गोपाळांनो ! करा संघ आपुला । प्रार्थुया परमेशा-पाउला ॥ (अंतरा) हा सोडुनि पळता बोध व्हाल पातकी । पूर्वजा दुःख बहु, पाहुनिय घातकी । अनुभवा आणता सर्वचि होती सुखी । तुकड्यादास म्हणे जागे व्हा, विसरु नका हो खुणा । रंगवा रणांगणी जीवना ॥४॥

· श्रीगुरुराज धरि हृदयी, भय हरेल या संसाराचे ॥धृ॥ भ्रम-बाजारी जीव धडपडे, काहि कळेना मार्ग तया । सत्-संगतिचा लाभ मिळे जव, होइ ज्ञान उध्दाराचे ॥१॥ कठिण प्रसंगचि ओढवती तव, वाढत चिंतारोग सदा । ज्ञान होय जव श्रीगुरु-बोधे, पाश जळति कुविचारांचे ॥२॥ अन्य नसे कुणि मार्ग जगी या, मोक्षपदाला जायासी । सत्संगतिने कळते, वळते, पट उघडति हरि-द्वाराचे ॥३॥ तुकड्यादास म्हणे निर्भय हो, जाउनिया गुरु-चरणाशी । ओळख ‘मी तो कोण, कोठचा ?’, मार्ग कळति सुविचारांचे ॥४॥

· श्रीहरिच्या प्रेमळांनो ! घ्या पदरी बालका । जरि पापी भ्रष्ट कर्मी, अज्ञानी होइ का ॥धृ॥ प्रभु तुमच्या ओळखीने, दीनासी भेटतो । तुमचीया एक बोले, कार्यासी कष्टतो ॥१॥ अति चिंता लागलीसे, जिवाभावापासुनी । प्रभु भेटो, रूप दावो, ही आशा मन्मनी ॥२॥ नच डोळे त्याविना हे, राहताती शांतसे । तुकड्याची हाक घ्या हो ! मज काही ना सुचे ॥३॥

· श्रीहरि-ध्यान धरि हृदयी, जा जिवा ! सुखद हा मार्ग तुला ॥धृ॥ सांगति संत-महंत सदा हे, शास्त्र-पुराण-श्रृती-वचने । ‘नामजपाविण शांति न लाभे. धर धावुनिया पदयुगुला’ ॥१॥ योगयागविधि कठिण तपस्या, साधति काय कुणास अता ? । चंचल मन हे फिरतचि राहे, भृंग जसा घे मोद फुला ॥२॥ तुकड्यादास म्हणे हो पावन, नामस्मरण करुनि भावे । वेळ पुन्हा ही न मिळे ऎसी, साधुनि घे हा जन्म भला ॥३॥

· श्रीहरी ! कोठवरि आता फिरविसी वाया ? जाहलो श्रमी बहु, नका दावु ती माया ॥ श्रीहरी ! ॥धृ॥ राहुनी प्रपंची जिवा नसे सुख काही । करिताचि कष्ट बहु शिणलो, या भव-डोही ॥ श्रीहरी ! ॥ पाहुनी द्रव्य-सुत-दार वैभवा ऎशा । भटकला जीव हा, न सुटे घरची आशा ॥ श्रीहरी ! ॥ मागता भीक श्वानासम पोटासाठी । हे हीन कर्म मारिते, आडवी काठी ॥ श्रीहरी ! ॥ (अंतरा) नच द्रव्य कधी घेउनी पाहिले डोळा । कष्टला जीव मम सर्व सोशिता ज्वाळा । घरधनी कशाचा घरचा बाइल-साळा । हा नर-जन्माचा, काळ लोटला वाया ॥ जाहलो श्रमी ० ॥१॥ कुणि बरे पाहिना, जावे दुसर्‍या दारा । काय सांगु वैभव ऎशा या परिवारा ? ॥ श्रीहरी ! ॥ तरि तुझे नाव मम न ये मुखी भगवंता ! । श्रीगुरु-कृपेने आठवला गुणवंता ! ॥ श्रीहरी ! ॥ आठवता ऎसे वाटे मज ते काळी । ‘फेडील पांग हा येउनिया वनमाळी’ ॥ श्रीहरी ! ॥ (अंतरा) ते मधुर बोल ऎकवशिल श्रवणी कधी । येउ दे दया मम, शांतवि अपुल्या मधी । ऎश्वर्य जाउ दे, मज घे अपुल्या पदी । तुकड्यादास ठाव दे श्रीसद्गुरुच्या पाया ॥ जाहलो श्रमी ० ॥२॥

· श्रीहरी भेटवा कोणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥धृ॥ त्या पहाया नेत्र भुकेने, कर्ण हे तीक्ष्ण किति झाले । जिव जरा उरी ना मानी, त्या बसविन हृदयस्थानी ॥१॥ ह्या सुंदर वृक्षाखाली, मी पाहिन तो वनमाळी । सांगेन जिवाचि कहाणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥२॥ ह्या झुळझुळ ओढ्याकाठी, मज दिसेल तो जगजेठी । धावुनि मी केविलवाणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥३॥ ह्या सुरम्य गुंजातळुनी, मी गाइन हरिला गाणी । तुकड्या म्हणे पूजिन ध्यानी, त्या बसविन हृदयस्थानी ॥४॥

· सदा तुझ्या चिंतनी रहावे, वाटे गुरुराया ! । प्रारब्धाचा भोग चुकेना, भ्रमवी अवनी या ॥धृ॥ ‘सखा सहोदर पाहु कुठे तरि ? ‘ म्हणतो जिव माझा । जे भेटति ते स्वार्थी लोभी, कोणि न ये काजा ॥१॥ महाकाळ विक्राळ काम हा, भोवति घे घिरट्या । संतसंग किति करू कळेना, पळहि न ये वाट्या ॥२॥ जिकडे तिकडे ‘मी मोठा, मी मोठा’ ही वाणी । भक्तिवर्म ते न दिसे कोठे, दुःखाची खाणी ॥३॥ तुकड्यादासा तुझा भरवसा, मग कोणी नाही । राख राख रे ब्रीद दयाळा ! आलो तव पायी ॥४॥

· सद्गुरु अपुला सखा, गडे हो ! सद्गुरु अपुला० ॥धृ॥ निर्मोही, निर्भयी निरंतर, मार्ग दावि भाविका ॥१॥ अजर, अमर हा आत्मा साक्षी, होउ न दे पारखा ॥२॥ निज स्वरुपाचा बोध दावुनी, दूर करी यम-दुखा ॥३॥ तुकड्यादास म्हणे या या रे ! तिळभरि विसरू नका ॥४॥

· सद्गुरुचे गूण-नाम, गाइ मनोभावे ॥धृ०॥ संसारी सर्व मिळे, व्यवहारी सर्व कळे । परि गुरुगम्यचि विरळे, नाहि जगा ठावे ॥१॥ सागर उतरेल पार, वायुगमनीहि फार । गुरुची महिमा अपार, नाहि कुणा पावे ॥२॥ अमृत मंथने निघेल, जीव मस्त हा बनेल । गुरु-ज्ञानविण कुणी, शेवटी न धावे ॥३॥ तुकड्याची एक आस, सद्गुरूचि पुरवि खास । करुनी भवदुःख-नाश, अंतकाळि पावे ॥४॥

· समाधान हे विषयी नसे । पाहता दिसे, कळे सायसे ॥धृ॥ विचारी मना रे ! त्यजी सर्व वारे । धरी संत-पाया, सुख देतसे, कळे सायसे ॥१॥ सुखी कोण झाला ? जगी या निवाला ? न राजा दिसे बा ! प्रजाही नसे, कळे सायसे ॥२॥ गडी तुकड्याचा, हरी हा सुखाचा । धरा भाव याचा, सुखी व्हा असे, कळे सायसे ॥३॥

· साधुनि घे काहि जरा, कीर्ति व्हावया ॥धृ॥ नाहितरी जाशि फुका, कोणी नच देइ रुका । खाशिल यमद्वारि धका, नाहि त्या दया ॥१॥ अखिल विश्व हे अचाट, कठिण जन्म-मृत्यु-घाट । काम-क्रोध यांचि वाट, दाविते भया ॥२॥ शरण जाइ संत-पदा, करुनि घेइ बोध सदा । चुकवुनि घे आपदा ही, मुक्ति घ्यावया ॥३॥ तुकड्याची हाक ऎक, नाहितरी होय शोक । पावशील लोकि दुःख, थोर कष्ट या ॥४॥

· सावळा मुरारी, अमुच्या रंगि रंगला । विसरुनी न जाऊ आम्ही, संग हा भला ॥धृ॥ जाउ जिथे पाही तेथे, आपणाची मागे येते । विसरिना कधी आम्हाते, मोहिला भला ॥१॥ नेत्र मिटोनिया बसता, भासतसे हसता हसता । खेळ खेळता नि निजता, सोडिना मला ॥२॥ सृष्टिसुखा पहाया जात, मार्गि लावितो हा चित्ता । भासवितो अपुली सत्ता, दावितो कली ॥३॥ नाठविता आठव देई, आठविता जवळी राही । देउनिया तुकड्या ग्वाही, सांगतो खुला ॥४॥

· सावळी मूर्ति ही गोजिरी । पाहताना मनासी हरी ॥धृ॥ अति कोमल चरणांगुले, सिंहासनि शोभति चांगले । गळा वैजयंती साजिरी । पाहताना० ॥१॥ कटि पीतांबर साजिरा, शिरि मोर-पिसांचा तुरा । वाजवितो मधुर बासरी । पाहताना० ॥२॥ दास तुकड्या म्हणे ध्यान हे, आमुच्या जीविचे प्राण हे । मुक्ति लाभे, जपा अंतरी । पाहताना० ॥३॥

· सुख दिसले डोळियाने, सांगो मी त्या खुणा । मज वाटे सुख नाही, हरी-भक्तीच्या विना ॥धृ॥ जरि द्रव्या साचवीले, परि चिंता पावते । भीतीने पाठि-पोटी, नच शांती लाभते ॥१॥ जरि घरचे भाग्य लाभे, स्त्री-सुखही मोहके । तरि मृत्यूच्या भयाने, दुःख होते दाहके ॥२॥ जरि स्त्री-धन दोन्हि लाभे, सौख्याच्या वाटणी । परि पुत्र ना तयासी, झुरती त्यावाचुनी ॥३॥ जगतीची वैभवे ही, लंगडी बा ! नाशती । तुकड्याची हाक घ्या ही, प्रभु-स्मरणी द्या मती ॥४॥

· सुखकर कर सत्संगा मनुजा ! पावन हा नरदेह करूनी, सहज करी भवभंगा मनुजा ! ॥धृ॥ सुख-दुःखे ही किति भोगावी ? शांति नसे संसारी मनुजा । विमल सुखा दे माउली ही, देइल भक्तिसुरंगा मनुजा ! ॥१॥ ‘सत्संगाविण मार्ग न लाभे’, श्रुति स्मृतिचे हे कोड मनुजा ! । तुकड्यादास म्हणे सुखी हो, त्यागुनि सकळ कुसंगा मनुजा ! ॥२॥

· सुखशांति या जगि ना दिसे । जन हे पिसे, फिरे वायसे ॥धृ॥ अति थोर राजा, जयाचा अगाजा ! धरि लोभ तोही, मनासी रुसे, दुःख-सायसे ॥१॥ रमे रम्य लोकी, मुखासी विलोकी । झुरे अंतरीही,’करावे कसे ?’ दुःख-सायसे ॥२॥ गडी तुकड्याचा, कुणी ना कुणाचा । झरा स्वारथाचा, मुळाशी वसे, दुःख-सायसे ॥३॥

· सुखाचा दिवस तै आला, कि जेव्हा भिन्नता गेली । बुध्दिच्या पूर्ण भावाची, विलिनता रामरुपि झाली ॥धृ॥ न अपुली वाटली काया, न जनता जिवपणे स्फुरली । रामराय विश्वची सारे कि, प्रभु-माया खरी नटली ॥१॥ निसर्गे बागही फुलली, निसर्गानेच सुखि झाली ॥२॥ न काही कामना उरली, धर्मे-कर्मे उठाठेवी । म्हणे तुकड्या गार जैसी, जली दिसली तशी मुरली ॥३॥

· सुदिन हा संत-सेवेचा, सुभाग्ये लाभला आम्हा । मिळाली दर्शने काशी, निमाली वृत्तिची सीमा ॥धृ॥ सदा फुलबाग बोधाचा, दिसे फुलला मुखावाटे । रंगले ज्ञान-वन सारे, पसरला भृंगमय प्रेमा ॥१॥ निसर्गे शांतिची ज्योती, सदा झळके तया दारी । शिपायी कडक वैराग्ये, अखंडित साधिती कामा ॥२॥ स्तुती-निंदा उभ्या भिंती, दिसे बाहेरच्या मार्गी । घासती बोचती अंगा, जावया साधुच्या धामा ॥३॥ लीन तुकड्या तया पायी, दर्शने भ्रांतिही जाई । जन्म-मृत्यू नसे काही, विसरती भेद-भय नेमा ॥४॥

· सोडशील का माया माझी ? श्रीपंढरीराया ! । कोण लाज राखिल ? देह हा जाइल गा ! वाया ॥धृ॥ काम-क्रोध मद-मत्सर सारे, जमले वळवाया । भक्ति-आड येऊनि, भाव तो नेती ओढुनिया ॥१॥ मन चंचल, कधि स्थिर राहिना, पहाते फसवाया । बुध्दीने वेष्टिला जीव हा, काय सांगु सखया ! ॥२॥ तूच गड्यारे ! गडी कोण मग येई ताराया ? । सगे-सोयरे पळती सारे, जमले ओढाया ॥३॥ तुकड्यादासा तुझा भरवसा, कोणी मग नाही । पुरा जाणला विचार याचा, ने अपुल्या पायी ॥४॥

· सोडु नको मज तू गिरिधारी ! दूर करो ही जनता सारी ॥धृ॥ जन म्हणोत मज ‘वेडा झाला’, तरि न दुःख मम होइ मनाला । परि न तुझी मर्जी हो न्यारी ॥१॥ म्हणतिल मज जरि ‘ठेवु उपाशी, परि तू रमशिल ना मजपाशी ? । तोडु नको अंतरिची तारी ॥२॥ पाहो मज वैर्‍यापरि कोणि, तरि त्याची तिळ न धरी ग्लानी । तुकड्याचे भय दुःख निवारी ॥३॥

· स्मर हरिनाम मनि मनुजा ! याविणा न गति कवणासि मिळे ॥धृ॥ दुर्लभ हा नरदेह सुखास्तव, अवचित तुज दिधला देवे । नश्वर सुख घेता गमाविशि मग, यमदंडा पाठीच फळे ॥१॥ सार्थक घे करुनी नरदेही, वेळ पुन्हा ऎसी नाही । चाख गुरूबोधामृत हृदयी, सुख तुझे तुजलाचि कळे ॥२॥ तुकड्यादास म्हणे समजी गुज ! वर्म कळुनि घे गुरु-वचने । वाग तयासी जगति गड्या ! मग देव सखा होऊनि वळे ॥३॥

· हरिगुण गात राहि मना ! जा चुकेल भव-संकट सारे ॥धृ॥ विषय सेविता कोण निवाला ? सांग तरी जगतात असा । राव, रंक जग सोडुनि गेले, कीर्ति न ती तिळमात्र उरे ॥१॥ भक्ति ‘सुखाविण शांति न पावे’, अनुभव गाती संत असे । जा सद्गुरुला पूस गड्या ! मग मन बोधे जागीच मुरे ॥२॥ तुकड्यादास म्हणे सावध हो, शोध करी हृदयी अपुल्या । नरजन्माची दुर्लभ वेळा, दवडु नको विषयी बा रे ! ॥३॥

· हरिनाम जपा मन लावुनिय, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥धृ॥ अति दुर्जन हे रिपु दूर करा, जे काम-क्रोध मद-लोभ अती । गुरुपायि चला हृदये नमुनी, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥१॥ रोज करा अभ्यास सदा, जी वेळ मिळे जो काळ मिळे । अति प्रेमभरे विरहे प्रभु गा, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥२॥ सत्य सदा वदनी वदणे, समजा सम सर्व जिवा प्रभुच्या । अति निर्मळ गोड रहा जगती, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥३॥ ‘मान असो अपमान असो, निति-धर्म न सांडुनि जाउ कुठे’ । तुकड्या म्हणे निश्चय घ्या ऎसा, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥४॥

· हरिनाम मधुर मनि गाइ सदा । गुरुवचनी निर्भय राहि सदा ॥धृ॥ सोडुनिय ही विषय-चिंतना, माया-मोह-विकाराची । सद्‍ विचार मनि वाहि सदा, गुरु-वचनी० ॥१॥ ‘अखिल जगाचा चालक तो प्रभु’, भाव असा दृढ ठेवुनिया । ममतेने जग पाहि सदा, गुरु-वचनी० ॥२॥ असत्यता ही नष्ट करोनी, नीतीने संसार करी । जन-सेवा-श्रम साहि सदा, गुरु-वचनी० ॥३॥ तुकड्यादास म्हणे, इहपर घे गोड करुनिया या देही । आत्म्याची घे ग्वाही सद, गुरु-वचनी० ॥४॥

· हरिभक्त लाडका हरिचा, ना दुजा कुणी । त्या मुक्त कराया येई, वैकुंठ सोडुनी ॥धृ॥ प्रल्हाद रक्षिला प्रभुने, वधुनि कश्यपू । दे मोक्ष गजेंद्रालागी, हटवुनी रिपु । पुरवीर चीर द्रौपदीला, रूप घेउनी ॥१॥ धरि लाज पांडवांचीहि रक्षिले तया । ध्रुव बाळ भक्ति करिता, त्या देत आश्रया । तुकड्या म्हणे हरी ध्या हो ! भक्ति करूनी ॥२॥

· हरिभजनाची नुरली जागा, स्वतंत्रतेच्या परी । उलटली परवशता ही पुरी ॥ गुलामगिरिच्या कर्कशा बेड्या, पडल्या पायी करी । धडकले परधर्माचे अरी ॥ तन-मन-धन हे नेति हरुनिया, हसवुनि अस्वलिपरी । लावती आग घरीचे घरी । (अंतरा) ‘हिंदु’चा नाश व्हावया चिंतिती मनी । अति दुर्बल केला देश चहुबाजुनी । वाटतो धाक हा गिळतिल कोण्या क्षणी । रक्षणकर्ता कोणिच नुरला, या पुढती कुणितरी । सखा हा भारत चिंता करी ॥१॥ गजांत-लक्ष्मी डुलली जेथे, सौभाग्याच्या गुणे । न होते काहि कुणाला उणे । सौख्य नांदले अखंड जेथे, ‘रामराज्य’ दणदणे । खेळले सैनिक निर्भयपणे ॥ तपोबलाच्या आत्मिय ऊर्मी, भक्त-उरी सणसणे । भोगिले वैभव भारत-भुने । (अंतरा) उतरला राहु आणि केतू हा अवकली । अन्नान्नदशा ही भारतभू पावली । ही परवशतेच्या भरी दुःखि जाहली । असा हिंदुनो ! वीर तुम्ही, कुणि गर्जा या अवसरी । सखा हा भारत चिंता करी ॥२॥ काय वाचता पुराण पोथ्या, राम-रावणी कथा । त्यातुनी काय काय ऎकता ? ॥ गेला रावण निघुनी आता, सोय काय चिंतिता ? । दुसरा झाला हा मागुता ॥ सुर-असुरांचा झगडा नेहमी, चालतसे भोवता । रहावे सावध अपुल्या हिता । (अंतरा) सांगतो राम हा उपासकांच्या प्रती । ‘व्हा उभे धर्मरक्षणा, त्यजा दुर्मती’ । यश येइल तेव्हा हिंदूंच्या भोवती । करा करा तातडी मिळोनी, वेळ नसे ही बरी । सखा हा भारत चिंता करी ॥३॥ मारुतिच्या अंकिल्या मुलांनो ! आर्याच्या बंधुनो ! । सिंधुच्या मर्यादित बिंदुनो ! ॥ कंसारीच्या गोपाळांनो ! नंद-नंद-कंदुनो ! । लाडक्या देवांच्या हिंदुनो ! ॥ शूर वीर श्रीछत्रपती शिवरायाच्या बिंदुनो ! । उभी व्हा तरुणांनो ! बंधुनो ! ॥ (अंतरा) हा धर्म-ध्वज घ्या करी, जपा मिळुनिया । कमवाच आपुला हक्क ‘हक्क’ म्हणुनिया । आळवा अंतरी देवदेवतासि या । तुकड्यादास म्हणे तोडा ही, गळफासाची सुरी । सखा हा भारत चिंता करी ॥४॥

· हरिभजनाची रुची जयाच्या हृदय-कमली लागली । तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥धृ॥ अभ्यासाने वाढत वाढत अंतरंगि पोहोचली । नशा अलमस्त उरी दाटली ॥ काय करावे, काय त्यजावे, बुध्दि हे विसरली । फकिरी शरिरावर धावली ॥ (अंतरा) बेतुफान लाटा चढती नयनावरी । कुणि द्या अंजनही ना उतरे बाहिरी । करि गुंग धुंद, डुलविते शरीरा पुरी । मन-वृत्ती ही वेडिच झाली, हरिच्या पदि लागली । तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥१॥ इंद्रिय-वृत्त्या भोगावाचुनि, तृप्त होत चालल्या । प्रवाही वाहति सुखाच्या खुल्या ॥ असो नसो कपडा अंगावरि चिंध्या अति शोभल्या । जरीला लाजविती चांगुल्या ॥ बिन कवडीची कंबर कैसी उदात्तशी शोभली । अधिक श्रीमंतीहुनि वाढली ॥ (अंतरा) नच बास घरी पण बादशाहि भेटली । चौखूट जहागिरि विश्वाची लाधली । प्रतिबंध-बंधने सगळी झाली खुली । स्वतंत्रतेची गढी मिळाली, अमरबुटी लाधली । तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥२॥ शास्त्र-पुराणे-वेदादिक हे, सुत्र बोलु लागले । वाचल्याविण उभे जाहले ॥ सृष्टि सुखाची सुंदर शोभा त्या भवती शोभली । जनांची जीव-वेली गुंफली ॥ अखिल जनाची मोहिनी माया खूष तयावर भली । मागण्या आज्ञा उभि जाहली ॥ (अंतरा) ही अमरबुटी पावली ‘हरी’ बोलता । विसरली भेदवृत्ती विषयांची लता । किति गोड वाटते अनुभव हा पाहता । तुकड्यादास म्हणे जिववृत्ती शीवरूप पावली । तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥३॥

· हरी आठवा मनी अपुल्या, भाव धरोनी । सोडूचि नका त्यासि कधी, जागृति, स्वप्नी ॥धृ॥ संसार भूल सारी, हा भ्रमचि ओसरा । हरि ठेवितसे या जीवा, वागु द्या बरा । सुख-दुःख सोसवोनि सदा, ध्यास घ्या मनी ॥१॥ ध्यानि धरा हरी नयनी, अंतरंगि या । रमवा सदा तयासी जिवी, आळवोनिया । तुकड्या म्हणे मिळे प्रभु हा, येइ धावुनी ॥२॥

· हरीच्या नाम-स्मरणाने, हरीचे तेज ये अंगी । मनाची दुष्टना नाशे, रमे मनही हरी-रंगी ॥धृ॥ मान-अभिमान टाकोनी, कुणी हरिनाम घे वाचे । तयासह नाचतो हसतो, हरी करि दास्य निःसंगी ॥१॥ हरीसी जाणुनी कोणी, हरीचे ध्यान धरि चित्ती । प्रकाशे तेज हृदयी त्या, लखलखे ब्रह्म सत्संगी ॥२॥ हरी म्हणता हरी होतो, हरी-रुपि साठुनी जातो । तो तुकड्यादास सांगतसे, तयाचे सुख ना भंगी ॥३॥

· हस एकदा तरी हस रे ! कुंजविहारी ! । त्या गोजिर्‍या रुपाची मज लागु दे तारी ॥धृ॥ कंठात वैजयंती, कानात कुंडले ती । शिरी मोरमुकुट झळके, किति केस कुरळ देती । किति गोड नेत्र हे, अधरी सुरस बांसरी ॥१॥ बघताचि तुझी वाट जिव हा, वेड्यापरी । बेचैन सदा राही, मन वृत्ति बावरी । दिसलास तसा बोल सख्या ! एकदा तरी ॥२॥ मन बावरे अता हे तव ध्यान सोडि ना । बस जन्मजन्मिचीही, ती हरलि कल्पना । तुकड्यास पदी घे आपुल्या, आस कर पुरी ॥३॥

· हा खेळ प्रभूच्या घरचा, मिटवाया हात कुणाचा । ये पुढे ? ॥धृ॥ ही निसर्ग बागहि त्याची, तोडाया छाति कुणाची । ये पुढे ? ॥ मोलाविण अग्नि-पाणी, देतो या लोकी कोणी । ये पुढे ? ॥ (अंतरा) हा नसे, नसे परि दिसे, भास व्यर्थसे, खेळ मायेचा, जाणता कोणहो याचा ? ये पुढे ॥१॥ स्तंभावीण रचना केली, गवसली बुध्दिची खोली । कोणत्या ? । पाण्यावर रचले भूला, साधते काय मनुजाला । कोणत्या ? ॥ रवि-चंद्र-तारका अधर, जडविता आलि का कोर । कोणत्या ? ॥ (अंतरा) सागरा, ऊत ये पुरा, ऊर्मिसी झरा । वाहतो कैचा ? पाहणारा ‘साक्षी’ याचा । ये पुढे ॥२॥ कोण या-मुळाशी आहे ? हे बघता खाली हाय । जाणते ॥ हा जड-चैतन्य विवाद, जाणती योगि संवाद । जाणते ॥ ‘एकाच शक्तिची वेली, गुंफलि’ ही जाणे बोली । जाणते ॥ (अंतरा) तो हरी, निराळा दुरी, दिसेना वरी । परी सर्वांचा, भेद हा जाणता त्याचा । ये पुढे ॥३॥ एकाच जिवाने केली, परि भिन्न-भिन्नता झाली । लोकि या ॥ कुणि सूर-असूर बनावे, कुणि खावे, कोणि द्यावे । लोकि या ॥ कुणि सुखी दुःखि कुणि भोगी, कुणि राहति जन्मी रोगी । लोकि या ॥ (अंतरा) ह्या खुणा, जाणि तो म्हणा, खरा शाहणा । पुत्र सद्गुरुचा, तुकड्यास प्रेम हा त्याचा । ये पुढे ॥४॥

· हा खेळ प्रभूच्या घरचा, मिटवाया हात कुणाचा । ये पुढे ? ॥धृ॥ ही निसर्ग बागहि त्याची, तोडाया छाति कुणाची । ये पुढे ? ॥ मोलाविण अग्नि-पाणी, देतो या लोकी कोणी । ये पुढे ? ॥ (अंतरा) हा नसे, नसे परि दिसे, भास व्यर्थसे, खेळ मायेचा, जाणता कोणहो याचा ? ये पुढे ॥१॥ स्तंभावीण रचना केली, गवसली बुध्दिची खोली । कोणत्या ? । पाण्यावर रचले भूला, साधते काय मनुजाला । कोणत्या ? ॥ रवि-चंद्र-तारका अधर, जडविता आलि का कोर । कोणत्या ? ॥ (अंतरा) सागरा, ऊत ये पुरा, ऊर्मिसी झरा । वाहतो कैचा ? पाहणारा ‘साक्षी’ याचा । ये पुढे ॥२॥ कोण या-मुळाशी आहे ? हे बघता खाली हाय । जाणते ॥ हा जड-चैतन्य विवाद, जाणती योगि संवाद । जाणते ॥ ‘एकाच शक्तिची वेली, गुंफलि’ ही जाणे बोली । जाणते ॥ (अंतरा) तो हरी, निराळा दुरी, दिसेना वरी । परी सर्वांचा, भेद हा जाणता त्याचा । ये पुढे ॥३॥ एकाच जिवाने केली, परि भिन्न-भिन्नता झाली । लोकि या ॥ कुणि सूर-असूर बनावे, कुणि खावे, कोणि द्यावे । लोकि या ॥ कुणि सुखी दुःखि कुणि भोगी, कुणि राहति जन्मी रोगी । लोकि या ॥ (अंतरा) ह्या खुणा, जाणि तो म्हणा, खरा शाहणा । पुत्र सद्गुरुचा, तुकड्यास प्रेम हा त्याचा । ये पुढे ॥४॥

· हिंदभुच्या लेकरांनो, स्वस्थ का बसता असे ? । भारताचे ग्रहण हे, नेत्री तुम्हा बघवे कसे ॥धृ॥ मार्ग काढा उन्नतीचा, या पुढे सरसावुनी । भेद-भावा सोडुनी, घ्या प्रेम-ऎक्याचे पिसे ॥१॥ जीर्ण ज्या चाली-रिती, डोळे मिटवुनी ना करा । वेळ ही पाहोनिया, कर्तव्य शोधा सायसे ॥२॥ आचरा सुविचार-वृत्ती, अनुभवाला घेउनी । अंध-श्रध्दा सोडुनी, व्यवहार साधा धाडसे ॥३॥ राहु द्या सत्प्रेम चित्ती, श्रीहरीसी गावया । नांदु द्या विजयी ध्वजा, द्या प्राण समरी वीरसे ॥४॥ दास तुकड्या सांगतो, काढा घरातुनी आळसा । काव्य बनवा आपुले, स्वातंत्र्य जे लाभे तसे ॥५॥

· हिंदभूच्या भाविकांनो ! आत्मबल मिळवा अता । भ्याड वृत्ती सोडुनी, हृदयी धरा बुध्दीमत्ता ॥धृ॥ हात जोडुनी का असे हो ! ‘धर्म धर्म’ चि बोलता ? । बोलणे हे सोडुनी, दावा स्वधर्माची सत्ता ॥१॥ अंतःकरणे मोकलोनी, एक व्हा एकी करा । संप्रदाय नि पंथ हे, विसरूनी घ्या कर्तव्यता ॥२॥ देव सर्वांचा सखा, आम्ही तयाची लेकरे । भेद मग का कोरडा ? जाळा जशी जळते चिता ॥३॥ दिव्य ज्योती चमकु द्या, भानू जसा रविमंडळी । अर्जुनासम वीर व्हा, हा वेळ ना दवडा रिता ॥४॥ दास तुकड्या सांगतो, ही वेळ जाता आळसे । रूढि ग्रासिल आपुली, जाईल ही स्वातंत्र्यता ॥५॥

· हो जागा, का निजला सखया ! अज्ञानामाजी ? । विसरुनिया संधान आपुले, केला भव राजी ॥धृ॥ सुख नाही, सुख नाही बापा ! या झोपेमाजी । लावुनि घेशी खटपट मागे. मग करिशी हाजी ॥१॥ नरजन्माची वेळ गमवुनी, का बनशी पाजी ? । समज अता तरि, सत्संगाने अनुभव घे आजी ॥२॥ आत्मस्वरूपी स्थिर होउनी, सोडी जग-लाजी । अंतर्मुख कर वृत्ति आपुली, धर निश्चय आजी ॥३॥ तुकड्यादास म्हणे का फिरशी ? धरि गुरुचरणा जी ! सत् चित् रुप सोडुनी राहशी, चोरांच्या शेजी ॥४॥

धन्य ते सभाग्य नर आणि नारी | करिताती वारी पंढरीची ||

धन्य ते सभाग्य नर आणि नारी | करिताती वारी पंढरीची ||
तयांचे चरणी माझे दंडवत | जे नेमे माझ्या गात विठोबासी ||
दिवाळी दसरा अवघे पर्वकाळ | नांदती सकळ तया घरी ||
चोखा म्हणे धन्य धन्य ते संसारी | नेमे करिती वारी पंढरीची ||

एक वेळ करीं या दु:खावेगळें।

एक वेळ करीं या दु:खावेगळें।
दुरितांचे जाळे उगवुनि।।
आठविन पाय हा माझा नवस।
रात्री आणी दिवस पांडुरंगा।।
बहु दूरवरि भोगविलें भोगा।
आतां पांडुरंगा सोडवावें।।
तुका म्हणे काया करीन कुरवंडी।
ओंवाळुनि सांडीं मस्तक हें।।